आठवड्याचे समालोचन -२८ नोव्हेंबर २०१६ ते २ डिसेंबर २०१६ – जे जे होईल ते ते पहा, संधी मिळताच फायदा घ्या!

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

thumbs-up-1172213_640डीमॉनेटायझेशनचे किर्तन सुरु होऊन तीन आठवडे झाले. तरी गोंधळाची स्थिती संपत नाही. डीमॉनेटायझेशनमुळे जी अनिश्चितता निर्माण झाली आहे त्यामुळे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदार ही अनिश्चितता संपण्याची वाट पाहत आहेत. धोरणामध्ये निश्चितता नाही पण ध्येय मात्र निश्चित आहे . ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी जे जे बदल करावे लागत आहेत ते ते सरकार आणी RBI करीत आहे. रोज आज काय निर्णय घेतला हे पाहावे लागत आहे.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

OPEC च्या  मीटिंगमध्ये असे ठरले की सर्व सदस्य राष्ट्रांनी Jan २०१७ पासून त्यांच्या क्रूड उत्पादनांत ठरावाप्रमाणे कपात करावी. यावेळी या मीटिंगमध्ये रशियाही सामील झाला होता. या उत्पादन कपातीत इंडोनेशिया, लायबेरीआ, आणी नायजेरिया भाग घेणार नाहीत. या मीटिंगमध्ये झालेल्या ठरावाप्रमाणे रशिया ३ लाख BPD  (BARRELS PER DAY), इराक २ लाख BPD, उत्पादन कमी करेल पण  इराणला मात्र सरासरी तत्वावर उत्पादन वाढवायला परवानगी दिली. जर हा उत्पादन कपातीचा निर्णय OPEC सदस्यांनी आणी रशियाने काटेकोर रीत्या पाळला तर क्रूडची किंमत वाढेल. OPEC च्या या निर्णयाचा फायदा ONGC, ऑईल इंडिया, केर्न इंडिया, सेलन एक्स्प्लोरेशन, अबन ऑफशोअर, GAIL, या ओईल आणी GAS क्षेत्रातील कंपन्यांना होईल. विमान वाहतूक कंपन्या आणी ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या(HP, BP IOC), पेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या  मार्जिनवर या निर्णयामुळे परिणाम होईल.क्रुद्ची प्राईस जी US $ ४० ते US$ ५० होती ती आता US $ ५० ते US $ ६० होईल असा अंदाज आहे. आता  वाढणारा क्रूडचा दर आणी रुपयाचा कमी होणारा विनिमय दर याची सांगड घालूनच निर्णय घ्यावा लागेल. क्रूडची किंमत US $ ५५ प्रती BARREL आणी रुपयाचा US $ बरोबरचा विनिमय दर १ US $ =Rs ७० ही लक्ष्मण रेषा समजावी. ओपेक कराराची अंमलबजावणी कशी होते याकडे पाहवे लागेल

