आठवड्याचे समालोचन – १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१६ – दसरा सण मोठा आनंदा नाही तोटा !

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC - Dori via wikipedia

IC – Dori via wikipedia

शेअरमार्केटचे दोन आधारस्तंभ, मी याला 2C म्हणते. क्रूड आणी करन्सी. ओपेक देशांत झालेली एकी आणी ओपेकचे  रशिया आणी इतर ऑईल उत्पादक देशांचे क्रूड उत्पादन गोठवण्यावर  झालेले एकमत, त्यामुळे क्रूडच्या किंमतीत झालेली सुधारणा. US डॉलरमध्ये येणारी मजबुती, घसरणारा GBP, USA मधील अध्यक्षीय निवडणुका, अमेरिकेची सतत सुधारणारी अर्थव्यवस्था आणी त्यामुळे फेड रेट वाढवण्याची वाढती शक्यता या सर्व गोष्टी मार्केटमधील अनिश्चीतता वाढवण्यास कारणीभूत ठरल्या. त्यामुळे मार्केट पडले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • रशिया आणी अल्जीरिया यांनी ओपेक सदस्य असलेल्या देशांबरोबरीने क्रूड उत्पादन गोठवण्याचे मान्य केल्यामुळे क्रूडच्या किंमतीत ३% वाढ झाली. अल्जीरियाने सांगितले की राहिलेले क्रूडउत्पादक देशही यांत सामील होण्याची शक्यता आहे.
 • US$ चा विनिमय दर वाढत आहे, त्यामुळे फेड डिसेंबर २०१६ मध्ये रेट वाढवण्याची शक्यता आहे.
 • चीनमधील सप्टेंबर २०१६ ट्रेड डाटा (निर्यात १०% कमी झाली.) निराशाजनक आला. चीनच्या चलनामध्ये सतत घट होत आहे. त्यामुळे निर्यातदारांचा फायदा होत असला तरी चीनी कंपन्यांना त्यांनी US$ मध्ये काढलेली कर्ज फेडण्यांत अडचणी येत आहेत.

सरकारी announcements

 • सरकारने आज ‘इथनॉल पॉलिसी’ जाहीर केली.इथनॉलविषयी पॉलिसी येणार म्हटल्यावर प्रथम साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले. पण नंतर पॉलिसीचा अभ्यास केल्यावर असे आढळले की साखरेचे उत्पादन सोडून देऊन साखर कंपन्या इथनॉल उत्पादन करणार नाहीतच. इथनॉल हे साखरेचे  BY-PRODUCT आहे. सरकारने याचा भाव Rs ३९ ठरवला. पूर्वी हा भाव Rs ४२ होता. इथनॉल तयार करण्यासाठी जो खर्च येईल त्यानुसार ही किंमत ठरवली जाईल असे सरकारचे म्हणणे आहे. साखर उद्योगाचे असे म्हणणे आहे की इथनॉलची किंमत Rs ४४ निश्चित करायला हवी होती.याचा फायदा ऑईल मार्केटिंग कंपन्यांना होईल हे समजताच सर्व चित्रच पालटले

