आठवड्याचे समालोचन – २२ ऑगस्ट २०१६ ते २६ ऑगस्ट २०१६ – पतंग शेअर मार्केटचा मांजा लीक्विडीटीचा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

kite-37855_640उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे जसे निसर्गाचे चक्र असते, बालपण, तारुण्य, वृद्धापकाळ, हे आयुष्याचे चक्र असते. तसेच तेजी मंदी हे शेअरमार्केटचे चक्र असते. याला कारण असते मागणी आणी पुरवठा पण कृत्रिम टंचाई, किंवा मुबलक आवक हे ही कारण असते. पण सगळ्यांच्या मुळाशी असतो तो पैसा. तो पैसा जर आपल्याजवळ असेल तर आपण महाग किंवा स्वस्त? किंवा गरज आहे कां ? ही चर्चा करीत नाही असेच काहीसे सध्या शेअरमार्केटचे चालू आहे. शेअरचे भाव आणी आणी आलेले तिमाही निकाल यांचा ताळमेळ बसत नाही. परंतु चोहो बाजूंनी पैशाचा ओघ सुरु आहे. पैशाचा महापूर लोटला आहे. त्यामुळे थोडेसे मार्केट पडले की लगेच सुधारते आहे. म्हणजेच शेअरमार्केटचा पतंग आकाशांत उंच उंच जात आहे. पण हे सर्व आहे लिक्विडीटीरुपी मान्जाच्या हातांत, हा मांजा जेव्हा तुटेल तेव्हा त्रेधा तिरपीट होईल हेच खरे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • ओपेक आणी नॉन ओपेक देशांची २६ तारखेला मीटिंग आहे. इराण आणी रशिया उत्पादन गोठवावे या विचाराला संमती देण्याची शक्यता आहे. यामुळे क्रूडचे भाव वाढतील. याचा फायदा ONGC ऑईल इंडिया,केर्न इंडिया या कंपन्यांना होईल. इथेनालच्या किंमती क्रूडच्या किंमतीप्रमाणे बदलतील अशी व्यवस्था असावी असा विचार चालू आहे. याचा फायदा प्राज इंडस्ट्रीजला होईल.
 • फायझर ही कंपनी ‘MEDIVATION’ ह्या कंपनीला US$१४ बिलियन ला विकत घेणार आहे. या मुळे ‘PROSTATE CANCER’ साठी असलेली X TANDI ही आधुनिक उपचार पद्धती त्यांच्या मालकीची होईल. या उपचार पद्धतीला USFDA आणी इतर देशांकडून मान्यता मिळालेली आहे.

सरकारी announcements

 • सरकारने उर्जित पटेल यांची RBI चे गव्हरनर म्हणून नेमणूक जाहीर केली. शेअर मार्केटने आणी सामान्यतः आर्थिक तज्ञांनी या नेमणूकीचे स्वागत केले.
 • सरकारने रिलायंस पॉवर या कंपनीला त्यांच्याकडे असलेले सासन कोलब्लॉक्स परदेशी कर्जदारांकडे गहाण ठेवण्यास मंजुरी दिली.
 • केंद्र सरकार रेल्वे अंदाजपत्रक आणी वार्षिक अंदाजपत्रक एकत्र सदर करण्याचा विचार करीत आहे. तसेच सामान्य अंदाजपत्रक जानेवारी महिन्याच्या शेवटी प्रस्तुत करावे असाही विचार चालू आहे. त्यामुळे पुढचे करनिर्धारण वर्ष चालू होण्याआधी करदात्यांना कर विषयक नियम माहीत होतील.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • डाबर.खादी, हिमालयन, बैद्यनाथ, पतंजली या कंपन्या मध विकतात. FSSAI या कंपन्यांच्या मधाची २१ मानकांनुसार तपासणी करणार आहे.
 • सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या डेअरीज दूध विकतात त्याचे नमुने FSSAIने तपासावेत असा आदेश दिला. तसेच दुध साठवण्याची आणी दुध तपासण्याची व्यवस्था तपासण्यास सांगितले. याचा परिणाम प्रभात डेअरी. क्वालिटी LTD. अमूल. पराग मिल्क या कंपन्यांवर होईल. दुधांत CAUSTIC सोडा, पोटाश. केमिकल आणी पेस्टीसाईड यांची भेसळ केलेली नाही हे विशेषतः तपासण्यास सांगितले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • कॉस्टीक सोडा आयातीवर जी antidumping ड्युटी लावली होती ती १ वर्षापर्यंत वाढवली. GHCL, गुजराथ अल्कली, DCW, GSPL यांना याचा फायदा होईल.
 • उज्जीवन फायनांसने SMALL बँकेसाठी अर्ज केला.
 • फोर्टिस हेल्थकेअर मलार हॉस्पिटलचा बिझिनेस Rs ४३ कोटीला विकत घेणार. फोर्टिस हेल्थकेअर मधून डायग्नोस्टीक बिझिनेस (SRL डायग्नोस्टीक) वेगळा करणार. १०० शेअर्ससाठी ९८ शेअर्स दिले
  नंतर डायग्नोस्टीक बिझिनेस मलार हॉस्पिटलमध्ये मर्ज करणार आणी त्याचे नाव SLR असे ठेवणार.ह्या कंपनीचे नंतर लिस्टिंग होईल
 • वेलस्पन इंडिया या कंपनीने सप्ल्याय केलेला माल कराराप्रमाणे नाही म्हणून त्यांचे एक महत्वाचा ग्राहक टार्गेट कंपनी, यांनी वेलस्पन इंडिया बरोबर केलेले सर्व करार रद्द केले जातील असे सांगितले. यामुळे वेलस्पन इंडिया या कंपनीच्या शेअर्सला दोन दिवस लोअर सर्किट लागत होती.टार्गेट पाठोपाठ WAL-MART आणी JCPENNY या इतर परदेशी ग्राहकानी वेलस्पन इंडियाच्या प्रोडक्टस् ची तपासणी सुरु केली आहे.
 • जेट एअरवेज आणी स्पाईस जेट या विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्या १००% ऑपरेटिंग CAPACITY ला काम करीत आहेत. आता या कंपन्यांनी भांडवली खर्च केला पाहिजे. प्रत्येक चांगली गोष्ट या शेअर्सच्या किंमतीत समाविष्ट आहे.
 • खूप पाउस झाल्यामुळे बार्लीच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे बियरचे भाव वाढतील अशी शक्यता आहे. याचा फायदा युनायटेड ब्रुअरीजला होईल.
 • मारुतीने येन ( जपानचे चलन) एक्स्पोजर २३% वरून १२% केले. त्यामुळे मारुतीचे टार्गेट Rs ५८०० केले.
  आंध्र प्रदेश आणी तेलंगाणा या राज्यांत सिमेंटच्या किंमती १०% ते १५% ने वाढल्या आहेत याचा फायदा NCL इंडस्ट्रीज, आंध्र सिमेंट, सागर सिमेंट या कंपन्यांना होईल.
 • स्पोंज आयर्न च्या किंमती वाढल्या आहेत याचा फायदा टाटा स्पोंज, आधुनिक मेटल्स या कंपन्यांना होईल.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • या आठवड्यांत RBL या बँकेचा IPO २३ ऑगस्टला बंद झाला. या IPO ला गुंतवणूकदारांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. IPO ६९ वेळा ओवरसबस्क्राईब झाला. यांत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला भाग ५.५ वेळा ओवरसबस्क्राइब झाला. HNI साठी असलेला भाग १९८ वेळा ओवरसबस्क्राइब झाला.

