आठवड्याचे समालोचन – २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६- सर्जिकल स्ट्राईक्स ऑपरेशन !

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

thumbs-up-1172213_640भारत सरकारने ‘उरी ‘पुंछ’ आणी ‘पठाणकोट’ येथील लश्करी तळांवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यांना ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून सडेतोड उत्तर दिले.आणी अतिरेकी हल्ले आम्ही खपवून घेणार नाही हे स्पष्ट केले. शेअरमार्केटमध्येही सर्वजण करेक्शन येण्याची वाट बघत होते. पण करेक्शन होत नव्हते आणी शेअर्सच्या किमती ‘ब्लू स्काय’ टेरिटरीमध्ये जात होत्या. जे अज्ञानी किरकोळ गुंतवणूकदार होते ते फसण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशावेळी ‘सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन’ ही इष्टापत्तीच ठरली. यातून सावरेपर्यंत शेअर्सच्या किंमती योग्य पातळीला येतील असा अंदाज आहे.
या ‘सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन’ मुळे नजीकच्या भविष्यकाळांत दोन देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीमुळे मार्केट कोसळले. मिडकॅप शेअर्स कोसळले. ‘oil & gas’ सेक्टरचे शेअर्स कोसळले नाहीत. जे शेअर्स अव्वाच्या सव्वा वाढले होते ते आपटले. ‘करन्सी मार्केटवर’ फारसा परिणाम झाला नाही. त्यातून हा ‘एक्सपायरी’ चा आठवडा असल्यामूळेही मार्केटमध्ये अस्थिरता होती. त्यामुळे मार्केट ५०० पाईंट पडले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • IEF (‘आंतरराष्ट्रीय उर्जा फोरम’) ची अल्जीरियामध्ये बैठक आहे.
 • ब्राझीलमध्ये साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांत साखरेच्या किंमती वाढत आहेत. याचा फायदा ज्या साखर उत्पादकांकडे इन्व्हेटरी उपलब्ध आहे अशा कंपन्यांना होईल.
 • “OPEC’ देशांमध्ये क्रूडचे उत्पादन घटवण्यावर सहमती झाली आहे. सौदी अरेबिया ३.५ लाख BARREL उत्पादन कमी करेल. इराण.नायजेरिया, आणी लिबिया उत्पादन स्थिर ठेवतील. सध्या ३.३५लाख BARREL उत्पादन होते ते ३.२५ लाख BARREL पर्यंत येईल. याचा परिणाम क्रूडची किंमत वाढण्यांत होईल. यांत महत्वाचे म्हणजे ‘OPEC’ देशांत एकी होत आहे. गेल्या चार वर्षातील ही महत्वाची घटना आहे.

