आठवड्याचे समालोचन – २५ जुलै ते २९ जुलै २०१६ – GST मंजुरीच्या प्रतीक्षेत शेअर मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

flag-40949_640प्रथम स्टेट बँक आणी तिच्या सबसिडीअरीजचे मर्जर आणी सध्या ऑईल रीफायनरीजचे विलीनीकरण करण्याचा विचार आहे असे सरकारने जाहीर केले. प्रथम कंपन्या वेगळ्या करायच्या, बदलत्या काळाप्रमाणे ते अयोग्य, नुकसानकारक वाटू लागले की विलीनीकरण करायचे. जसे एकत्र कुटुंबपद्धतीचे दोष दिसू लागले की लोक विभक्त होतात, नंतर विभक्त कुटुंबपद्धतीचे दोष जाणवू लागले की पुन्हा एकत्र राहू लागतात. असे काही बदल आयुष्यांत परिस्थितीनुसार करावे लागतात तसेच कंपन्यांच्या, अर्थव्यवस्थेच्या आयुष्यातील हे बदल.

 

सरकारी announcements

 • सरकारचे GST बिल या पावसाळी अधिवेशनांत पास करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. सरकारने थोडी माघार घेवून बिलात खालील दुरुस्त्या करण्यासाठी तयारी दाखवली.
 • १% कर आकारण्याचा राज्य सरकारांना दिलेला अधिकार काढून टाकला.
 • राज्य सरकारे आता आकारीत असलेले कर रद्द होणार असल्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नुकसानाची केंद्र सरकार ५ वर्षेपर्यंत १००% भरपाई राज्यांना करेल.
 • GST विषयक कायद्यामध्ये GST ज्या दराने आकारला जाईल त्या दराचा GST कायद्यामध्ये उल्लेख केला जाईल.
  सरकारने गुड्स आणी सर्विसेस taxes नेटवर्कवर काम सुरु केले आहे.
 • या बिलावर काँगेसने सकारात्मक पवित्रा घेतल्यामुळे पुढील आठवड्यांत GST बिलावर ठरल्याप्रमाणे ५ तास चर्चा होऊन ते राज्यसभेंत मंजूर होईल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे लॉजिस्टिक, FMCG, ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले.हे बिल या सत्रांत पास झाले तर देशांत GST १ एप्रिल २०१७ पासून लागू होण्याची शक्यता आहे.

   