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ‘ या नावाने अघोषित धन जाहीर करण्याची योजना आणली. या योजनेप्रमाणे उत्पन्न जाहीर करणार्याला अघोषित उत्पन्नाच्या २५% रक्कम जमा करावी लागेल. अघोषित उत्पन्नावर ३० % आयकर + कराच्या ३३% प्रधानमंत्री गरीब योजना सेस + १०% पेनल्टी भरावी लागेल. या योजनेद्वारे जमा झालेली रक्कम हौसिंग, जलसिंचन, शिक्षण आणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी वापरली जाईल.
 • सरकारने BRANDED सोन्याच्या कॉईन वरील एक्साईज ड्युटी रद्द केली. याचा फायदा TBZ, PC  ज्युवेलर्स, TITAN इत्यादी कंपन्यांना होईल.
 • ओडिशा राज्य सरकारने ‘मेक इन ओडिशा’ हा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सर्वांत जास्त गुंतवणूक ‘वेदान्ता’ ग्रुपने केली आहे. JSW स्टील ही कंपनी सुद्धा या योजनेत गुंतवणूक करणार आहे.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने बँकांना १६ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर २०१६ या मुदतींत ठेवींमध्ये जमा झालेली १००% कॅश CRR ( CASH RESERVE RATIO) खाली ट्रान्स्फर करावयास सांगितली. या निर्णयाचा फेरविचार ९ डिसेंबरला केला जाईल असे RBI ने कळवले आहे. RBI च्या या निर्णयाचा परिणाम म्हणून सर्व बँकांनी मुदत ठेवींवरचे व्याजदर कमी करायला सुरुवात केली.
 • RBI ने प्रधान मंत्री जन धन योजनेखाली उघडलेल्या आणी KYC( KNOW YOUR CUSTOMER)  प्रक्रिया पूर्ण झालेल्या खात्यांमध्ये Rs १०००० प्रती महिना आणी ज्या जन धन खात्यांमध्ये KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल त्या खात्यांत प्रती महिना Rs ५००० काढायला परवानगी दिली. त्या त्या बँक शाखेचा व्यवस्थापक परिस्थितीचे सत्यापन करून खातेदाराला जास्त रक्कम काढण्याची परवानगी देऊ शकतो.
 • RBI ने MSS (MARKET STABILIZATION SCHEME) च्या लीमिटमध्ये वाढ केली. पण ती फक्त २८ दिवसांपुरती असेल असे जाहीर केले. या अवधीत RBI २८ दिवसांच्या मुदतीची कॅश MANAGEMENT बिल्स इशू करेल.
 • आपल्याकडे जमा झालेले पैसे कुणी बँकेत भरायला ( जुन्या Rs ५०० आणी Rs १००० च्या नोटा सोडून) जात नव्हते. हे ओळखून  RBI ने सर्व सामान्य खात्यातून रक्कम काढण्यावर घातलेली मर्यादा काढून टाकली त्यामुळे आता लोक बँकेमध्ये पैसे भरू लागतील. त्यामुळे कॅशचे सर्क्युलेशन वाढेल.
 • दिल्ली हायकोर्टाने ३४४ FDC ( FIXED DRUGS COMBINATION) औषधांवर बंदी घालणारे मार्च १० २०१६ चे सरकारी नोटिफिकेशन रहित केले. याचा फार्मा कंपन्यांना होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • शेती आणी शेतीशी संलग्न उद्योग आणी सरकारी खर्च या मुळे  जुलें ते सप्टेंबर २०१६ या तिमाहीमध्ये आर्थिक प्रगतीचा वेग ७.३% राहिला. हा प्रगतीच्या वाढीचा दर डीमॉनेटायझेशनमुले तिसऱ्या तिमाहीत कमी होण्याची शक्यता आहे.
 • नॉनटँक्स रेव्हेन्यूमध्ये वाढ झाल्यामुळे फिस्कल डेफीसीट कमी झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सिप्ला या कंपनीचा ‘सिप्ला वेट’ या नावाने animal हेल्थ बिझिनेस आहे. हा बिझिनेस १०० देशांत आहे. हा विकण्याची ‘सिप्ला’ ची योजना आहे. ‘सिक्वेंट सायंटीफिक’ या कंपनी बरोबर याबद्दल बोलणी चालू आहेत.
 • राजश्री शुगर त्यांची सबसिडीअरी ‘ट्रायडूंट शुगर’ विकणार आहे.
 • ‘सेंच्युरी प्लाय’ या कंपनीचा शेअर २०१४ मध्ये Rs २० होता . तो Rs २५० झाला होता. २८ नोव्हेंबर २०१६ रोजी तो Rs १८२ आहे. म्हणजे त्याची किंमत ३०% ने कमी झाली. म्हणजे तो खरेदीला योग्य आहे का? कंपनीची प्रगती योग्य प्रमाणांत झाली की आणखी काही कारण असावे याचा प्रत्येकाने विचार करून कारणांचा शोध घ्यावा.
 • फायझर ही कंपनी ‘कोरेक्स’ या ब्रांडखाली बरीच उत्पादने मार्केटमध्ये आणणार आहे.
 • HCC या कंपनीला येत्या ३ ते ४ आठवड्यांत आरबीट्रेशनमुळे Rs २००० कोटी मिळतील.या प्रमाणेच ही कंपनी आपल्या कर्जदारांना शेअर्सचा प्रेफेरंशियल इशू करण्याचा विचार करीत आहे.
 • ‘रिलायंस ज्ञीओ’ या रिलायंस ग्रुपच्या कंपनीने आपली वेलकम ऑफर (फ्री वॉइस आणी डेटा) सर्व नव्या आणी जुन्या ग्राहकांसाठी ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढवली. या नव्या ऑफरला ‘HAPPY न्यू ईअर ऑफर’असे नवे नाव दिले.
 • रिलायंस जीओ एक डिजिटल रिटेल इकोसिस्टीम ‘जीओमनी मर्चंट सोल्युशन्स’ या नावाने आणीत आहे. ही सिस्टीम १७००० शहरे आणी ४ लाख खेडेगावातील १९ मिलीयन  रिटेलर्सला लागू होईल
 • COMPAT (APPELLETE AUTHORITY)ने  रामको cement वर CCI ( COMPETITION COMMISION ऑफ इंडिया) ने लावलेली Rs २५८ कोटींची पेनल्टी स्थगीत ठेवली.
 • मारुतीसारख्या ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनीने त्यांच्या महागड्या मॉडेल्सवर Rs १५००० ते Rs २०००० ची सूट जाहीर केली आहे. त्यामुळे डीमॉनेटायझेशनमुले मागणी कमी झाली आहे यात शंकेला वाव नाही.

