आठवड्याचे समालोचन – फटाके नाही फटके – ३१ ऑक्टोबर २०१६ ते ४ नोव्हेंबर २०१६

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

flame-580184_640दिवाळीच्या आठवड्यांत अर्थव्यवस्था सुधारल्याचे चित्र दिसेल असे वाटले होते. पण तसे दिसले नाही. जगभरातली शेअर मार्केट पडली. घरांच्या किंमती प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे लोकांनी घरांकडे पाठ फिरवली. USA मध्ये अध्यक्षीय निवडणुकांचे वातावरण आहे त्याचा परिणाम सोन्यावर झाला. सोन्याची किंमत वाढली. त्यामुळे लोकांनी सोन्याकडे पाठ फिरवली. स्टेट बँकेने आणी इतर बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर कमी करूनही कर्जदारांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. GST कौन्सिलने GSTचे पाच पदरी दर घोषित केले. याचा उद्योगातील विविध क्षेत्रांवर वेगवेगळा परिणाम होईल.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • ब्रेकझीटवर सार्वमत घेतले असले तरी त्यावर पुढील कारवाई करण्यासाठी ब्रिटीश संसदेची परवानगी घेणे जरुरी आहे असे ब्रिटनच्या हायकोर्टाने सांगितले. त्यामुळे पंतप्रधान मे यांनी मार्च २०१७ पर्यंत आर्टिकल ५० खाली युरोपिअन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडेल असे कळवण्याचा घेतलेल्या निर्णयाला खीळ बसली. या कोटाच्या निर्णयामुळे GBP चा US$ बरोबरचा विनिमय दर वाढला.
 • बँक ऑफ जपानने आपले इन्फ्लेशन टार्गेट पूर्ण करण्याची मुदत पुढे ढकलली.
 • USA मध्ये अध्यक्षीय निवडणुकांचे वातावरण जसे तापत आहे त्यामध्ये TRUMP या उमेदवाराला मतदार आपली पसंती दाखवतील असा अंदाज व्यक्त केल्यामुळे जगातील सर्व शेअर मार्केट्सवर विपरीत परिणाम झाला.
 • फेडने सांगितले की USAची अर्थव्यवस्था सुधारत असली तरी रेट आताच वाढवले जाणार नाहीत. FOMCच्या १३ -१४ डिसेंबर २०१६ ला होणाऱ्या मीटिंग मध्ये रेट वाढवण्याची शक्यता वाढली आहे.
 • ANTI-DUMPING ड्युटीच्या विरोधांत चीन समवेत जपान, युक्रेन, कतार या देशांनी WHO कडे तक्रार केली आहे. WHO ने भारताकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
 • जागतिक पातळीवर ‘लिक्विडीटी ADJUSTMENT’ चालू आहे. प्रगत देशातील सेन्ट्रल बँक्स अर्थव्यवस्थेत पैसा टाकीत होत्या त्यामुळे व्याजाचे दर कमी किंवा काही देशांत –Ve आहेत. त्यामुळे भारतीय मार्केटमध्ये पैसा येत होता पण जर युरोप USA जपान आणी इतर प्रगत देशांत व्याजाचे दर वाढतील तर भारतांत येणारा पैशाचा ओघ कमी होईल.