 • सरकार सर्व ऑईल रीफायनरीजचे विलीनीकरण करून एक मोठी कंपनी स्थापन करण्याच्या विचारांत आहे. म्हणजेच माणूस असो वा सरकार असो परिस्थितीमधील तोटे जाणवू लागले की त्यांत बदल करून पहायचा प्रयत्न करतो.
 • सरकारने इरिगेशन क्षेत्रांत ५ वर्षांत Rs ५०००० कोटी गुंतवणूक करायचे ठरवले आहे.याचा फायदा जैन इर्रीगेशन या कंपनीला होईल.
 • सरकारने stock एक्सचेंज आणी कमोडिटी एक्स्चेंज मध्ये FDI ची लिमिट ५% वरून १५% केली.याचा फायदा MCXला होईल. कोटक MCXमधील आपला स्टेक विकू शकतील.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • जपानचे पंतप्रधानानी इकॉनोमिक स्टीम्युलस म्हणून २७ ट्रिलीयन येन चे package दिले जाईल असे जाहीर केले. त्यामुळे जपानचे मार्केट वाढेल.
 • फेडने आपल्या व्याजदरांत कोणतेही बदल केले नाहीत. USAच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्यामुळे तसेच USA मधील जॉब मार्केट सुधारत असल्यामुळे भविष्यांत रेट वाढवण्याची शक्यता व्यक्त केली.
 • चीनच्या सेन्ट्रल बँकेने ७० बिलियन युआन अर्थव्यवस्थेमध्ये ७ दिवसाच्या रिवर्स रेपोरेटने घातले. चीन त्यांच्या इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यावर काही बंधने घालण्याची आणी वेल्थ management प्रॉडक्टवर बंदी घालण्याची शक्यता आहे
 • याहू ने आपला ओंनलाईन बिझिनेस वेरीझोन, USA टेलिकॉम कंपनीला US$४८३ कोटींना विकला.हा सर्व व्यवहार कॅशमध्ये होईल.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBIने वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बॅंका तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांना एकूण Rs २७ कोटी दंड केला. हा दंड के वाय सी नॉर्म्स, परदेशी चलनसंबंधी कायदे आणी बँकिंग रेग्युलेशन कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी लावण्यांत आला आहे.
 • RBI आपले वित्तीय धोरण ९ ऑगस्टला जाहीर करेल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • IOC ही कंपनी GSPLचे मुंद्रा LNG इम्पोर्ट टर्मिनल खरेदी करण्याच्या विचारांत आहे.
 • सुप्रिम कोर्टाने सिप्ला या कंपनीला कोर्टांत Rs १७५ कोटी भरायला सांगितले.
 • तामिळनाडू पेपर, शेषशायी पेपर या पेपर क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल चांगले आले या तिमाहींत पेपर उद्यागाचे निकाल चांगले येतील असे अपेक्षित आहे.
 • केर्न (इंडिया) च्या विलीनिकरणाच्या कराराचा नवा मसुदा तयार झाला. एल आय सी ने अल्पमतातील भागधारक म्हणून पूर्वीच्या कराराला संमती दिली नव्हती आता केर्नमधील एका शेअरसाठी वेदांताचा एक इक्विटी शेअर आणी ७.५% कूपन रेट असलेले ४ प्रेफरन्स शेअर्स मिळतील. हे प्रेफेरंस शेअर्स १८ महिन्यानंतर रिडीम करता येतील. नवीन कराराला शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळायची आहे. परंतु एल आय सी ने या नवीन कराराला मान्यता दिली आहे.
 • DR रेडीज या कंपनीचा तिमाही निकाल असमाधानकारक आला. व्हेनिझुएला मधील कमी झालेला व्यापार याला कारणीभूत ठरला .
 • USFDA च्या वार्निंग लेटरमुळे काही प्रोडकट्स LAUNCH करायला उशीर झाला. USA मध्ये VOLUME ग्रोथ कमी झाली. ह्या शेअरची किंमत १०% कमी झाली.
 • डेल्टा कॉर्प ही कंपनी गंगटोकमध्ये कॅसिनो सुरु करणार आहे. कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून कॅसिनो खरेदी करण्याऐवजी कॅसिनो लिव आणी लायसेन्सवर घ्यायचे ठरवले आहे.
 • मारुती LTD चा निकाल चांगला आला. पण त्यांत इतर उत्पन्न जास्त होते.
 • सिम्फनी,KG डेनिम, अंबुजा सिमेंट, KEI इंडस्ट्री, झी एनटरटेनमेंट, भारती एअरटेल(सरासरी रेव्हेन्यू प्रती ARPU चांगले आले.),एशिअन पेंट्स, मुथूट फायनांस, KCP शुगर, आयशर मोटर्स. हिताची होम्स, इक्वीटास,थायरोकेअर,लाल पाथ lab RALLIES इंडिया, कल्याणी स्टील. अजंता फार्मा, बजाज फिनसर्व यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • SBT, SBBJ, SBM, PNB, कॅनरा, कर्नाटक बँक(NPA वाढल्यामुळे) या बँकांचे तसेच हेक्झावेअर, युनायटेड स्पिरीट,या कंपन्यांचे तिमाही निकाल असमाधानकारक होते.
 • ओरिसा मिनरल्स्ला ओरिसामध्ये कमर्शिअल मायनिंग साठी ब्राम्हणी ब्लॉक मिळाला. कंपनीचा शेअर १४% वाढला.
 • उत्तम गालवा त्यांची वर्धा आणी खोपोली येथे असलेली मालमत्ता विकून Rs ७००० कोटी गोळा करणार आहेत. पॉस्को आणी चीनी कंपनी TIDFORE ही मालमता खरेदी करेल.
 • टाटा केमिकल्स आपला फरटीलायझर बिझीनेस विकणार आहेत हा बिझीनेस खरेदी करण्यांत IFFCO आणी दीपक फरटीलायझर यांनी रस दाखविला.
 • आसाममध्ये खूप पाउस पडला आहे याचा परिणाम चहा आणी कॉफीच्या पिकांवर झाल्यामुळे उत्पादन कमी होईल या मुळे चहा आणी कॉफीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
 • L&T चा तिमाही निकाल फारसा चांगला आला नाही. मार्जिन ३% कमी झाले. नफा Rs ६०९ कोटी, उत्पन्न Rs२१८७४ कोटी आले. ऑर्डरबुकही कमी झाले.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • या आठवड्यांत दिलीप बिल्डकॉन या INFRASTRUCTURE, रोड प्रोजेक्ट (NHAI आणी रोड मंत्रालय), इरिगेशन क्षेत्रांत कार्यरात असलेल्या कंपनीचा IPO येत आहे. प्राईस band Rs २१४ ते Rs २१९ आहे. हा IPO १ ऑगस्ट ला ओपन होऊन ३ ऑगस्टला बंद होईल.कंपनीचे ऑर्डर बुक चांगले असून घेतलेल्या ऑर्डर्स वेळेंत पुऱ्या करण्याचा लौकिक आहे. पण कंपनीचां DEBT इक्विटी रेशियो उद्योगातील सरासरीपेक्षा जास्त आहे. कंपनीचे उत्पन्न आणी नफा यांत चांगली प्रगती आहे.
 • या आठवड्यांत १ ऑगस्टच्या आसपास अडवान्स्ड एन्झाइम लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.

