आठवड्याचे समालोचन – 9 Jan ते  15 Jan – दशा ठरवते दिशा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हा आठवडा आनंदाचा. बरोडा बँकेने सांगितले की ज्यांचे क्रेडीट पॉइंट चांगले आहेत त्याना कमी व्याजाच्या दराने कर्ज मिळेल. हे चांगल्या वागणूकीसाठी मिळालेले बक्षीसच होय. नाहीतर जे लोक कर्ज फेडत नाहीत त्यांची कर्जे माफ होतात. हे कळल्यावर लोकांची कर्ज फेडण्याची वृत्तीच नाहीशी होते. जर सरकारने कर्ज माफ केले नाही तर चीड येते. कर्ज बुडवण्याच्या वृत्तीला वेसण घालून कर्ज फेडण्याच्या वृत्तीचे वेगळ्या प्रकारे कौतुकच !

त्याचबरोबर टी सी एस चे प्रमुख चंद्रशेखरन याची टाटा सन्सच्या चेअरमनपदी झालेली नेमणूक हे ही एक चांगल्या कार्यक्षमतेला आणी चांगुलपणाला मिळालेले प्रशस्तीपत्रकच होय. सोमवार दिनांक ९ जानेवारी २०१७ रोजी  PUT CALL रेशियो १.११ होता. खताचे शेअर्स वेंल्थ DISTROYERS आहेत असेच म्हणावे लागेल. २००७ साली चंबळ फरटीलायझर या कंपनीचा शेअर Rs ८५ होता तो आजही २०१७ मध्येही Rs८५ च आहे. १० वर्षानी ०% फायदा झाला. मार्केट्ची गुणवत्ता खराब होते आहे असे वाटते. GVK, GVR,JP असे शेअर्स वाढू लागले आणी चांगले शेअर्स पडू लागले की वेगळीच शंका येते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी :-

 • USA च्या मावळत्या अध्यक्षांचे श्री बराक ओबामा याचे निरोपाचे भाषण म्हणजे कृतकृत्य झालेल्याची पावती होती आपल्या ‘WE CAN DO IT’ या घोषणेचा संदर्भ घेऊन त्यांनी सांगितले की USA च्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे ‘WE HAVE DONE IT’ असे ते म्हणाले. ट्रम्प हे अध्यक्षपदाची सूत्रे २० जानेवारीपासून सांभाळतील. त्यांचा भार स्थानीय लोकांना काम मिळवून देण्यावर आहे. त्यांची कडी नजर विदेशी फार्मा कंपन्यांवर असेल. भारतीय फार्मा कंपन्यांची बरीच विक्री USA मध्ये होत असल्याने फार्मा कंपन्यांना USA सरकारच्या निर्णयाची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. H1 B विसाचे नियम कडक करणार असल्यामुळे IT सेक्टरमधील कंपन्यांवर ज्यांचा बहुतांशी बिझिनेस USA मध्ये आहे त्यांनाही ही झळ लागण्याची शक्यता आहे.
 • चीनने काही ठराविक प्रकारच्या स्टील प्रोडक्ट्सचे उत्पादन करण्यावर बंदी घातल्यामुळे भारतीय स्टील कंपन्यांचे शेअर्स वधारले उदा :- टाटा स्टील्स

