आठवड्याचे समालोचन – ११ जुलै ते १५ जुलै – GOOD BYE ब्रेक्झीट, WELCOME INDIA

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Stock market information in marathiया आठवड्यांत खूप मजा आली. ‘BULLS’ चा पूर्णपणे वरचष्मा राहिला. मिडकॅप निर्देशांकांत १०% तेजी आली. कमोडीटीच्या किमती कमी झाल्यामुळे लहान कंपन्यांना फायदा झाला. ब्रेक्झीटच्या परिणामांच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूक लांबणीवर टाकलेल्या गुंतवणूकदारांनी स्थानिक घटनांना जास्त महत्व देवून आंतरराष्ट्रीय वातावरणातील  भीती मनातून काढून टाकली. त्यामुळे मार्केट गेल्या आठवड्यांत वाढतच राहिले..

 


आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनमध्ये FDI लिमिट वाढवल्यामुळे धातूंमध्ये तेजी आली.
 • जपानने आपल्या 2016 च्या GDPचे अनुमान १.७% वरून ०.९ केले
 • USA मधील जॉबविषयीचे आकडे चांगले आले.
 • USA मध्ये H1आणी L1 व्हिसाच्या बाबतीत विधेयक मांडणार आहेत.
 • USA मधील अध्यक्षीय निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. त्यामुळे आता US मधील मार्केटमध्ये प्रीपोल rally येईल असे भारतीय मार्केटला वाटते आहे.

