आठवड्याचे समालोचन – १४ नोव्हेंबर २०१६ ते १८ नोव्हेंबर २०१६ – घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

cropped-mktandme-logo.jpg
आठवडाभरांत डीमॉनेटायझेशनचा परिणाम चांगलाच जाणवू लागला. बिझिनेस ACTIVITY थंडावली. अर्थव्यवस्थेतील पैसा कमी झाला. ‘दुकानांत माशा मारीत बसण्यापेक्षा गावी गेलेले बरे’असे संवाद ऐकू येऊ  लागले. शेतकीविषयक क्षेत्रावर परिणाम जाणवला. रबी फार्मिंग आणी खरीप हार्वेस्टिंगवर परिणाम झाला. सध्या लोकांकडे कॅश कमी आहे त्यामुळे खरेदीचा निर्णय एकतर रद्द केला जात आहे किंवा पुढे ढकलला जात आहे. जाणत्या लोकांचा अंदाज असा आहे की परिस्थिती  पूर्व पदावर येण्यासाठी वर्षं सहा महिन्यांचा काळ लागेल.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मधील अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. त्या देशाच्या नियमाप्रमाणे ते २० जानेवारी २०१७ पासून अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. US सिनेटमध्ये ट्रम्प यांच्याच पक्षाला बहुमत असल्यामुळे त्यांना आपली धोरणे राबविणे सोपे जाईल. साऱ्या जगातील शेअर मार्केट्स ट्रम्प काय धोरणात्मक निर्णय घेतात याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे.
 • USA मधील फेडच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनी जाहीर केले की रेटमध्ये वाढ  करण्यासाठी USA मध्ये  अधिकाधिक पोषक वातावरण तयार होत आहे. लेबर मार्केट सुधारत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये फेड रेट वाढवण्याची शक्यता आहे आणी बरेच दिवस रेट स्थिर ठेवणे बरोबर नाही.

