आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

courtesy – Brocken Inaglory / Wikipedia
अती गरिबी किंवा अती श्रीमंती दोन्ही वेळेला माणूस योग्य विचार करत नाही. त्यामुळे परिणाम भयानक होतात. तसेच मार्केटचे झाले आहे. मार्केटचा वाढण्याचा वेग खूप आहे. ४ मार्च २०१५ नंतर प्रथमच बँक निफ्टी २०,००० च्या वर, निफ्टी ८९००च्या वर आणी सेन्सेक्स २९००० च्या वर पोहोचले. कोणत्याही वाईट बातम्यांकडे ट्रेडर्स दुर्लक्ष करीत आहेत. पण चांगल्या बातमीचा परिणाम ज्या शेअर वर होणार असेल त्या शेअर्सच्या किंमती खूप वेगाने वाढत आहेत. एखाद्या शेअरमध्ये २% वाढ अपेक्षित असेल तर शेअर १०% वाढतो. त्यामुळे मार्केटमध्ये जे लोक नवीन असतील त्यांनी सावध व्हावे. बुलरनच्या चक्रव्युहांत अडकून पडू नये.मोहजालांत अडकून पडू नये. मार्केट उच्चतम पातळीवर आहे. अन्यथा कमाल किंमतीला घेतलेले शेअर्स तुमच्या पदरांत पडतील. आणी ते विकण्यासाठी पुढच्या बुलरनची वाट बघत बसावे लागेल.जसे क्रिकेटमध्ये खेळाडू चांगला असतो पण त्याचा bad patch चालू असतो. त्याचप्रमाणे ज्या बेस्ट कंपन्या ‘ bad patch’ मध्ये असतील अशा कंपन्या शोधाव्यात. जो शेअर खूप वाढला असेल त्याच्यातील प्रॉफीट बुक करून जे शेअर तात्कालिक कारणांसाठी सतत पडत असतील त्यांत गुंतवणूक करावी.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- रशिया आणी सौदी अरेबिया यांच्यात क्रूडचे उत्पादन फ्रीज करण्यासाठी करार केला.
- २१ सप्टेंबरला FOMCची मीटिंग आहे. नॉनफार्म पे रोल डाटा खराब आला. USA चा UNEMPLOYMENT रेट ४.९ % आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये रेट वाढण्याची शक्यता कमी झाली.
- युरोपिअन सेन्ट्रल बँकेने रीफायनांस रेट झिरो %, ठेवींवरील व्याज -०.४% आणी ASSET पर्चेसेस प्रत्येक महिन्याला EURO ८० बिलियन ( मार्च २०१७ पर्यंत) वर कायम ठेवली.
सरकारी अन्नौंसमेंट
- कोटिंग इंडस्ट्री आणी पेंट बनविण्यासाठी वापरण्यांत येणाऱ्या केमिकल्स वर ANTI DUMPING ड्युटी लावण्यांत येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हौसिंग पॉलिसी जाहीर केली.याचा फायदा रीडेव्हलपमेंट करणाऱ्या कंपन्यांनाच होणार. उदा :- HDIL
- GST साठी पास झालेल्या घटनादुरुस्तीसाठी ५०% पेक्षा जास्त राज्यांच्या सभागृहांनी मंजुरी दिल्यामुळे राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली.
RBI.सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था
- RBI चे गव्हरनर म्हणून उर्जित पटेल यांनी ५ सप्टेंबर २०१६ पासून कार्यभार सांभाळला.
अर्थव्यवस्थेच्या गोष्टी
- सतत १७ महिने कमी होणारे WPI एप्रिल महिन्यांत .३४% वाढले
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- इक्विटास होल्डिंग या कंपनीने आपली इक्विटास स्माल फायनान्स बँक चेन्नईमध्ये तीन शाखा उधडून सुरु केली. त्यांना ४१२ शाखा उघडायला RBI ने परवानगी दिली. कंपनी ६-८ महिन्यांत ४१२ शाखा उघडेल आणी वर्तमान १७० शाखा कर्ज देण्याचा आपला बिझिनेस चालू ठेवतील.
