आठवड्याचे समालोचन – १८ जुलै ते २२ जुलै – लिक्विडीटीने उघडले स्वर्गाचे द्वार

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
money-rain-1013711_640सध्या मार्केटमध्ये लिक्विडीटी आहे.लिक्विडीटी म्हणजे मार्केटमध्ये सर्व बाजूंकडून येणारा पैशाचा ओघ. भारतीय शेअरमार्केटमध्ये मुबलक प्रमाणांत पैसा येतो आहे. फेडने रेट वाढवणे पुढे ढकलले आहे. ब्रेक्झीटमुळे युरोपसुद्धा फ़ायनान्सिअल स्टीमुल्यस देईल.त्यामुळे संगीत वाजवते आहे आणी लिक्विडीटी वेगवेगळ्या शेअर्सना खुर्चीत बसवत आहे. जिथपर्यंत पैसा येतो आहे तिथपर्यंत ज्या शेअर्सना खुर्चीत बसवण्याची इच्छा बाळगतील ते शेअर्स वाढतील. कारण संगीत खुर्चीमध्ये संगीत केव्हा थांबेल हे सांगतां येत नाही.

आंतरराष्ट्रीय घडामोडी 

 • ECB ने आपल्या व्याजाच्या दरांत किंवा वित्तीय धोरणांत कोणताही बदल केला नाही. ब्रेक्झीटचा काहीतरी परिणाम होईल असा अंदाज होता.
 • IMF (INTERNATIONAL MONETARY FUND) ने भारताच्या प्रगतीचे लक्ष्य ७.७% वरून ७.४% केले.

सरकारी announcements

 • जागतिक करारानुसार antidumping ड्युटी कायमसाठी सुरु ठेवता येत नाही. म्हणून सरकार स्टील उद्योगासाठी एक PACKAGE देण्याच्या विचारांत आहे.
 • सरकारने १३ सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये भांडवल पुरवण्याचे ठरवले आहे. सरकार एकूण Rs २२९७५ कोटी भांडवल या बँकांना पुरवेल. सरकारने स्पष्ट केले की सरकार अजुनही आवश्यकता वाटल्यास भांडवल पुरवेल पण त्यावेळी बँकांचा परफोर्मंस बघूनच निर्णय घेतला जाईल.
 • सरकार लवकरच आपले शिक्षणविषयक धोरण जाहीर करेल.