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • सोमवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी IIP चे आकडे आले. औद्योगिक उत्पादनांत ऑगस्ट महिन्यामध्ये ०.७ % ( जुलै २०१६ २,५ ) घट झाली. कॅपिटल गुड्सचे उत्पादन -२२.७% ( जुलै २०१६ -२९.७ %) झाले. कंझ्युमर्स ड्यूरेबल्सचे उत्पादन २.३% ने वाढले. जरी अगदी थोड्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक व्हायला सुरुवात झाली असली तरी अजून मोठ्या प्रमाणावर मोठ्या गुंतवणुकी व्हायला सुरुवात झाली नाही असेच यावरून दिसते. तसेच पावसाने केलेली मेहेरबानी आणी सरकारची पे कमिशनच्या स्वरूपांत झालेली मेहेरबानी यामुळे येत्या दोन तिमाहीत ग्रामीण आणी शहरी भागांत मागणी वाढून भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.
 • प्रत्यक्ष कर आणी अप्रत्यक्ष करांची वसुली वर्षाच्या पहिल्या अर्ध्या भागांत समाधानकारक झाली. अप्रत्यक्ष कराची वसुली २५.९% ने वाढून Rs ४.०८ लाख कोटी तर प्रत्यक्ष कराची वसुली ८.९५% वाढून ३.२७ लाख कोटी झाली.
 • गुरुवार तारीख १३ ऑक्टोबर रोजी CPI ( CONSUMER PRICE INDEX) चे आकडे आले. हा निर्देशांक महागाईचा दर्शक असतो . सप्टेंबर २०१६ साठी CPI ४.३१% ( ऑगस्ट ५.०५ ) झाला. यांत फूड CPI ३.८८% (ऑगस्ट ५.९१%) झाला. शहरी CPI ३.६४ % ( ऑगस्ट ४.२२%) तर ग्रामीण CPI ४.९६%( ऑगस्ट ५.८७%) झाला या आकड्यावरून असे दिसते की वरूण राजाची कृपा होऊन खरीप पिक चांगले आल्यामुळे अन्नधान्याची महागाई कमी झाली. एकूणच महागाई या महिन्यांत कमी झाली असे या माहितीवरून दिसते.
 • WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) सप्टेंबर २०१६ मध्ये ३.५७% ( ऑगस्ट २०१६ ३.७४%) झाला. याचा अर्थ किरकोळ आणी घाऊक दोन्ही बाजारातील महागाई कमी झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • पिरामल एन्टरप्रायझेस या कंपनीने जानसेन कंपनीची ५ औषधे Rs ११६४ कोटींना विकत घेतली. यामुळे कंपनीच्या ‘क्रिटीकल ड्रग” च्या पोर्टफोलीओमध्ये वाढ होईल.
 • DR रेड्डीज या कंपनीने कोलंबियाच्या मार्केटमध्ये प्रवेश केला. ही कंपनी कॅन्सरसाठी लागणारी काही औषधे विकणार आहे.
 • अजंता फार्मा गोहाटीमधील प्लांट मार्च २०१७ मध्ये बंद करणार आहे.
 • शिव सिमेंट आपला ओडीसामधील प्लांट विकण्यासाठी OCL इंडिया बरोबर बोलणी करत आहे.
 • टेक महिंद्रचा बहुतांशी बिझिनेस युरोपमध्ये आहे. GBP चा विमिमय दर सतत कमी होत असल्यामुळे या कंपनीला तोटा होत आहे.
 • किंग मेकर मार्केटिंग मधला आपला स्टेक ITC ने US$ 24 लाखांना विकला.
 • ASHOK LEYLAND या कंपनीने तेलंगाणा राज्य सरकारच्या बरोबर Rs ५०० कोटीचे बॉडी बिल्डींग युनिट बांधण्यासाठी MOU केले.
 • गृह फायनान्स या हौसिंग लोन क्षेत्रातील कंपनीचा निकाल चांगला आला.
 • अदानी ग्रूपच्या ऑस्ट्रेलियातील कारमायकेल प्रोजेक्टला ‘क्रिटीकल INFRASTRUCTURE’ प्रोजेक्टचा दर्जा मिळाला. त्यामुळे आता या प्रोजेक्टसाठी लागणार्या सर्व मंजुरी जलद होतील.
 • R COM चा टॉवर बिझिनेस ‘ब्रूकफिल्ड A. M. ला Rs १९००० ते २१००० कोटींना विकायचा व्यवहार पूर्ण झाला आहे. ब्रूकफिल्ड A. M. RCOMला Rs ११००० कोटींचे पहिले पेमेंट करील.
 • ग्रासिम कंपनीची FII लिमिट 24% वरून ३०% केली. ग्रासिम आपल्या शेअर्सचे २ शेअर्समध्ये स्प्लीट करणार आहे.
 • सिप्लाच्या ईदौर प्लांटसाठी USFDA कडून EIR ( ESTABLISHMENT INSPECTION REPORT) मिळाला. आता इन्स्पेक्शन पूर्ण झाले असे समजते.
 • झी एन्टरटेनंमेंट ही कंपनी रिलायंस ब्रॉडकॉस्ट खरेदी करणार आहे.
 • कुकिंग कोलच्या किंमती वाढत आहेत. याचा फायदा मरकेटरला होईल.
 • इंडसइंड बँकेचे तिमाही निकाल अंदाजापेक्षा चांगले आले.
 • KEC INTERNATIONAL या कंपनीला Rs १२०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • जे & के बँकेने कमीतकमी २ वर्षे तरी लाभांश जाहीर करू शकणार नाही तसेच काही काळ बँकेला तोटा होण्याची शक्यता आहे असे जाहीर केल्याने जे & के बँकेचा शेअर १५% पडला.
 • TCS चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल आला. निकाल समाधानकारक नव्हता. BFSI आणी रिटेल सेक्टरमध्ये प्रोजेक्ट आणी त्यावरील खर्च क्लायंटनी पुढे ढकलले. त्यामुळे उत्पन्न आणी प्रॉफीटमध्ये कमी वाढ झाली. सप्टेंबर २०१६ तिमाहीसाठी रेव्हेन्यू Rs २९२८४ कोटी ( ०.१% कमी ) तर नेट प्रॉफीट Rs ६५८६( ४.३% वाढ) कोटी झाले. मार्जीन २६.१% राहिले. कंपनीने सांगितले की तिसऱ्या तिमाहीचे आणी चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले असतील. कंपनीने Rs ६.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • इन्फोसिसचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. रेव्हेन्यू Rs १७३१० कोटी तर प्रॉफीट Rs ३६०६ कोटी आणी मार्जिन २४.९ % झाले. कंपनीने आपला रेव्हेन्यू गायडंस ८% ते ९% पर्यंत कमी केला. ATTRITION रेट वाढला. कंपनीने Rs ११ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनीने भविष्यातील गायडंस कमी केल्यामुळे शेअर पडला.
 • Unileverने आपला भारताविषयीचा गायडंस कमी केला. सध्याच्या परिस्थितीत इतर कंपन्यांकडून असणारी स्पर्धा लक्षांत घेता किंमती वाढवणे शक्य होणार नाही त्यामुळे रेव्हेन्युत वाढ होणे कठीण आहे. तसेच volume मध्ये वाढ होणेही कठीण वाटते. Unilever च्या उत्पन्नापैकी फक्त ७%हिस्सा भारतीय मार्केटमधून येतो.
 • ROSNEFT आणी TRAFIGURA या रशियन कंपन्यांनी एस्सार ऑईलमधील ९८% स्टेक US$१३ बिलियनला खरेदी केला. याचबरोबर ही कंपनी एस्सार ओईलचे Rs ३०००० कोटींचे कर्जही टेक ओव्हर करणार आहे. याचा फायदा ICICI आणी AXIS आणी स्टेट बँक या बँकांना होईल.

