आठवड्याचे समालोचन – १२ डिसेम्बर ते १६ डिसेंबर २०१६ – तळ्यात की मळ्यात

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

15557-illustration-of-a-yellow-smiley-face-pvफेडच्या मीटिंगचे दळण एकदाचे संपले. कटकट संपली. सर्वांना हायसे वाटले. किती दिवसापासून चालू होती फेडच्या मीटिंगची चर्चा! सगळे कंटाळले होते. दरवेळी जर परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेली तर विद्यार्थी कंटाळतात. नंतर म्हणतात काय व्हायचे ते होऊ दे एकदाचे, पण परीक्षा होऊन जाऊ दे. तसेच झाले होते. ग्रहण सुटले आणि गुंतवणूकदार निर्णय घेण्यास मोकळे झाले.

 

आंतरराष्ट्रीय घटना

 • फेडने यावेळी आपला व्याजाचा दर २५ बेसिस पॉइन्ट वाढवला. त्याचबरोबर २०१७ या आर्थिक वर्षांत फेड ३ वेळेला दर वाढवेल असे जाहीर केले. USA मधील महागाईतील वाढ २ % पर्यंत पोहोचली आहे, बेकारी कमी झाली आहे,
 • अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या ट्रम्प यांनी करांत सवलती आणी INFRASTRUCTUREमध्ये सरकार जास्त गुंतवणूक करेल असे जाहीर केल्यामुळे फेडने आपले दीर्घ मुदतीचे व्याजदराचे लक्ष्य वाढवले आहे.
 • USA मधील १९ राज्यसरकारांनी सहा जनरिक औषध निर्मात्यांविरुद्ध (त्यांत MYLANNV, ऑरोबिंदो फार्मा आणी चार इतर कंपन्या याचा समावेश आहे) कोर्टात केस दाखल केली आहे.
 • चीनमध्ये रबराचा STOCK कमी आहे रबराच्या किंमती ७८% वाढल्या आहेत. याचा परिणाम टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर होईल.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने १५ डिसेंबर पासून Rs५०० आणी Rs १००० च्या नोटा व्यवहारातून संपूर्ण बंद केल्या. आता ३० डिसेंबर २०१६ पर्यंत तुम्ही तुमच्या बँक खात्यात तुमच्याजवळ असलेल्या नोटा भरू शकता.
 • सरकारने डीजीटल पेमेंटसाठी निरनिराळ्या योजनांखाली सूट आणी बक्षिसे जाहीर केली.
 • नीती आयोगाच्या ‘लकी ग्राहक योजना’ आणि ‘दिगी-धन व्यापार योजना’ २५ डिसेंबरला सुरु होतील. या योजना पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया १०० दिवासापर्यंत चालवेल. या योजनांवर सरकार Rs ३४० कोटी खर्च करेल.
 • सेफगार्ड PANELने UNWROUGHT ALUMINIUM वर सेफगार्ड ड्युटी लावायची गरज नाही अशी शिफारस केली.
 • सरकार आजारी सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची जमीन NBCC आणी EIL या सरकारी कंपन्यांच्या ताब्यात देईल. कोठल्याही खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना विकणार नाही. सरकार ‘स्कूटर इंडिया’ या कंपनीचे Rs ५०० कोटी खर्च करून पुनरुज्जीवन करणार आहे. हाल या कंपनीचा एक प्लांट खरेदी करणार आहे.
 • सरकार कोचीन शिपयार्ड, HUDCO, HAL या सरकारी कंपन्यांमधील आपला स्टेक कमी करून (IPO आणी OFS च्या माध्यमातून) Rs १२००० कोटी गोळा करणार आहे
 • सरकारने पोर्ट ऑथारीटी बिल मंजूर केले. यामुळे आता पोर्ट ऑथारीटीची जमीन ४० वर्षापर्यंत लीजवर देता येईल.
  सरकार डिजिटल यूज वाढवण्यासाठी इंधन खरेदीसाठी, रेल्वेला पेमेंट करण्यासाठी, टोल पेमेंट, अपघात विमा यांत सूट जाहीर करत आहे.
 • राजस्थान सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी BOSCH या कंपनीला आपला जयपूर येथील प्लांट बंद करण्यासाठी घेतलेला निर्णय रद्द केला.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • भारताची ट्रेड डेफिसिट US $१३.०१ बिलीयान एवढी झाली. नोव्हेंबर २०१६ महिन्यात निर्यात US $ २०.०१ आणि आयात US $ ३३.०१ बिलियन एवढी होती.
 • अप्रत्यक्ष कराचा भरणा वाढला आहे. इन्कम डिक्लरेशन योजनेचा उपयोग होत आहे.
 • नोव्हेंबरमध्ये CPI (CONSUMER PRICE INDEX) ३.१५ % आणि WPI ( WHOLESALE PRICE INDEX) ३.६ % दोन्ही ५ महिन्यांच्या कमीतकमी स्तरावर होती. त्यामुळे महागाई कमी होत असल्याचा दिलासा मिळाला.
 • IIP चे आकडे या वेळेला ऑक्टोबरमध्ये -१.९% आले. चांगला पाउस होऊन आणी सणासुदीचा मोसम असूनही IIP निगेटिव्ह आल्यामुळे जरा निराशेचे वातावरण निर्माण झाले.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने ज्या जनधन खात्यांमध्ये Rs ५ लाख ज्ञमा आहेत आणी जर त्या खात्यामध्ये ८ नोव्हेंबर नंतर Rs २००००० जमा केले असतील तर त्या खात्यामध्ये PAN कार्ड किंवा फॉर्म न. ६० भरल्याशिवाय या खात्यातून पैसे काढता किंवा या खात्यात पैसे भरता येणार नाहीत.
 • सुप्रीम कोर्टाने सर्व हायवेजवर दारूबंदीचा आदेश दिला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • साउथ इंडिअन बँकेने २१ डिसेंबरला राईट्स इशूवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.
 • ओंकार स्पेशालिटी या कंपनीला ‘BETA KETOSTAR’ हे चौथे पेटंट मिळाले .
 • WOCKHARDT या कंपनीच्या दमण, शेंद्र, चिखलठाणा L1 येथील युनिटसाठी UK ने परवानगी दिली. येथून २५ लाखाची विक्री होते.
 • फोर्टिस हेल्थकेअरच्या प्रमोटर्सनी १२ डिसेंबर रोजी ९६.७ लाख शेअर्स सोडवले. तर रेलिगेअरच्या प्रमोटर्स नी १९ लाख शेअर्स सोडवले.
 • ट्री हाउस या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने कॅश क्रंच मुळे आपल्या ११९ शाखा बंद केल्या.
 • बजाज ऑटो या कंपनीने ‘DOMINOR’ 400CC हे नवीन बाईकचे मॉडेल Rs १,३६ ते Rs १.५० लाख किमतीला बाजारात आणले. कंपनीची प्रत्येकवर्षी २००००० युनिट विकण्याची योजना आहे.
 • BAXTER या कंपनीने ( USA बेस्ड) CLARIS लाइफसायन्स या कंपनीची १०० % सबसिडीअरी CLARIS INJECTIBLES Rs ४२३८ कोटींना खरेदी केली परंतु क्लारीस लाईफसायन्स या कंपनीला USFDAने फॉर्म न,. ४८३ इशू केल्यामुळे शेअरची किमत खूप वाढली नाही.
 • येस बँक, HDFC बँक, NMDC या कंपन्यांनी ADVANCE कर पूर्वीच्या वर्षापेक्षा जास्त भरला.
  J & K बँक, कोल इंडिया या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.
 • दिलीप बिल्डकॉनला आंध्र सरकारकडून Rs २६० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • BHELला रेल्वेकडून Rs २०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • AZZ इन्फ्राला दिल्ली मेट्रो कडून Rs ३९.३ कोटींची ऑर्डर मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • ALCARGO Rs १९५ प्रती शेअर या भावाने १२४.८ शेअर्स BUY BACK करणार आहे.
 • TCI या कंपनीमधून डीमर्ज झालेल्या TCI एक्स्प्रेसचे लिस्टिंग झाले.
 • LAURENCE LAB चे १९ डिसेंबरला लिस्टिंग आहे हा IPO ४ ते ५ वेळेला ओवर सबस्क्राईब झाला होता. इशू प्राईस Rs ४२८ आहे ग्रे मार्केटमध्ये Rs २५ प्रीमियम चालू आहे. लिस्टिंग झाल्यावर शेअर कोणत्या ग्रूपमध्ये टाकला आहे हे बघूनच ट्रेडिंग करावे.
 • गीतांजली जेम्स ‘नक्षत्र वर्ल्ड’ या नावाने IPO आणत आहे.
 • म्युच्युअल फंड्स आपल्या फंड ALLOCATION पोलिसी बदलत आहेत GST, अंदाजपत्रकातील तरतुदी यांचा विचार करून पोलिसी ठरवू. आतापर्यंत कमोडीटीज, मेटल्स यावर अंडरवेट होते. कॅश क्रंच मुळे ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील मागणी कमी होण्याची शक्यता आहे. रीमॉनेटायझेशन होऊन परिस्थिती पूर्ववत व्हायला सहा महिने वर्ष तरी लागेल. FII विकत आहेत आणी DII परिस्थितीचा अंदाज घेत आहेत
 • ‘DOXYCLINE’ हे ड्रग हिक्मा कंपनीने विकणे बंद केले. त्यामुळे या औषधाचे शॉरटेज निर्माण झाले. त्यामुळे सन फार्माच्या ‘TARO’ या कंपनीने या औषधाची किंमत वाढवून खूप नफा मिळवला. सम फार्माला या औषधातून झालेल्या फायद्याची रक्कम सरकारला द्यावी लागणार आहे.

