आठवड्याचे समालोचन – १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१६ – दिवाळीच्या मुहूर्तावर उलगडले निकालांचे कोडे

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC - Wikipedia

IC – Wikipedia

१८ ऑक्टोबर २०१६ पासून GST कौन्सिलची मीटिंग सुरु झाली. ही मीटिंग २० ऑक्टोबरला संपली. या मीटिंगमध्ये GST चा रेट, राज्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाईचा फॉर्म्युला, आणी ड्युएल कंट्रोल याविषयीचे निर्णय होतील. यावेळी अंदाजपत्रक १ महिना अलीकडे (१ फेबृआरी २०१७) सादर केले जाणार असल्यामुळे आणी FII ची विक्री चालू असल्यामुळे मार्केट मंदीत आहे. FCNR (B) ठेविंची मुदत संपल्यामुळे त्याचीही परतफेड करावी लागणार आहे.

अशावेळी ज्या कंपनीचा तिमाही निकाल चांगला असेल किंवा ज्या कंपन्या या तिमाहीत गेल्या तिमाहीतील तोट्यातून नफ्यांत आल्या आहेत म्हणजेच टर्नराउंड झाल्या आहेत म्हणजेच त्यांच्या कामकाजांत सुधारणा झाली.आहे अशा कंपन्यांच्या शेअर्सकडे लक्ष ठेवा. अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये खूप फायदा होण्याची शक्यता आहे. या वेळी मार्केटचा मूड असा आहे की कंपनीचा तिमाही निकाल चांगला आला तर मार्केट फारसा चांगला प्रतिसाद देत नाही पण जे निकाल असमाधानकारक असतील तर शिक्षा मात्र जबर करते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • दिवसेंदिवस USA मधील जनतेचा कौल DEMOCRATIC पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने झुकत आहे. हे भारताच्या दृष्टीने म्हणजेच पर्यायाने मार्केटच्या दृष्टीने चांगले आहे. कारण USA च्या भारताविषयीच्या धोरणांत सुसंगतता राहील.

सरकारी announcements

 • GST कौन्सिलच्या बैठकीत राज्य सरकारांना देण्यांत येणाऱ्या नुकसानभरपाईविषयी एकमत झाले. केंद्राने खालीलप्रमाणे प्रस्ताव ठेवला आहे.
  १२% आणी १८% STANDARD रेट असतील. मूल्यवान धातूंवर ४% तर ६% दुसर्या अत्यावश्यक गोष्टींवर आणी काही कन्झुमर गुडस्वर २६% GST असेल. यापैकी चैनीच्या वस्तू आणी ‘SIN’ गुडस् (मद्यार्क आणी तंबाखू आणी त्यापासून बनविलेल्या इतर गोष्टी) वर जादाचा सेस लागेल. बहुतेक सेवांवर १८% GST लागेल.
 • GST चे रेट शेड्युल NOV ३ आणी ४ च्या बैठकीत निश्चित होईल, तसेच GST कायद्याच्या ड्राफ्ट वर नोव्हेंबर ९ आणी १० या दिवशी चर्चा होईल आणी १६ नोव्हेंबरला सुरु होणार्या हिवाळी अधिवेशनांत हा कायदा पास होईल अशी सरकारची आशा आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • अशोक LEYLAND ने इलेक्ट्रिक बस लॉनच केली, तसेच अशोक LEYLAND ला तान्झानियामधून AMBULANCEच्या पार्टसाठी US$ १७० लाख रकमेचे CONTRACT मिळाले.
 • दिल्ली हायकोर्टाने केर्न(इंडिया) चा राजस्थान क्रूड निर्यात करण्यासाठी केलेला अर्ज खारीज केला. जर केर्न ( इंडिया ) ला काही डीसपयूट असेल तर त्यांनी ती PRODUCTION SHARING CONTRACT या डीसप्यूट रेझोल्यूशन मेकॅनिकखाली सोडवावी असे सांगितले.
 • आदित्य बिर्ला आपला फरटीलायझर बिझिनेस विकणार आहे.
 • DLF त्यांचा सायबर सिटीमधील स्टेक विकणार आहेय.
 • HCL-TECH चा निकाल अपेक्षेनुसार लागला. ‘बटलर अमेरिका एरोस्पेस’ही कंपनी US$८४ लाखांना विकत घेतली.
 • HCL-TECH ने १२% ते १४ % चा गायडंस दिला. ज्यावेळी IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी निराशा केली या पार्श्वभूमीवर हा निकाल उठावदार वाटला.
 • विप्रो या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने ‘APPIRIO CLOUD सर्विसेस ही कंपनी US$ ५०० लाखांना विकत घेतली.
 • कजारिया सेरामिक, SBBJ, ACC, HAVELLS यांचे निकाल असमाधानकारक आले.
 • DHFL, ओरीएंट पेपर (टर्नराउंड), लक्ष्मी विलास बँक ( ग्रोस एनपीए वाढले), HIL, PANASONIC कार्बन, मास्टेक, BIOCON (टर्न राउंड ) SYNGEN , रिलायंस इंडस्ट्रीज, हिंदुस्थान झिंक,RBL, टाटा कॉफी, एल आय सी हौसिंग फायानांस या कंपन्यांचा दुसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • PNB ची हौसिंग सबसिडीअरी PNB हौसिंग फायनान्स चा IPO २५ ऑक्टोबरला सुरु होऊन २७ ऑक्टोबरला बंद होईल. याचा प्राईस BAND Rs ७५० ते Rs ७७५ आहे. मिनिमम लॉट १९ शेअर्सचा आहे. या IPOचे विशेषता ही की यांत कोणीही प्रमोटर आपले शेअर्स IPO द्वारा विकणार नाही.
 • पेप्सी कंपनीचे franchisee BOTTLER ‘वरुण बिव्हरेजीस’या कंपनीचा IPO २६ ऑक्टोबरला ओपन होऊन २८ ऑक्टोबरला बंद होईल. या IPO चा प्राईस BAND Rs ४४० ते Rs ४४५ असेल. कंपनी या IPO द्वारा Rs ११५० कोटी भांडवल उभारेल. IPO ची रक्कम कंपनीला असलेले कर्ज कमी करण्यासाठी वापरली जाईल
 • D’मार्ट या कंपनीने IPO साठी DRHP सेबीकडे दाखल केले.
 • इंडिअन ह्यूम पाईप या कंपनीने २६ ऑक्टोबर रोजी बोनस इशुवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.
 • ENDURANCE टेक्नोलॉजी या ऑटो अन्सिलरी कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग Rs ५७२ला झाले. नंतर तो Rs ६५४ पर्यंत वाढला.
 • गुरुवार तारीख २० ऑक्टोबर २०१६ पासून NBCC चा OFS उघडला. फ्लोअर प्राईस Rs २४६.५० होती. या कंपनीतील १५%हिसा सरकार विकणार आहे. या OFS मधून सरकारला Rs २२०० कोटी मिळतील अशी अपेक्षा आहे. शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी ही OFS किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन होईल.

