आठवड्याचे समालोचन – १६ जानेवारी २०१७ ते २३ जानेवारी २०१७ – नांदा सौख्यभरे!

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC - Dori via wikipedia

IC – Dori via wikipedia

‘यंदा लग्नकर्तव्य आहे’ असे सांगून सूचक मंडळात नाव घालतात निवड होते बैठक, साखरपुडा, लग्न, लक्ष्मीपूजन, मधुचंद्र असे सर्व सोपस्कार पार पडतात. पण घरातील माणसांच्या मनात एकाच धागधुग असते येणारी सून वागेल कशी? सगळ्यांना सांभाळून घेईल का? ‘खायचे दात वेगळे आणी दाखवायचे दात वेगळे’असे झाल्यास काय करावे अशी एक प्रकारची काळजी किंवा अनाकलनीय भीती सगळ्यांच्या मनात असते. सध्या तसेच काहीसे वातावरण मार्केटमध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीला उभे राहिले, प्रचार झाला, निवडून आले. प्रेसिडेंट इलेक्ट जानेवारी २० २०१७ पासून पदभार सांभाळणार  आणी अध्यक्ष होणार.  त्यांची वागणूक, एकंदरच धोरणे विकसनशील देशांच्या आणी पर्यायाने इमर्जिंग मार्केट्सच्या दृष्टीने कशी असतील, त्या धोरणांचा कोणत्या क्षेत्रांवर, त्यातील कोणत्या भारतीय कंपन्यांवर किती आणी कोणत्या प्रकारचा परिणाम होईल या विचारातच हा आठवडा संपला.

आंतरराष्ट्रीय घटना

USA मध्ये डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी २०१७ पासून अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतील. त्यामुळे USA चा परदेशी कंपन्या तसेच परदेशी लोकांना नोकऱ्या देण्याच्या धोरणात फरक पडण्याचा संभव आहे. याचा परिणाम IT, फार्मा या क्षेत्रातील कंपन्यांवर आणी ज्यांचा बिझिनेस USA बरोबर जास्त आहे अशा आयातनिर्यात क्षेत्रातील कंपन्यांवर होईल. US $ मजबूत होईल आणी रुपयाचा विनिमय दर कमी होईल

सौदी अरेबिया या तेलउत्पादक देशाने आपले उत्पादन कमी केल्यामुळे क्रूडची किंमत वाढावयास सुरुवात झाली. चीनचे युआन हे चलन US $ च्या तुलनेत खूपच कमजोर आहे. त्यामुळे USA मधील उद्योग चीनी उद्योगांबरोबर स्पर्धा करू शकत नाही. USA $ कमजोर होणे जरुरीचे आहे. चीनच्या सेन्ट्रल बँकेने १९००० कोटी युआन सिस्टीममध्ये घातले.

