आठवड्याचे समालोचन – ४ जुलै ते ८ जुलै – मार्केट्ची पहिली युनिट टेस्ट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

board-361516_640शेअर मार्केट हा आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे असं एकदा समजलं कि मार्केट समजण सोप जातं आणी प्रत्येक गोष्टीचा उलगडा होतो. माझी मुलं शाळेत जात असताना तिमाही,सहामाही, नऊमाही आणी वार्षिक अशा परीक्षा असायच्या. काही शाळांत पहिली युनिट टेस्ट,नंतर टर्मिनल, दुसरी युनिट टेस्ट, आणी वार्षिक अशा परीक्षा असत. तसेच आपल्या मार्केटमधील कंपन्याना त्यांच्या प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी शेअरहोल्डर्सना देणे बंधनकारक आहे. त्यानुसार जुलै महिन्यांत ‘एप्रिल ते जून’ या तिमाहीचे निकाल जाहीर होतात. म्हणजेच कंपन्यांची आणी पर्यायाने मार्केटचीही पहिली युनिट टेस्ट असते.या युनिट टेस्टमधील पहिला महत्वाचा निकाल सोमवारी इंडस इंड बँकेचा येईल.

सरकारी announcements

 • सरकार पेट्रोल मध्ये २२.५% आणी डीझेलमध्ये १५% इथेनॉल ब्लेन्डीन्गला मंजुरी देण्याचा विचार करत आहे.
 • सरकारने CNG च्या किमती वाढवल्या.
 • सरकार नॉनकन्वेन्शनल एनर्जी अर्थात अपारंपारिक उर्जा धोरण जाहीर करेल. याचा सुझलॉन. युजास या सारख्या शेअर वर परिणाम होवू शकतो
 • केरळ राज्य सरकारने ब्रांडेड जंक फूडवर १४.५ % FAT लावला. तसेच केरळ राज्य सरकारने कोपरा (खोबरं) आणी तांदुळावर ५% कर लावला. यामुळे मेरिको, LT फूड्स,KRBL, कोहिनूर फूड्स, या कंपन्यांच्या बिझिनेसवर परिणाम होईल.
 • 10 वर्षापेक्षा जुन्या वाहनांवर केरळ राज्य सरकार ग्रीन कर लावण्याच्या विचारांत आहे.
 • सरकारने नॉन-युरिया खतांच्या किंमती प्रती टन Rs ५००० कमी केल्या. कॉरोमोंडल फरटीलायझर सारख्या शेअरवर याचा परिणाम होवू शकतो
 • सरकारने AXIS बँकेतील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा ६२% वरून ७४% वर नेण्यास मंजुरी दिली.
 • सरकार प्रिंट मिडियामध्ये FDI लिमिट २६% वरून ४९% करणार आहे. याचा फायदा जागरण, हिंदुस्थान मिडिया या कंपन्यांना होईल.
 • सरकार इलेट्रिसिटी ACT मध्ये बदल करणार आहे. रिन्यूएबल एनर्जीचा विचार केला जाईल.
 • EPFO चा पैसा ETF (EXCHANGE ट्रेडेड फंड ) मध्ये गुंतवावा या बाबतीत निर्णय घेतला जाईल. कारण ETF मोठ्या कालावधीसाठी भरपूर पैसा गुंतवू शकतात. ही मर्यादा ५% वरून ७.५% पर्यंत वाढवण्याचा विचार आहे.
 • सरकार पावसाळी अधिवेशनांत GST बिल पास होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. GST पास होण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल त्यासाठी ७५% मतांची गरज आहे. बिल पास होताना गडबड गोंधळ असता कामा नये.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • आयर्न ओअरच्या आयात निर्यातीत खूप वाढ झाली आहे. याचा फायदा अदानी पोर्टला होईल.
 • ग्रासिमच्या नागदा स्टेपल फायबर प्लांटमध्ये उत्पादन सुरु झाले.
 • जेपी ग्रूप आणी अल्ट्राटेक मध्ये समझोता झाला. अल्ट्राटेकची उत्पादन क्षमता ९ कोटी टन होईल. हे डील पूर्ण होण्यास 9 महिने लागतील. या डीलमुले जेपी ग्रुपचे कर्ज Rs ३०००० कोटी वरून Rs १५०००कोटी होईल. डीलची किंमत Rs १६१८९कोटी झाली म्हणजेच जवळ जवळ Rs २०० कोटीनी वाढली.
 • बँक ऑफ बरोडा आणी ICICI बँकेला ‘CIBIL’ मधील आपला स्टेक विकून अनुक्रमे Rs १०० कोटी आणी Rs १२० कोटी मिळाले.
 • IFCI ने आपल्या NSE मधील ३.५५ % स्टेक पैकी ०.५ % स्टेक विकला.
 • डीश टी व्ही व्हिडीओकॉन चा D2H बिझिनेस विकत घेणार आहे.