सरकारी announcements

 • सरकारने गव्हावरील आयात ड्युटी १५%ने कमी केली. त्यामुळे गव्हाची आयात करणाऱ्या ADF फुड्स, हेरीटेज फूड्स, ब्रिटानिया, या सारख्या कंपन्यांचा फायदा होईल.
 • ‘NHPC’ २६ सप्टेंबर रोजी OFS आणणार होती पण काही तांत्रिक कारणांमुळे तो स्थगीत केला गेला.
 • केरळ सरकार दारूबंदी उठवण्याच्या विचारांत आहे. दारूबंदीमुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे असे राज्य सरकारने कारण दिले आहे.
 • महाराष्ट्र सरकारने मुंबईमधल्या ज्या जमिनी ५० वर्षापूर्वी लीजवर दिल्या आहेत त्या जमिनी अगदीच छोट्या आहेत,चिंचोळ्या पट्ट्या आहेत.त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने त्या जमिनी एकत्रित करून डेव्हलप करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • सरकारने GAS च्या किंमती रिवाईज करण्याचा विचार केला आहे. GAS च्या किंमती २१% कमी करणार आहेत.
 • सरकारने अग्री कमोडिटी आणी साखर यांचे PACKING ज्यूटमध्येच केले पाहिजे असा नियम केला. याचा फायदा LUDLOW ज्यूट, GLOSTER, CHEVIOT या ज्यूट इंडस्ट्रीमधील कंपन्यांना होईल.
 • सरकार चीनमधून आयात होणाऱ्या आणी औषध बनविण्यासाठी उपयोगांत येणाऱ्या केमिकल्सवर ANTI DUMPING ड्युटी लावण्याच्या विचारांत आहे.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBIचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल आपली पहीली वित्तीय पॉलिसी ४ ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी अडीच वाजता सादर करतील. यावेळी त्यांच्या निर्णयावर MPC (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) चा प्रभाव दिसेल. RBIचे प्राथमिक ध्येय महागाई ताब्यांत ठेवण्याचे असेल. पण याबरोबरच ग्रोथचे ही भान ठेवणे आवश्यक आहे.
 • पटना हायकोर्टाने बिहार राज्य सरकारचे दारूबंदीविषयक धोरण आणी ते अमलांत आणण्याची पद्धत चुकीची आणी बेकायदेशीर आहे असा निर्णय दिला. हा निर्णय आणी केरळ राज्य सरकार दारूबंदी उठवण्याचा विचार करीत आहे या बातम्यांमुळे मद्यार्काचे उत्पादन करणार्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले उदा :- युनायटेड स्पिरीट, ग्लोबस स्पिरीट, GM ब्रूअरीज.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • रेन इंडस्ट्रीज ही कंपनी WASTE MANAGEMENT करून पॉवर बनविण्याच्या विचारांत आहे.
 • मंगलं टिंबर या कंपनीला GST चा फायदा होईल. कारण प्लायवूडला GST मध्ये बराच फायदा आहे.
 • MAX फायनान्स आणी HDFC लाईफ यांच्या मर्जरबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या. NON COMPETITION फी प्रमोटर्सला देण्याबाबत एकमत होत नव्हते. त्यामुळे मतदान घेण्यांत आले. KKR, गोल्डमन, कोटक या तिघांचा स्टेक असल्याने NON COMPETITION फीच्या बाजूने मतदान झाले आणी मर्जरमधील एक अडथळा दूर झाला.
 • MMTC बरोबर सोन्याचे शिक्के बनवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया बोलणी करीत आहे.
 • युनायटेड स्पिरिट ‘SILK’ या नावाने पहिली व्हिस्की भारतीय बाजारांत आणीत आहे.
 • MCX नी त्यांचे सर्व रेट वाढवले. त्याचबरोबर MCX वर ऑप्शनमध्ये ट्रेडिंगला परवानगी मिळणार आहे. हिरे, चहा, कॉफी,कोको, तांबे, पिग आयर्न या सारख्या वस्तुंचे कमोडीटी मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु होणार आहे.
 • ‘USFDA’ने सिप्लाच्या गोव्यातील ३ उत्पादन युनीट्स वर ४ निरीक्षणे दिली. सिप्लाने सांगितले ही निरीक्षणे प्रोसिजरल आहेत.
 • अल्केम LAB च्या दमण उत्पादन युनिटवर USFDAने फॉर्म नंबर ४८३ ( १३ निरीक्षणे) इशू केला. त्यामुळे हा शेअर पडला.

कॉर्पोरेट एक्शन

 • KNR कन्स्ट्रक्शन ही कंपनी आपल्या शेअर्सचे ५ शेअरमध्ये स्प्लीट करणार आहे.
 • वर्धमान टेक्स्टाईल ही कंपनी Rs. ११७५ ला शेअर्स BUYBACK करणार आहे. कंपनी एकूण Rs ७२० कोटीं शेअर्स BUYBACK साठी खर्च करेल.
 • BNP PARIBA या कंपनीने शेरखान या ब्रोकिंग कंपनीचे अधिग्रहण केले.
 • मुक्ता आर्ट्स त्यांचा मल्टीफ्लेक्स बिझिनेस अलग करणार आहेत
 • ओरीएंट पेपर त्यांचा इलेक्ट्रिसीटी बिझिनेस वेगळा करणार आहेत.
 • REC २८ सप्टेंबर २०१६ रोजी एक्स बोनस झाला

