आठवड्याचे समालोचन – २ जानेवारी २०१७ ते ६ जानेवारी २०१७- एकाच नाण्याच्या दोन बाजू : फायदा आणी नुकसान

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

source - wikipedia

नवीन वर्षाचा पहिला आठवडा बरा गेला. बँकांच्या कर्जावरील रेट कटचे कोंबडे उशिराने का होईना पण आरवले त्यासाठी नोटबंदीसारखा जालीम उपाय करावा लागला. यात सुद्धा काही बँकांनी जुन्या कर्जदारांना रेट कटचा फायदा घ्यायचा असेल तर Rs १०००० पर्यंत सेवा चार्जेस भरायला सांगितले आहेत. ‘शिंक्याचे तुटले आणी बोक्याचे फावले’ तसा नोटबंदीमुळे बँकांची कर्जवसुली झाली  आयत्या ठेवी मिळाल्या. परिस्थिती अशी आहे की क्रेडीट ग्रोथ ठप्प झाली आहे, ठेवींवर व्याज तर द्यावे लागेल आणी कर्जावरील व्याजाचा दरही कमी करावा लागल्यामुळे बँकांचे मर्जीन कमी झाले आणी त्याचा विपरीत परिणाम तिमाही निकालांवर आणी बँकांच्या शेअर्सच्या किमतीवर होण्याचा संभव आहे. सरकारच्या आटोकाट प्रयत्नानंतरही उत्पादनात, निर्यातीत वाढ झाली नाही.

यासर्व गोष्टी लक्षात ठेवूनही मार्केटने नव्या वर्षाचे स्वागत तेजीने केले. ज्यांनी निफ्टी ७९०० असताना खरेदी केली असेल त्याना निफ्टी ८२५० च्या आसपास हे शेअर्स फायदा घेऊन विकता आले. सामान्य माणसांच्या गरजांकडे  लक्ष द्या असेच मार्केटलाही सुचवावेसे वाटले का ? हे कळले नाही. साखर चहा तांदूळ ताग कॉफी रबर निर्यात या उद्योगातील कंपन्यांचे शेअर्स या ना त्या कारणानी वाढले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी :-

डोनाल्ड ट्रम्प USA च्या अध्यक्ष पदाची सूत्रे २० जानेवारी २०१७ रोजी सांभाळतील. लवकरच H1 B व्हिसा विधेयक USA च्या संसदेमध्ये सादर केले जाईल. यातील दोन तरतुदी म्हणजे हा व्हिसा मिळण्यासाठी कमीतकमी USA $ १ लाख पगार आणे मास्टर्सची डिग्री आवश्यक केली जाणार आहे. हे बिल मंजूर होण्यासाठी १ वर्षाचा काळ  लागेल.पण हे बिल पास झाल्यावर स्थानीक कर्मचारी कामावर ठेवणे फायदयाचे होईल. ट्रम्प यांच्याच पक्षाला संसदेत बहुमत असल्यामुळे त्यांना आपली धोरणे राबविणे सोपे जाईल. USA च्या संसदेने ‘न्यूनतम वेतन बिल’स्वीकार केले. याचा तडाखा IT क्षेत्राटेल कंपन्यांना बसेल.

ओपेक आणी नॉन ओपेक देशांमध्ये जे करार झाले त्याची अंमलबजावणी चालू झाल्यामुळे क्रूड ऑईलच्या किमतीत सतत सुधारणा होत आहे. याचा फायदा ऑईल एक्सप्लोरेशन कंपन्यांना होईल.  इराण जास्तीतजास्त तांदूळ भारतातून मागवणार आहे. पूर्वी पेक्षा जास्त आयात परवाने देणार आहे. चीनने सुद्धा तांदळाचे नमुने मागवले आहेत. याचा फायदा KRBL,कोहिनूर फूड्स, LT फूड्स या कंपन्यांना होईल.

