आठवड्याचे समालोचन – २३ जानेवारी २०१७ ते २७ जानेवारी २०१७ – समुद्रमंथन शेअरमार्केटचे!

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Stock market information in marathiशेअर मार्केटमध्ये सतत सागराप्रमाणेच लाटा उठत असतात भोवरे तयार होत असतात, ज्याप्रमाणे समुद्राची लाट किनार्यावर काय आणून टाकेल हे माहित नसते त्याप्रमाणे मार्केट मध्ये चालू असलेले मंथन कोणती नवरत्ने बाहेर टाकेल ह्याचीही निश्चिती नसते. ह्यावेळी ब्रेक्झीट, USA ची अध्यक्षीय निवडणुक, फेड, ECB च्या मुळे सतत मंथन चालू होते. त्यात डीमॉनेटायझेशन च्या रवीने आख्खे मार्केट ढवळून निघाले. आता भारतीय उद्योग निराशाजनक निकालांचे  हलाहल देतो की चांगल्या निकालांचे अमृत देतो याची मार्केट वाट पाहत होते. आनंदाची गोष्ट अशी की मार्केटने सर्व प्रकारचे मंथन पचवून अमृतासारखी RALLY त्याच्या गुंतवणूकदारांना दिली.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिकन वापरा, अमेरिकेत बनवा’ ही घोषणा केली. त्यांनी व्हिसाबद्दल तसेच आपल्या परराष्ट्र धोरणानुसार निर्णय घ्यावयास सुरुवात केली. दुःखात सुख एवढेच की त्यांनी असे सांगितले की भारताबरोबरीच्या संबंधात सौहार्द राहील.

UK च्या सुप्रीम कोर्टाने UK च्या पंतप्रधान थेरेसा मे ह्यांना ब्रेक्झीट साठी वाटाघाटी चालू करण्याआधी UK च्या संसदेची मंजुरी घ्यायला सांगितली. त्यामुळे आता ब्रेक्झीटच्या अटी कोणत्या असतील ह्यासाठी वाटाघाटी करणे लांबणीवर पडले.

शुक्रवारी तारीख २७ जानेवारी २०१७ NSE निर्देशांक निफ्टी ८६५० झाला. १ नोव्हेंबरनंतर हा आकडा पाहावयास मिळाला म्हणजेच डीमॉनेटायझेशन चा अडथळा मार्केटने पार केला. आतापर्यंत लागलेले कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागले. मार्केटला गती मिळाली सर्वांनी या RALLYला ‘PRE – BUDGET’  RALLY असे नाव दिले.

‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ या म्हणीप्रमाणे USA आणि चीन यांच्या भांडणात US $ वीक होत आहे. US # निर्देशांक १०० च्या पेक्षा कमी झाला आहे. पूर्वी चीनने जसे युआनचे अवमूल्यन केले तसे US $ चे अवमूल्यन झाले तर मेटल शेअर्सना फायदा होईल.

अंदाजपत्रकात गोल्ड पॉलिसी आणण्याचा विचार आहे. आयात कर जर जास्त असेल तर तर स्मगलिंग वाढते, चोरटी आयात वाढते. म्हणून आयात कर कमी करण्याचा विचार आहे. आयात ड्युटी १०% वरून ८% वर येण्याची शक्यता आहे. स्पेशल पार्क बनवणार. या अंदाजपत्रकात कमीतकमी करपात्र उत्पन्नाची मर्यादा Rs ४ लाख होण्याची शक्यता आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

सरकारने MOIL या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचे १,३४ कोटी शेअर्ससाठी Rs ३६५ फ्लोअर प्राईस वर ओपन ऑफर ही ओपन ऑफर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २५ जानेवारीला ओपन होऊन त्याच दिवशी बंद झाली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २०% शेअर्स राखीव होते आणी त्यांना कटऑफ प्राईसवर ५% डीसकौंट होता. या ऑफर फोर सेलला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.