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • D-MARTचा IPO येण्याची शक्यता आहे.
 • हिंदुस्थान कॉपर ही कंपनी ३० तारखेला किरकोळ गुंतवणूकदारांसाठी Rs ६२ प्रती शेअर या दराने ओपन ऑफर आणीत आहे.
 • सिंटेक्सचा CUSTOM मोल्डिंग बिझिनेस आणी PREEFAB बिझिनेस अलग करण्याला मंजुरी मिळाली. सिंटेक्स प्लास्टिक ही कंपनी नंतर लिस्ट होईल.
 • GNA AXLES या कंपनीचे Rs २६० वर लिस्टिंग झाले. गुंतवणूकदारांना Rs ५० पर्यंत लिस्टिंग गेन झाला.
 • ICICI PRUDENTIALचे लिस्टिंग निराशाजनक झाले. कंपनीच्या शेअरचे लिस्टिंग Rs ३३० वर IPO च्या किंमतीपेक्षा कमी किंमतीला झाले. नंतर तो Rs 297 पर्यंत खाली आला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

भारत सरकारने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन’ मुळे मार्केट काय करते, गुंतवणूकदार काय करतात, ट्रेडर्स काय करतात, चलनाच्या विनिमय दरावर काय परिणाम होतो किंवा विश्लेषकांचे भूतकाळातील अशाच घटनांना मार्केटने दिलेल्या प्रतिसादाच्या अनुभवांचे विश्लेषण ऐकणे समजावून घेणे महत्वाचे ठरते. मार्केटचा ट्रेंड बदलतो आहे का तसाच राहतो आहे किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चर्नींग होते आहे का याकडेही लक्ष द्यावे लागते.
अशा घटना घडतात तेव्हा मार्केटमध्ये अस्थिरता खूप असते. मार्केट काही काळ पडते आणी काहीवेळेला सुधारते. पण पडण्याचा वेग सुधारण्याच्या वेगापेक्षा जास्त असतो. तेजी मंदीच्या लाटावर लाटा मार्केटच्या किनाऱ्यावर आदळत असतात. चांगल्या शेअर्समध्ये इंट्राडे ट्रेड होतो. त्याचवेळी ‘Stoploss’चे महत्व समजते. तोटा मर्यादित रहातो आणी गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स स्वस्त भावांत मिळतात.

प्रत्येकाला ज्याप्रमाणे धैर्य असेल त्याप्रमाणे ज्याचा त्याने निर्णय घ्यायचा, सारासार विचार करायचा. खरेदीसाठी यादी तयार असेल तर वर्षभरातील प्रत्येक शेअरची कमाल आणी किमान किंमत बघून अगदी थोड्या प्रमाणांत खरेदी करावी. मार्केट एका विशिष्ट लेव्हलला स्थिर झाले की फायदा होऊ शकतो. गुंतवणूकदारांसाठी ही इष्टापत्तीच असते. बर्याच ट्रेडर्सनी आणी अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी ‘LONG POSITION’ घेतल्या आहेत. ते लोक या ‘POSITION CUT’ करतील त्यामुळे थोडे दिवस मार्केट पडत राहील.. ‘ब्लू चीप’ आणी चांगला बिझिनेस असणार्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्तांत विकत घेण्याची चालून आलेली ही संधी समजावी. मात्र मार्केट वारंवार पडत असल्यास जेव्हा अधून मधून सुधारते तेव्हा आपण खरेदी केलेले शेअर्स विकून पुन्हा मार्केट पडते तेव्हा आणखी स्वस्त भावांत खरेदी करू शकता. मार्केटला पडायला आणी सावरायला खूप वेळ लागत नाही. मार्केट भूतकाळाचा फारसा विचार न करता वर्तमानकाळ आणी भविष्यकाळावर लक्ष देते. पुष्कळवेळेला अशा प्रसंगी केलेली खरेदी फलदायी ठरते.
ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड याचा प्रत्यय आला, आलेले संकट मार्केटने तरी लीलया पचवले. शुक्रवारी मार्केट तेजीत बंद झाले.

पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल येण्यास सुरुवात होईल. विचार करून खरेदी केल्यास अल्पावधीत फायदा मिळू शकेल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २७८६५ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८६११ वर बंद झाले.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६- सर्जिकल स्ट्राईक्स ऑपरेशन !

 1. पिंगबॅक शाबासकी की शासन! – आठवड्याचे समालोचन – ३ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०१६ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s