आठवड्याचे समालोचन – १ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०१६- GST चे घोडे गंगेत न्हाले

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
GST ची हुरहूर पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून सगळ्यांनाच होती. GST पास होणार की नाही याची १०वी १२वीच्या निकालापेक्षा जास्त उत्कंठा होती. पण ज्या समाजासाठी हे बिल पास होणार होते त्यांना मात्र GST म्हणजे काय हे माहितही नव्हते.MADAM, GST ही काय भानगड अशी विचारणा होत होती. GST पास व्हावे म्हणून फ्लोअर management खूप छान केली. २००६-०७ पासून सुरु झालेले GST चे गुऱ्हाळ संपले.  GST साठीच्या घटनादुरुस्तीचे घोडे एकदाचे गंगेत न्हाले.पण gst चा परिणाम दिसण्यासाठी अजून दोन वर्स्गे वाट बघावी लागेल.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

BOE(बँक ऑफ इंग्लंड) ने आपला बेंचमार्क रेट २५ बेसिस पाईंट कमी करून सात वर्षातील  कमीतकमी ०.२५% वर आणला. बँकेने असे जाहीर केले की BOE येत्या सहा महिन्यांत GBP ६० बिलीयन्सचे  सरकारी कर्ज रोखे, तसेच येत्या १८ महिन्यांत  GBP १० बिलीयंसचे कॉर्पोरेट bonds खरेदी करेल आणी GBP १०० बिलीयंसचा लोन प्रोग्राम बँकांना देईल. त्यांनी असे जाहीर केले की वेळोवेळी आम्ही हा कार्यक्रम वाढवायचा विचार करू.

सरकारी announcements

 • सरकारकडे BALCO (BHARAT ALUMINIUM COMPANY) मधील ४९% स्टेक आहे आणी वेदान्ताकडे ५१% स्टेक आहे. सरकारच्या मते बाल्को आणी HZL ( HINDUSTHAN ZINK LIMITED) मधील सरकारचा स्टेक विकण्याची ही योग्य संधी आहे, वेदान्ता किंमत ठरवण्यासाठी सल्लागार नेमणार आहे. HZL मध्ये वेदांताचा ६४.९२ % स्टेक आहे आणी सरकारचा २९.५४% आहे.
 • ONGC जे विदेशाबरोबर करार करते ते सर्व रीनिगोशीएट करायला सांगितले आहे. जो ओईल सेस लागतो तो २०% वरून १०% वर आणण्याचा सरकार विचार करीत आहे.
 • ६६ उत्पादनांसाठी MIP ची कालमर्यादा दोन महिने वाढवली. MIP( MINIMUM IMPORT PRICE) जास्त काळ लावता येत नाही.WTO ( WORLD TRADE ORGANIZATION) या विरुद्ध तक्रार करू शकते. म्हणून MIP ऐवजी ANTIDUMPING ड्युटी स्टीलवर पुन्हा सुरु केली.ANTIDUMPING ड्युटी ५ वर्षासाठी लावता येते.
 • सरकारने साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सबसिडी देण्याचे मान्य केले होते. UP तील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सबसिडी लवकर दिली जाईल. साखरेचे यावर्षी उत्पादन कमी होईल असे ISMA च्या रिपोर्टवरून समजते.
 • मंत्रिमंडळाने वार्षिक उत्पन्नाच्या कमीतकमी ३% WEIGHTED AVERAGE SPECTRUM USAGE चार्ज ठरवले यामुळे आता सर्वांत मोठ्या एअरवेवजचा लिलाव होऊ शकेल. यामध्ये 700 MHZ वेव्हजचा लिलावही अपेक्षित आहे.
 • संसदेच्या दोन्ही सभागृहांत शेवटी आवश्यक असलेले बहुमत मिळून GST साठी घटनादुरुस्ती करणारे बिल मंजूर झाले. सरकारला आशा आहे की ते १ एप्रिल २०१७ पासून GST सर्व देशांत लागु करू शकतील. पण त्याआधी त्यांना अजून तीन बिल्स पास करावी लागतील. CENTRAL GST, STATE GST, आणी INTEGRATED GST बिल. कमीतकमी १५ राज्यांच्या विधानसभेमध्ये २/३ बहुमताने घटनादुरुस्ती बिल पास करायला पाहिजे. घटना दुरुस्ती बिल ५०% राज्य विधानसभांनी आवश्यक त्या बहुमताने आणी संसदेच्या दोन्ही सदनामध्ये पास झाल्यावर राष्ट्रपतींकडे त्यांच्या मंजुरीसाठी जाईल.
 • GST कौन्सिल स्थापन केले जाईल.
 • केंद्रीय अर्थ खाते आणी राज्य सरकारांच्या अर्थमंत्र्यांच्या EMPOWERED कमिटी आणी GST कौन्सिल यांच्यांत रेट बद्दल एकमत व्हावयास पाहिजे.
 • सर्व राज्यांनी त्यांचे स्वतःचे GST LAWS पास करायला पाहिजेत.
 • केंद्र सरकारला आशा आहे की ते राज्यांबरोबर एकमत करून संसदेच्या हिवाळी अधिवेशनांत CENTRAL GST आणी INTREGRATED GST बिल सादर करू शकतील. यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ खात्याला अथक आणी अविरत प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे जरी GST साठी घटना दुरुस्ती पास झाली असली तरी दिल्ली बहुत दूर है.
 • gst अमलांत आल्यावर GOODS स्वस्त झाले तरी काही सेवा महाग होण्याचा संभव आहे.
 • GST अमलांत आणण्यासाठी आवश्यक असलेले सॉफटवेअर करण्यासाठी या आधीच सरकारने करार केले आहेत..