मायक्रो ATM , फिंगरप्रिंट रीडर, पॉइंट ऑफ सेल, बायोमेट्रीक रीडर बनवण्यासाठी जर काही पार्ट्स आयात करणे जरुरीचे असेल तर या पार्ट्सच्या आयातीवरील करात सुट मिळण्याची शक्यता आहे

ISMT या सरकारी संस्थेने साखरेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सरकारने सांगितले आहे की वाढत्या साखरेच्या किमतीवर उपाय योजण्यासाठी सरकार विचार करीत आहे.

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी BEML मधील २६% स्टेक विकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी आवश्यक ते इन्व्हेस्टमेंट बँकांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत.

अंदाजपत्रकात सेवा कर १२% आणि १८% अशा दोन स्तरावर आकारला जाईल. सध्या आकारल्या जाणार्या सेवा करात ०.५ ते १ % वाढ होऊ शकते प्राथमिक गरजा पुरवणाऱ्या सेवांवर कमी दराने सेवा कर आकारला जाईल असा अंदाज आहे.

सरकार E –KYC ला मंजुरी मिळाल्यानंतर आधारकार्डचा नंबरच DEMAT अकौंटचा नंबर असेल असा नियम करण्याच्या विचारात आहे.

‘GAAR’ नियम २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षासाठी ( A. Y. २०१८ ते २०१९)  लागू होतील. यामध्ये व्यापाराच्या  उद्देशाला महत्वाचे स्थान दिले आहे. कर बुडवणे  हा उद्देश असता कामा नये.

SEBI RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

सेबीने विजय मल्ल्या यांस शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्यास तसेच कोणत्याही लिस्टेड  कंपनीच्या डायरेक्टर पदावर राहण्यास मनाई केली आहे. तसेच DIEGO आणी मल्ल्या यांच्यात झालेल्या कराराची पुन्हा तपासणी केली जाईल असे सांगितले.

NPPA(NATIONAL PHARMACEUTICAL PRICING AUTHORITY) या प्रशासनिक संस्थेने ११ औषधे प्राईस कंट्रोलमध्ये आणली तर २२ औषधाच्या किंमती कमी केल्या.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

भारतातील आर्थिक सुधारणांचा (फिस्कल कन्सोलीडेशन) वेग सरकारने वाढवला पाहिजे असे S & P या आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थेने सांगितले. भारताचा DEBT TO GDP रेशियो ६०% पेक्षा कमी झाला तर भारतीय अर्थव्यवस्थेला अपग्रेड करता येईल असे सांगितले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

यावेळी कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल  मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगले आले. डीमॉनेटायझेशनच्या परिणामांवर कंपन्यांच्या कार्यक्षमतेने मात केली असे चित्र दिसले.

HCL-TECH या कंपनीचा तिसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला. या कंपनीने २०१७ साठी १२% ते १४% रेव्हेन्यू गायडंस दिला कॉन्स्टनट करन्सी मध्ये गायडंस कमी केला नाही. Rs ६ प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.

CROMPTON च्या डस्ट फ्री पंख्याच्या रेंजला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटा मोटर्स नी हायब्रीड आणी इलेक्ट्रिक बस चालू केल्या. या बसची किंमत Rs १.६० कोटी ते २.०० कोटी असेल.

नाटको फार्मा या कंपनीच्या हैदराबाद उत्पादन युनिटमध्ये केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये USFDA ने ६ त्रुटी दाखवल्या. कंपनीने सांगितले की या त्रुटी गंभीर स्वरूपाच्या नसून दुरुस्त करण्यासारख्या आहेत.

चेन्नई पेट्रो, KPR मिल्स, EXIDE, मारुती, सुप्रीम इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक,ब्लू स्टार, बायोकॉन, चोलामंगलम इन्वेस्टमेंट, CROMPTON कन्झुमर, HAVELLS, HDFC BANK, YES बँक, एशियन पेंट्स, कोलगेट यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

करुर वैश्य बँक, ओबेराय रिअल्टी, IDFC BANK, कर्नाटक बँक आलेम्बील फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर , सागर सिमेंट्स अशोक LEYLAND, SPARC यांचे निकाल असमाधानकारक होते.

बायोकॉन  या कंपनीला मालेशियातून इन्सुलिन साठी Rs ४६० कोटींची ऑर्डर मिळाली.

