आठवड्याचे समालोचन – ‘ट्रम्प’ कार्ड – ७ नोव्हेंबर २०१६ ते ११ नोव्हेंबर २०१६

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC - Biswarup Ganguly via wikipedia

IC – Biswarup Ganguly via wikipedia

IC - Gage Skidmore via Wikipedia

IC – Gage Skidmore via Wikipedia

 

 

 

 

 

 

गेला आठवडाभर मार्केट USA मधील अध्यक्षीय निवडणुकींत काय होणार याचा विचार करण्यातच रमले.
सोमवारी मतदान आणी मंगळवारी निवडणुकीचा निकाल ! आता कसे होणार !आता काय होणार ! मार्केट पडणार की वाढणार ! असे वारे घोंगावत होते. त्यातच PNB हौसिंगचे लिस्टिंग सोमवारी होते. आणी त्यातच मोदीनी काळा पैसा, भ्रष्टाचार वं महागाई यासाठी केलेले सर्जिकल स्ट्राईकस ( Rs ५०० आणी Rs १००० च्या चलनांत असणार्या नोटा ताबडतोब रद्द करणे) याची भर पडली. त्यामुळे वेगवेगळ्या घटनांनी भरलेला हा आठवडा होता..

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA च्या अध्यक्षीय निवडणुकीत ‘डोनाल्ड ट्रम्प’ निवडून आले. ट्रम्प यांच्या कोल माईन्स आहेत. म्हणून ‘कोल इंडिया’ला फायदा होईल. ट्रम्पचा ‘INFRASTRUCTURE’ डेव्हलपमेंट करण्यावर भर असल्याने त्यासाठी मेटल लागते म्हणून धातूचा भाव वाढला ते शेअर वाढले. हे झाले अमेरिकन ‘ट्रम्पकार्ड’ च्या बाबतीत.माणूस खुर्चीवर बसण्याआधी वेगळे बोलतो आणी खुर्चीवर बसायचे म्हणल्यावर त्याचा नूर बदलतो. ‘ट्रम्प’ यांनी निवडून आल्यानंतर केलेल्या भाषणांत कुठेतरी समन्वय साधण्याची तयारी दाखवल्यामुळे लोकांना हायसे वाटले. मार्केट ट्रम्प यांच्या  विजयाची बातमी आल्यावर १६०० पाईंट पडले आणी लगेच १३०० पाईंट सुधारले. ब्रेकझीट च्या वेळी जी गोष्ट घडली तसेच याहीवेळी घडले, ब्रेकझीटच्या भीतीने मार्केट पडले पण ब्रेकझीटच्या बाजूने मतदान झाले अशी बातमी आली तेव्हा मार्केट प्रथम पडले पण लगेचच सावरले.
 • ‘USA’ मध्ये काही काल अस्थिरता वाढेल त्यामुळे डिसेंबर २०१६ मध्ये फेड ठरलेली दर वाढ करणार नाही असे गुंतवणूकदारांना वाटले त्यामुळे सर्व इमर्जिंग मार्केट्स वाढली