कॉर्पोरेट एक्शन

 • ‘ऑईल इंडिया’ या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने ज्यांच्याकडे ३ शेअर्स असतील तर १ शेअर बोनस म्हणून देण्याची घोषणा केली. या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल समाधानकारक नव्हता.
 • ‘आयडिया सेल्युलर’ ही कंपनी त्यांचा टॉवर बिझिनेस US $ १ बिलियन ला विकणार आहेत.
 • टाटा स्टील त्यांचा स्पेशालिटी स्टील बिझिनेस ‘लिबर्टी हाउस’ या कंपनीला US$ १०० मिलियन ला विकणार आहेत.
 • टाटा स्टील ‘THYSSENKRUPP’ या जर्मन कंपनीबरोबर करार करणार आहे. ही कंपनी ५०% पेक्षा कमी स्टेक घेईल. हे डील UK मधील कामगार युनियन्सनी समती दिल्यावर होईल. कामगारांसाठी नवी पेन्शन योजना आणली जाईल. नवीन कंपनीचा IPO येईल.
 • क्वेस कॉर्प ही कंपनी  ‘मणिपाल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस’ मधील Rs २२० कोटी एवढा स्टेक खरेदी करणार आहे.
 • वर्धमान टेक्स्टाईल या कंपनीने आपल्या शेअर  ‘BUY BACK’ साठी ९ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट ठरवली.
 • IFCI लीड बँक असलेल्या कॉन्सोर्शियम ने SRAVANTHI एनर्जी ही कंपनी विकण्यासाठी ब्लॉकवर टाकली आहे..या कंपनीला Rs १३२० कोटींचे कर्ज आहे.
 • ३ आय इन्फोटेक त्यांचे IMS युनिट विकणार आहेत. त्यांनी यासाठी ‘SREI’ या कंपनी बरोबर बोलणी सुरु केली आहेत.
 • विप्रो त्यांची इको एनर्जी डिव्हीजन US$७० मिलियन्सला विकणार आहे.
 • ल्युपिन आणी ELI LILLY यांनी मधुमेहाच्या औषधासाठी भारतातील भागीदारी वाढवली .’EGLUCENT’ हे औषध एली लिली उत्पादन करून निर्यात करेल आणी ल्युपिन मार्केटिंग आणी विक्री करेल.
 • शिल्पा मेडिकेअर ही कंपनी Rs ५६९ प्रती शेअर या भावाने प्रेफरन्स शेअर्स इशू करणार आहे. या कंपनीतील FII ची मर्यादा ३०% वरून ४०% पर्यंत वाढवली आहे.
 • व्हीव्हीमेड LABS या कंपनीचे चेन्नई मधील FDF प्लांटचे इन्स्पेक्शन USFDA ने पूर्ण केले. त्यांत काहीही त्रुटी आढळल्या नाहीत.
 • नोव्हेंबरमध्ये ऑटो सेल्स कमी झाले. मारुती, आईचर मोटर्स, या कंपन्या सोडल्या तर सर्व ऑटो कंपन्यांचे  सेल्स कमी झाले.
 • स्पाईस जेट, मान इन्फ्रा, बालक्रिष्ण इंडस्ट्रीज, महानगर gas, त्रिवेणी इंजिनीरिंग या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
 • सदभाव एन्जिनीअरिन्ग, NFL टाटा पॉवर या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.
 • FMCG क्षेत्रातील कंपन्या उदा. डाबर, मेरिको, TITAN यांच्या किंमती पडत आहेत.

