आठवड्याचे समालोचन – १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०१६ – लांडगा आला रे लांडगा आला !

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Stock market information in marathiगेले सहा महिने फेडच्या व्याज दरांत वाढीचा ‘लांडगा आला रे लांडगा आला’  आणी त्यामुळे काय नुकसान होणार ही आवई वारंवार उठत राहिली. २१ सप्टेंबर २०१६ रोजी होणार्या फेडच्या मीटिंगविषयी आणी त्यांत होऊ शकणार्या संभाव्य दरवाढीचा विकसित आणी अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल त्याची खुमासदार चर्चा वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या वाहिन्या यावर चालू आहे. विविध देशाच्या सेन्ट्रल बँक या संभाव्य घटनेच्या परिणामांना तोंड देण्याची तयारी करीत आहेत. पण गोष्टीतील लांडग्यांप्रमाणे प्रत्येक वेळी फेडच्या दरवाढीचा बार फुसका ठरत आहे. फटाका फुटत नाही यावेळी USA च्या अर्थव्यवस्थेविषयी त्याना जसा डेटा हवा होता तसा डेटा आल्यामुळे फेड आपले रेट ०.२५% ने वाढवील असा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA मधील निवडणुका, हिलरी क्लिंटनचे आजारपण, आणी त्या आजारपणाचा विरोधी उमेदवार ट्रंप यांना होणारा फायदा , २१ सप्टेंबरला होणारी फेडची मीटिंग आणी या मीटिंगमध्ये रेट वाढवतील का ही वाटणारी भीती यामुळे जागतिक स्तरावर सर्व शेअर मार्केट पडली. त्यामुळे या घटनेचा भारतीय मार्केटवरही परिणाम झाला.

सरकारी announcements

 • सरकार हायर एजुकेशन फायनान्सिंग एजन्सी सुरु करणार आहे. त्यानुसार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी मधून पैसा उभा करून तो पैसा IIT, IIM च्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पुरवला जाईल.
 • GST कौन्सिलच्या स्थापनेला मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली. हे कौन्सिल GST चा दर आणी इतर प्रशासनिक बाबतींत निर्णय घेईल.
 • दर महिन्यातून दोनदा फ्युएल (इंधन म्हणजेच पेट्रोल डीझेल आणी विमानांत वापरले जाणारे इंधन) च्या किंमती जाहीर होतात. यावेळी पेट्रोल दोझेल आणी विमानाच्या इंधनाच्या किंमती कमी होतील असा अंदाज आहे.
 • रेल्वेचे भाडे जरुरीपेक्षा जास्त आहे असे वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे भाडे कमी झाल्यास निर्यातदार आणी गुंतवणूकदारांचे नुकसान थांबेल असे वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.
 • ऑगस्ट २०१६ पर्यंत प्रत्यक्ष कराची वसुली १५% ने वाढली कॉर्पोरेट कर वसुली ११.५५ % ने वाढली. व्यक्तीगत कराची वसुली २४.०६% ने वाढली.
 • केंद्र सरकार १ ऑक्टोबर पासून २३५४.५५ MHZ स्पेक्ट्रमचा लिलाव करेल. या लीलावामध्ये ७ टेलिकॉम कंपन्या भाग घेतील. या स्पेक्ट्रम ची किंमत Rs ५.लाख ६०,हजार कोटी ठरवण्यांत आली आहे.
 • NATIONAL PHARMA PRICING AUTHORITY या सरकारी आस्थापनाने १८ औषधांच्या किंमती कमी केल्या.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) ऑगस्ट मध्ये ३.७४% झाला
 • CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ऑगस्ट २०१६ मध्ये ५.०५%(जुलै ५.१३%) होते.
 • फूड इन्फ्लेशन ५.९%( जुलै ८.३५) झाले. हे गेल्या ५ महिन्यातील कमीतकमी इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन कमी झाल्यामुळे आता RBI ऑक्टोबरच्या पॉलिसीमध्ये रेट कट करेल अशी आशा निर्माण झाली.
 • जुलै २०१६ च्या IIP च्या आकड्यांनी निराशा केली. IIP ( इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन) – २.४% झाले MANUFACTURING -३.४% झाले. कॅपिटल गुड्सचे प्रोडक्शन -२९.६% झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • महिंद्र CIE ने जे बिल फोर्जचे अक्विझिशन केले ते महागांत केले. ऑटो अन्सीलिअरी चे शेअर्स १० ते १५ पटींत चालतात. पण महिंद्र CIE ने बिल फोर्जला २५ पटींत भाव दिला.
 • HOEC या कंपनीने आसाममध्ये त्यांचे कमर्शिअल उत्पादन सुरु केले.
 • एडलवेईस त्यांचा अग्रीबिझिनेस विकणार आहे.
 • हिंदाल्को त्यांचा ब्राझील प्लांट आणी बॉक्साइटच्या खाणी विकणार आहेत.
 • टाटा पॉवरनी वेलस्पन रीन्युएबल एनर्जीचे अक्विझीशन पुरे केले.
 • WOCKHARTD या कंपनीच्या चिकलठाणा प्लांटला USFDA ने क्लीनचीट दिली. या प्लांटपासून कंपनीला एकंदर उत्पन्नाच्या ७५% उत्पन्न मिळते.