सरकारी announcements

 • भारतीय पंतप्रधान मोदींनी जे ‘ट्रम्प कार्ड’ काढले ते सामान्य लोकांनाही थोडेसे कठीण गेले. सगळ्यांचाच डाव कोलमडला. कारण महागाई एवढी आहे की Rs १०० च्या नोटेंत काहीच खरेदी होत नाही. त्यामुळे Rs ५०० तसेच Rs १००० च्या नोटा बाळगाव्या लागतात. ATM मधूनही Rs ५०० आणी Rs 1000 च्या नोटाच मिळतात. हल्ली विभक्त कुटुंबपद्धतीमुळे कोणी घरी जास्त पैसे ठेवत नाहीच.लागतील तेवढे ATM मधून काढतात. सरकारच्या या निर्णयाचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून अनेक उपाय केले. पण काही अडचणी आल्याच. पण लोकांना मनोमन आनंद झाला कारण काळ्या पैशाचा नायनाट करण्यासाठी हे पाउल उचलले होते. बेनामी आणी हवाला व्यवहारांना लगाम घातला जावा हा हेतू आहे. पण विचार केल्यास असे आढळले की आधी जंनधन खाती उघडली गेली त्यामध्ये जुन्या नोटा जमा करायला सांगितले. त्यामुळे बँकांचे ‘CASA’ डीपोझीट वाढेल पण लोकांच्या हातांत खर्च करायला पैसे नसल्याने मागणीवर परिणाम होईल.
 • या आर्थिक ‘सर्जिकल स्ट्राईक’ची वेळ म्युचुअल फंडांच्या दृष्टीने फार चांगली होती. १ तारीख ते ७ तारीख पगार होतात त्यामुळे SIP तून येणारा पैसा जमा झाला होता.
 • बुधवारी मार्केट पडले तेव्हा म्युचुअल फंडांना गुंतवणूक करायला चांगली संधी मिळाली. काळ्या पैशाचा वापर जेथे होतो त्या क्षेत्रावर म्हणजे रिअल्टी, सिनेमा, हॉटेल जडजवाहिरे, सोनेचांदी, यावर परिणाम होईल. काही काळे धन गोरे करण्याची धडपड नक्कीच होईल. सरकारला VAT, EXCISE, यातून उत्पन्न मिळेल. यामुळे सरकारची ‘BALANCE SHEET’ सुधारेल. . ‘ATM’, क्रेडीट कार्ड यांच्या माध्यमातील व्यवहार वाढेल.खाती जास्त उघडली जातील. समांतर अर्थव्यवस्थेला लगाम बसेल. बँकांना फायदा होईल. या सगळ्यामुळे बॅंकाचे शेअर्स वाढले.पण मायक्रो फायनान्स कंपन्यांचं शेअर्स, हौसिंग फायनांस कंपन्यांचे शेअर्स पडले. याला ‘HDFC’ हाही अपवाद नव्हता.
 • उत्तर प्रदेशांत विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकींत पुष्कळ काळा पैसा खर्च होण्याचे प्रमाण कमी होईल आणी BJP ची बाजू मजबूत होईल. मोठ्या धोरणीपणाने आणी हुशारीने हा निर्णय घेण्यांत आला असे जाणवले.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने नियमांत थोडी ढिलाई केली ज्या कंपन्या NPA झाल्या होत्या त्यांची ऑपरेशन्स सुधारली असतील तर त्यांना NPA मधून काढून ‘ STANDARD ASSETS’ असे घोषित करायला परवानगी दिली. त्यामुळे NPA साठी करावी लागणारी तरतूद कमी करावी लागेल.
 • मद्रास हायकोर्टाने सांगितले की ‘EVERONN EDUCATION’या कंपनीसाठी लिक्विडेटर नेमावा.
 • दिल्ली हायकोर्टाने हॉटेल लीला या कंपनीने ‘एअरपोर्ट ऑथारिटी ऑफ इंडिया’ या संस्थेला Rs २५८ कोटी द्यावे असे सांगितले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ल्युपिनला USFDA कडून त्यांच्या गोंवा प्लांटसाठी EIR ( ESTABLISHMENT INSPECTION REPORT) मिळाला .ल्युपिन या कंपनीची अशी ख्याती आहे की ती अर्जातील त्रुटींवर त्वरीत सुधारणा करते.
 • ‘NTPC’ ने त्यांचा दिल्लीतील प्लांट प्रदुषणाच्या कारणामुळे बंद केला.
 • NHAI च्या प्रोजेक्ट्समध्ये एल आय सी Rs २५००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
 • ब्रीटानियाचा तिमाही निकाल MIX आला. ‘POTASSIUM BROMATE’च्या इशूमुळे गेल्या तिमाहीत ब्रेडच्या विक्रीवर परिणाम झाला असे कंपनीने कळवले.
 • भारत फोर्जचा निकाल चांगला आला नाही. प्रत्येक व्हरटिकलमध्ये मंदी जाणवली. निर्यातीतून मिळणारे उत्पन्न कमी झाले.
 • भेलचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आला.
 • VHOLTEMP TRANSFORMER, धामपूर शुगर, HONEYWELL, मदरसन सुमी, पिडीलाईट, यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • HCL-TECH ने सांगितले की त्यांनी विसामधून जवळजवळ मुक्ती मिळवली आहे. आता स्थानिक लोकांमधून भरती केली जाते. स्थानिक आणी व्हिसावर काम करणारे यांच्या पगारांत फारसा फरक नाही. त्यामुळे निवडणुकीच्या निकालावर आमचे भविष्य अवलंबून नव्हते.
 • युनायटेड ब्रुवरीजचा निकाल खराब आला. बार्ली आणी साखर यांच्या किंमती वाढल्यामुळे मार्जींनवर परिणाम झाला.
 • यावेळी पेपर कंपन्यांचे निकाल चांगले आले. त्यातल्यात्यांत शेषशायी पेपरचा निकाल लक्षांत येण्यासारखा होता.