नजीकच्या काळांत येणारे IPO

या आठवड्यांत आलेल्या QUESS CORP च्या IPO ला Rs ६०००० कोटींचा प्रतिसाद मिळाला. एल आय सी सारखी दिग्गज संस्था आख्या वर्षांत एवढी गुंतवणूक करू शकते. याचा विचार करता एका IPOला एवढा प्रतिसाद मिळाला हे येणाऱ्या बुल रनचे लक्षण आहे कां ? या आठवड्यांत QUESS कॉर्पचे लिस्टिंग अपेक्षित आहे.

 • या आठवड्यांत L & T इन्फोटेक चा IPO येत आहे. प्राईस band Rs ७०५ ते Rs ७१० आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना Rs १० सूट आहे. मिनिमम लॉट २० चा आहे.
 • कोल इंडिया ही कंपनी ११ जुलैला शेअर BUYBACK करेल.
 • टेक्नोइलेक्ट्रिक या कंपनीची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे त्यांत बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार होण्याची शक्यता आहे.
 • PNB हौसिंग फायनांस या कंपनीने IPO साठी DRHP दाखल केले.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

ज्या शेअरमध्ये FII खरेदी करत असतील त्या शेअरकडे लक्ष द्यावे. किंवा मिडकॅप आणी स्मालकॅप म्युच्युअल फंडांची खरेदी कोणत्या शेअर्स मध्ये सुरु आहे हे पहावे. किरकोळ गुंतवणूकदारांना अनेक बातम्या उशिरा समजतात तेव्हा शेअर्सची किंमत वाढलेलीच असते. शेअर खरेदी केल्यास महाग पडतो. खरेदीची किंमत आणी विक्रीची किंमत यातील फरक म्हणजेच फायदा कमी होतो. बँकांचे NPA जाहीर झाले. ज्या कंपन्या आपले नॉनकोअर ASSET विकून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असतील अशा कंपन्यांना ज्या बँकांनी कर्ज दिले असेल त्या बँकांचे शेअर वाढतात.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७१२६ आणी NSE निर्देशांक ८३२३ वर  बंद झाला.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ४ जुलै ते ८ जुलै – मार्केट्ची पहिली युनिट टेस्ट

 1. Akshay Kharage

  khupch mast

  2016-07-08 23:25 GMT+05:30 “Stock Market आणि मी” :

  > surendraphatak posted: “आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक
  > करा शेअर मार्केट हा आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे असं एकदा समजलं कि मार्केट
  > समजण सोप जातं आणी प्रत्येक गोष्टीचा उलगडा होतो. माझी मुलं शाळेत जात असताना
  > तिमाही,सहामाही, नऊमाही आणी वार्षिक अशा परीक्षा असायच्य”
  >

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ११ जुलै ते १५ जुलै – GOOD BYE ब्रेक्झीट, WELCOME INDIA | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s