आठवड्याचे समालोचन – ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट – लग्न झालं, सूप वाजलं

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

cropped-mktandme-logo.jpgएखादे कार्य उरकलं की जशी अवस्था असते तशीच स्थिती या आठवड्यांत होती. GST चे लग्न लावण्याची घाई सगळ्यांनाच लागली होती. ‘लग्न लावून द्या हो नक्की सुधारेल बघा’ हा नेहेमीचा संवाद ! गेल्या तीन अधिवेशनापासून GST ची चर्चा जोरदार असे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून विकासाची गंगा वाहील असे एक चित्र रंगवले गेले. त्याचाच एक भाग GST. तेही पास झाले. पण आता पुढे काय ? मार्केट नेहेमी पुढची वाट धरते. पुढची वाट समजेनाशी झाल्याने आणी मार्केट अपेक्षेपेक्षा खूप वाढल्याने आठवडाभर मार्केट नरमच होते. कंपन्या मात्र मार्केटचा मूड चांगला असल्याने IPO आणत आहेत आणी NCD (NON CONVERTIBLE DEBENTURES) आणत आहेत. आणी वेगवेगळ्या प्रकाराने भांडवल गोळा करीत आहेत.

 

सरकारी announcements

 • सरकार मार्बल, ग्रनाईट या साठी सुद्धा antidumping ड्युटी लावणार आहे. याचा फायदा एसियन ग्रनीटो , HSIL, पोकर्ण या कंपन्यांना होईल.
 • सरकारने इथेनॉलवर १२.५ % एक्साईज ड्युटी लावली
 • सरकार २९ सप्टेंबर २०१६ पासून 2G, 3G, 4G स्पेक्ट्रमचा सगळ्यांत मोठा लिलाव सुरु करणार आहे. सरकारला या लिलावातून Rs ५,५६००० कोटी मिळतील अशी अपेक्षा आहे
 • gst घटना दुरुस्ती दोन्ही सभागृहांत पास झाले. त्यानंतर आसाम राज्याच्या सभागृहांत GST घटना दुरुस्ती विधेयक पास झाले.
 • मंत्रीमंडळाने NBFC च्या ‘OTHER FINANCIAL सर्विसेसमध्ये’ ऑटोमटिक रूटने FDI आणण्यास परवानगी दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी :-

 • १२ ऑगस्ट २०१६ रोजी महागाईचे आणी IIP चे आकडे जाहीर झाले. रिटेल महागाई ६.०७%जून महिन्यांत वाढली. खाण्यापिण्याच्या गोष्टी ८.३५% महागल्या. शहरांत ५.३९% तर ग्रामीण भागांत ६.६६ % महागाई वाढली.
 • IIP च्या आकडे या वेळेला जून महिन्यासाठी २.१% आले. खनिज आणी वीज उत्पादनांत वाढ झाली तर कॅपिटल गुड्स चे उत्पादन घटले. कन्झुमर द्युरेबल्स चे उत्पादन ५.६% तर कन्झुमर गुड्स उत्पादन २,८% झाले. तज्ञांचे असे मत आहे की सरकार करत असलेल्या गुंतवणुकीमुळे हळूहळू IIP च्या आकड्यानमध्ये सुधारणा होत आहे.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने आपली वित्तीय पॉलिसी ९ ऑगस्ट रोजी जाहीर केली. त्यांत गेल्या वेळच्या व्याजाच्या दरात किंवा CRR मध्ये काही बदल केले नाहीत. पण लिक्विडीटी मुबलक असेल असे सांगितले. पण ७वा वेतन आयोगातील पगारवाढ दिल्यामुळे आणी gst मुळे काही काल महागाई वाढेल असे आपल्या भाषणांत सांगितले. त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक आणी खाजगी क्षेत्रातील बँकांना RBI ने केलेला १.५% रेट कट पूर्णपणे बँकांच्या कर्जदारांना पास ऑन करावयास सांगितला
 • CAG ने सरकारला नोटीस दिली आहे की गेली चार वर्षे टेलिकॉम कंपन्या उत्पन्न कमी दाखवीत आहेत.
 • डीझेल कार्स विकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. ग्रीन सेस ग्राहकाकडून वसूल केला जाईल. २०००CC वरचे इंजीन असणाऱ्या कार्सना ग्रीन सेस लावला जाईल.
 • सेबीने म्युच्युअल फंडासाठी होऊसिंग फायनांस कंपन्यांच्या bonds मध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा ५% वरून १०% केली. ह्या कंपन्याना ट्रिपल A रेटिंग असले पाहिजे.
 • MSCI निर्देशांकांत बजाज फिनसर्व आणी पिडीलाईट यांचा समावेश होईल असे वाटले होते. AXIS बँक आणी येस बँक यांचा समावेश केला गेला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • झी एन्टरटेनमेंटने त्यांची टेन स्पोर्ट्स ही वाहिनी सोनी एन्टरटेनमेंटला Rs २०० कोटींना विकली.
 • कोलगेट, ब्रिटानिया, हिरो मोटो कॉर्प, इप्का lab, IRB इन्फ्रा, बोरोसील ग्लास,वाडीलाल इंडस्ट्रीज, REC,ग्लेनमार्क फार्मा, सुदर्शन केमिकल्स या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • बँक ऑफ बरोडा, कॉर्पोरेशन बँक,अलाहाबाद बँक, सेन्ट्रल बँक, OBC, बँक ऑफ इंडिया यांचे तिमाही निकाल अतिशय असमाधानकारक होते.
 • PFIZER या अंतरदेशीय कंपनीच्या चार देशांच्या रेग्युलेटरच्या कमिटीने मद्रासजवळच्या कारखान्यांत चालू असलेल्या उत्पादन प्रक्रियेतील उणीवा रिपोर्ट केल्या आहेत.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • दिलीप बिल्डकान या कंपनीचे समाधानकारक लिस्टिंग झाले.
 • S.P. APPARELS या कंपनीचे Rs ३०५ वर लिस्टिंग झाले.
 • रत्नाकर बँक आपला IPO आणत आहे प्राईस band Rs २२४ ते Rs २२५ आहे. हा इशू १९ ऑगस्टला ओपन होईल.