सरकारी अनौंसमेंट :-

 • सरकार पवन हंस मधील ५१% स्टेक विकणार आहे या कंपनीत ONGC चा ४९% स्टेक आहे. या कंपनीचे व्यवस्थापन सुद्धा सरकार दुसऱ्या कंपनीस देण्यास तयार आहे.
 • UP मधील निवडणुकांच्या मुहूर्तावर सरकार लेदर उद्योगाला Rs ४००० कोटीचे package देण्याचा विचार करत आहे. याचा फायदा लिबर्टी शूज, मिर्झा, रीलाक्सो, बाटा यांना होईल.
 • मध्य प्रदेश राज्य सरकारने POS (पॉइंट ऑफ सेल) मशीन करमुक्त केली. तसेच मध्य प्रदेशचे राज्य सरकार दारूबंदी आणण्याचा विचार करत आहे.
 • सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व सरकारी कंपन्याना जास्तीत जास्त लाभांश देण्याची सुचना केली आहे. BPCL कडून Rs १७०० कोटी तर HPCL कडून Rs १५०० कोटी तर ONGC कडून Rs २००० कोटी आणी IOC कडून Rs ५००० कोटी लाभाशांची सरकारला अपेक्षा आहे.
 • सरकारने MDR ( MERCHANT DISCOUNT RATE) हा चार्ज आता ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी द्यावा असे सांगितले. क्रेडीट कार्ड इशू करणाऱ्या बँका, पेट्रोल पंपांचे मालक आणी पेट्रोल भरणारे ग्राहक आणी OMC यापैकी कोणी कोणी हे चार्जेस भरावेत याविषयी वाद होता.
 • BEML मधील २६% स्टेक विकण्यासाठी सरकारला CCEA ने मंजुरी दिली.
 • सरकार कुकिंग कोल वरची ड्युटी २.५% आणी निकेलवरची ड्युटी ५% कमी करण्याची शक्यता आहे याचा फायदा आशापुरा माईनकेम, विसा स्टील, भूषण स्टील, मॉनेट इस्पात या कंपन्यांना होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी :-

 • नोव्हेंबर २०१६ या महिन्यासाठी IIP ५.७ % झाले. ही गेल्या १३ महिन्यातील उच्चतम आहे तसेच CPI महागाई डिसेंबर महिन्यासाठी ३.४१% झाली हा महागाईचा आकडा २५ महिन्यातील कमीतकमी आकडा आहे
 • सरकारने अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग ७.६% वरून ७.१ पर्यंत कमी केला तर काही रेटिंग एजन्सीजने हा दर ७% पर्यंत कमी केला आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी :-

 • GRANULS या कंपनीच्या तेलंगाणा राज्यातील गागीलापूर येथील उत्पादन युनिटवर पोर्तुगालच्या INFRAMED या रेग्युलेटरी संस्थेने इन्स्पेक्शन करून ११ त्रुटी दाखवल्या. यामुळे कंपनीचा शेअर कोसळला.
 • ऑरोबिंदो फार्माने ‘GENERICS’ही पोर्तुगीज कंपनी खरेदी केली. ऑरोबिंदो फार्माला मिरगीच्या औषधासाठी परवानगी मिळाली.
 • IDBI बँकेने पंजाब अल्कलीजच्या कर्जाचे शेअर्स मध्ये रुपांतर करण्यासाठी ४७ लाख शेअर्स घेतले.
 • पॉवर ग्रिड या सरकारी कंपनीला Rs ४३५० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • MAX वेंचर मध्ये ‘NEWYORK LIFE’ ने आपला स्टेक वाढवला.
 • शिवा सिमेंटचे प्रमोटर्स JSW सिमेंट या कंपनीला १९.५ कोटी शेअर्स Rs १४ प्रती शेअर या भावाने विकणार आहेत. शिवा सिमेंटमध्ये प्रमोटर्सचा  स्टेक ३६% आहे. ही बातमी मार्केटला होती कारण या कंपनीच्या शेअरची किंमत गेले काही दिवस वाढत होती. या कंपनीच्या शेअर्ससाठी ओपन ऑफर येण्याची शक्यता आहे.
 • भारती एअरटेल १२ जानेवारी पासून पेमेंट बँक सुरु करत आहे. कंपनी पेमेंट बँकेत Rs ३००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
 • HOCL ही कंपनी आपल्याकडे असलेली अतिरिक्त जमीन BPCL ला विकण्याच्या विचारात आहे.
 • S H केळकर आणि कंपनी ही कंपनी GFCL हा नवीन फ्लेवर सुरु करणार आहेत.त्यांची सबसिडीअरी ‘केवा फ्लेवर्स’ मार्फत खरेदी केला.
 • आठवडा संपता संपता टी सी एस आणी इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे तसेच इंडस इंद बँकेचे आणी साउथ इंडिअन बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
 • टी सी एस चा रेव्हेन्यू Rs २९७३५ कोटी तर नफा Rs ६७७८ कोटी आणी US $ रेव्हेन्यू US $ ४३८ कोटी झाला. BFSI, MFG, तसेच रिटेल मध्ये चांगली वाढ झाली. ATTRITION रेटही कमी झाला. हे निकाल मार्केटच्या अपेक्षेपेक्षा थोडे चांगलेच आहेत.
 • इन्फोसिसचा रेव्हेन्यू Rs १७२७३ कोटी तर नफा ३७०८ कोटी आणी US $ रेव्हेन्यू US$255 कोटी झाला. परंतु कंपनीने आपला २०१७ च्या वित्तीय वर्षासाठीचा गायडंस कमी केला.इन्फोसिसचा निकाल मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे आला.
 • इंडस इंद बँकेचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले. डीमॉनेटायझेशनचे वादळ या बँकेने तरी यशस्वीरीत्या थोपवले.