- ENIL ही कंपनी ३ नवी रेडिओ स्टेशन सुरु करणार आहे.
- डेन नेटवर्क्स त्यांचा BROAD BAND /इंटरनेट बिझिनेस डीमर्ज करणार आहे. हा बिझिनेस स्कायनेट मध्ये मर्ज करणार आहेत.
- वर्धमान ग्रूपने यार्न आणी थ्रेड बिझिनेसमधला ४०% स्टेक Rs ४१३ कोटीला विकला.
- RBI ने जस्ट डायल या कंपनीला प्रीपेड पेमेंट INSTRUMENT सर्विस साठी परवानगी दिली.
- ब्रिटानिया बरोबरच्या बिस्कीट PACKAGE च्या डीसप्यूट च्या बाबतीत ITC च्या बाजूने निकाल आला. त्यामुळे ब्रिटानिया डायजेस्टीव बिस्किटाचे सर्वं PACKETS मार्केटमधून ४ आठवड्यांत परत मागविल. ब्रिटानिया ने या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केके आहे.
- टाटा मोटर्सला ५००० बस पुरवण्यासाठी STU कडून ऑर्डर मिळाली.
- ITDC त्यांची चार हॉटेल्स विकण्याचा विचार करीत आहे.
- श्री कलहस्ती पाईप ह्या कंपनीची लहान लहान युनिट्स चालू केली जातील. असे कंपनीने जाहीर केले.
- नॉर्वे बेस्ड रेल्वे कंपनीकडून विप्रोला ३ वर्षाकरता CONTRACT मिळाले.
- महिंद्र CIE ही कंपनी बिल फोर्ज मध्ये १००% स्टेक Rs १२०० ते Rs १३०० कोटींना विकत घेणार आहे.
- चेन्नई पेट्रोचे तिमाही निकाल आले. GRM कमी झाले. बाकी निकाल चांगले आले. क्रूडचा भाव कमी राहिल्यामुळे निकाल चांगले असतील हे अपेक्षित होते.
- भेल आणी स्पाईसजेट या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले.
- USFDAने इंडोको रेमिडीजच्या गोवा प्लांटसाठी फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
- नॉर्थ अमेरिकेतून ‘क्लास 8’ ट्रक्सची विक्री आणी ऑर्डर मिळण्याचे प्रमाण महिना दर महिना वाढत आहे असे भारत फोर्जच्या व्यवस्थापनाने सांगितले.
- M & M त्यांच्या रेवा ब्रांडचे महिंद्र इलेक्ट्रिक असे REBRANDING करणार आहेत. M & M ओला या कंपनी बरोबर टायअप करणार आहे. हे अग्रीमेंट Non-exclusivity तत्वावर असेल. त्यामुळे M & M उबेर आणी इतर कंपन्यानबरोबरही टायअप करू शकतात. M & M ही कंपनी OLA या कंपनीला कार्स लीजिंग तत्वावर देईल. किंवा फायनांसिंगला मदत करील.
- ONGC चे निकाल चांगले आले.
- अशोक LEYLAND आणी निसान यांनी आपले जॉइनट व्हेन्चर अग्रीमेंट RESTRUCTURE केले.
- रेलवेने टोरांटो, राजधानी आणी तत्काळ तिकिटांचे दर वाढवले.
- IDBI ने त्यांचा ‘CARE’ मधला स्टेक विकला.
- ओर्बिट कॉर्पचे प्रमोटर पूजित अगरवाल यांना मुंबईमध्ये फसवाफसवीच्या आरोपावरून पकडले.
- येस बँकेने आपला QIP इशू मागे घेतला. बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले की शेअरच्या किमतीतील ‘VOLATILITY’आणी इशू ओवरसबस्क्राईब झाल्यावरही इशू ओपन ठेवल्यामुळे शेअरच्या किंमतीत VOLATILITY आली. त्यामुळे QIP इशू मागे घ्यावा लागला.
- टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने दुसऱ्या तिमाहीसाठी प्रॉफीट वार्निंग दिली. USA मधील कंपन्यांनी त्यांचे IT संबंधीत DESCRITIONARY SPENDING रोखून धरले आहे किंवा कमी केले आहे. याचा परिणाम टी सी एस च्या उत्पन्नावर होईल असे कंपनीने सांगितले. यापैकी BFSI या कामांत हे जास्त लागू आहे असे सांगितले. यामुळे सर्व IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी झाल्या.
- टेलीकॉमक्षेत्रातील इतर कंपन्यांनी रिलायंस ज्ञीओ साठी आवश्यक त्या प्रमाणात इंटर कनेक्टीव्हिटी देण्याला संमती दिली आहे.
या आठवड्यातील ipo आणी लिस्टिंग
- L & T टेक्नोलॉजी सर्विसेस, हे L & T चे एक युनिट, IPO आणत आहे. या IPO मध्ये प्राईस BAND Rs ८५० ते Rs ८६० आहे. मिनिमम लॉट १६ शेअर्सचा आहे. हा १.०४ कोटी शेअर्सचा इशू असून या द्वारे Rs. ८९४ कोटी उभारले जातील. हा IPO १२ सप्टेंबरला ओपन होऊन १५ सप्टेंबरला बंद होईल.
- GNA AXLES ही कंपनी रेअर अक्सल्स शाफ्ट बनविण्याच्या बिझिनेसमध्ये आहे. ही कंपनी जालन्दरर्ची असून Rs १३० कोटींचा IPO आणत आहे. ह्या IPO चा प्राईस BAND Rs २०५ ते Rs २०७ आहे. हा IPO १४ सप्टेंबर ओपन होऊन १६ सप्टेंबरला बंद होईल. IPO चे प्रोसीड्स प्लान्ट आणी मशिनरी खरेदी करण्यासाठी आणी खेळते भांडवल म्हणून वापरण्यांत येईल.
- ICICI प्रुडेन्शियल या कंपनीच्या IPO ला सेबी कडून मंजुरी मिळाली.
- पेप्सीची franchise कंपनी वरूण बिव्हरेजीसला IPO साठी मंजुरी मिळाली.
- आय आर बी इन्फ्रा या कंपनीने Rs ४३०० कोटीचे infrastructure investment trust (Invit) इशू करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट डॉक्यूमेंट फाईल केले.
- एल आय सी हौसिंग फायनांस ही कंपनी Rs १००० कोटींचे मसाला बॉंड आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये इशू करेल.या आधी इंडियाबुल्स हौसिंग फायनांस आणी HDFC या कंपन्यांनी हे बॉंड यशस्वीरित्या इशू केले आहेत. हे मसाला बॉंड इंडिअन रुपीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांना इशू केले जातात. या बॉंडचे रिपेमेंट मात्र US $ मध्ये केले जाते.
या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
सध्याच्या मार्केटमध्ये भाग घ्यायचा कि नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. मार्केट महाग झाले आहे त्यामुळे निफ्टी खरेदी करणे दूरच. मोठी गुंतवणूक करण्यांत अर्थ नाही. ट्रेलिंग stop loss ठेवावा आणी जेव्हढा जास्त फायदा मिळतो आहे तो पदरांत पाडून घ्यावा. पैसा कुठे कुठे गुंतवायचा ते मात्र विचार करून ठरवावे. जशा तुमच्या गाड्या चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यात तर उचलल्या जातात, त्यामुळे गाड्या आणी पैसा चुकीच्या ठिकाणी पार्क केला तर फायदा हातून जाण्याची शक्यता असते
गुरुवारी आणी शुक्रवारी मार्केट थोडेसे सुस्तावले आहे असे वाटले. पण ही सुस्ती टिकाऊ आहे असे वाटत नाही. उच्चांक प्रस्थापित झाल्यावर मार्केटने घेतलेली विश्रांती आहे की तेजी संपुष्टांत आली आहे हे सांगणे कठीण आहे पुढील आठवड्यांत CPI IIPचे आकडे येतील त्यानंतर मार्केटचा कल समजेल
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८७९७ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८६६ वर बंद झाला.