Corporate Action

 • आरती इंडस्ट्रीज ने ‘शेअर BUYBACK’साठी १७ ऑक्टोबरला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग बोलावली आहे.
  JSW स्टील या कंपनीने शेअर स्प्लीटवर विचार करण्यासाठी २७ ऑक्टोबरला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • सुनील हायटेकने १:१ बोनस दिला.
 • GNA AXLES हा शेअर २६ सप्टेंबरला लिस्ट झाला. त्यानंतर १० दिवस नव्याने लिस्टेड झालेला शेअर T TO T गटांत असतो. त्यावेळी याला ५%चे सर्किट असते. १० ऑक्टोबरपासून हा शेअर T TO T ग्रूपमधून बाहेर पडत आहे. ५%चे सर्किट लीमिट काढून टाकले आहे.
 • रिलायंस कॅपिटल त्यांच्या होम फायनान्स बिझीनेस्चे लिस्टिंग करणार आहे. कमर्शियल फायनांस बिझिनेसही अलग करणार आहे.
 • PNB हौसिंग कंपनीच्या Rs २५०० कोटींच्या IPO ला सेबीने परवानगी दिली.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

TCS आणी इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. निकाल आल्याबरोबर TCS चा शेअर पडला आणी इन्फोसिस वाढला. पण नजीकच्या भविष्यातील कंपनीच्या बिझीनेस विषयी कंपनीने वर्तविलेले अंदाज (गायडंस) ऐकल्यावर बरोबर विरुद्ध झाले. कारण काय बरे ? तर TCSचे व्यवस्थापन तिसऱ्या आणी चौथ्या तिमाहीविषयी आश्वस्त आहे असे जाणवले पण इन्फोसिसने आपला या दोन तिमाहीसाठीचा गायडंस कमी केला. गुंतवणूक नेहेमी पुढील कालखंडाचा विचार करूनच केली जाते हेच लक्षांत येते.

गोव्यामध्ये BRICS( ब्राझील, रशिया इंडिया, चीन आणी साउथ आफ्रिका) देशांचे व्यापारी अधिवेशन चालू आहे. यांत BRICS ची रेटिंग एजेन्सी स्थापन करणार आहे.

मार्केट लीडर्सनी गुंतवणूकदारांना निराश केले. पाउस चांगला झाला. उत्पादन वाढले, खरीप पीक चांगले येईल. पण याचे पर्यवसान मागणी वाढण्यात झाले नाही तर त्याचा उपयोग नाही. याची सरकारलाही जाणीव आहे त्यामुळे सरकार INFRASTRUCTURE क्षेत्रांत सार्वजनिक SPENDING वाढवण्याच्या विचारांत आहे. मार्केटमध्ये अनिश्चितता आहे. बुल्स आणी बेअर्स दोघेही नाराज आहेत कारण मार्केटला ट्रिगर नाही. दिशा मिळत नाही. प्रत्येक जण चाचपडतो आहे कोण वाट दाखवतो ते बघू.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७६७३ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८५८४ वर बंद झाले

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१६ – दसरा सण मोठा आनंदा नाही तोटा !

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१६ – दिवाळीच्या मुहूर्तावर उलगडले निकालांचे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s