कॉर्पोरेट एक्शन :-

 • NHPC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने Rs १.७० प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.
 • हिंद रेक्टीफायर ह्या कंपनीने राईट्स इशू आणण्यावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक १५ जानेवारी २०१७ रोजी बोलावली आहे.
 • BEL (भारत इलेक्ट्रोनिक लिमीटेड) या कंपनीने शेअर्सच्या विभाजनावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग २७ जानेवारी २०१७ रोजी बोलावली आहे.
 • VIVIMED या कंपनीला आपल्या ४ सबसिडीअरिज कंपनीत मर्ज करण्यासाठी हायकोर्टाने मंजुरी दिली.
 • BSE या भारतातील सर्वात जुन्या आणी मोठ्या STOCK EXCHANGE चा IPO २३ जानेवारी २०१७ ला ओपन होऊन २५ जानेवारी २०१७ ला बंद होईल.

मार्केटने काय शिकवले :-

ज्या कंपन्या किंवा जे उदयोग तोट्यात चालत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न सरकार  करीत असे. पण सरकारही आता कंटाळले. कितीही मदत केली तरी सुधारणा दिसत नाही हे पाहिल्यावर त्या कंपन्या बंद कराव्यात, त्यातील मालमत्ता विकावी किंवा या कंपन्या व्यवस्थापनासकट चालवावयास द्याव्या हा विचार पुढे आला आहे. म्हणजेच उद्योगाची दशाच ही त्या उदयोगाच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाच्या दिशेचे कारण असते.

मार्केट काही गोष्टी डोक्यावर घेते व काही गोष्टीकडे दुर्लक्ष करते, ट्रम्पच्या भाषणाकडे मार्केटने फारसे लक्ष दिले नाही असे जाणवले. मार्केटने डीमॉनेटायझेशनलाही मागे टाकले आहे. हे IIP व इन्फ्लेशन च्या आकड्यांनी दाखवले. त्यामुळे मार्केट वाढत राहिले व आनंदाची लहर जाणवली

आज मकर संक्रांत, तीळा तीळाने का होईना शेअरमार्केट विषयीच्या ज्ञानात भर पडून कमाईच्या गुळाची गोडी चाखता यावी म्हणून ‘तिळगुळ घ्या आणी गोड बोला’ गोड बोलून शेअर मार्केटचे ज्ञान तीळा तीळाने दुसर्यास देऊन लोकांचेही ज्ञान आणी कमाई वाढवा. तीळ  सांडू नका आणी मार्केटशी  भांडू नका. आपण जर जमा केलेले ज्ञान नीट  वापरले तर तोटा होऊन मार्केटशी भांडण्याचा प्रसंगच येणार नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७२३८ वर NSE चा निर्देशांक निफ्टी ८४०० वर बंद झाला.

 

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – 9 Jan ते  15 Jan – दशा ठरवते दिशा

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १६ जानेवारी २०१७ ते २३ जानेवारी २०१७ – नांदा सौख्यभरे! | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s