आठवड्याचे समालोचन – २७ जून ते १ जुलै – रात्रीच्या गर्भांत असे उद्याचा उषःकाल

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Source - NASA Image of the day

Source – NASA Image of the day

२४ जूनचा शुक्रवार हा ब्रेक्झीटचा ! सगळ्या जगातील मार्केट शुक्रवारी कोसळली. ‘BLACK FRIDAY’च म्हणावा लागेल. भारताच्या दृष्टीने मात्र एक नवी उमेद निर्माण झाली. हजार पाईंट कोसळलेले मार्केट ५०० पाईंटपेक्षा जास्त सुधारले. म्हणजेच ग्लास अर्धा रिकामा म्हणायचा की अर्धा भरलेला म्हणायचा हे समजले नाही. शुक्रवारची मार्केट ची घसरण ही खरेदी करणाऱ्यांना मेजवानी ठरली. एक तारखेच्या शुक्रवारी NSE निर्देशांक निफ्टीने ८३२८ चा उच्चांक तर BSE निर्देशांक सेन्सेक्सने २७१४४ चा उच्चांक गाठला. सर्वांना बुल रनची चाहूल लागली. स्माल कॅप मिडकॅप, लार्जकॅप शेअर्स या ना त्या कारणाने तेजीत होते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • WORLD बँक सोलर एनर्जी साठी फंडिंग करणार आहे.

