आठवड्याचे समालोचन – २६ डिसेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ – सांगता २०१६ ची आणी शुभारंभ २०१७ चा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

flame-580184_640हा या वर्षाचा शेवटचा आठवडा त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या F&O ची एकस्पायरी, डीमॉनेटायझेशन मध्ये जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची एक्सपायरी, तोटयात चालणार्या सरकारी कंपन्यांची एक्सपायरी, यामुळे गोंधळाचा आणी माननीय पंतप्रधान आणी अर्थमंत्री यांच्या उलटसुलट विधानामुळे गाजलेला आठवडा म्हणावा लागेल.

२०१६ मध्ये शेअर मार्केट मध्ये जी तेजी आली होती ती डीमॉनेटायझेशन नंतरच्या काळात नाहिशी झाली. ब्रेकझीटच्या वेळचा लो मार्केटने पार केला. ५०, १००, २००, डे मूव्हिंग सरासरीपेक्षा मार्केट खाली गेले.

सरकारी अन्नौंसमेंट :-

पंतप्रधानांनी सांगितले की शेअरमार्केट मध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात शेअरमार्केटमधील लोक कमी प्रमाणात कर भारतात. सेबीने  लक्ष देऊन करापासून मिळणारे उत्पन्न वाढेल याकडे लक्ष द्यावे. लगेच अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले की लॉंग टर्म कॅपिटल गेन्स कर लावण्याचा कोणताही उद्देश नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणाकडे लक्ष द्यावे हाच प्रश्न आहे.

GST च्या बाबतीत दुहेरी नियंत्रण (राज्य आणी केंद्र सरकारचे) वगळता बाकीच्या सर्व बाबतीत एकमत झाले. १ एप्रिल २०१७ पासून GST कार्यान्वित व्हावा म्हणून सरकार प्रयत्नशील राहील. पण १ जुलै २०१७ पासून GST नकीच कार्यान्वित केला जाईल अशी आशा आहे.

सरकारने डीमॉनेटायझेशनच्या परिणामांवर आणी अन्दाजपत्रकासंदर्भात अर्थशास्त्रज्ञ आणी तज्ञांची बैठक बोलावली होती. त्यांना या बैठकीत सुचना आणी काही उपाय सुचविण्यास सांगितले. या बैठकीत पर्यटन आणी शेती आणि शेतीसंबंधीत उद्योगांवर लक्ष द्यावे असे सुचविण्यात आले.

ज्या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्या तोटयात चालत आहेत त्यांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार टायर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कंपनी लिस्टेड नाही.

विरल आचार्य या प्रसिद्ध अर्थतज्ञाची RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली.यांच्या अनुभवाचा आणी ज्ञानाचा उपयोग सरकार आणी RBI डीमॉनेटायझेशननंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी करून घेऊ शकेल.

सरकारने एक अध्यादेश काढून रद्द केलेल्या नोटांवरील RBI ची जबाबदारी काढून टाकली आणी चलन रद्द करण्याच्या आपल्या निर्णयाचे शिकामोर्तब केले. आता ३१ डिसेंबर ते ३१ मार्च या काळात  लोकांना RBI ने ठरवून  दिलेल्या शाखांमध्ये बंदी घातलेल्या नोटा जमा करता येतील. सरकारने बंदी घातलेल्या Rs ५०० आणी Rs १००० च्या १० नोटांपेक्षा जास्त नोटा ठेवण्यावर बंदी घातली आहे. जर आपल्याजवळ १० पेक्षा जास्त नोटा आढळल्या तर Rs १०००० किंवा जेवढी रक्कम असेल त्याच्या ५ पट दंड लावण्यात ( यापैकी कमीतकमी रक्कम असेल) येईल. जर  आपण ३१ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत जुन्या बंदी घातलेल्या नोटा जमा करताना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली तर आपल्याला Rs५००० किंवा जमा केलेल्या रकमेच्या पाच पट दंड होऊ शकतो.

३१ डिसेंबरला  पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार होते. या भाषणावर २०१७ हे वर्ष मार्केटला कसे जाईल हे बरेच अवलंबून असेल. उत्तर प्रदेशात निवडणुका असल्यामुळे BJP च्या सभेमध्ये पंतप्रधान काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता होती.

सरकारने त्यांच्या ४ फार्मा कंपन्यांना त्यांच्या मालकीची असलेली जमीन विकण्यास परवानगी दिली. ITI आणी MTNL या कंपन्यांच्या मालकीची पुष्कळ जमीन आहे ती विकण्यास परवानगी मिळेल असे सर्वांना वाटले.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था :-

सेबीने ‘ट्री हाउस’ या कंपनीच्या फायनान्सियल व्यवहाराचे ऑडीट  करण्यास सांगितले आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी :-

खाजगी क्षेत्रातील एक बँक भारत फायनांसियल इन्क्लूजन ही कंपनी विकत घेण्याच्या विचारात आहे अशी बातमी आल्याने हा शेअर खूपच वाढला.

सुनील हायटेक या कंपनीला Rs ३४० कोटींची ऑर्डर मिळाली.

JMC प्रोजेक्ट या कंपनीला Rs १४७६ कोटींची ऑर्डर मिळाली.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला NHAI कडून Rs १५३० कोटींची ऑर्डर मिळाली.

सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीने नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले.