सरकारी announcements

 • GST कौन्सिलने GSTच्या दरांची पांचपदरी रचना जाहीर केली.
 • CPI (CONSUMER PRICE INDEX) मध्ये असलेल्या वस्तूंपैकी ५०% वस्तूंवर GST लागणार नाही.
 • सर्वसाधारण लोक वापरीत असलेल्या आणी खूप खप असलेल्या वस्तूंवर ५% GST लावला जाईल.
 • १२% आणी १८% या प्रमाणे दोन STANDARD रेट ठरवलेले आहेत. बहुतेक सेवांवर १८% GST लागेल.
 • पूर्वी ज्या वस्तूंवर VAT आणी उत्पादक शुल्कासह ३०% ते ३१% कर लावला जात होता त्यावर आता २८% GST लागेल.
 • तंबाखू, शीत पेये, चैनीच्या गोष्टी, पान मसाला इत्यादींवर २८% अधिक सेस या प्रमाणे GST लावला जाईल.
  जरी बहुतेक वस्तूंच्या किंमती स्थिर राहिल्या तरी काही सेवांसाठी आकारण्यांत येणाऱ्या दरांमध्ये वाढ होण्याचे शक्यता आहे.
 • GST ची ही कर रचना FMCG उदा :- HUL ITC डाबर, गोदरेज कन्झुमर्स यांना फायदेशीर आहे.
 • आता एक सेक्रेटरीजची कमिटी कोणत्या वस्तूवर किती GST लावायचा हे ठरवेल. GST कायद्याचे बिल संसदेच्या हिवाळी अधिवेशनांत सदर केले जाईल आणी पास होऊन त्याचा कायदा बनेल अशी सरकारची योजना आहे. सोने आणी इतर मूल्यवान धातूंवर २% ते ४% GST लावला जाईल.
 • याचे फायदे उद्योगांना प्रत्यक्षांत कमी लागणारा रेट, मालाच्या ने आण करताना येणारी सुलभता, आणी एकाच कायद्याची पूर्तता करायची असल्यामुळे त्यांच्या खर्चांत बरीच बचत होईल. कर चुकवेगिरीला आळा बसल्यामुळे सरकारच्या अप्रत्यक्ष करांच्या उत्पन्नात वाढ होईल.
 • अर्थव्यवस्थेमध्ये एकाच राष्ट्रीय स्तरावरील मार्केट प्रस्थापित होईल.
 • सरकार लवकरच नवीन मुलकी विमान वाहतूक धोरण जाहीर करणार आहे. पूर्वी विमान वाहतूक कंपनीत स्टेक खरेदी केला तरी व्यवस्थापनांत भाग घेणे शक्य होत नसे. FDI च्या नियमांत बदल केल्यामुळे आता हे शक्य होईल.
 • सरकारने लार्सेन & टुब्रो मधील आपला सुटी स्टेक (१.६३%) Rs २१०० कोटींना विकला. सरकारचा असाच सुटी स्टेक AXIS बँक आणी ITC मध्ये आहे.
 • आयर्न ओअर आणी अल्युमिनाच्या किंमती वाढल्या. याचा चांगला परिणाम वेदान्ता आणी हिंदाल्को या कंपन्यांच्या शेअर्स वर होईल. पण वाईट परिणाम नाल्को आणी NMDC वर होईल.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • रिलायंस इंडस्ट्रीजला  १.५५ बिलियन पेनल्टी ठोठावली (संदर्भ ONGC GAS MIGRATION ही २०१३ ची  केस)