सरकारी announcements

 • NATIONAL MINERAL EXPLORATION पॉलिसी जाहीर केली. या पोलीसीमुळे धातूमध्ये व्यवहार करणार्या कंपन्यांना दिलासा मिळाला.
 • मंत्रीमंडळाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मंजुरी दिली. यामुळे लोकांच्या हातांत जास्त पैसा येईल मागणी वाढेल याचा सर्वच क्षेत्रांना फायदा होईल पण FMCG, ऑटो, REALTY या क्षेत्रांना विशेष फायदा होईल.
 • मंत्रीमंडळाने SHOP & ESTABLISHMENT ACT मध्ये सुधारणा केली. या मुळे २४/ ७ दुकाने, हॉटेल्स, MALLS, बॅंका बिझीनेस करू शकतील. यामुळे या क्षेत्रातील सर्व शेअर्सच्या किंमती वाढल्या.
 • चीनमधून आयात होणाऱ्या दुधाच्या आयातीला सरकारने मनाई केली. याचा फायदा पराग मिल्क, अमूल या कंप न्यांना होईल.
 • संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै पासून सुरु होईल असे जाहीर केले.
 • सरकारने स्टीलवर बसविलेल्या anti-dumping ड्युटीची मुदत वाढवली.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • IOB आणी UCO बँक हे शेअर्स F & O मधून बाहेर पडले आणी NIIT टेक हा शेअर F & O मध्ये दाखल झाला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • पाउस ऑटोविक्रीचे आकडे आले. मारुतीचे उत्पादन कमी झाले. सुब्रोस या युनिटमध्ये आग लागल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. M&M च्या TRACTOR विक्रीमध्ये वाढ झाली.
 • ६ जुलैला ईदच्या निमित्तान सलमानखानचा ‘सुलतान’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. याचा फायदा INOX,PVR, मुक्ता आर्ट्स अशा कंपन्याना झाला.
 • सोन्याच्या भावांत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या कंपन्या उदा :- मन्नापुरम, मुथूट फायनांस. तसेच जेम्स आणी ज्युवेलरी क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपन्यांचा फायदा झाला. उदा :- टायटन, TBZ
 • जेपी असोशीएट आणी अल्ट्राटेक सिमेंट यांच्यातील फेब्रूआरीमध्ये दोन सिमेंट युनिट खरेदी करण्यासाठी झालेला करार अडचणीत आला. अल्ट्राटेकने देऊ केलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमतीची ऑफर जेपी असोशीएटला मिळाली. अल्ट्राटेकने याबाबतीत पुन्हा वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली आहे.
 • युरो मेडिसिन एजन्सीने CEFUROXINE हे औषध युरोपमध्ये विकण्यासाठी मंजुरी दिली. याचा फायदा अलकेम LAB या कंपनीला होईल.
 • NHPC ही सरकारी क्षेत्रातील कंपनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, युपीमध्ये विंड एनर्जी, सोलर एनर्जी यांच्यामध्ये ३००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
 • अदानी ग्रूप त्यांच्या अदानी फायनान्सिअल या कंपनीद्वारे (INFRASTRCTURE, रिअल इस्टेट,)या क्षेत्रांत फ़ायनान्सिअल सर्विस क्षेत्रांत प्रवेश करण्याच्या विचारांत आहे. ही कंपनी MACQUARIE चे NBFC युनिट खरेदी करण्याच्या विचारांत आहे.
 • उदय योजनेमुळे REC, PFC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांना फायदा होईल.
 • DLF चे प्रमोटर्स कंपनीमध्ये Rs १०००० कोटीचे शेअर्स प्रेफरन्सिअल इशूच्या माध्यमातून कम्पनीत आणणार आहेत. त्यामुळे DLF ही रीअलटी क्षेत्रातील कंपनी DEBTFREE कंपनी होईल.
 • टाटा कम्युनिकेशन ही कंपनी त्यांच्या NEOTEL या साउथ आफ्रिकन सबसिडीअरीमधील ६७% स्टेक Rs २९०० कोटींना विकणार आहे.
 • रिलायंस आणी स्टेट बँक पेमेंट बँकेसाठी जॉइंट वेंचर करणार आहेत.
 • KPIT टेक्नोलॉजी या कंपनीने profit वार्निंग दिली तरी कंपनीच्या शेअर वाढतो आहे. अशावेळी सावधानता बाळगावी.
 • स्टेट बँकेने आपला NSE मधील ५% स्टेक Rs ९११ कोटींना विकला.
 • ITDC ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी आपली काही हॉटेल्स विकणार आहे.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • ‘L&T इन्फोटेक या L&T ग्रूपच्या कंपनीचा ipo ११ जुलै ते १३ जुलै या दरम्यान येणार आहे. प्राईस band Rs ७०५ ते Rs ७१० असेल. रिटेल गुंतवणूकदारांना Rs १० सूट राहील. या IPOची गुंतवणूकदार खूप वेळापासून आतुरतेने वाट पहात आहेत.
 • क्वेस कॉर्पोरेशन या कंपनीचा इशू १४७ वेळेला सबस्क्राईब झाला.
 • महानगर gas या कंपनीचे शानदार लिस्टिंग झाले. IPO मध्ये Rs ४२१ दिलेला शेअर Rs ५४० ला लिस्ट झाला. गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
 • भारती रिटेलचा IPO नजीकच्या भविष्यांकाळांत येऊ शकेल.
 • रिलायंस आणी स्टेट बँक पेमेंट बँकेसाठी जॉइंट वेंचर करणार आहे.
 • KPIT टेक्नोलॉजी या कंपनीने profit वार्निंग दिली तरी कंपनीच्या शेअर वाढतो आहे. अशावेळी सावधानता बाळगावी.
 • या आठवड्यांत DR रेड्डीज, विप्रो, या कंपन्यांच्या BUYBACK तसेच ITC च्या बोनस इशुची EXडेट झाली

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

रेक्झीट, ब्रेक्झीट हे सर्व धक्के मार्केटने लीलया पचवले.चांगला पडलेला पाउस आणी सरकारने घेतलेले महत्वाचे सकारात्मक निर्णय यामुळे एक्सपायरी वीक असूनही मार्केटने आपली आगेकूच चालू ठेवली. पण निरीक्षणातून असे जाणवते की अशा वेळेलाच कमी किंमतीचे शेअर्स तेजीत असतात. किरकोळ गुंतवणूकदार असे शेअर्स चढ्या भावाला घेतात, वेळेवर विकत नाहीत आणी मग आम्ही फसलो आमचं नुकसान झालं असा गाजावाजा करतात. अशा वेळी सावध राहिले पाहिजे झटपट फायदा घेवून बाहेर पडले पाहिजे. एखाद्या कंपनीने प्रॉफिट वार्निंग दिली असतानाही शेअर वाढत असेल तर तो कां वाढतो आहे त्याची शहानिशा करावी. योग्य खुलासा न मिळाल्यास अशा शेअर्सच्या वाटेला जाऊ नये.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७१४४ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८३२८ वर बंद झाला.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २७ जून ते १ जुलै – रात्रीच्या गर्भांत असे उद्याचा उषःकाल

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ४ जुलै ते ८ जुलै – मार्केट्ची पहिली युनिट टेस्ट | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s