सरकारी announcements

 • सरकारने वाय फाय उद्योगासाठी धोरण निश्चित करण्यासाठी सामान्य लोकांकडून सुचना आणी शिफारशी मागवल्या आहेत. लोकांची मतेही वाय फाय विषयी धोरण ठरवताना विचारांत घेतली जातील. या क्षेत्रांत बिझीनेस करणारी डी-लिंक ही एकच कंपनी आहे.
 • जेम्स & ज्युवेलरी क्षेत्रांतल्या कंपन्यांना सवलत जाहीर केली. ज्या कंपन्या १% एवढी एक्साईज ड्युटी भरतात त्यांचे ऑडीट २ वर्षे होणार नाही.या क्षेत्रातील कंपन्यांच्या एक्साईजसाठीची टर्नओवर लिमिट १२ कोटींवरून १५ कोटींवर होईल.
 • NBCC मधील १५% हिस्सा विकण्यासाठी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
 • सरकार लेदर उद्योगाची एक्साईज ड्युटी कमी करणार आहे. याचा फायदा मिर्झा, RELAXO, बाटा, लिबर्टी या कंपन्यांना होईल.
 • ITI कंपनीतील सरकारचा हिस्सा विकण्यासाठी तसेच कंपनीचे ASSET विकण्यासाठी आणी कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मंजुरी दिली.
 • भारत सरकारने दरदिवशी ४१ किलो मीटर रस्ता बांधण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. आता यांत चीनी कंपन्याही टेंडर भरू शकतील. चायना कॉर्पोरेशन ही कंपनी चीनमधले ६५%रस्ते बनवते.या कंपनीच्या भारतातील प्रवेशामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढेल. याचा परिणाम HCC, IRB, गायत्री प्रोजेक्ट्स या कंपन्यांवर होईल.
 • इंडोनेशिया आणी विएतनाम मधून आयात होणाऱ्या स्पेसिफिक फायबर बोर्डवर (6MM पेक्षा जास्त डेन्सिटी असलेल्या) ANTIDUMPING ड्युटी लावली. याचा फायदा ग्रीनप्लाय, मंगलम टिंबर, युनिप्लाय, सेन्चुरी पलाय या कंपन्यांना होईल.
 • प्रत्येक महिन्यांत रॉकेलच्या किंमतीत Rs ०.२५ (२५ पैसे) वाढ होईल असे जाहीर केले. यामुळे ONGC वरील Rs १००० कोटींचा सबसिडीचा भार कमी होईल. या निर्णयाचा फायदा ONGC, ऑईल इंडिया, तसेच GAIL या कंपन्यांना होईल.
 • कॉंग्रेस या राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्ष्याने सामंजस्याची भूमिका घेण्याचे ठरवल्यामुळे GSTचे बिल आता पावसाळी अधिवेशनांत राज्यसभेत आवश्यक त्या बहुमताने मंजूर होईल अशी अशा निर्माण झाली आहे. या बातमीमुळे सर्व लॉजिस्टिक कंपन्याच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली. परंतु दिनांक १५ जून मध्ये झालेल्या बैठकीत काही जास्त निष्पन्न झाले नाही
 • चीनमधून आयात होणाऱ्या रेफरीजंट वर ANTIDUMPING ड्युटी लावली याचा फायदा REFEX रेफ्रिजरेटर या कंपनीला होईल.
 • सरकारने आपला SUTTI (SPECIAL UNDERTEKING ऑफ UNIT TRUST ऑफ INDIA) मधील स्टेक विकण्याचे ठरवले आहे या स्टेक मध्ये सर्व चांगले शेअर्स आहेत. ते विकल्यास सरकारच्या डायव्हेस्टमेंट लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नांत मदत होईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI च्या गव्हरनरपदी नीती आयोगाचे उपाध्यक्ष श्री पनगरिया यांची निवड जवळ जवळ निश्चित झाली आहे. अजून औपचारिक घोषणा व्हावयाची बाकी आहे. यामुळे रेट कट होतील असे मार्केटला वाटते.
 • RBI ने RESTRUCTURING साठी गाईडलाईन्स जाहीर केल्या. स्कीमचे नाव SAA ( SUSTAINABLE RESTRUCTURING ऑफ STRETCHED ASSETS) असे जाहीर केले आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • IIP चे आकडे वजा -१.३५ वरून +१.२ झाले. गेल्या २-३ वर्षांत जागतिक मंदीमुळे मागणी पुरवठ्यावर परिणाम झाला. BOTTOMING out झाले. सरकारने आपले ‘गव्हर्नमेंट स्पेनडिंग’ वाढवल्यामुळे IIP सुधारले 7 व्या वेतन आयोगातील वेतन /पेन्शन वाढीमुळेही देशामध्ये सर्वत्र मागणीमध्ये वाढ होईल. यामुळे गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल
 • तसेच या वर्षीच्या आवश्यक तेवढ्या आणी सर्वच प्रदेशात होणाऱ्या पुरेशा पावसामुळे शेती आणी संबंधीत उद्योगातील उत्पन्न वाढल्यामुळे ग्रामीण भागातील उत्पन्न आणी मागणी वाढल्यामुळेही गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल.
 • CPI ( किरकोळ ग्राहक निर्देशांक) ५.७६% वरून ५.७७ झाला. म्हणजे जवळ जवळ स्थिर राहिला.
 • WPI(घाऊक किंमत निर्देशांक) मध्येही वाढ झाली. हा जून महिन्यांत १.६२ झाला. याआधी हा ०.७९ होता.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • बायोकॉन या कंपनीने जपानमध्ये इन्सुलिनचे औषध launch केले.
 • KKR ने क्वालिटी LTD. मध्ये ५५० कोटी गुंतवणूक केली. याचा फायदा कंपनीला व्याजातील बचतीच्या स्वरूपांत होईल
 • दिल्ली हायकोर्टाने आयकर विभागाने केलेल्या केसमध्ये NDTV च्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे या शेअरची किंमत वाढली.
 • सोन्याची आयात वाढली आहे. याचा फायदा STC आणी MMTC या कंपन्यांना होईल कारण या कंपन्यांमार्फत सोन्याची आयात होते. STC चा नंबर पुनरुज्जीवित होणार्या कंपन्यांमध्ये आहे.
 • श्रीराम इपीसी या कंपनीच्या कर्जाचे रुपांतर इक्विटीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे या कंपनीवरील व्याजाचा बोजा कमी होईल.
 • अशोक LEYLANDला वेगवेगळ्या राज्याकडून ऑर्डर्स मिळाल्या.
 • निरमा लाफार्ज चे assets US$१.४ बिलियनला विकत घेणार आहे.
 • एडलवाईझला IRDA कडून जनरल इन्शुरन्स करण्यासाठी मजुरी मिळाली. ही कंपनी आयुर्विम्याच्या क्षेत्रांत आधीपासूनच आहे.
 • IDFC बँकेने विद्याला मायक्रोफायनांस या कंपनीचे १००% अधिग्रहण केले. या कंपनीचे १२ लाख ग्राहक असून असून Rs १५०० कोटींची मालमता आहे तसेच या कंपनीचा बिझिनेस ७ राज्यांत चालतो. हे अधिग्रहण डिसेंबर २०१६ पर्यंत पुरे होईल. IDFC बँकेने भारतातील सर्वांत मोठी रिटेल बँक बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 • ऑपटो सर्किट या कंपनीच्या शेअरची किंमत Rs १२५ होती. याचे चांगले दिवस असताना कायम अधिग्रहण करताना कर्ज काढून पैसा गोळा केला. कंपनीतून पैसा काढण्याचा हा एक उपाय असतो. रेटिंग एजनसीने रेटिंग करणे बंद केल्यामुळे शेअरच्या किंमतीत खूपच घट झाली. सरकारकडून राहत PACKAGE मिळणार असल्यामुळे या शेअरची किंमत काही प्रमाणांत वाढली.
 • केर्न आणी वेदान्ता या कंपन्यांच्या मर्जर मधील एक अडथळा लवकरच दूर होणार असे मार्केटला वाटले. एल आय सी ने या मर्जरला मंजुरी देण्याचा प्रश्न विचारार्थ घेतला. त्यामुळे दोन्ही शेअर्सच्या किंमती वाढल्या. पण एल आय सी ने सांगितले की अजून या बाबतीत निर्णय झाला नाही.
 • इंडियाबुल्स ग्रूपच्या सर्व ऑफिसवर आयकर खात्याने धाड टाकल्यामुळे या ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सची किंमत कमी झाली.
 • टी सी एस चा तिमाही निकाल चांगला आणी अपेक्षेप्रमाणे आला. रेव्हेन्यू आणी नफा थोडा कमी झाला. पण मार्जिनच्या दृष्टीने निकाल चांगले आहेत. ब्रेक्झीटचा परिणाम दुसऱ्या आणी तिसर्या तिमाहीमध्ये दिसेलच. टी सी एसने Rs ६.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. टी सी एस चा शेअरही पडला.
 • इन्फोसिसचा तिमाही निकाल मात्र निराशाजनक आला. नफा Rs ३४३६ कोटी तर एकूण उत्पन्न Rs १७५३५ कोटी आणी US $ उत्पन्न २५०.१० कोटी झाले. कंपनीने 100M+ तीन क्लायंट जोडले. कंपनीने आपला २०१६ साठीचा गायडंस १०% ते १२% केला. आधी हा गायडंस ११.५ ते १३.५ होता. शेअरमार्केटला हे निकाल पसंत पडले नाहीत त्यामुळे इन्फोसिसचा शेअर Rs १०० पडला.
 • रिलायंस इंडस्ट्रीजचे १ल्या तिमाहीचे निकाल खूपच चांगले आले. STANDALONE नफा Rs ७५४८ कोटी, उत्पन्न Rs ५३४९६ कोटी, ग्रॉस रिफायनिंग मार्जिन US $११.५०BBL, पेटकेम EBIT Rs २९०१ कोटी, मार्जिन १५%, उत्पन्न Rs १९४०९ कोटी. रीफायनिंग मार्जिन १३.४% . या निकालांत सर्व बाबतीत प्रगती झालेली आहे.
 • इन्फोसिस आणी टी सी एस च्या निराशाजनक तिमाही निकालानंतर रिलायंस इंडस्ट्रीजच्या निकालांनी जणू काही मार्केटला संजीवनी मिळाली.रिलायंसच्या रिटेल बिझीनेसमध्ये प्रगती झाली.
 • इंडस इंड बँक, एल आय सी हौसिंगफायनान्स, CYIENT या कंपन्यांचे निकाल चांगले आले.
 • DCB चा पहिल्या तिमाहीचा निकाल आला. NPA मध्ये वाढ झाली.

