आठवड्याचे समालोचन – ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१६ – कोणी निंदा कोणी वंदा, देशहिताचा आमुचा धंदा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
cropped-mktandme-logo.jpgभारतात राजकीय स्थैर्य आहे. पण जगातील घटनांकडेसुद्धा लक्ष द्यावे लागते. इटलीमध्ये लोकांच्या सार्वमताचा कौल पंतप्रधानांच्या मताविरुद्ध गेल्यामुळे त्यानी राजीनामा दिला. इटलीमध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. युरोचा विनिमय दर २० महिन्यांच्या कमीतकमी स्तरावर आहे तर क्रूडची किंमत सन २०११ नंतर वाढून US $ ५४ वर पोहोचली. गेल्या दोन वर्षांत युरोझोनमध्ये फाटाफूट होताना दिसते आहे, सदस्य देशांमध्ये युरोझोन मधून बाहेर पडावे असा विचार जोर धरत आहे. याचा प्रभाव २०१७ च्या सुरुवातीला सदस्य देशांमधील निवडणुकांत दिसून येईल. राजकीय अस्थिरतेचा परिणाम बँकिंग उदयोगावर आणी शेअर मार्केटवर होतो. या दोन्ही क्षेत्रात ‘kneejerk reaction’ होण्याची शक्यता असते. परंतु येथे हे लक्षांत ठेवले पाहिजे की सगळया देशांमध्ये होणाऱ्या सगळया घटनांचा परिणाम शेअर्सच्या किंमतीवर होतो असेच नाही,

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • इटलीमध्ये काही वैधानिक सुधारणा कराव्यात की नाही यावर घेतलेले सार्वमत ‘नो’ (म्हणजेच सुधारणा करू नये) आले त्यामुळे इटलीच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला. यामुळे इटलीमधील बँकिंग उदयोग अडचणीत येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
 • ओपेक आणी रशिया यांच्यात क्रूडचे उत्पादन नियंत्रित करण्याचा करार झाल्यामुळे आणि US$ WEAK झाल्यामुळे आणि USA मधील क्रूडचा साठा कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांत क्रूडचे भाव वाढण्यास सुरूवात झाली.
  ८ डिसेंबरला ECB ची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये Q.E. (QUANTITATIVE EASING) चालू ठेवण्याची शक्यता वाटत आहे.
 • USAचे निवडून आलेले प्रेसिडेंट ट्रम्प आपल्या मंत्रिमंडळातील निरनिराळया खात्यांसाठी मंत्री निवडत आहेत. त्याकडेही मार्केटचे लक्ष आहे. त्यामुळे USAच्या भावी धोरणांचा अंदाज येतो.
 • USA मध्ये प्रिस्क्रिप्शन ड्रगच्या  किंमती कमी करणार आहेत.
 • FOMC ची १३ आणि १४ डिसेंबर २०१६ ला मीटिंग आहे यात दर वाढीचा फेड विचार करेल.