सरकारी announcements

 • केंद्र सरकारने चलनांत प्रचलित असलेल्या Rs. १००० आणी Rs. ५०० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारने हा निर्णय घेण्यांत थोडी घाई केली आणी पूर्णपणे तयारी होण्याआधीच निर्णय घोषित केला असे सर्वांचे मत आहे.  Rs ५०० आणी Rs १००० च्या नोटा मुख्यतः ATM मधून पैसे काढल्यामुळे मिळत असल्यामुळे आणी गोरगरीब जनताही या नोटांचा सोय आणी सुरक्षितता या दोन्ही गोष्टी लक्षांत घेवून शिलकी पैसा ठेवण्यासाठी उपयोग करीत होती. त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे गरीब, मध्यम वर्ग आणी श्रीमंत लोकांनी दैनिक खर्च भागविण्यासाठी ATM समोर रांगा लावल्या. Rs ५०० आणी Rs १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या शाखांमध्ये लांबचलांब रांगा लागल्या. आपल्याजवळ असलेल्या जुन्या नोटा आपल्या खात्यामध्ये भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ ही शेवटची तारीख असूनही लोकांनी बँकांत गर्दी केली. त्यातच नवीन छापलेल्या नोटा ATM च्या ऑपरेशनसाठी सोयीस्कर नसल्यामुळे गोंधळ वाढला. त्यामुळे जनप्रक्षोभ लक्षांत घेवून सरकारने ज्यांच्या घरांत लग्न आहे अशा कुटुंबांना एकाच खात्यातून Rs २,५०,००० काढण्यासाठी परवानगी दिली. सरकारने शेतकरी आणी व्यापारी यांना आठवड्यात रोख पैसे काढायची मर्यादा ठरवली. केंद्र सरकारी कर्मचार्यांना Rs १०००० रुपये ‘ADVANCE SALARY’ घेण्यास परवानगी दिली. एकदा नोटा बदलल्यानंतर त्या माणसाच्या बोटावर खूण म्हणून INDELIBLE शाई वापरण्याचे ठरवले. पेट्रोल पंपावर Rs २५०० रोख मिळण्याची व्यवस्था केली. काही काळापर्यंत रस्त्यांवरील टोल कलेक्शन थांबवले.
 • सरकारने याबरोबरच हे ही जाहीर केले की ज्या व्यक्तींनी वर्षभरांत Rs २,५०,००० ची रोख जमा केली असेल त्यांच्यावर आयकर खाते लक्ष ठेवून असेल.तसेच जेम्स आणी ज्युवेलरी कंपन्यांकडून त्यांच्या रोजच्या व्यवहाराची माहिती मागवत आहे.
 • याचा परिणाम ज्या ज्या सेक्टरमध्ये रोखींत व्यवहार चालत असे त्या सेक्टरवर झाला. ऑटो, रिअल्टी, सिमेंट, खते, बीबियाणे, मॉल्सच्या विक्रीवर झाला. त्यामुळे या सेक्टरमधील कंपन्याच्या बिझिनेसवर विपरीत परिणाम होईल अशी भीती वाटल्यामुळे या सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स पडले. ग्रामीण क्षेत्रामधील असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नावर आणी त्यांच्या क्रय शक्तीवर परिणाम झाला. त्यामुळे ‘दैव देते, आणी सरकार नेते’ अशी परिस्थिती झाली. याचा एकंदर परिणाम FMCG, AC, टीव्ही, आणी इतर घरगुती मशीन उत्पादन करणार्या कंपन्यांच्या बिझीनेसवर झाला.
 • लोकांनी सर्व बचत खात्यातून पैसे जमा करायला सुरुवात केल्यामुळे बँकांच्या ठेवींमध्ये अचानक आणी खूप प्रमाणांत वाढ झाली. त्यामुळे बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजाचे दर कमी करायला सुरुवात केली. लोकांनी आपले पैसे फुकट जाण्याऐवजी आपल्या कर्ज खात्यांत जमा करण्यास सुरुवात केल्यामुळे बँकांकडे असलेली थकबाकी आणी NPA ची परिस्थिती सुधारण्यास थोडी मदत झाली.  तसेच वीज बिल्स, टेलिफोन बिल्स, मालमता कर, विक्रीकर, सेवाकर इत्यादी सर्व करभरणा वाढल्यामुळे पॉवर क्षेत्र, तसेच स्थानीय संस्था, राज्य सरकारे आणी केंद्र सरकारच्या उत्पन्नांत वाढ झाली. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे शेअर मार्केटचे दोन्ही निर्देशांक BSE सेन्सेक्स आणी NSE निफ्टी पडावयास सुरुवात झाली.आणी रुपयाच्या US $ बरोबरच्या विनिमय दरांत घट झाली. त्यामुळे निर्यातीवर ज्यांचे उत्पन्न अवलंबून आहे अशा IT, फार्मा, आणी व्यापार क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल.
 • याचा परिणाम म्हणून मनीसप्लाय कमी होईल, PURCHASING पॉवर कमी होईल. मागणी आणी खप दोन्ही कमी होतील. देशाचे GDP कमी होईल. तसेच करापासून मिळणारे उत्पन्न वाढेल.
 • याचा परिणाम म्हणजे लोकांच्या घरी, बँक लॉकरमध्ये असलेला रोख पैसा एकतर सिस्टीममध्ये येईल किंवा रद्द होईल. त्यामुळे चलनातील पैसा कमी होऊन ATM, क्रेडीट कार्ड आणी इतर रोखीशिवाय उपलब्ध असणाऱ्या CHANNELS च्या वापरात वाढ होईल. उदा :- PAYTM , WALLET मनी  इत्यादी. त्यामुळे बँकांचे इतर उपन्न वाढेल.
 • काळ्या पैशाविरुद्ध चाललेली लढाई पूर्ण यशस्वी होईल असे नाही. काळा पैसा पूर्णपणे बाहेर पडेल असेही नाही.ज्या कंपन्यांचा व्यवहार रोखीत चालतो त्या कंपन्यांवर परिणाम झाला. जे बिझिनेस क्रेडिटवर चालतात त्यांच्यावर कमी परिणाम झाला. नियंत्रित आणी फिक्स उत्पन्न असणारे तसेच सरकारबरोबर व्यवहार असलेल्या कंपन्यांचे शेअर्स वाढले
 • सरकारने जाहीर केले की २०१७ या वर्षासाठी अंदाजपत्रक १ फेबृआरी २०१७ रोजी सादर करेल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी :-