कॉर्पोरेट एक्शन 

 • स्टर्लिंग टूल्स आपले शेअर्स स्प्लिट करणार आहे.
 • आरती इंडस्ट्रीज आपल्या शेअर्सपैकी १२ लाख शेअर्स Rs ८०० प्रती शेअर या भावाने BUYBACK करणार आहे. या BUYBACK ची RECORD डेट २ नोव्हेंबर आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

कोणतेही मोठे डील झाले की त्या गोष्टीची चर्चा पेपरला, दूरदर्शनच्या विविध लाइव्ह शेअरमार्केट दाखवणाऱ्या वाहिन्यांवर होते. त्यावेळी ती ऐकावी. मला काय करायचं? माझा काय संबंध ? असे म्हणू नये. एस्सार ऑईलचे डील झाले. त्यातला जो पैसा उरणार आहे तो पैसा एस्सार स्टीलमध्ये गुंतवणार का ? खरे पाहता एस्सार स्टीलला बँकांनी दिलेले कर्ज ARC (ASSET RECONSTRUCTION COMPANY) ला विकले आहे. ते EDELWEISSने घेतले आहे. त्यामुळे EDELWEISS ला फायदा होईल. त्यामुळे EDELWEISS या शेअरची किंमत वाढत आहे.

IT क्षेत्रातील कंपन्यांच्या निकालांवर फेडच्या निर्णयाचा आणी ब्रेक्झीट तसेच क्षेत्रांत होणार्या इनोव्हेशंस मुळे विपरीत परिणाम होईल असा अंदाज होता. याचे प्रतिबिंब इन्फोसिसचा गायडंस आणी TCS च्या निकालात दिसले पण CYIENT या IT क्षेत्रातील कंपनीचे निकाल त्यांचा बिझिनेस एरोस्पेस या क्षेत्रांत असल्यामुळे आणी GBP मध्ये व्यवहार असल्यामुळे चांगला आला.

ताधाकिशन दमाणी यांनी प्रोझोन या कंपनीचे १९ लाख शेअर्स विकार घेतले अशी न्यूज आली अशावेळी आपण डेट्रेड साठी खरेदी केल्यास निश्चित यश येते.

तिमाही निकाल येण्यास सुरुवात झाली की अनेक कोडी पडतात. विचार केल्यास त्याची उत्तरे मिळतात. काही वेळा निकाल खूप छान आला तरी शेअरच्या भावावर काहीच परिणाम दिसत नाहीच पण कधी कधी तर शेअरचा भाव कमी होतो. याच्या उलट निकाल फारसा चांगला दिसत नसला तरी शेअरचा भाव वाढतो. एखादा मुलगा खूप हुशार आहे चांगले मार्क मिळणारच हे माहीतच असते. तशी अपेक्षाही असते. पण त्या मुलाची प्रगती अपेक्षेपेक्षा किंचित कमी दिसल्यास जास्त वाईट वाटते. पण एखादा मुलगा पास होण्याची शक्यता नसते अशावेळी तो मुलगा ३५%मार्क मिळवून पास झाला तरी दिवाळी साजरी होते अशाप्रकारे कंपन्यांच्या निकालांचे निरीक्षण आणी आकलन केल्यास कोडी उलगडतात.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८०७३ वर तर NSE निर्देशांक NIFTY ८६९३ वर बंद झाला .

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१६ – दिवाळीच्या मुहूर्तावर उलगडले निकालांचे कोडे

 1. Kunal Kulkarni, Aurangabad

  या सगळ्या मजकुराचे संकलन करून एक छानसे पुस्तक का नाही प्रकाशित करत? की प्रकाशित केले आहे? कृपया कळवावे. धन्यवाद.
  कुणाल कुलकर्णी

 2. पिंगबॅक नवा प्रकाश, नव्या आशा, उजळू दया दाही दिशा – आठवड्याचे समालोचन – 24 ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१६- | Stock

 3. पिंगबॅक नवा प्रकाश, नव्या आशा, उजळू दया दाही दिशा – आठवड्याचे समालोचन – 24 ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१६- | Stock

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s