कॉर्पोरेट एक्शन

 • अल्सटोम पॉवर चे नाव G. E. पॉवर असे झाले.
 • HDFC LIFE आणी MAX LIFE यांचे मर्जर निश्चित झाले. नंतर HDFC LIFE चे BSE आणी NSE वर लिस्टिंग होईल.ह्या मर्जरमध्ये प्रथम max life चे MAX फायननानसियलमध्ये मर्जर होईल. MAX LIFE च्या शेअर होल्डर्सना त्यांच्याकडे असलेल्या ५ शेअरमागे MAX फायनाशियलचा एक शेअर मिळेल. नंतर LIFE इन्शुरन्स बिझीनेस MAX फ़यनान्सिअल मधून वेगळा काढून HDFC लाईफ मध्ये मर्ज केला जाईल,MAX फ़यानान्सिअलच्या शेअरहोल्डर्सना एक शेअरमागे HDFC लाईफचे २.३३ शेअर्स मिळतील. HDFC life चे लिस्टिंग केले जाईल. या कंपनीचे प्रमोटर्स HDFC आणी STANDARD LIFE असतील. max फ़यनान्सिअल राहिलेल्या बिझीनेस बरोबर MAX INDIA मध्ये मर्ज होईल. हे मर्जर १२ महिन्यांत पूर्ण केले जाईल.
 • REC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने १:१ असा बोनस जाहीर केला.
 • इंडिया बुल्स हौसिंग फायनांस कंपनी Rs १३०० कोटीचा NCD ( NON CONVERTIBLE DEBENTURES) इशू आणणार आहे.
 • येस बँक US १बिलियन राईट्स इशू आणणार आहे. प्रमोटर्स होल्डिंग ११% ते १२% विकण्यासाठी QIP इशू आणण्याची शक्यता आहे.
 • रॉयल ऑरचीड कंपनीच्या बोर्ड मीटिंग मध्ये बोनस इशुचा विचार होण्याची शक्यता आहे.
 • ग्रासिम मध्ये आदित्य बिर्ला नुवोचे मर्जर होणार आहे. AB NUVO च्या १० शेअर्सच्या बदल्यांत ३ ग्रासिम चे शेअर्स मिळतील. ग्रासिम कंपनीच्या शेअरहोल्डर्सना AB NUVO च्या फ़यनान्सिअल कंपनीचे ७ शेअर्स मिळतील. हे मर्जर गुंतवणूकदारांना पसंत पडलेले आणी पटलेले नाही. त्यामुळे दोन्ही शेअर्सचा भाव पडला. ग्रासिमच्या शेअरहोल्डर्सना टेलिकॉम बिझिनेसमध्ये रस नसल्यास या मर्जरला त्यांची संमती मिळणे अवघड आहे.मर्जर ची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. गुंतवणूकदारांना मर्जर रेशियो पटलेला नाही. मर्जर नंतर फ़ायनान्सिअल बिझीनेस्स्चे लिस्टिंग होईल.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

मार्केटची वेळ संपल्यानंतर आलेल्या IIP आणी CPI च्या आकड्यांमुळे आणी स्टेट बँकेच्या आशादायी तिमाही निकालांमुळे मार्केटला आलेली मरगळ नाहीशी होईल. त्यातच डीझेल गाड्यांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिल्यामुळे मार्केटला उभारी येईल.सोमवारी १५ ऑगस्टची विश्रांती घेऊन मंगळवारी मार्केट पुन्हा नव्या जोमाने उघडेल.

BSE सेन्सेक्स २८१५२ वर तर NSE NIFTY ८६७२ वर बंद झाला.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट – लग्न झालं, सूप वाजलं

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट – जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला | Stock Mark

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s