या आठवड्यांत येणारे IPO

 • ‘शीला फोम्स’ या कंपनीचा IPO २९ नोव्हेंबर पासून ओपन होत आहे. प्राईस BAND Rs ६८० ते Rs ७३० आहे. या कंपनीचे मार्जिन २०१३ मध्ये ७% होते ते आता १३ % झाले आहे. ‘स्लीपवेल’ हा कंपनीचा ब्रांड प्रसिद्ध आहे. GST मुळे  कंपनीला फायदा होईल. ही एक DEBT-FREE कंपनी आहे. प्रमोटर्स आपला स्टेक विकत आहेत.
 • हैदराबादस्थित LAURUS LABS ही कंपनी Rs ४२६ ते Rs ४२८ या प्राईस BAND मध्ये डिसेंबर ६ २०१६ पासून IPO आणत आहे. ही कंपनी HIV आणी HEPATITIS ड्रग्सच्या  ACTIVE PHARMACEUTICAL INGREDIENTS चे उत्पादन करते.

मार्केटने काय शिकवले

एखादी बातमी आली तर एक भाग असतो तो म्हणजे (१) मला काय वाटतं आणी (२) मार्केट काय करतं त्यातील मार्केट काय करतं, मार्केट्ची प्रतिक्रिया काय आहे याला जास्त महत्व आहे तेव्हा हे समजून घेवून शॉर्ट टर्मसाठी निर्णय घ्यावेत.

सध्या ‘V’ SHAPED रिकव्हरी होते आहे. पण अशी सुधारणा टिकाऊ नसते. बेस तयार होत नाही. FOLLOW ON रिकव्हरी हवी. ज्यावेळी एखादी बातमी येते तेव्हा शेअर वाढावयास सुरुवात होते, पण त्या बातमीचा फायदा त्या कंपन्यांना होणार नाही हे समजताच शेअर पडतो.

कोणालाच सध्या माहीत नाही की उदया सरकार किंवा RBI कोणती घोषणा करेल. त्यामुळे कोणते शेअर्स खरेदी करावेत आणी कोणते विकावेत हे ठरवता येत नाही. त्यामुळे काही काळ गप्प बसावे आणी जे जे  होईल ते ते पहावे, संधी मिळताच फायदा घ्यावा हेच योग्य वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २६२३० आणी NSE निर्देशांक निफ्टी ८०८८ वर बंद झाला.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन -२८ नोव्हेंबर २०१६ ते २ डिसेंबर २०१६ – जे जे होईल ते ते पहा, संधी मिळताच फायदा घ्या!

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१६ – कोणी निंदा कोणी वंदा, देशहिताचा आमुचा धंदा | St

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s