आठवड्याचे समालोचन – २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर – संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गणरायाच्या स्वागतासाठी मार्केट सज्ज झाले आहे. कोणत्याही वाईट बातमीचा परिणाम होऊ न देता विघ्नाची तमा न बाळगता मार्केट पुढे पुढे चालले आहे.
या आठवड्यांत GDP चे आकडे चांगले आले नाहीत. कार्टलायझेशनसाठी सिमेंट कंपन्यांना Rs ६७१४ कोटी दंड बसला. शाह कंपनीच्या रिपोर्टमुळे ONGC आणी रिलायंस इंडस्ट्रीज या दोन्ही कंपन्यांवर काळे ढग जमा झाले.पण यावेळी मार्केटला या सर्व गोष्टींची चिंता नव्हती. सातत्याने मार्केट वाढतच होते. बुल रनच्या या सर्व खुणा आहेत. मुलभूत गोष्टी, त्यांचे विश्लेषण आणी शेअर्सची किंमत यांत असणारे परस्पर नाते नाहीसे होते. ग्रीड (हाव) आणी येणारा पैसा यांचे प्रमाण वाढते असते हे सध्याचे तर रोअरिंग बुल मार्केट आहे. हे सध्याचे तर रोअरिंग (गर्जना करणारे) बुल मार्केट आहे. एक वर्षासाठी दिलेले टार्गेट ४ महिन्यांतच पूर्ण होत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • ‘JACKSON HOLE’ येथे झालेल्या फेडच्या मीटिंग मध्ये फेडच्या अध्यक्ष येलेन यांनी जे भाषण केले त्यावरून काही गोष्टी सूचित केल्या गेल्या. रेट वाढवण्यासाठी पोषक वातावरण USA मध्ये तयार झाले आहे. पण रेट वाढवण्याची शक्यता सप्टेंबर पॉलिसीमध्ये ३०% तर डिसेंबरच्या पॉलिसीमध्ये ६०% झाली. या वर्षीच्या शेवटपर्यंत २ रेट हाईक होतील. याचा अर्थ USA ची अर्थव्यवस्था सुधारत आहे. इमर्जिंग मार्केटच्या RALLY वर परिणाम होण्याची शक्यता नाही. पण रेट हाईक होण्याची शक्यता वाढली हे खरे.
 • मेक्सीको मध्ये पडलेल्या पावसामुळे आणी वादळामुळे क्रूडचे भाव वाढत आहेत. रशियाने सांगितले की क्रुद्चे उत्पादन फ्रीज करण्याची जरुरी आहे. तसेच व्हेनिझुएला या सारख्या देशांची अर्थव्यवस्था क्रूडपासून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून आहे.
 • ऑस्ट्रेलियन कोर्टाने अडानी ग्रूपच्या बाजूने निकाल दिला.