सरकारी अन्नौंसमेंट

 • लो कॉस्ट हौसिंगला उत्तेजन देण्यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ चा दर्जा द्यावा या विचारात सरकार आहे. याचा फायदा गणेश हौसिंग, अन्सल हौसिंग, पेनिनसुला land यांना होईल.
 • सरकार राजीव गांधी इक्विटी सेविंग स्कीम नव्या रुपात आणी नव्या नावाने आणू शकते. या योजनेत Rs १२ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्याना Rs ७५००० ते Rs १००००० पर्यंत गुंतवणूक करता येईल. ह्यावर आय करामध्ये सवलत मिळू शकेल. शक्यता आहे की पहिल्यावेळी गुंतवणूक करणार्यांबरोबर जुन्या गुंतवणूकदारांनाही ही सवलत दिली जाईल.
 • सायबर सिक्युरिटीसाठी सरकार लवकरच ऑपरेशन सेंटर चालू करणार आहे.
 • सरकारने एकूण Rs ११८७ कोटींचे ६ FDI प्रस्ताव मंजूर केले यात हॉलंडची कंपनी रेसीफार्मच्या Rs ९५० कोटींचा प्रस्ताव सामील आहे.
 • CCI (COMPETITTION COMMISION ऑफ इंडिया) ने ७ सिमेंट कंपन्यांवर Rs २०६ कोटी दंड लावला. हा दंड कार्टलायझेशन (सर्व कंपन्यांनी एकमेकांच्या सहाय्याने आणी संमतीने किंमत आणी इतर धोरणात्मक निर्णय घेणे)साठी लावला आहे.
 • आलोक वर्मा यांची CBI चे नवीन प्रमुख म्हणून नेमणूक केली. ही नेमणूक दोन वर्षांसाठी आहे.
 • सरकारने सर्व जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे लिस्टिंग करायचे ठरवले आहे. यात युनायटेड इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरीएंटल जनरल इन्शुरन्स, NATIONAL इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स कंपनी यांचा समावेश आहे. या कंपन्यातील सरकारची हिस्सेदारी १००% वरून ७५% वर आणली जाईल.
 • सरकारने इलेक्ट्रोनिक आयटेम्सचे उत्पादन करणाया कंपन्यांना करात सवलत मिळण्यासाठी सातत्याने ३ वर्ष व्यापारी तत्वावर उत्पादन करावे लागेल असे सांगितले आहे.
 • CBDT सर्क्युलर प्रमाणे इंडिया डेडिकेटेड फंड्सना भारतीय करप्रणालीप्रमाणे कर भरावा लागत होता. जर एखादा गुंतवणूकदार ५% पेक्षा जास्त गुंतवणूक करेल तर त्याला जास्त कर भरावा लागे. तसेच हा फंड ज्या देशातील असेल त्या देशाच्या करप्रणालीप्रमाणे कर भरावा लागेल. ही ट्रिपल TAX पॉलिसी या फंडांना मान्य नव्हती. हे CBDT चे सर्क्युलर सरकारने जवळ जवळ मागे घेतल्यासारखेच आहे. मुख्य म्हणजे एखाद्या धोरणाच्या विरोधात काही मत मांडले तर सरकार ऐकून घेते हे जाणवले.
 1. सरकारने CPSC (सेन्ट्रल पब्लिक सेक्टर कंपनीज) ETF ची घोषणा केली. हा इशू १८ जानेवारीला सुरु होऊन २० जानेवारीला बंद होईल.
 2. या फंडात कमीतकमी Rs ५००० गुंतवणूक करावी लागेल.
 3. गुंतवणूक करण्यासाठी ‘ DEMAT’ अकौंट असणे जरुरीचे आहे.
 4. या फंडाच्या युनिट्स ची खरेदी ब्रोकरमार्फत केली जाईल.
 5. एक वर्षानंतर विकल्यास लॉंग टर्म कॅपिटल गेन्स कर लागणार नाही. हा फंड सरकारी कम्पन्यातच गुंतवणूक करेल या कंपन्या नवरत्न आणी महारत्न या प्रकारातील असतील.
 6. हा फंड राजीव गांधी इक्विटी सेविंग योजनें अंतर्गत आहे. पहिल्या वेळी गुंतवणूक करणार्याला ५००००पर्यंत TAX बेनिफिट आहे.
 • सरकारने हिंदुस्थान झिंक या कंपनीकडून लाभांशाच्या स्वरूपात Rs १५००० कोटी अपेक्षित आहेत असे सांगितले आहे.
 • सरकारने भारत डिजिटल या उद्देशाने खेडोपाडी डेटा फ्री मिळावा हा उद्देश ठेवल्यास Rs ४००० कोटी खर्च येईल.
 • GSTचे घोडे गंगेत न्हाले. दुहेरी नियंत्रणाचा प्रश्न केंद्र सरकार आणी राज्य सरकारांनी एक्मताने सोडविला.आता GST १ जुलै २०१७ पासून लागू केला जाईल असा अंदाज आहे.
 • पेट्रोलियम मंत्रालयाने युरो III नियमानुसार बनवण्यात आलेल्या वाहनाना १ एप्रिल २०१७ पासून बंदी येईल असे सांगितले सरकार युरो IV नियमानुसार वाहने बनवण्यासाठी Rs ३०००० कोटी गुंतवणूक करेल.
 • प्रिंट मेडिया सुचना आणी प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते. प्रिंट मेडियाची १३ वर्षात समीक्षा झाली नव्हती. आता सरकारने प्रिंट मेडियामध्ये FDI ची मर्यादा २६ % वरून ४९% केली आहे. याचा फायदा HT मेडिया, जागरण प्रकाशन, DB कॉर्प या कंपन्यांना होईल.
 • सरकार फरटीलायझर कंपन्यांना स्पेशल बँकिंग अरेंजमेंट नुसार Rs १०००० कोटी देणार आहे.
 • सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना Rs २५००० कोटी भांडवल देईल. यामध्ये स्टेट बँक आणी PNB यांना इतर बँकापेक्षा जास्त रक्कम मिळेल.
 • अल्युमिनियमची भारतात ५० % आयात होते त्यामुळे MIP लावावी अशी मागणी होत आहे. याचा फायदा NALCO, हिन्दाल्को, तसेच वेदांता ग्रूपला होईल.
 • पर्यटन क्षेत्रात काम करणार्या कंपन्यांच्या बिलाच्या ६०% रकमेवर २२ जानेवारी पासून सेवा कर आकारला जाईल.
 • सरकारने चीनमधून आयात होणार्या स्टीलवर ANTI DUMPING ड्युटी लावली.
 • बिहार राज्य सरकारने १ एप्रिल २०१७ पासून मद्यार्क बनविण्यासाठी परवाने दिले जाणार नाहीत असे जाहीर केले. तसेच सध्या दिलेल्या परवान्यांचे २०१८ नंतर नुतनीकरण केले जाणार नाही असेही जाहीर केले. हा मद्यार्क उत्पादन करणार्या कंपन्यांसाठी मोठा धक्का आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • WPI आकड्यांमध्ये यावेळी वाढ झाली. WPI यावेळी ३.१५% वरून ३.३९% झाला. जरी अन्नधान्य आणी प्राथमिक गरजांच्या वस्तूंमध्ये घट दिसली तरी इंधन, MFG WPI मध्ये वाढ झाली.
 • डिसेंबर २०१६ या महिन्यासाठी ट्रेड डेटा (आयात निर्यातिचे आकडे) चांगले आले निर्यात सतत चौथ्या महीन्यात वाढली. निर्यात US $ २३८०० बिलियन तर आयात US $ ३४.२५ बिलियन झाली आणी अशा तर्हेने US $ १०.४ बिलियन ट्रेड GAP राहिली.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