RBI, सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने AXIS बँकेची FII लिमिट ७४% करण्यास मंजुरी दिली.
 • NGT (NATIONAL GREEN TRIBUNAL) ने १० वर्षापेक्षा जास्त जुन्या डीझेल गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द होईल असे जाहीर केले.
 • मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टने स्टेट बँकेबरोबर करार केला आहे. आता CDSL च्या DEMAT अकौंटच्या माध्यमातून शेअर्स देवस्थानसाठी दान म्हणून स्वीकारण्याचे ठरवले आहे. देवस्थान हे शेअर्स समाजसेवा आणी मंदीरखर्चासाठी वेळोवेळी गरजेप्रमाणे विकून पैसा उभा करू शकेल.
 • सोने,चांदी,क्रूड, ग्वारगम, सोयाबीन, सोया तेल अशा कमोडीटीमध्ये लवकरच ऑप्शन ट्रेडिंग सुरु होण्याची शक्यता आहे. याचा फायदा MCX ला होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ‘CRESTOR generic’ या कोलेस्टरल ड्रगसाठी भारतीय कंपन्यांना USFDA ची मंजुरी मिळाली (१)सन फार्मा (२) ऑरोबिन्दो फार्मा (३) ग्लेनमार्क फार्मा. (४) ALCHEM lab (५) TORRENT फार्मा त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत वाढली.
 • VRL लॉजिस्टिक या कंपनीने विमानवाहतुकीच्या क्षेत्रांत प्रवेश करण्याचा आपला निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. कंपनीच्या भागधारकांना हा निर्णय मान्य नव्हता त्यामुळे हे जाहीर झाल्यावर कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढली.
 • डाबर एरीएटेड ड्रिंक्सच्या क्षेत्रांत आपल्या VOLO या ड्रिंक्समार्फत प्रवेश करीत आहे.
 • IIFL होल्डिंगमध्ये CDC ग्रूप Rs १००० कोटी गुंतवून आपली हिस्सेदारी १५% करणार आहे.
 • इगारशी मोटर्स पब्लिक शेअरहोल्डिंग १४% वरून २५% करण्याच्या विचारांत आहे.
 • HDFC बँकेचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे चांगले आले पण NPA वाढले आणी NPA साठी करण्यांत येणारी प्रोविजन वाढवली.
 • जे पी पॉवर आणी JSW एनर्जी यांच्यांत डील होत आहे याचा फायदा ICICI बँक, AXIS बँक आणी IDBI या कर्ज देणाऱ्या बँकांना होईल.
 • स्टेट बँकेमध्ये मर्ज होणाऱ्या SBBJ, SBT, SBM आणी SBP या बँकांचे VALUATION करण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम ऑक्टोबर २०१६ मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे.
 • रजनीकांत या सुपर नायकाचा ‘काबली’ हा चित्रपट २२ जुलैला रिलीज होत आहे. याचे राईट्स PVR कडे आहे त्यामुळे याचा फायदा पीवीआर आणी मुक्ता आर्ट्स, INOX लीजर या कंपन्यांना होईल.
 • ABBOTT lab आपले लों एंड brand विकण्याच्या विचारांत आहे.
 • रिओ टीन्टो आणी अल्कोवा या स्टील क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे निकाल चांगले आले.
 • HUL, माइंड ट्री, M&M फायनांसियल कंपन्यांचे तिमाही निकाल असमाधानकारक आले. 
 • EXIDE, गृह फायनान्स, डी बी कॉर्प, GNFC, राणे ब्रेक्स, भारत फ़ायनान्सिअल इन्क्लुजन, बायोकॉन, मोतीलाल ओस्वाल, ITC,अतुल ऑटो, केर्न एनर्जी, फेडरल बँक, विजया बँक, लक्ष्मी विलास बँक, कोटक महिंद्रा बँकेचे ( NPA तील वाढ सोडता) निकाल समाधानकारक आले.
 • DR REDDYs  मध्ये प्रमोटर्सनी हिस्सेदारी वाढवली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ट्रेड डेटा यावेळी चांगला आला. भारताची निर्यात वाढली. सोने तेल डाळींची आयात कमी झाली. त्यामुळे CAD (CURRENT ACCOUNT DEFICIT) Rs १०८२ कोटींवरून Rs ८१२ कोटी एवढी कमी झाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • HPCL या OMC क्षेत्रातील कंपनीने १ शेअर पाठीमागे २ बोनस शेअर इशू करण्याचे जाहीर केले.
 • कॅप्लीन पाईंट ही कंपनी आपल्या १ शेअरचे ५ शेअर मध्ये स्प्लिट करणार आहे.
 • PFC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने १:१ असा बोनस शेअर देण्याचे जाहीर केले.
 • नवभारत वेंचर या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.
 • एल आय सीने टाटा ग्लोबल बिव्हरेजीस मधील हिस्सा ७.५१ वरून ९.८६ पर्यंत वाढवली.
 • ADF फूड्सची या कंपनीची BUY BACK ऑफ शेअर्स साठी बैठक आहे.
 • अनंतराज प्रोजेक्ट डिविजन डीमर्ज करणार आहे. त्या कंपनीचे नाव अनंतराज ग्लोबल असेल. एका अनंतराजच्या शेअरला २ अनंतराज ग्लोबलचे शेअर मिळतील. तर नव्या कंपनीचे BSE आणी NSE वर लिस्टिंग होईल.
 • PNB आणी PNB GILT चे मर्जर होण्याची शक्यता आहे.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • गुरुवार २१ जुलै २०१६ रोजी L & T इंफोटेक या कंपनीचे Rs 667 NSE वर आणी Rs 680 BSE वर लिस्टिंग झाले.ऑफर प्राईस Rs ७०० असल्यामुळे IPO मध्ये अर्ज केलेल्यांना लिस्टिंग गेन झाला नाही.
 • अडवान्स्ड एन्झाईम टेक्नोलॉजी लिमिटेड या कंपनीचा IPO २०/०७/२०१६ ला उघडून २२/०७/२०१६ ला बंद झाला. ही एका स्पेसींलाइस्ड क्षेत्रातील २ नंबरची कंपनी आहे. ही कंपनी एन्झाईम्स चे उत्पादन करते. या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

ज्या पाईंटला मार्केटच्या एक्स्ट्रीम दिसेल त्याप्रमाणे निर्णय घेणे योग्य. मार्केट वाढले तर ज्या ठिकाणी चांगला नफा होतो आहे तो पदरी पाडून घ्यावा. जर एखादे दिवशी मार्केट पडले तर जो शेअर वाढल्यामुळे तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर तो विकत घेऊ शकता. ‘SELL ON RALLIES आणी BUY on DIPS’ हे सूत्र लक्षांत ठेवून अनुसरावे. शेअर मार्केट मध्ये जेव्हां पैशाचा ओघ चालू असतो तेव्हा शेअरची किंमत योग्य आहे कां याचा विचार होत नाही.अशावेळी शेअर महाग मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुमच्याकडे चांगले शेअर्स पोर्टफ़ोलिओमध्ये ठेवून साधारण किंवा मध्यम प्रतीचे शेअर्स विकून नफा पदरांत पाडून घ्यावा. आणी खरेदीसाठी योग्य वेळेची वाट पहावी.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७८०९ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८५४१ वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १८ जुलै ते २२ जुलै – लिक्विडीटीने उघडले स्वर्गाचे द्वार

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २५ जुलै ते २९ जुलै २०१६ – GST मंजुरीच्या प्रतीक्षेत शेअर मार्केट | Stock Market आणि म

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s