मार्केटने काय शिकवले

गेले जवळ जवळ दोन महिने काही मुलभूत गोष्टींकडे मार्केटचे लक्ष होते. २ दिवसापूर्वीची HPCL BPCL IOC या OMC कंपन्यांच्या शेअरची हालचाल पाहिली तर समजते की ऑईलच्या किमती वाढणार म्हणून शेअर वाढले नंतर सरकार मध्ये पडले आणी ऑईल आणि Gasच्या किमती वाढवू नयेत असे सुचवले. नंतर पुन्हा भविष्यात या किंमती वाढणार आहेत असे कळल्यावर शेअर्सच्या किमती पुन्हा वाढल्या. म्हणजेच मुलभूत गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मार्केटने फेड २५ बेसिस पाईंट वाढवणार हे गृहीत धरले होते. . दर अपेक्षेप्रमाणेच वाढले त्यामुळे मार्केट्ची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच झाली. जर फेडने रेट वाढवले नसते किंवा ५० बेसिस पाईंट रेट वाढवले असते तर मार्केट्ची वेगळी प्रतिक्रिया दिसली असती. हिवाळी अधिवेशन कोणतेही कामकाज न होताच संपले आता मार्केटला पुढील ट्रिगर म्हणजे १ फेबृआरीला सादर होणारे अंदाजपत्रक होय

BSE सेन्सेक्स .२६४८९ आणी NSE निफ्टी ८१३९ वर बंद झाले.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १२ डिसेम्बर ते १६ डिसेंबर २०१६ – तळ्यात की मळ्यात

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १९ डिसेंबर २०१६ ते २३ डिसेंबर २०१६ – अनुभवाचे बोल, मोठे मोल | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s