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI आपली वित्तीय पॉलिसी ९ ऑगस्ट २०१६ ला जाहीर करेल.
 • RBI ने आपली नवीन बँक लायसेन्स पॉलिसी जाहीर केली.

RBI ने आपली ओंन TAP लायन्सेस विंडो उघडली त्यामुळे आता पात्र असलेल्या कंपन्यांना बँक चालू करण्यासाठी अर्ज करता येईल. यातील काही प्रोविजन खालीलप्रमाणे :-

 1. या बँकेचे कमीतकमी पेडप(PAID UP) भांडवल Rs ५०० कोटी पाहिजे. यांत परदेशी गुंतवणूक ७४% असू शकेल.
 2. या बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर तटस्थ डायरेक्टर्स बहुसंख्येने हवेत.
 3. १० वर्षे चांगले track रेकॉर्ड असलेल्या भारतीय निवासी प्रमोटर्सच्या मालकीच्या आणी ते चालवीत असलेल्या कंपन्या अर्ज करू शकतील.
 4. या बँकांनी आपल्या २५% शाखा जेथे बँक नाहीत अशा ग्रामीण क्षेत्रांत उघडल्या पाहिकेत. आणी आपले शेअर्स बँक सुरु झाल्यापासून सहा वर्षांत stock exchange वर लिस्ट केले पाहिजेत.
 5. कंपन्या ज्यांची मालमता Rs ५०० कोटींवर आहे अशा कंपन्या जर त्यांचा ६०% बिझीनेस वित्तीय सेवा क्षेत्रांत असला तर अर्ज करू शकतील. जर असे नसेल तर त्या कंपन्या बँकेत १०% स्टेक घेऊ शकतील.प्रमोटर्सनी आपले होल्डिंग ४०% ( ५ वर्षे lockin), १० वर्षांत ३०% तर १५ वर्षांत १५% पर्यंत कमी केले पाहिजे.
 6. या नवीन नॉर्म्स खाली EDELWEISS, IIFL, श्रीराम मोटार फायनांस, मुठूत फायनांस. एल आय सी हौसिंग फायनांस, सुंदरम फायनांस सारख्या कंपन्या बँकिंग लायसेंससाठी अर्ज करू शकतील. या परवान्याअंतर्गत कंपनीला १८ महिन्यांत बँक सुरु करावी लागेल.
 7. बजाज फिनसर्व आणी PIDILITE चा समावेश MSCI निर्देशांकांत होण्याची शक्यता आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सन फार्माच्या जनरिक औषध ‘GLUMETZA’ या टाईप २ डायबीटीसवरील औषधाला USFDAची मंजुरी मिळाली.
 • मुथुट फायनांस आणी ग्रूप कम्पनीवर मनीलॉनडरिंग आणी कर टाळण्यासाठी आयकर खात्याने धाडी टाकल्या.
 • HCL TECH या IT क्षेत्रातील कंपनीचा ज्ञून २०१६ तिमाहीचा निकाल चांगला आला. ही कंपनी युरोपीय देशांत निर्यात करते. कंपनीने Rs ६ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • इंडिअन बँकेचे, टाटा केमिकल्स यांचे तिमाही निकाल चांगले आले.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • ADVANCE ENZYM चे अतिशय चांगले लिस्टिंग झाले. IPO मध्ये Rs ८९६ ला दिलेल्या शेअर Rs १२३०ला लिस्टिंग झाले आणी तो Rs १२४४ पर्यंत गेला. गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
 • या आठवड्यांत दिलीप बिल्डकान यांच्या IPOला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. HNI ७९% तर किरकोळ क्वोटा २.२ पट सबस्क्राईब झाला. एकूण IPO २१ वेळेला सबस्क्राईब झाला.
 • S P APPARELS चा IPO २ ऑगस्ट २०१६ रोजी ओपन होऊन ४ ऑगस्टला बंद झाला.