डिविज LAB ह्या कंपनीचा शेअर त्याच्या VIZAG प्लांटवर USFDA ने दाखवलेल्या त्रुटीमुळे पडला.डिविज LAB जी औषधे तयार करत होती त्या औषधासाठी मिळालेल्या ऑर्डर्स रद्द केल्या तर त्याचा फायदा DR REDDY’S LAB, STRIDES SHASUN या कंपन्यांना होईल.

PANACEA BIOTECH ने TETRAVALENT VACCINE ‘EASY FOUR TT” मार्केटमध्ये आणले.

RAMCO SYSTEMS ला वेस्टर्न international या ‘UAE’ बेज कंपनीकडून पेरोल सोल्युशन साठी ऑर्डर मिळाली.

TRETROIN ORAL  CAPSULES  या औषधासाठी ग्लेनमार्कच्या जनरिक आर्मला USFDA कडून परवानगी मिळाली.

ONGC ने के जी बेसिन ब्लॉक 4 GSPL मध्ये ८०% स्टेक घेतला.

रिलायंस म्युच्युअल फंडाने दीपक नायट्रेट या कंपनीत गुंतवणूक केली. एकतर हा शेअर आपल्या हाय पेक्षा ४०% ने कमी आहे आणी त्यांची स्पेशालिटी केमिकल डिविजन चांगले काम करीत आहे.

टाटा स्टील या कंपनीने ‘PELLET’ बनवणारी BRPL (BRAHMANI RIVER PELLET) ही कंपनी Rs ९०० कोटींना खरेदी केली.

ZYDUS कॅडीला या कंपनीने ‘MERK’ या कंपनीकडून ६ ब्रांड विकत घेतले.

कॉर्पोरेट एक्शन :-

अपार इंडस्ट्री या कंपनीने शेअर ‘BUYBACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक ६ जानेवारी २०१७ रोजी बोलावली आहे.

‘BALMER LAWRIE’ हा शेअर सोमवार २६ डिसेंबर रोजी एक्सबोनस झाला.

सासकेन कम्युनिकेशन्स या कंपनीने आपल्या शेअर ‘BUY BACK’ किंमत Rs ४१० ठरवली.

जागरण प्रकाशन या कंपनीने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी ५ जानेवारी २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.

इशान डाइज  या कंपनीने १:२ या प्रमाणात बोनस जाहीर केला.

EIL ही कंपनी शुक्रवारी ३० डिसेंबर २०१६ रोजी एक्स बोनस झाला.

LT FOODS ही कंपनी आपल्या एका शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लीत करणार आहे.

नजीकच्या काळांत येणारे IPO आणी लिस्टिंग :-

NSE ( NATIONAL STOCK EXCHANGE) ने Rs १०००० कोटींच्या IPO साठी  DRHP दाखल केले. STOCK होल्डिंग कॉर्पोरेशन, IDBI, IFCI ह्या कंपन्या आपला स्टेक IPO मध्ये ऑफर करण्याची शक्यता आहे.

CDSL (CENTRAL DEPOSITORIES SERVICES (INDIA) LIMITED) ने सेबीकडे ३.५२ कोटी शेअर्ससाठी DRHP दाखल केले. BSE, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, आणी कोलकाता STOCK EXCHANGE आपला काही स्टेक विकणार आहेत.

मार्केटने काय शिकवले :-

यावर्षी मार्केट २ वेळा निफ्टी ७९२५ च्या लेव्हलला आले पण पुन्हा मार्केट सावरले. कोणतीही स्थिती तशीच रहात नाही. तुम्ही जर तुमची उत्तम शेअर्सची यादी तयार ठेवून चांगले शेअर्स स्वस्तात पदरात पाडून घेतले असतील तर जास्त भावाला विकून फायदा मिळाला असेल. त्यामुळे मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवावा.

सध्या हे मार्केट सेक्टर स्पेसिफिक नसून STOCK स्पेसिफिक आहे. तुम्ही खरेदी करायला योग्य अशा शेअर्सची यादी बनवा. शेअर्स पडण्याची वाट पहा त्यानंतर छोटया छोटया लॉट मध्ये खरेदी करा. कारण सध्यातरी खरेदीसाठी ‘DEMAT’ चार्ज पडत नाही. विकताना प्रथम गुंतवलेले भांडवल+१०% नफा मिळेल एवढे शेअर्स विका म्हणजे उरलेले शेअर्स फ्री ऑफ कॉस्ट होईल. जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असेल तेव्हा हे शेअर विकून तूमची गरज तुम्ही भागवू शकता पण गरज लागेल तेव्हाच विकेन असे उलट गणित मात्र घालू नका कारण गरज लागेल तेव्हा शेअरला चांगला भाव मिळेलच असे नाही  हे ध्यानात ठेवा.

पुढील वर्ष शेअर मार्केटला, त्यात ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सना आणी गुंतवणूकदारांना तसेच माझ्या वाचकांना सुखाचे समृद्धीचे आणी समाधानाचे जावो. ‘अनंत हस्ते कमलावरांनी देता किती घेशील दो करांनी’ अशीच सर्वांवर कृपा करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २६६२४ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८१७४ वर बंद झाला.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

4 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २६ डिसेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ – सांगता २०१६ ची आणी शुभारंभ २०१७ चा

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २ जानेवारी २०१७ ते ६ जानेवारी २०१७- एकाच नाण्याच्या दोन बाजू : फायदा आणी नुक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s