कॉर्पोरेट एक्शन 

 • ‘BALMER LAWRIE’ या कंपनीने १:३ या प्रमाणांत बोनस जाहीर केला. म्हणजेच तुमच्याजवळ जवळ तीन शेअर्स असतील तर तुम्हाला एक बोनस शेअर मिळेल.
 • इंडिया बुल्स रियल इस्टेट या कंपनीने २७ नोव्हेंबरला ‘BUYBACK OF SHARES’ साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.
 • बलरामपुर चीनी सुद्धा शेअर्स ‘BUYBACK’ करण्याच्या विचारांत आहे.
 • ‘नवनीत पब्लिकेशन’ या कंपनीने १६ नोव्हेंबरला शेअर्स ‘BUYBACK’ करण्यावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.
 • OCL, दालमिया भारत आणी दालमिया भारत सिमेंट यांच्या ‘AMALGAMATION’ ला परवानगी मिळाली. ज्या शेअरहोल्डरकडे OCL INDIA चे २ शेअर्स असतील त्यांना ‘दालमिया भारत’या कंपनीचा एक शेअर मिळेल.
 • ‘CYIENT’ ही IT क्षेत्रातील कंपनी UK बेस्ड ‘DIOM AEROFILM’ या कंपनीचे अक्विझिशन करणार आहे.
 • सिप्ला क्वालिटी केमिकल्स चा IPO आणण्याचा विचार करीत आहे.
 • फ्युचर ग्रूप ‘हेरीटेज फूड्स’ या कंपनीचा रिटेल बिझिनेस खरेदी करणार आहे.

IPO

 • PNB हौसिंग चा IPO २५ वेळा सबस्क्राईब झाला होता.ग्रे मार्केट प्रीमियम Rs ६५ होता. PNB हौसिंगच्या शेअरने पहिल्या दिवशीच Rs ९०० ची पातळी गाठली. IPO मध्ये शेअर Rs ७७५ च्या भावाने दिला होता. त्यामुळे लिस्टिंग गेन चांगला झाला.
 • वरुण बिवरेजीसचे ८ नोव्हेंबरला लिस्टिंग झाले. लिस्टिंग चांगले झाले नाही. पण नंतर शेअर सुधारला तेव्हा लोकांना Rs २० प्रती शेअर फायदा झाला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

ज्याप्रमाणे परिस्थिती असेल त्याप्रमाणे प्रत्येक घटनेकडे पहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी चांगली किंवा वाईट नसते. कोणत्याही बदलाला सामोरे जाताना आपल्यालाही अनेक बदल करावे लागतात. DEMONETISATION आणी GST हे मुलभूत रीफोर्म्स आहेत याचे वेगवेगळे परिणाम आहेत. जो पैसा ठेवींच्या स्वरूपांत येईल तो तेवढ्याच वेगाने निघून जाईल. त्याचवेळी दुचाकी आणी चारचाकी वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे त्यामुळे बजाज ऑटो, मारुती, हिरो हे शेअर्स पडले.

शुक्रवारच्या मार्केटने अनेक रंग दाखवले. बँकांचे उत्पन्न वाढेल या आशेने बँकांचे शेअर्स वाढले पण नोटा बद्लण्याच्या घटनेमुळे रिअल्टी क्षेत्रावर परिणाम होईल असे वाटल्याने हौसिंग फायनान्स कंपन्यांवर झाला. त्यामुळे सिमेंट कंपन्याचे शेअर्सही पडले.

जवळजवळ २ वर्षे धातूंच्या किंमती कमी होत होत्या त्यामुळे कोणी साठा वाढवला नव्हता. त्यामुळे असणारा साठा संपत आला आहे. त्याचबरोबर धातूंच्या किंमती वाढायला सुरुवात झाली हे लक्षांत येताच मागणी वाढली आहे. आयर्न ओअर आणी कुकिंग कोलला खरोखरी मागणी आली आणी त्यांचे भाव वाढले.

हवामान बदलत असले की आहार, कपडे, यामध्ये जसा बदल करतो त्याच पद्धतीने मार्केटमध्येही बदलाचे वारे वाहू लागले की कंपन्यांचेही नशीब बदलते आणी त्याप्रमाणे शेअरच्या किंमतीही बदलतात. त्यानुसार आपण आपले निर्णय घ्यावेत किंवा बदलावेत. शेअर मार्केटमध्ये ज्यांना व्यवहार करायचा असेल त्यांना ही मार्केट्ची लवचिकता ध्यानांत ठेवून जसा पाउस पडेल तशी छत्री धरावी लागते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २६८१८ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८२९६ वर बंद झाली.

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ‘ट्रम्प’ कार्ड – ७ नोव्हेंबर २०१६ ते ११ नोव्हेंबर २०१६

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १४ नोव्हेंबर २०१६ ते १८ नोव्हेंबर २०१६ – घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s