या आठवड्यातील कॉर्पोरेट एक्शन आणी लिस्टिंग

 • PFC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.
 • मेनन बेअरिंगने ५ शेअरमागे १ बोनस शेअर जाहीर केला. नवभारत व्हेन्चर या कंपनीची २२ जुलै रोजी बोर्ड मीटिंग आहे या बैठकीत बोनस इशूबाबतीत विचार केला जाईल.
 • MAX या कंपनीचे तीन भाग झाले. (१)MAX फ़ायनान्सिअल (२) MAX व्हेन्चर (३) MAX इंडिया
  यापैकी MAX इंडियाचे लिस्टिंग या आठवड्यांत गुरुवारी Rs १८५ ला झाले.
 • सोलार इंडस्ट्रीज एक्स स्प्लिट आणी BPCL आणी ग्राईंडवेल नॉरटन एक्स बोनस झाला.
 • इगारशी मोटर्सचे प्रमोटर्स आपला १०% स्टेक OFS च्या माध्यमातून Rs ६५० प्रती शेअर या भावाने १२ जुलै नॉन रिटेल आणी १३ जुलै रिटेल गुंतवणूकदारांना विकणार आहेत.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • L&T टेक सर्विसेस या कंपनीच्या IPO साठी DRHP लवकरच दाखील केले जाईल. हा Rs १००० कोटींचा इशू असून L &T या कंपनीतील आपला १५% स्टेक ऑफर करील.
 • L&T IN FOTECH या कंपनीचा IPO ११.६ पट ओवरसबस्क्राईब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला क्वोटा ७.३ वेळेला ओवरसबस्क्राईब झाला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

IPO मध्ये एक गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. IPOची साईझ लहान असल्यास इशू खूप वेळेला ओव्हरसबस्क्राईब होतो. महानगर gas आणी क्वेस कॉर्प्स ह्या दोन्ही शेअर्सच्या किंमती लिस्टिंग नंतर वाढल्या नाहीत. ज्यांनी कुणी फार्म भरला पण शेअर्स लागले नाहीत त्यांनी IPOची किंमत लक्षांत ठेवावी. त्यावेळी जर सर्वजण शेअर महाग आहे असे सांगत असतील तर लिस्टिंगनंतर तो स्वस्त कसा होईल. त्यामुळे लिस्टिंगनंतर खरेदी करावा असे वाटले तरी मनावर ताबा ठेवून करेक्शन येईपर्यंत थांबणे उचित ठरते.

BSE निर्देशांक २७८३६ आणी निर्देशांक ८५४१ वर बंद झाला.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ११ जुलै ते १५ जुलै – GOOD BYE ब्रेक्झीट, WELCOME INDIA

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १८ जुलै ते २२५ जुलै – लिक्विडीटीने उघडले स्वर्गाचे द्वार | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s