कॉर्पोरेट एक्शन

 • ओरीएंट पेपर त्यांचा इलेक्ट्रिक बिझिनेस डीमर्ज करणार आहेत.
 • हिंदुजा फौंड्री आणी अशोक LEYLAND यांचे मर्जर होणार आहे. हिंदुजा फौन्द्रीच्या १०० शेअर्सना अशोक LEYLAND चे ४० शेअर्स मिळणार आहेत. या ठिकाणी सिनर्जी काय आहे हे समजत नाही.
 • रिलायंस कम्युनिकेशनने आपण एअरसेल या अन्लीस्टेड कंपनीमध्ये आपले मर्जर जाहीर केले. यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील ४ नंबरची मोठी कंपनी अस्तित्वांत येईल.
 • सेन्चुरी टेक्स्टाईल AB FASHION मध्ये मर्ज होणार आहे.
 • सन फार्मा Rs ९०० प्रती शेअर या भावाने 22 सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ७५ लाख शेअर्स BUYBACK करेल.
 • वेदान्ता आणी केर्न इंडिया यांच्या मर्जरला मंजुरी मिळाली. केर्न एनर्जी च्या एका शेअरसाठी एक वेदांताचा शेअर आणी ४ प्रेफरन्स शेअर्स ( १८ महिन्यांत रीडीमेबल आणी ७,५% लाभांश) मिळतील.
 • रिलायंस कॅपिटलमधून रिलायंस होम फायनांस वेगळी काढून त्याचे स्वतंत्र लिस्टिंग करणार आहेत.रिलायंस कॅपिटलच्या १ शेअरला रिलायंस होम फायनान्स चा एक शेअर फ्री मिळेल.
 • BAYER AG या कंपनीने MONSANTO ही कंपनी अक्वायर केली. याचा फायदा त्या कंपन्यांच्या इंडिअन सबसिडीअरीजना होईल.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • L & T टेक्नोलॉजी चा IPO १२ सप्टेंबरला ओपन होऊन १५ सप्टेंबरला २०१६ ला बंद झाला. हा इशू २,२९ वेळा सबस्क्राईब झाला.
 • GNA AXLES या कंपनीचा IPO १४ सप्टेंबरला ओपन होऊन १६ सप्टेंबरला बंद झाला. हा IPO सात वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
 • ICICI पृडेन्शियल या कंपनीचा IPO सप्टेंबर १९ २०१६ ला ओपन होऊन २१ सप्टेंबरला बंद होईल. या IPO चा प्राईस BAND Rs ३०० ते Rs ३३४ असेल. मिनिमम लोट ४४ शेअर्सचा असेल. या IPO ची साईझ Rs ५४४० कोटी ते Rs ६०४० कोटी आहे. यावेळी प्रथमच ICICI बँकेच्या शेअरहोल्डर्सना क्वोटा राखून ठेवला आहे. याचा अर्थ ICICI बँकेचे शेअरहोल्डर्स IPO मध्ये २ अर्ज करू शकतील आणी हे अर्ज मल्टीपल अर्ज म्हणून समजले जाणार नाहीत. या कंपनीची खाजगी आयुर्विम्याच्या क्षेत्रांत लीडरशिप आहे. त्यांचा ब्रांड सुप्रस्थापित आहे. आणी कंपनी इन्व्हेस्टर फ्रेंडली म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची फायनानसिअल्स चांगली आहेत.
 • BSE (बॉम्बे STOCK एक्स्चेंज) भारतातील सर्वात जुन्या STOCK एक्स्चेंजने Rs १५०० कोटींच्या IPO साठी ऱेड हेअरिंग प्रोस्पेक्टूस फाईल केले. या IPO चा प्राईस BAND Rs ४०० ते Rs ५०० असेल. MCX नंतर BSE हे दुसरे लीस्टेड STOCK एक्स्चेंज असेल.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

शेअर मार्केटमध्ये कळीचा मुद्दा निरीक्षण हा आहे. या निरीक्षणाला तांत्रिक विश्लेषण आणी मुलभूत विश्लेषणाची जोड दिली तरच इंट्राडे ट्रेड चांगला होतो. म्हणजे समजा मी निरीक्षणातून असे ताडले की आज जेम्स आणी ज्युवेलरी सेक्टर चांगला चालतो आहे. तर यामधील मजबूत किंवा न वाढलेले शेअर्स कोणते? कोणते शेअर्स किती वाढतात आणी कोणते शेअर्स सपोर्ट लेव्हलला आहेत? ते पाहावे.

याआधी पुढच्या दोन्ही आठवड्यांत थोडेसे अस्वस्थ करणारे वातावरण मार्केटमध्ये असेल यांत शंका नाही. पण पुट CALL रेशियोसुद्धा ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनला नाही. सगळ्यांना बुल रनची चाहूल लागली आहे. त्यामुळे मार्केटमधील मुक्काम हलविण्याची इच्छा नाही. ‘बुल्स आर प्लेईंग फोर GBP पाउंड्स एंड बेअर्स आर प्लेईंग फोर पेनीज’ अशी स्थिती आहे. बघू या काय होते ते !

शनिवारी १७ सप्टेंबर रोजी युरोपिअन कॉमन युनियनची बैठक आहे. या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८५९५ NSE निर्देशांक निफ्टी ८७८० वर बंद झाले

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०१६ – लांडगा आला रे लांडगा आला !

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०१६ – दे दान सुटे गिराण (ग्रहण) | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s