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • GDP चे आकडे असमाधानकारक आले. GDP ७.१% ( ७.९) GVA ( GROSS VALUE ADDED) ७.३% (७.४%) शेती १.८ उत्पादन ग्रोथ ९.१% (९.३%) औद्योगिक वाढ ६% ( ७.९%) सेवा ग्रोथ ९.६% (८.७%). कंसातील आकडे जानेवारी ते मार्च २०१६ या तिमाहीसाठी आहेत. वरील आकड्यांवरून असे आढळून येते की एक सेवा क्षेत्र सोडले तर आपली प्रगती गेल्या पांच तिमाहीपेक्षा कमी आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ऑरोबिंदो फार्मा ही कंपनी ‘GENERIS FARMACEUTICA’ ही पोर्तुगीज कंपनी US$ २०० मिलियन ला विकत घेण्याचा विचार करत आहे. ही कंपनी ANTIINFECTIVE. RESPIRATORY, ANTI –DIABATES आणी DERMATOLOGY संबंधी औषधांचे उत्पादन करते आणी विकते.
 • जे पी असोसिएट या कंपनीने NCD ( NONCONVERTIBLE DEBENTURES) वरील तीन महिन्यांचे व्याज भरले नाही.
 • भारती एअरटेल या कंपनीला ‘ZAIN’ या कंपनीकडून US$१२९ मिलियन (Rs ८५० कोटी) नायजेरियातील कर आणी इतर बाबी SETTLE करण्याकरता मिळतील.
 • GNFC या कंपनीच्या दाहेज प्लांटमध्ये लीकेज झाल्यामुळे ५ दिवस हा प्लांट बंद राहील. GNFC चे ६०% उत्पन्न या प्लांटमधून येते.
 • मुक्ता आर्ट्स त्यांचा सिनेबिझीनेस त्यांच्या सबसिडीअरीला १० नोव्हेंबर पासून भाड्याने देणार आहेत.
 • मोईलने आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती तिसऱ्यांदा वाढवल्या. धातू क्षेत्रांत तेजी आहे.
 • झिंकच्या किंमती वाढत आहेत तसेच हिंदुस्थान झिंक या कंपनीतील आपला स्टेक विकण्याची सरकारने तयारी दर्शवल्यामुळे हिंदुस्थान झिंक या कंपनीच्या शेअरची किंमत वाढली. ग्लेनकोर ही कंपनी आपली झिंक आणी लेडची खाण ‘DEPLETION ऑफ RESERVES’ या कारणामुळे बंद करणार आहे.
 • डाबर निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. आफ्रिकेत अक्विझिशन करीत आहे. CTL ग्रुपचे हेअरकेअर आणी क्रीमचा बिझिनेस विकत घेणार आहे.
 • NON-AGRI कमोडीटीजमध्ये ऑप्शन ट्रेडींग सुरु करणार आहे हे कळताच MCX च्या शेअरची किंमत वाढली.
 • गव्हाच्या किंमती Rs २००० प्रती क्विंटल झाल्या. याचा परिणाम ब्रिटानिया, ITC आणी इतर कन्फेशनरी उत्पादकांवर होईल.
 • PINCON SPIRITS या कंपनीने त्यांच्या IMFL ( INDIAN MADE FOREIGN LIQUOR) च्या किंमती वाढवल्या.
 • रेमंड ही कंपनी ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेअंतर्गत अमरावती येथे उत्पादन युनिट सुरु करीत आहे.
 • इंडो अमाइन्स या कंपनीला त्यांची १० औषधे USAमध्ये विकण्यासाठी USEPA ( UNITED STATES ENVIRONMENT PROTECTION AGENCY) कडून परवानगी मिळाली.
 • श्री पुष्कर केमिकल्स या कंपनीने कमर्शियल उत्पादन सुरु केले.
 • जेट एअरवेजने ५० उड्डाणे रद्द केली. वैमानिकांची कमी हे कारण दिले.
 • TTK प्रेस्टीज चा निकाल खराब नव्हता तरी शेअर Rs ५०० पडला. कारण अनिश्चितता. हा शेअर आधीच पुष्कळ वाढला होता. जो काही फायदा होतो तो बुक करावा. उद्या काय होईल कुणास ठाऊक !ही वाटणारी भीती याला कारण आहे.
 • PE फंड ABG शिपयार्डमधला स्टेक घेण्याची शक्यता आहे.
 • हेरीटेज फुड्स ही कंपनी रिलायंस रिटेलचा डेअरी बिझिनेस विकत घेणार आहे.
 • VSNL ची जमीन डेव्हलप करण्याचे आणी १० र्रेल्वे स्थानके सुशोभित करण्याचे काम NBCC ला दिले जाणार आहे.
 • ‘ABACAVIR’ या HIV प्रतिबंधक औषधासाठी स्ट्राईडस शसून या कंपनीला USFDA कडून परवानगी मिळाली आहे.
 • झेन्सार या कंपनीने UK तील ‘FOOLPROOF’ ही चांगला कस्टमर बेस असलेली डिजिटल मार्केटिंग कंपनी विकत घेतली.
 • कॅपलीन पाईंट या कंपनीच्या इंजेकटेबल बिझिनेसच्या तामिळनाडूमधील युनिटच्या इन्स्पेक्शन साठी USFDA ऑक्टोबरमध्ये येणार आहे. हे इन्स्पेक्शन झाल्यावर कॅप्लीन पाईंट चा USA च्या मार्केटमध्ये प्रवेश होईल.
 • बी जी आर एनर्जीला Rs २६०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • जे के सिमेंट या कंपनीचे तिमाही निकाल चांगले आले.
 • टाटा ग्रूपची अवस्था आता ‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ ह्या म्हणीप्रमाणे झाली आहे. काढून टाकलेल्या चेअरमनने उघड केलेया विविध गोष्टीमुळे आता सेबी, टाटा ग्रुपला कर्ज दिलेल्या बँका आणी इतर प्रशासनिक संस्थांनी टाटा ग्रुपकडे स्पष्टीकरण मागायला सुरुवात केली आहे. टाटा ग्रुपने आता DOKOMO या जपानी कंपनीशी ११ नोव्हेंबरपर्यंत OUT ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याची तयारी चालवली आहे.LIC सकट बर्याच सार्वजनिक संस्थानी या ग्रुपच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली असल्यामुळे आता सामान्य लोकांनाही यांत लक्ष घालण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