सरकारी announcements

 • कॅनडाच्या पेन्शन प्लान इन्व्हेस्टमेंट बोर्डला कोटक महिंद्र बँकेत ५% ते १०% गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली.
 • २ सप्टेंबरला महाराष्ट्राचे राज्य सरकार नवीन हौसिंग पोलिसी जाहीर करणार आहे. या पोलीसींत FSI वाढवून मिळेल असा अंदाज आहे.
 • महाराष्ट्र राज्य सरकारने काही धरण योजनांसाठी मंजूर केलेली टेंडर्स रद्द केली. याचा परिणाम जैन इरिगेशनच्या बिझिनेसवर होणार नाही.
 • केंद्र सरकारने रिअल एस्टेट आणी CONSTRUCTION बिझिनेसला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. सरकारने असे सांगितले की आरबीट्रेशन कायद्यातील बदलांमुळे लिक्विडीटी वाढेल आणी CONSTRUCTION उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. जर ARBITRATION चा निर्णय कंपनीच्या बाजूने असला तर सरकार पैसे रिलीज करेल. पण दिलेल्या या रकमेचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी आणी अपुरी बांधकामे पुरी करण्यासाठी करावा लागेल..जर कंपनीने मार्जीन फ्री बँक GURANTEE दिली तर या रकमेपैकी ७५% रकम रिलीज केली जाईल. INFRASTRUCTURE आणी रिअल्टी क्षेत्रातील कंपन्याच्या बाजूने ARBITRATIONचा निर्णय आला असेल आणी सरकार कोर्टांत गेले असेल आणी केसचा निर्णय झाला नसेल त्यांचा फायदा होईल. याचा फायदा हिंदुस्थान construction कंपनी, Gammon इंडिया, IVRCL, आणी इतर रिअल्टी क्षेत्रांत काम करणार्या आणी सरकारी प्रोजेक्ट करणार्या कंपन्यांना आणी त्यांना कर्ज दिलेल्या बँकांना होईल.
 • सरकारने भारतांत Rs १० कोटी १८ महिन्यांकरता किंवा Rs २५ कोटी तीन वर्षांत गुंतवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकांना कायम रहिवासी म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे नागरिकत्व प्रथम १० वर्षाकरता असेल आणी ते पुढील १० वर्षाकरता वाढवता येईल.यामुळे या परदेशी नागरिकांना MULTIPLE विसा मिळेल आणी भारतांत मालमत्ता खरेदी करता येईल.
 • कोचीन शिपयार्ड आणी हुडको या दोन्ही सरकारी कंपन्यांचे IPO सरकार आणणार आहे. या दोन्ही कंपन्यातील १०% स्टेक सरकार IPO च्या माध्यमातून विकणार आहे. HUDCO च्या IPO मधून Rs १६०० कोटी आणी कोचीन शिपयार्ड मधून Rs ६०० कोटी मिळतील. हे दोन्ही IPO ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अपेक्षित आहेत.
 • ओडिशाच्या राज्य सरकारने GST साठी आवश्यक घटना दुरुस्ती पास केल्याने ५०% राज्यसरकारांनी हे बिल पास केले पाहिजे ही अट पुरी झाल्यामुळे आता हे बिल राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी जाईल.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • जे कुमार इंफ्रा या कंपनीचे ऑफिस आणी घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या कंपनीला BMC ( BOMBAY MUNICIPAL CORPORATION) ने BLACKLIST केले आहे.
 • केरळ हायकोर्टाने अपोलो टायर आणी अपोलो MAURITIUSच्या मर्जरला परवानगी दिली.
 • कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया या सरकारी संस्थेने ११ सिमेंट कंपन्यांवर कार्टलायझेशनसाठी (सर्वांनी मिळून सिमेंटची किंमत ठरवली आणी CAPACITY UTILIZATION आणी सेल्स यांची माहिती एकमेकांना देऊन सिमेंटचा पुरवठा नियंत्रित केला) Rs ६७१४ कोटींचा दंड लावला.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • GDP चे आकडे असमाधानकारक आले. GDP ७.१% ( ७.९) GVA ( GROSS VALUE ADDED) ७.३% (७.४%) शेती १.८ उत्पादन ग्रोथ ९.१% (९.३%) औद्योगिक वाढ ६% ( ७.९%) सेवा ग्रोथ ९.६% (८.७%). कंसातील आकडे जानेवारी ते मार्च २०१६ या तिमाहीसाठी आहेत. वरील आकड्यांवरून असे आढळून येते की एक सेवा क्षेत्र सोडले तर आपली प्रगती गेल्या पांच तिमाहीपेक्षा कमी आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टाटा मोटर्सचे तिमाही निकाल शुक्रवारी मार्केट संपल्यावर आले. कंपनीने भावी आउटलूक सांगताना सांगितले की ब्रेक्झीटचा आमच्यावर फारसा परिणाम होणार नाही.उलट GBP रुपयाच्या तुलनेत घसरत असल्यामुळे आम्हाला फायदाच होईल.
 • J K टायर्स ह्या कंपनीने आता विमानासाठी लागणारे टायर बनवणार असे जाहीर केले.
  २९ ऑगस्ट रोजी फ्युचर रिटेलचे रिलिस्टींग झाले. हे रिलिस्टिंग Rs १५३ वर झाले.
  CROMPTONच्या प्रमोटर्सनी २.८ कोटी तारण ठेवलेले शेअर्स सोडवले.
 • झी एंटरटेनमेंट या कंपनीने त्यांची ‘टेन स्पोर्टस्’ ही दूरदर्शन वाहिनी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स या कंपनीला Rs २६०० कोटींना विकली.
 • ABNUVO त्यांचे फरटीलायझर उत्पादन करणारे युनिट विकणार आहेत.
 • BASF ही कंपनी आपला फोटो इनीशीएटर बिझिनेस IGM ला विकणार आहेत.
 • ऑरोबिन्दो फार्मा आणी लिंटास या दोन कंपन्या तेवा या इस्रायेली कंपनीचा UK आणी आयरिश बिझिनेस विकत घेण्याच्या प्रयत्नांत आहेत.
 • MANGANESE ओअरच्या किंमती वाढल्यामुळे ‘MOIL’ या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत वाढली.
 • रीलायंस इंडस्ट्रीजने २ सप्टेंबर रोजी कंपनीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत रिलायंस ज्ञीओ इन्फोकॉम सर्विसेस लॉनच केली. याचे वैशिष्ट्य म्हणजे फ्री व्हाईस CALLS आणी आत्ता प्रचलीत असलेल्या दरांच्या १/५ दरांत मोबाईल इंटरनेट उपलब्ध करून दिले. याचा परिणाम भारती एअरटेल आणी आयडीया या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. अधिकृतरीत्या ही सेवा ५ सप्टेंबरला सुरु केली जाईल आणी सर्व ग्राहकांना वर्षं अखेरीपर्यंत फ्री व्हाईस आणी डाटा सर्विसेस उपलब्ध होतील.
 • जिंदाल स्टील आणी पॉवर लिमिटेड या कंपनीला परदेशी क्रेडीटर्सनी दिलेली कर्ज १२ सप्टेंबर २०१६ पर्यंत परत करायला सांगितली आहेत.
 • ऑगस्ट २०१६ साठी बजाज ऑटो आणी अशोक LEYLAND यांचा अपवाद वगळता सर्व ऑटो कंपन्यांची प्रवासी कार्स ची विक्री १०% पेक्षा अधिक वाढली.
 • यावर्षी रेल्वेसंबंधीत शेअर्समध्ये तेजी होती. कां ? हा प्रश्न तुम्ही विचारायला हवा. नेहेमीप्रमाणे फेबृआरी २५ ला रेल्वे अंदाजपत्रक सादर होते. त्यामुळे गुंतवणूकदार डिसेंबर जानेवारीच्या सुमारास हे शेअर्स जमा करण्यास सुरुवात करतात. मग या वर्षी हे शेअर्स ऑगस्टमध्येच का वाढू लागले ? विचार केला तर एक उत्तर मिळाले. या वर्षी सरकार रेल्वे अंदाजपत्रक वेगळे सादर न करता वार्षिक अन्दाज पत्रकाबरोबर जानेवारी २९ २०१७ ला सादर करील असा अंदाज आहे.