कॉर्पोरेट एक्शन

 • CYIENT या कंपनीची स्पेशल लाम्भांश देण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग होणार आहे.
  IOC ( INDIAN OIL CORPORATION) या कंपनीची १:१ बोनस देण्यावर विचार करण्यासाठी २९ ऑगस्टला बोर्ड मीटिंग आहे.
 • 8 K माईल्स या कंपनीने स्प्लिट आणी बोनस जाहीर केला. सध्या या कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत Rs १० आहे. हे शेअर्स Rs ५ दर्शनी किंमतीच्या २ शेअर्समध्ये स्प्लीट होतील. नंतर तुमच्याजवळ असलेल्या ३ शेअर्सच्या बदल्यांत १ बोनस शेअर मिळेल. तुमच्याजवळ ३ शेअर्स असतील तर त्याचे ८ शेअर्स होतील.
 • ECLERKS सर्विसेस ही कंपनी १०९ कोटी रुपयांचे शेअर्स ‘BUY BACK’ करणार आहे. पण हे प्रमाण फारच कमी आहे. जर तुमच्याजवळ ४०० शेअर्स असतील तर ९ शेअर्स BUY BACK’ करणार. या साठी निर्णय घेण्यासाठी २९ ऑगस्टला मीटिंग आहे,
 • INFINITE कॉम्पुटर्स ने ‘BUY BACK’ जाहीर केले. १५:५ हा रेशियो आहे. सध्याची शेअरची किंमत Rs २२७ आहे. ‘BUY BACK’ Rs २५० किंमतीला होईल. म्हणजे तुमच्याजवळ २०० शेअर्स असतील तर ३१ शेअर्स ‘BUY BACK’ होतील. आणी उरलेले शेअर्स पुन्हा तुमच्या DEMAT अकौंटला जमा होतील. ‘BUY BACK; च्या बातमीने शेअरची किंमत वाढते त्यामुळे शेअर मुळातच महाग पडणार नंतर त्याचा भाव कमी होणार. त्यामुळे ‘BUY BACK’ स्कीममधील ‘ACCEPTANCE रेशियो’ महत्वाचा असतो.
 • TCI च्या एक्सप्रेस डिविजनच्या डीमर्जरची एक्सडेट २६ ऑगस्ट रोजी झाली.
 • २६ ऑगस्टला PFC चा शेअर EXबोनस झाला.
 • REC ने आपल्या बोनस इशुची रेकार्ड डेट २९ सप्टेंबर २०१६ ही जाहीर केली.
 • महानगर GAS Rs १७.५० लाभांश जाहीर करणार आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

या आठवड्यांत PUTCALL रेशियो .८८ राहिला. म्हणजेच तेजी करणाऱ्यांचाही वरचष्मा किंवा मंदी करणाऱ्यांचाही वरचष्मा नाही. म्हणजे निर्णायक कोणतीच बाजू नाही. या खेचाखेचीत कोणाचा विजय होतो ते पहावे लागेल. तोपर्यंत विशिष्ट शेअरचा विचार करणेच योग्य ठरते. किंवा थोड्या फायद्याच्या उद्देशाने ट्रेड करावा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७७८६वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८५७५ वर बंद झाला.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s