 • ऑक्टोबर २०१६ साठी CPI (CONSUMER PRICE INDEX) ४.२%( ४.३९% सप्टेंबर २०१६) आणी WPI (WHOLESALE PRICE INDEX) ३.३९%(३.५७% सप्टेंबर २०१६) एवढे झाले. अन्नधान्य आणी संबंधीत वस्तूंच्या किंमती कमी झाल्यामुळे या दोन्ही निर्देशांकांत घट झाली.
 • ऑक्टोबर महिन्यांत निर्यात ९.६ % वाढून Rs.१५९००० कोटी एवढी झाली. तर आयात ८.१ % वाढून Rs २,२८,००० कोटी झाली. सोन्याची आयात दुप्पट झाली. सेवा क्षेत्रातील निर्यात US $१३.७ बिलियन तर आयात US $ ८.३ बिलियन झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • झी BLACKSTONE ग्रूप आणी कॅनेडियन इन्व्हेस्टर ब्रूकफिल्ड हे भारती इन्फ्राटेल या कंपनीतील ४०% स्टेक घेण्याच्या विचारांत आहे.
 • टाटा सन्समधील बोर्डरूम लढाईने आता टाटा ग्रुपच्या साऱ्या कंपन्यांना ग्रासले. TCS, टाटा केमिकल्स, इंडिअन हॉटेल्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा ग्लोबल बिव्हरेजीस आणी इतर टाटा ग्रूपमधील कंपन्यांच्या डायरेक्टरपदावरून सायरस मिस्त्री यांना हटविण्यासाठी टाटा ग्रूपने आपल्या शेअरहोल्डर्सच्या EGM ( EXTRA ORDINARY GENERAL MEETING) बोलावल्या आहेत. या मीटिंग मधून सायरस मिस्त्री यांना डायरेक्टर पदावरून हटविण्यासाठी ठराव मांडून पास करून घेतला जाईल असा अंदाज आहे.
 • अपोलो टायर्स ही कंपनी  दक्षिण कोरियातील KUMHO TIRE ही २ नंबरची टायर उत्पादन करणारी   कंपनी US $ ९०० मिलियनला खरेदी करण्याचा विचार करीत आहे.
 • स्विस सिमेंट कंपनी लाफार्जहोल्सिम या कंपनीने अंबुजा सिमेंट आणी ACC मधील आपला स्टेक वाढवला.
 • PNB हौसिंग, बलरामपुर चीनी,EIL, पेट्रोनेट LNG या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • GAIL, व्होल्टास या कंपन्यांचे तिमाही निकाल असमाधानकारक होते.
 • दिलीप बिल्डकोन या कंपनीला मध्यप्रदेश सरकारकडून Rs १४७० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • भारत फोर्ज नॉर्थ अमेरिकेतील ऑटोमोटीव कंपनी घेण्याच्या विचारांत आहे.
 • अवन्था ग्रूप BILT (बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड)ची अवस्था सुधारण्यासाठी AION कॅपिटल बरोबर बोलणी करीत आहे. AION कॅपिटल Rs १००० कोटी अवन्था ग्रुपला देईल. हा पैसा BILT चे कर्ज कमी करण्यासाठी आणी बिझिनेस चांगल्या प्रकारे करण्यासाठी वापरेल.
 • GST चा दर TITAN या कंपनीसाठी ४% पडणार आहे. सध्या हा दर २% आहे. त्याच प्रमाणे डीमॉनेटायझेशनचा परिणाम झाल्याने हा शेअर २०१४च्या लेव्हलला आला.
 • IIFL होल्डिंग ही समस्ता MANUFACTURING ही मायक्रो फायनांस कंपनी खरेदी करणार आहे…

कॉर्पोरेट एक्शन

 • इंजिनिअरस इंडिया या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला
 • बलरामपूर चीनी या कंपनीने Rs १७५ प्रती शेअर १ कोटी शेअर्स टेंडर पद्धतीने buyback करणार आहेत ACCEPTANCE रेशिओ ४.८% आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

पूर्वी FII विकत होते, DII खरेदी करीत होते.पण सध्या डोमेस्टिक फंडसुद्धा विक्री करीत आहेत ही चिंतेची बाब आहे. इंडेक्स फ्युचर्स, STOCK फ्युचर्स आणी CALL ऑप्शन्समध्ये विक्री चालू आहे. पुट काल रेशिओ ०.७३ आहे मार्केट ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. निफ्टी ८२०० पॉइंटच्यावर १ तास राहिला तर short कवरिंग येण्याची शक्यता आहे. सध्या ट्रेडिंग करणे धोक्याचे आहे. मार्केट कधी पडेल आणी कधी वाढेल याबाबतीत अनिश्चितता आहे अशावेळी शेअरची निवड करून पोर्टफोलीओ तयार करून थोडया थोडया प्रमाणांत केलेली खरेदी फायदयाची आहे. सध्याच्या मार्केटमध्ये थोडा थोडा फायदा घेण्याची सवय लावून घ्यावी लागेल. विकत रहा घेत रहा फायदयाचे कण वेचत रहा.

मार्केट पडू लागले की सर्वजण खालची पातळी सांगू लागतात. त्याविरुद्ध मार्केट वाढू लागले की वरील टार्गेट दिली जातात. आपण सुवर्णमध्य पकडायचा प्रयत्न करावा. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक दिसतो कारण वाटणारी प्रमाणाबाहेरची भीती किंवा हाव. यात न फसता आपण थोडी थोडी खरेदी किंवा थोडी थोडी विक्री करावी.

चार वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी पाउस पुरेसा आणी व्यवस्थित पडलेला असल्यामुळे ग्रामीण भागांत आनंदीआनंद होता परंतु डीमॉनेटायझेशनने सर्व ग्रामीण भागातील आनंदाला ग्रहण लागल्यासारखे झाले.

BSE  निर्देशांक २६१५० वर तर NSE निर्देशांक ८०७४ वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १४ नोव्हेंबर २०१६ ते १८ नोव्हेंबर २०१६ – घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २१ नोव्हेंबर २०१६ ते २५ नोव्हेंबर २०१६ – लपंडाव तेजी मंदीचा | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s