सरकारी अनौंसमेंट :-

 • सरकारने  ब्रांडेड नॉन ज्युवेलरी सोन्यावरची ‘COUNTERVEILING आयात’ ड्युटी ६% वरून १२.५ % केली याचा परिणाम TBZ, टायटन, PC ज्युवेलर्स, गीतांजली जेम्स या कंपन्यांवर होईल.
 • सरकारने बांगलादेश आणी नेपाल यांच्याकडून आयात होणाऱ्या तागावर ANTI DUMPING ड्युटी ५ वर्षासाठी लावली.
 • सरकारने जाहीर केले की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे भत्ता STRUCTURE तयार केले जाईल.
  ‘LNG’ वरची आयात ड्युटी सरकार काढून टाकण्याच्या विचारात आहे.
 • निर्यातीसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजामध्ये ३%सूट (इंटरव्हेंशन) होती ती २०१७ च्या वर्षात चालू ठेवणार आहे. या योजनेमध्ये ४१६ उत्पादने सामील केली जातील.
 • पंतप्रधानांनी रिअल्टी सेक्टरसाठी मागणी वाढावी यासाठी व्याज दारात काही सवलती जाहीर केल्या. घरासाठी घेतलेल्या कर्जासाठी Rs ९००००० कर्जापर्यंत ४% ते Rs १२ लाख कर्जापर्यंत ३% सूट जाहीर केली. तसेच पंतप्रधानांनी जेष्ठ नागरिकांसाठी १० वर्षासाठी Rs ७५०००० पर्यंत  मुदत ठेव योजना जाहीर केली. या मुदत ठेवीवर ८% व्याज मिळेल हे व्याज दर महिन्याला दिले जाईल; पण ही ठेव १० वर्षांपर्यंत काढता येणार नाही. बँकांना हा व्याजाचा दर देण्यासाठी सबसिडी दिली जाईल.
 • निवडणूक आयोगाने पंजाब, UP, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्याच्या मतदानाच्या तारखा जाहीर केल्या. ह्या तारखा १ फेबृआरीला अंदाजपत्रक सादर केल्यानंतरच्या आहेत. त्यामुळे मतदानावर अंदाजपत्रकातील तरतुदींचा परिणाम होईल त्यामुळे एकतर अंदाजपत्रक मतदानाची शेवटची फेरी झाल्यावर सादर करा किंवा मतदानाच्या तारखांत  बदल करा अशी विरोधी पक्षांनी मागणी केली. याची परिणाम बजेट RALLY वर होऊ शकतो.
 • शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जावरचे ६० दिवसांसाठीचे व्याज केंद्र सरकार भरेल असेही जाहीर केले.
 • सरकारने पेट्रोल डीझेल तसेच ATF च्या किंमती वाढवल्या. याचा विपरीत परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर होईल.
 • सरकारने  ITDC ची तीन हॉटेल्स, अनुक्रमे भुवनेश्वरचे हॉटेल कलिंग  दिल्लीचे अशोक हॉटेल आणी हॉटेल जनपथ राज्य सरकारांकडे किंवा खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याचा निर्णय घेतला आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी:-

 • ऑटो विक्रीच्या आकड्यांमध्ये M&M ची विक्री ४% कमी तर त्यांच्या TRACTOR विक्री ९% ने वाढली , आयशर मोटर्सची विक्री वाढली तर मारुतीची देशांतर्गत विक्री कमी झाली पण निर्यात वाढली. फोर्से मोटर्सची विक्रीही कमी झाली. अशोक LEYLAND ची विक्री १२% ने कमी झाली. जरी विक्री १२% ने कमी झाली तरी या कंपनीच्या शेअरची किंमत वाढू लागली कारण मार्केटच्या अपेक्षेपेक्षा ही विक्रीत झालेली घट कमी होती. या कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किंमती Rs ६०००० ते Rs १ लाखापर्यंत वाढवल्या.
 • FERRO CROME प्रोडक्टस् च्या किंमती वाढत आहेत. याचा फायदा IMFA, बालासोर ALLOYS या कंपन्यांना होईल.
 • बॉम्बे डाईंग या कंपनीने त्यांची पुण्याची जमीन आणी मशिनरी Rs १८५ कोटींपर्यंत विकणार असे जाहीर केले.
 • सिमेन्स या कंपनीने वरळीची जमीन Rs ६२० कोटींना विकली.
 • ONGC ने AMGURI ऑईल फिल्ड आसाम कंपनीला HANDOVAR केले.
 • व्हिडीओकॉन त्यांचा ‘केनस्टार’ नधला स्टेक Rs १२०० कोटी ते Rs १५०० कोटींना विकणार आहे. हा स्टेक खरेदी करण्यात बजाज इलेक्ट्रिकल, HAVELLS, आणी सिम्फनी या कंपन्याना रस आहे. या पेशाचा उपयोग व्हिडीओकॉन कर्ज फेडण्यासाठी करेल.
 • फोर्टिस हेल्थकेअर या कंपनीचा हॉस्पिटलचेन मधील स्टेक विकण्यासाठी KKR बरोबर बोलणी चालू आहेत.
  स्टेट बँकेने सुरक्षिततेचे कारण सांगून मोबाईल WALLET (ओंन लाईन युसेज WALLET)  ब्लॉक केले.
 • वोखार्तच्या अंकलेश्वर युनिटला USFDA ने पाच त्रुटी दाखवल्या परंतु जर्मनीने क्लीन चीट दिली
  झारखंडमधील लाइमस्टोनच्या खाणीसाठी ACCला पर्यावरण मंजुरी मिळाली. या खाणीची क्षमता २.११ मिलियन टन  एवढी आहे. याचा फायदा ACC ला होईल.
 • झारखंडमधील लालमटीया खाण लवकरच सुरु होईल याचा फायदा कोल इंडियाला होईल.
 • येन डॉलर याच्या विनिमय दराचा फायदा मारुतीला होईल. हा रेट १०३ येन वरून ११५ येन पर्यंत गेला.
 • रेलिगेअर त्यांचा सेरेसट्रा अडवायझर आणी TRANSACTION यातला स्टेक विकणार आहेत. हा व्यवहार फेबृआरी २०१७ पर्यंत पुरा होईल.
 • पिरामल एन्टरप्रायझेसने हौसिंग फायनांस कंपनी सुरु करण्यासाठी NATIONAL हौसिंग बँकेकडे अर्ज दिला आहे.
  जागतिक मार्केटमध्ये चहाच्या किंमती वाढत आहेत. याचा फायदा , हर्रीसन मलायलम (चहा, कॉफी, रबर), जयश्री टी, टाटा ग्लोबल बिव्हरीजेस या कंपन्यांना होईल.
 • टी व्ही एस मोटर्सने आपल्या २ व्हीलर्सच्या किंमती वाढवल्या.
 • महाराष्ट्र आणी कर्नाटक येथे उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे साखरेची किंमत वाढत आहे. याचा फायदा उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना होईल उदा :- बलरामपुर चीनी धामपूर शुगर