RBI ने ATM मधून दर दिवशी पैसे काढण्याची मर्यादा Rs ४५०० वरून Rs१०००० पायांत वाढविली. तसेच चालू (CURRENT) खात्यातून दरदिवशी पैसे काढण्याची मुदत Rs १००००० पर्यंत वाढवली. परंतु आठवड्यातून पैसे काढण्याची मर्यादा बचत खात्यांसाठी रस २४००० कायम ठेवली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • SDR 4A योजनेअंतर्गत मॉनेट इस्पात एनर्जी आणी उत्तम गालवा स्टील या कंपन्या विकल्या जातील.
 • कॅडिला हेल्थकेअरला कॅन्सर साठीच्या आणी ऑरोबिंदो फार्माला HIV साठीच्या औषधासाठी USFDA कडून परवानगी मिळाली.
 • टाटा ग्लोबल बिव्हरेजीस आणी स्टार बक्स ‘टीवाना टी बार’या नावाने चेन सुरु करणार.
 • फेडरल बँक, लक्ष्मी विलास बँक, डेव्हलपमेंट कोओपरेटीव बँक,येस बँक, MCX, DHFL. LIC हौसिंग रिलायंस इंडस्ट्रीज यांचे तिमाही निकाल चांगले आले तर AXIS बँकेचे तसेच कॅनरा बँकेचे निकाल खूपच असमाधानकारक आले.
 • इस्टर इंडस्ट्रीज या कंपनीने स्पेसीअलिटी पॉलीएस्टर धाग्यांच्या उत्पादनासाठी पेटंटसाठी अर्ज दाखल केला. कंपनी गुरु ग्राममध्ये Rs ५० कोटी गुंतवणूक करून R & D युनिट चालू करेल.
 • कोल इंडियाने कोकिंग कोलची कींमत २०%ने वाढवली. कोल इंडिया परदेशात ‘कोकिंग कोल रिझर्व’ खरेदी करण्याचा प्रयत्न करेल असे जाहीर केले.
 • सुझलानने १०००० MW विंड CAPACITYचे उद्दिष्ट पुरे केले.
 • अशोक LEYLAND या कंपनीने गुरु आणी पार्टनर या नावाने २ प्रकारचे ट्रक बाजारात आणले.
 • टाटा मोटर्सने नवीन SUV गाडी ‘HEXAA’ या नावाने बाजारात आणली. याची किंमत Rs १२.०० लाख ते १६ लाख आहे.
 • बजाज ऑटोने 2KTMLR रेंजची बाईक Rs १.७५ लाख ते २.०० लाख किंमतीला बाजारात आणली.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) या भारतातील सर्वात जुन्या आणी मोठ्या STOCK EXCHANGE चा IPO पुढील आठवड्यात २३ जानेवारी २०१७ ला उघडून २५ जानेवारी २०१७ रोजी बंद होईल. या IPOचा PRICE BAND Rs ८०५ ते Rs ८०६ आहे. मिनिमम लॉट १८ शेअर्सचा आहे.
 • GAIL या कंपनीने बोनस आणी भांडवल उभारणीवर विचार करण्यासाठी २५ जानेवारी २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग बोलावली आहे.

