आठवड्याचे समालोचन – १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट – जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला

Illustration By Frits hikingartist.com

Illustration By Frits hikingartist.com

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हा आठवडा १५ ऑगस्टच्या सुट्टीपासून सुरु झाला. हा स्वातंत्र्यदिन पण किती बाबतीत आपण स्वतंत्र झालो, स्वावलंबी झालो हा खरा प्रश्न आहे. शेअरमार्केटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अजूनही आपण टिप्सवर अवलंबून आहोत. टिप्स म्हणजे तरी काय कुणीतरी शेअर्सची नावे सांगायची आणी आपण मात्र डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवायचा असे किती दिवस चालणार या बाबतीतही स्वातंत्र्य मिळवणे गरजेचे आहे. कारण तुम्ही तो शेअर कां खरेदी करीत आहांत किंवा कां विकत आहांत ? हे तुम्हाला माहीत नसते. त्यामुळे पैसा कमावण्याचा उद्देश तर सिद्ध होत नाहीच पण आपण फसले गेलो असे वाटते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

क्रूड टेक्निकल कारणामुळे वाढत आहे. लिक्विडीटी हे कारण तर आहेच. सध्याची क्रूडसाठी असलेली मागणी सिझनल आहे. रशिया जगांत जास्त ऑईल उत्पादन करतो. सौदी अरेबियाही जास्त ऑईल उत्पादन करते. सध्या हळू हळू क्रूडच्या किंमती वाढत आहेत.ओपेक आणी नॉन-ओपेक देशांमध्ये क्रूडचे उत्पादन गोठविण्यासाठी वाटाघाटी चालू आहेत. US$ ३० वरून क्रूडच्या किंमती US$ ५० पर्यंत वाढल्या आहेत.

सरकारी announcements

 • सरकारने कायद्यांत काही बदल केले आहेत. त्यामुळे VSNL कंपनीची जमीन कंपनी सरकारला विकू शकेल. त्यासाठी VSNL ला कॅपिटल गेन्स कर भरावा लागणार आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • जुलै WPI ३.५५% म्हणजेच २३ महिन्यानमधील उच्च स्तरावर गेले.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • मिडकॅप निर्देशांकातून जिंदाल SAW निघेल आणी इक्विटास होल्डिंग सामील होणार.
 • निफ्टीमध्ये काही बदल केले जाणार आहेत. इंडिगोचा समावेश होण्याची शक्यता आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • इन्फोसिस आणी IBM बरोबर RBS ने जो ५ वर्षांसाठी करार केला होता तो रद्द केला. हा करार GBP ३०० कोटींचा होता. त्यामुळे इन्फोसिस आपला २०१६-२०१७ या वर्षासाठी गायडंस कमी करेल असा अंदाज आहे.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया चा तिमाही निकाल वरवर पाहता चांगला दिसत नाही. तरीही त्यांचा ‘कासा’ ( CURRENT and SAVINGS DEPOST) रेशियो चांगला आहे. ‘कासा’ रेशियो म्हणजे CURRENT DEPOSITS +SAVINGS DEPOSIT /TOTAL DEPOSITS होय. स्टेट बँकेच्या बाबतीत हे प्रमाण चांगले आहे. ‘HIGH COST DEPOSIT’ (म्हणजेच ज्या ठेवींवर जास्त दराने व्याज द्यावे लागते) चे प्रमाण कमी झाले आहे. मार्जिन वाढले आहे. NPA (NON PERFORMING ASSET) वाढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
 • झी लर्न आणी ट्री हाउसच्या मर्जरसाठी नवी योजना आणली आहे. आता मर्जर १:१ या रेशियो प्रमाणे होईल. पूर्वीचा रेशियो ५:१ असा होत. ट्री हाउसचे सगळे शेअर्स (प्रमोटरचे) तारण ठेवले आहेत. कॅश ठेवली नाही.
 • VIP कंपनी मिलिटरी कॅन्टीनला माल पुरवते. मिलीटरीच्या लोकांना एरीयर्स मिळणार आहेत. त्यामुळे मिलिटरी कॅन्टीनच्या विक्रीत वाढ होईल. त्याचा फायदा VIP कंपनीला होईल.
 • ऑईल आणी gas च्या लिलावात ‘HOEC’ या कंपनीला काही ब्लॉक्स मिळू शकतात.
 • सुट्ट्या जोडून आल्या, सणांचा सिझन आला की पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो. उदा :- COX AND KINGS, THOMAS COOK
 • इमामीच्या प्रमोटर्सनी तारण ठेवलेले शेअर्स सोडवले.
 • दिलीप बिल्ड्कॉनला NHAI कडून हायब्रीड ANUITY बेसिसवर Rs २०१६ कोटींची उत्तर प्रदेशातील ऑर्डर मिळाली.
 • सिंगटेल ही कंपनी भारती एअरटेल या कंपनीमध्ये हिस्सा खरेदी करेल.
 • ऑरोबिन्दो फार्माच्या प्रमोटर्सनी आपले शेअर्स तारण ठेवून बजाज फायनान्सकडून कर्ज घेतले.
 • मरकेटर लाईन्स या कंपनीने त्यांची सिंगापूरमधील लॉसमेकिंग सब्सिसिअरी विकून टाकली.
 • केरळ सरकारच्या दारूबंदी मंत्र्याने सांगितले की केरळ राज्य सरकारने त्यांच्या दारूबंदी धोरणाचा फेरविचार करावा. कारण दारूबंदीमुळे राज्य सरकारच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
 • NHPC ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी पश्चिम बंगालमधील युनिट ४ मध्ये COMMERCIAL ओपरेशन सुरु करणार आहे.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • २००५ साली येस बँकेचा IPO आला होता त्यानंतर आता खूप वर्षांनी रत्नाकर बँकेचा IPO या आठवड्यांत येत आहे. १९ ऑगस्टला ओपन होऊन २३ ऑगस्टला बंद होईल. या IPO चा प्राईस band Rs२२४- Rs२२५ आहे मिनिमम लॉट ६५ शेअर्स आहे. ही बँक IPO द्वारा Rs १२१३कोटी उभारणार आहेत. या बँकेच्या व्यवस्थापनाने असे सांगितले की आम्ही स्टील, पॉवर आणी इन्फ्रा या सेक्टरला कर्ज देण्यापासून दूर राहू.