कॉर्पोरेट एक्शन :-

 • NBCCने १:२ असा बोनस जाहीर केला. तुमच्याकडे २ शेअर्स असतील तर १ बोनस शेअर मिळेल.
 • जागरण प्रकाशन ने Rs १९५ प्रती शेअर या किंमतीला ‘BUYBACK’ जाहीर केला. कंपनी Rs ३०२ कोटी ‘BUY BACK’ साठी वापरेल.
 • ‘BSE’ ला Rs १०००० कोटींचा IPO आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली.
 • HUDCO( हौसिंग अंड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)  ने IPO साठी DRHP दाखल केले.
 • लक्ष्मी विलास बँकेने Rs १४० प्रती शेअरने QIP केला.
 • AB NOVHOच्या प्रमोटर्स नी कंपनीतील आपला स्टेक वाढवला. यासाठी त्यांनी Rs १३६६ प्रती शेअर या भावाने शेअर्स खरेदी केले.
 • अपार इंडस्ट्रीज Rs ६६० प्रती शेअर ‘BUY BACK’ .करण्यावर Rs २९.०७ कोटी खर्च करणार आहे.

मार्केटने या आठवड्यात काय शिकवले :-

नुकसान आणी फायदा ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थात आपण त्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. उद्योगामध्ये किंवा कोणत्याही धोरणामध्ये एका उद्योगाचा, समाजाच्या एका घटकाचा फायदा होतो तर दुसर्या उद्योगाचे नुकसान होते किंवा फायदा कमी होतो. ज्या उद्योगाचा फायदा होत असेल त्या उद्योगात कार्यरत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावेत आणी ज्या उद्योगाचे नुकसान होत असेल त्या उद्योगात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स शॉर्ट करावेत किंवा आपल्याजवळचे शेअर्स फायद्यात असतील तर विकावेत.

एकाचे अन्न ते दुसर्याचे विष असते असे आपण म्हणतो. नोटबंदीचा थोडाफार विपरीत परिणाम सर्व क्षेत्रांवर होत असताना बँकांना मात्र कर्ज वसुलीत वाढ आणी ठेवीमध्ये अमाप वाढ असा झाला. त्यामुळे कर्जावरील व्याजाचे दर कमी करणे बँकांसाठी अपरीहार्य झाले. याचा परिणाम बँकांच्या मार्जिनवर दिसून येईल कर्जावरील कमी केलेल्या दरांचा फायदा सर्व कर्जदारांना होईल. USA च्या नागरिकांना जास्ती रोजगार मिळावा यासाठी इमिग्रेशन बिल आणत आहेत पण याचा विपरीत परिणाम भारतीय IT क्षेत्रातील कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. साखर, विजेची बिल आपला खिसा खाली करत आहेत तसेच बिस्कीट, दारू, शीत पेय यांचा उत्पादन खर्च वाढत आहे.  पण त्यामुळे पॉवर कंपन्या आणी साखर कंपन्यांची परिस्थिती सुधारत आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स २६७६० तर NSE निर्देशांक निफ्टी ८२४४ वर बंद झाला.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २ जानेवारी २०१७ ते ६ जानेवारी २०१७- एकाच नाण्याच्या दोन बाजू : फायदा आणी नुकसान

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट – दशा ठरवते दिशा | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s