IPO

 • पी एन बी हौसिंग फायनांस या कंपनीच्या शेअर्सचे पुढील आठवड्यांत लिस्टिंग होईल.
 • अलकार्गो या कंपनीची ७ नोव्हेंबरला BUYBACK ऑफ शेअर्ससंबंधी विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

STRENGTH आणी WEAKNESS कसा ओळखावा ? मंदीच्या काळांत जे शेअर्स कमी प्रमाणांत पडतात आणी वाढताना जास्त प्रमाणांत वाढतात असे शेअर मजबूत समजावेत. याउलट ट्रेंड पेक्षा जास्त पडतात आणी तेजीच्या मार्केटमध्येही शेअरची किंमत वाढण्याचे प्रमाण कमी असते ते शेअर्स ‘WEAK’ समजावेत.

तसेच शेअर्सची विक्री आणी खरेदी याविषयीचा डेटा पाहण्याची सवय ठेवावी. सध्या असे आढळते आहे की विक्रीचा वेग कमी होत आहे पण खरेदीमध्ये वाढ नाही आपण याला ‘GRINDING LOWER’ म्हणू शकतो. मार्केट पडत असताना जे शेअर्स फारसे पडत नाहीत ते मार्केट सावरल्यावर पुन्हा वाढू लागतात.

गेल्या रविवारी संध्याकाळी मुहूर्त ट्रेडिंग झाले. मुहूर्त चांगला झाला की वाईट झाला म्हणायचे कळत नाही.ज्यांना विकायचे होते त्यांच्या दृष्टीने वाईट तर ज्यांना खरेदी करायची होती त्यांच्या दृष्टीने हा आठवडा चांगला होता. कारण मुख्य कल तेजीचा असताना ही एक छोटीशी मंदीची लाट आहे. USA मधील निवडणुका ही मोठी घटना डोळ्यासमोर असल्याने ज्यांना जिथे प्रॉफीट होत आहे ते तो प्रॉफीट बुक करीत आहेत. घाबरण्याचे कारण नाही. पुढील आठवड्यांत सर्व चित्र साफ होईल. व योग्य निर्णय घेणे सोपे जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७२७४ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८४३३ वर बंद झाले.

 

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – फटाके नाही फटके – ३१ ऑक्टोबर २०१६ ते ४ नोव्हेंबर २०१६

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ‘ट्रम्प’ कार्ड – ७ नोव्हेंबर २०१६ ते ११ नोव्हेंबर २०१६ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s