दिलीप बिल्डकॉन या कंपनीला महाराष्ट्रातून Rs ४६८ कोटींची ऑर्डर मिळाली.

साउथ कोरिअन कंपनी REDDY’s ने तयार केलेली औषधे USA मध्ये विकत होती. त्यामुळे औषधे स्वीकारली नाहीत त्यामुळे साउथ कोरिअन कंपनीने DR रेड्डीज वर दावा दाखल  केला आहे.

प्रकाश इंडस्ट्रीज ला स्पॉंज आयर्नसाठी दीर्घ मुदतीसाठी COAL LINKAGES मिळाली

ITC ह्या FMCG क्षेत्रातील कंपनीचे तिमाही निकाल समाधानकारक आले. यामुळे डीमॉनेटायझेशनचा परिणाम भारतीय उद्योगाने पचवले असेच म्हणावे लागेल. तसेच ITC चा सिगारेटपासून मिळणाऱ्या उत्पानावरचा भाग कमी झाला. संजीव पुरी हे ITC चे CEO म्हणून ५ फेबृआरी पासून सूत्र स्वीकारतील. सघ्याचे CEO Y.C .देवेश्वर हे पुढील ३ वर्ष ‘MENTOR’ म्हणून राहतील.

कॉर्पोरेट एक्शन

GAIL या सार्वजनिक  क्षेत्रातल्या सरकारी कंपनीने १:३ असा बोनस जाहीर केला आहे म्हणजे तुंमच्याजवळ ३ शेअर असतील तर तुम्हाला १ बोनस शेअर मिळेल. तसेच Rs ८.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

MPHASIS BFL या कंपनीने शेअर  ‘BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ३१ जानेवारी २०१७ ला  बोलावली आहे

NLC (नेईवेली लिग्नाईट) या कंपनीने शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ३१ जानेवारी २०१७ ला  बोलावली आहे

IPO

BSE च्या IPOला  गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला, HNI क्वोटा १५१ वेळा तर QIB क्वोटा ३२ वेळेला आणी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला क्वोता ६.२२ वेळेला ओव्हर सबस्क्राईब झाला.

D MARTचा IPO नजीकच्या काळात येणार आहे त्यामुळे TRENT, SHOPPER’S STOP  अशा कंपन्यांच्या शेअर्स कडे लक्ष ठेवावे

मार्केटने काय शिकवले

बुधवारी तारीख २६ जानेवारी २०१७ रोजी PUT CALL रेशियो १.३४ होया म्हणजेच ओव्हरबॉट झोन होता अशावेळी प्रॉफीट बुकिंग करणे योग्य ठरते. पण बुधवारी वायदा एक्सपायरी आणी २ ते ३  ट्रेडिंग सेशननंतर अंदाजपत्रक सादर होणार असल्यामुळे लोकांनी खरेदी केली. PUT CALL रेशियो १.५९ झाला.

बुधवारच्या वायदा बाजाराच्या आकड्यांचे निरीक्षण केल्यास. निफ्टी ८००० ते  ९०००  या रेंजमध्ये राहील असे वाटले.  IT आणि फार्मा सेक्टर पासून दूर रहाणार. मार्केट अंदाजपत्रक सादर होण्याच्या दिवशी म्हणजे १ फेबृआरी २०१७ रोजी सेन्सेक्स  ६०० पोइंट व्होलटाईल राहील.

मार्केटमध्ये ‘लेफ्ट ऑउट फिलिंग’ जाणवले जे शेअर चांगले पण ‘BAD PATCH’ मध्ये असल्यामुळे योग्य भावाला उपलब्ध होते ते  शेअर वाढले उदा :- भेल, PNB, AXIS बँक. ICICI बँक भारती एअरटेल त्यामुळे मला ही ‘CATCH UP RALLY’ आहे असे वाटले. काहीही म्हणा काहीही नाव द्या मार्केट वाढले की खुशीची लहर पसरते हेच खरे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २७८८२ आणि NSE निर्देशांक निफ्टी ८६४१ वर बंद झाले.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २३ जानेवारी २०१७ ते २७ जानेवारी २०१७ – समुद्रमंथन शेअरमार्केटचे!

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ – जोकर बजेटचा! | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s