IPO

 • RBL(रत्नाकर बँक लिमिटेड) चे शानदार लिस्टिंग झाले. Rs २२५ ला IPO मध्ये दिलेला शेअर Rs २७४.५० ला लिस्ट झाला आणी नंतर Rs ३०० च्या वर गेला.
 • नजीकच्या भविष्यकाळांत L&T टेक सर्विसेस चा IPO येणार आहे. या IPO चा प्राईस BAND Rs ८५० ते ८६० असेल.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

मार्केटने काय शिकवले किंवा मीच मला शिकवलं कळत नाही पण प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आपल्याला बरेच काही शिकवून जातो.

या आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी अल्केम LAB, थायरो केअर, लाल पाथ LAB हे शेअर्स वाढले. असे कां झाले ? असा विचार केला तेव्हा लक्षांत आले की दुसऱ्या तिमाहीत (जून ते सप्टेंबर) सर्व महिने पावसाळ्याचे म्हणजेच साथीचा आजाराचा काळ, डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया, अशा आजारांचे आगमन होते. त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. या तीनही कंपन्या त्याच क्षेत्रातील, त्यामुळे त्यांची विक्री नफा वाढणार त्यामुळे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येतील. त्यामुले या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या.

आपण मार्केट पडण्याची वाट बघू या असे म्हणणारे जे लोक होते त्यांना सध्या ‘LEFT OUT FEELING’ आले आहे. त्यामुळे मार्केट कमी पडते आणी जास्त वाढते आहे अशा वेळी थोड्या थोड्या प्रमाणांत प्रॉफीट बुकिंग करावे. ट्रेलिंग STOP LOSS लावणे योग्य ठरते. आणी आपले गुंतवलेले भांडवल काढून घ्यावे.

ज्या लोकांचे वाढत्या किंमतीला घेतलेल्या शेअर्समध्ये पैसे अडकून पडले असतील अशा लोकांचे या बुल रन मध्ये पैसे वसूल व्हावेत हीच गणरायाजवळ प्रार्थना. मात्र योग्य वेळी योग्य किंमतीला शेअर विकण्याची खबरदारी घेणे जरुरीचे आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८५३२ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८०९ बंद झाला.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर – संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर – FEAR आणी GREED च्या मोहजालात शेअर मार्केट | Stock Market आणि म

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर – FEAR आणी GREED च्या मोहजालात शेअर मार्केट | Stock Market आणि म

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s