कॉर्पोरेट एक्शन

 • विम प्लास्ट या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.
 • BEL या कंपनीची ५ ऑगस्ट २०१६ रोजी ‘BUYBACK ऑफ शेअर्स’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.
 • IDFC चे IDFC बँकेत विलीनीकरण होण्याचा प्रस्ताव आहे.
 • स्टार फेरोचे ३ शेअर असतील तर स्टार सिमेंटचे ४ शेअर्स मिळतील.
 • कर्नाटक बँकेने शेअरहोल्डर्स जवळील २ शेअर्ससाठी १ राईट्स शेअर Rs ७० ला जाहीर केला.
 • 8 K MILES या कंपनीची २४ ऑगस्ट २०१६ ला stock स्प्लिट आणी बोनस साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

‘बाय ऑन रुमर्स (RUMOURS) आणी सेल ऑन न्यूज’ या उक्तीप्रमाणे या आठवड्यांत मार्केटमध्ये सुस्ती जाणवली कारण GST पास झाल्यामुळे ताबडतोब काहीही परिणाम दिसणार नाही जाणवली तर महागाईच जाणवेल. त्यामुळे GST चा परिणाम ज्या कंपनींच्या शेअर्सवर होईल असे आडाखे बांधून खरेदी केली त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आढळले. आपणही शेअर्स खरेदी करताना GSTचे फायदे २०१७-२०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत मिळावयास सुरुवात होईल.त्यामुळे शेअर्स विशेषतः GST संबंधीत शेअर घ्यायचे असल्यास दीर्घ मुदतीसाठी घ्यावेत. आता पुढे काय हा प्रश्नं पडला ?. सध्या तरी मार्केटचे लक्ष ९ ऑगस्ट २०१६ रोजी जाहीर होणाऱ्या RBIच्या मॉनेटरी पॉलिसीकडे आहे बघू या..

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८०७८ आणी NSE निर्देशांक ८६७९ वर बंद झाला

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

5 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०१६- GST चे घोडे गंगेत न्हाले

 1. सचिन रिसबूड औरंगाबाद

  मार्केट आणि मी हा ब्लॉग खूप चांगला व मार्केट विषयी सविस्तर माहिती देणारा आहे
  कुठली नॅशनॅलिज्ड बँक डिमॅट व ट्रेडिंग साठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन चांगली सेवा देते.
  मलाही नॅशनॅलिज्ड बँकेतच डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट उघडावयाचे आहे.

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट – लग्न झालं, सूप वाजलं | Stock Market आणि मी

 3. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २२ ऑगस्ट २०१६ ते २६ ऑगस्ट २०१६ – पतंग शेअर मार्केटचा मांजा लीक्विडीटीचा | S

 4. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर – संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया | Stock Market

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s