कॉर्पोरेट एक्शन

 • बजाज फायनांस या कंपनीने एका शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट आणी १:१ बोनस जाहीर केला.
 • सिम्फोनी या कूलर्स बनविणार्या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.
 • ADF फूडने शेअर्स BUYBACK करण्यासाठी Rs १२५ किंमत निश्चित केली.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

या आठवड्यांत एक गोष्ट आढळली की FII ची खरेदी आणी विक्री दोन्हीही सेकंड हायेस्ट होती. याचा अर्थ ज्या ठिकाणी फायदा आहे ते शेअर्स विकून टाकत आहेत आणी ज्या ठिकाणी भविष्यांत फायदा होण्याची शक्यता आहे असे शेअर्स विकत घेत आहेत. कंपनीच्या तिमाही निकालांमध्ये ज्या कंपन्यांचे उत्पन्न आणी मार्जिन दोन्ही वाढले असतील तर गुंतवणूकदारांनी या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यांची पाठ थोपटली. नेहेमीचे शेअर्स खूप वाढले आहेत त्यामुळे गुंतवणूकदार नवे नवे शेअर्स शोधीत आहेत. ज्या कंपन्यांचे शेअर्स योग्य भावाला उपलब्ध आहेत आणी या कंपन्यांच्या प्रगतीची शक्यता आहे असे शेअर्स खरेदी करीत आहेत. गांधी स्पेशल ट्यूब आणी गुजरात अल्कली या दोन्ही कंपन्यांचे तिमाही निकाल खूपच चांगले आले परंतु कधी कधी ही प्रगती टिकाऊ नसते त्यामुळे काळजी घ्यावी लागते.

जुलै सिरीज ८६६६ ला बंद झाली. ओळीने तीन महिने निफ्टी चढत्या भांजणीने बंद झाला. ऑगस्ट सिरीजची सुरुवात चांगली झाली नाही.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २५ जुलै ते २९ जुलै २०१६ – GST मंजुरीच्या प्रतीक्षेत शेअर मार्केट

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०१६- GST चे घोडे गंगेत न्हाले | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s