कॉर्पोरेट एक्शन

 • मिंडा इंडस्ट्रीज आपल्या शेअर्सचे २ शेअर्समध्ये स्प्लिट करणार आहे.
 • फोरटीस हेल्थकेअर आपल्या SLR डायाग्नोस्टिक बिझीनेसचे डीमर्जर करणार आहे.
 • मेनन बेअरिंगची बोनस इशुवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर ची मीटिंग आहे.
 • PNBची सबसिडीअरी PNB GILTSचे PNB मध्ये विलीनीकरण होईल.
 • ORACLE त्यांच्या इंडिअन आर्मचे डीलिस्टिंग करण्याची शक्यता आहे. या साठी कंपनी Rs ७००० कोटी ते Rs ८००० कोटी खर्च करण्याची शक्यता आहे. ORACLE फायनांशीअलमध्ये ‘ORACLE’ चा ७४.२% स्टेक आहे.
 • ताज GVK या कंपनीचे इंडिअन हॉटेल्स या कंपनीमध्ये विलीनीकरण होणार आहे.
 • आता SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या असोसिएट लिस्टेड बॅंका अनुक्रमे स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (या बँकेच्या १० शेअर्सच्या ऐवजी SBIचे २२ शेअर्स), स्टेट बँक ऑफ म्हैसूर (या बँकेच्या १० शेअर्ससाठी SBI चे २२ शेअर्स) आणी स्टेट बँक ऑफ बिकानेर and जयपूर ( या बँकेच्या १० शेअर्ससाठी SBIचे २८ शेअर्स) या प्रमाणे स्टेट बँकेत या लिस्टेड बॅंका मर्ज झाल्यावर SBIचे शेअर्स मिळतील. या लिस्टेड बँकाबरोबरच SBIमध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पतियाला आणी भारतीय महिला बँकेचे विलीनीकरण होईल. हे विलीनीकरण जरी अल्प मुदतीसाठी खर्चिक वाटले तरी दीर्घ मुदतीत मात्र कार्यक्षमता वाढून खर्च कमी होईल. तसेच NPAकमी होतील असा आशावादी विचार व्यक्त केला जात आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

डेटा आणी आकडेवारीच्या निरीक्षणावरून अनेक गोष्टी लक्षांत येतात. मार्केट पडण्याचे प्रमाण कमी होत आहे आणी मार्केट पडल्यावर सुधारण्याचे प्रमाण चांगले आहे. सेक्टर रोटेशन आणी शेअर्समध्ये रोटेशन दिसते आहे. कंपनीकडून जे टपाल येते ते लोक पहात नाहीत, वाचत नाहीत, समजावून घेत नाहीत. त्यामुळे सेबीचा ग्राहक संरक्षणाचा उद्देश सफल होत नाही. तसेच गुंतवणूकदारांचा फायदा होत नाही. सध्या रिलायंसच्या टपालाबरोबर रिलायंस हॉस्पिटल्सचे १०% discount कूपन आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८०७७ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८६६६ वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s