सरकारी घोषणा

 • सरकारची डीमॉनेटायझेशनची मोहीम जोरांत चालू आहे. हळू हळू पण निश्चीतपणे Rs ५०० आणी Rs १००० च्या नोटा व्यवहारातून  रद्द करत आहे. आता तुम्ही फक्त आपल्या बचत किंवा चालू खात्यांत ३० डिसेंबर २०१६ पर्यंत या नोटा  भरू शकता.
 • डीमॉनेटायझेशनचा परिणाम म्हणून  ज्युवेलरी, जडजवाहीरात, यांची मागणी लग्नसराई असूनही ८०% घटली आहे
 • सरकारने खतासाठी दिली जाणारी सबसिडी चालू ठेवण्याची घोषणा केली.
 • सरकार गव्हावर लावली जाणारी आयात ड्युटी रद्द करणार आहे.
 • सरकारने १००० EVM (इलेक्ट्रोनिक व्होटिंग मशीन) खरेदी करण्यासाठी मजुरी दिली. ही मशीन फक्त BEL ( भारत इलेक्ट्रोनिक लिमिटेड) तयार करते. त्यामुळे या सरकारी निर्णयाचा फायदा ‘BEL’ ला होईल.
 • १ फेबृआरी २०१७ ला अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. यांत सरकारी आजारी कंपन्यांची कर्जे माफ केली जाण्याची आणी त्यांचे पुनरुज्जीवन केले जाण्याची शक्यता आहे. उदा. HMT ITI
 • सरकार लोकल डिफेन्स गीयर मेकर्सना Rs ८६३५० कोटींची ऑर्डर देणार आहे. यावेळी भारत गिअर, शांती गिअर अशा कंपन्यांच्या शेअर्स ची किंमत वाढली. पण ही वाढ टिकाऊ आहे का? हा विचार करायला पाहिजे. कोणत्याही कंपनीला ऑर्डर मिळाली हे समजल्याशिवाय खरेदी करू नका. यापैकी कोणत्याही कंपनीचे शेअर्स पडून असतील आणी चांगला भाव येत असेल तर विकून टाकायची हि चांगली संधी आहे.
 • वेस्ट बेंगाल, बिहार ओरिसा या राज्यांत सिमेंटच्या किंमती कमी केल्या.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने आपल्या कोणत्याही दरांत तसेच CRR मध्ये बदल केला नाही. बँकांसाठी जो सप्टेंबर १६ पासून नोव्हेंबरला  ११ पर्यंत आलेल्या कॅश वर १००% CRR लावला होता तो १० डिसेंबर पासून रद्द केला जाईल असे जाहीर केले. भारताच्या प्रगतीचे लक्ष्य ७.६ % वरून ७.१ % केले. RBI ने जर रेट कट केला तर अर्थव्यवस्थेला RBI च्या सपोर्टची गरज आहे असा संकेत बाहेर जावा असे RBI ला वाटत नाही. ज्या चलनी नोटा ३० डिसेंबरला रद्द केल्या जातील त्यांची रक्कम लाभांश म्हणून सरकारला  दिली जाणार नाही.
 • कोर्टाने जन धन खात्यांत पैसे काढण्यावर जी मासिक Rs १०००० ची मर्यादा घातली आहे तिच्याविरुद्ध केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे कोर्ट यांत ढवळाढवळ करू शकत नाही असा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टांत आज डीमॉनेटायझेशन विषयक केसच्या सुनावणी मध्ये कोर्टाने सरकारला तीन बाबींविषयी माहिती विचारली. रीमॉनेटायझेशन करण्यासाठी अजून किती वेळ लागेल. बँकांना कॅशमध्ये  नियंत्रित (RATION) रक्कम का दिली जात आहे. आणी सरकार सहकारी बँकेतील ठेवीविषयी काय उपाय करीत आहे. सरकारने कोर्टाच्या करविषयक आणी अर्थविषयक धोरणात्मक बाबतीत निर्णय देण्याच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला,

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • CROMPTONने पॉवेल स्पेंको बरोबर केलेला शेअर्स खरेदी करण्याचा करार रद्द केला. CROMPTONचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
 • हिंदुस्थान झिंक ही वेदांत ग्रुपची कंपनी आता सोलार बिझिनेसमध्ये Rs ६८० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
 • DIVI’s LAB या कंपनीच्या विशाखापट्टणम युनिटची USFDA ने तपासणी केली.या कंपनीचे ७०% उत्पन्न या युनिटमधून येते.
 • टाटा स्टील च्या UK मधील युनियन बरोबरची बोलणी यशस्वी झाली. टाटा स्टील मधील वर्तमान पेन्शन योजना बंद करून दुसरी COMPETITIVE DEFINED CONTRIBUTION SCHEME सुरु करणार आहे.
 • M &M AGRI नेदरलँड्स स्थित OID होल्डिंग मधील ६०% स्टेक खरेदी करणार आहे.
 • टाटा  मोटर्सला आर्मीकडून मोठी ऑर्डर मिळाली.
 • Dr REDDY’s ने ANTI FUNGAL क्रीम USA मार्केटमध्ये लोंच केले आहे.
 • रिको या कंपनीच्या शेअर्समधील ट्रेडिंग १३ डिसेंबर २०१६ सस्पेंड करण्यांत आले आहे.
 • KEC INTERNATIONAL या कंपनीला Rs ८४० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • १ डीसेंबर २०१६ रोजी सन फार्मा या कंपनीच्या हलोल येथील उत्पादन युनिटचे USFDA ने इन्स्पेकशन केले. USFDA ने १४ पानी 483 नम्बरचा रिपोर्ट दिला.
 • सागर सिमेंट या कंपनीने ६.१ लाख शेअर्स प्रेफरनशिअल बेसिसवर Rs ८०० प्रती शेअर या भावाने इशू केले.
 • ONGC विदेशने असे सांगितले की भारत आणी रशिया, चीन आणी म्यानमारमार्गे पाईप लाईन टाकण्याचा विचार करीत आहेत.
 • M & M ने ‘NO PRODUCTION’ दिवस जाहीर केले. त्यांनी सांगितले की आम्ही ‘PULL’ बेसिसवर काम करतो.