या आठवड्यात मार्केटने काय शिकवले

२० जानेवारी २०१७ रोजी मदरसन सुमी आणी कॅडिला हेल्थकेअर या दोन्ही कंपन्यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे अक्विझिशन केले. ज्यावेळी कमी किमतीत चांगली कंपनी अक्वायर केली जाते तेव्हा ती कॉर्पोरेट एक्शन योग्य समजली जाते. मदरसन सुमी या कंपनीने मोठे अक्विझिशन महागात केले पण फारसे कर्ज नसलेली, फायद्यात चालणारी कंपनी त्यांनी घेतली. त्यामानाने कॅडिलाने केलेले अक्विझिशन लहानसे असले तरी पाय रोवण्यासाठी योग्य होय. असा विचार केल्यास शेअर्सच्या किमतीवर चांगला किंवा वाईट परिणाम होइल हे समजते.

या आठवड्यात विमा व्यवसायासंबंधी केलेली घोषणा फलदायी ठरेल असे दिसते. सर्व सरकारी विमा कंपन्यांचे वेगवेगळे लिस्टिंग केले जाईल याचा फायदा ICICI प्रुडेन्शियल आणी MAX लाईफ यांना होईल. ज्या लोकांचे ICICI प्रुडेन्शियल च्या IPO मध्ये अडकले होते त्यांना काहीसे हायसे वाटले असावे. मार्केटच्या मंदीच्या गर्मीमध्ये ही गार वाऱ्याची झुळूक म्हणावी लागेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७०३५ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८३५० वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १६ जानेवारी २०१७ ते २३ जानेवारी २०१७ – नांदा सौख्यभरे!

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २३ जानेवारी २०१७ ते २७ जानेवारी २०१७ – समुद्रमंथन शेअरमार्केटचे! | Stock Market आ

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s