कॉर्पोरेट एक्शन

 • पोलारीस या कंपनीचा OFS Rs १३० प्रती शेअर या भावाने येत आहे. या कंपनीत प्रमोटरचा स्टेक ७८% आहे तो कमी करण्यासाठी OFS आणत आहेत. मार्केटमध्ये या शेअरचा भाव Rs १५५च्या आसपास आहे.
 • लौरेल LABS या कंपनीच्या IPO ची रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरण्यांत येणार असल्यामुळे IPO ला थंडा प्रतिसाद मिळाला.
 • गुरुवार ८ डिसेंबर रोजी मार्केट खूप आशादायी होतं. आतापर्यंत ज्या ज्या वेळी RALLY आली त्या त्या वेळी VOLUME नव्हते जे शेअर वाढत होते त्या शेअर्समध्ये VOLUME ही चढे होते. जे शेअर  पडत होते त्यांत VOLUME मध्ये कमी वाढ होत होती. कॅशलेस अर्थव्यवस्थेचा सरकारतर्फे जोराचा प्रचार चालू आहे. याचा फायदा टी व्ही एस इलेक्ट्रोनिक्स, आर. एस. सॉफटवेअर, न्युक्लीअस सॉफटवेअर, क्विक हील. डीलिंक, एच सी एल इन्फो, ORIONPRO, तानला सोल्युशन्स, रामको सॉफटवेअर इत्यादी कंपन्यांना होईल.

मार्केटने काय शिकविले

“ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’ या उक्तीचा प्रत्यय RBI च्या वित्तीय पॉलिसीच्या वेळेस आला. दूरदर्शन वाहिन्यांमुळे RBI च्या पोलीसीचा गाजावाजा प्रमाणाबाहेर होतो. लोकांची, तज्ञांची, विश्लेषकांची मते सांगितली जातात. प्रत्येकाने .२५ बेसिस पॉइंट रेट  कट होईल असे भाकीत केले होते. पण ६५% लोक ५० बेसिस पॉईण्ट रेट कट केला जाईल असे म्हणत होते. पण घडले भलतेच! RBIने बिलकुल रेट कट केला नाही त्यामुळे आपला आपणच सारासार विचार करून निर्णय घ्यावा.

शीला फोम या ‘स्लीप वेल’ ब्रांड MATTRESS  बनवणार्या कंपनीचे लिस्टिंग आज इशू प्राईसच्या वर Rs ३०० झाले. हा शेअर Rs ८८१ ला लिस्ट झाला आणी Rs १०३२ पर्यंत वाढला. सर्व तज्ञ विश्लेषक यांनी इशू प्राईस महाग आहे सबस्क्राईब करताना सावधगिरीचा इशारा दिला होता. मग हे लिस्टिंग ‘कन्झ्युमर व्हीजीबिलीटी’ ला एक प्रकारे गुंतवणूकदारांनी दिलेली सलामी मानावयाची की निसर्गाचे, सरकारचे, आणी आता शेअर मार्केटचे मन कोणी जाणू शकत नाही असे म्हणायचे!

फिस्कल स्टीमुलस वाढत आहे. मॉनेटरी पॉलिसीतून सपोर्ट देणे बंद केले आहे. याचा परिणाम broader मार्केटवर होईल. रस्ते पूल बंदरे धरणे म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला जाईल. म्हणजे BSE 500 मधील शेअर्स वाढतील. पण त्यामानाने निफ्टी मधील शेअर्स कमी प्रमाणांत वाढतील. कारण सर्वांच्या लक्षांत आले आहे की मॉनेटरी पॉलिसीतून लिक्विडीटी दिली तरी पैसा परदेशांत जातो. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा होत नाही.

जागतिक स्तरावर आढावा घेतल्यास असे आढळते की सध्या कमोडीटी बेस शेअर्स चालत आहेत. मेटलच्या किंमती वाढत आहेत. चीनची आयात वाढत आहे. नॉन ओपेक देश ओपेकचा निर्णय मानायला तयार दिसत नाहीत. पण IT आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स मागे पडले आहेत. अर्थातच दुसरी बाजू म्हणजे क्वालिटी कंपन्यांचे शेअर्स योग्य भावांत घेण्याची संधी मिळणार असे वाटते. शेवटी निर्णय तुमचा. ट्रम्प  निवडून येणं, RBI ने रेट कट न करणे हे दोन धक्के मार्केटने पचवले. आता पुढील आठवड्यांत FED च्या निर्णयाचा धक्का मार्केटला सोसेल का ? बघू काय होतं

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१६ – कोणी निंदा कोणी वंदा, देशहिताचा आमुचा धंदा

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १२ डिसेम्बर ते १६ डिसेंबर २०१६ – तळ्यात की मळ्यात | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s