आठवड्याचे समालोचन – ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ – जोकर बजेटचा!

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

image source - TaxCredits.net

image source – TaxCredits.net

२४ ऑक्टोबर २०१६ नंतर मार्केटने बुधवारी पुन्हा एकदा निफ्टी ८७०० चा टप्पा गाठला. बजेटमध्ये काय असेल, बजेटच्या पेटीत कोणता जादूचा पेटारा असेल हे माहित नव्हते. सगळेजण आपापल्या परीने अंदाज व्यक्त करीत होते. डीमॉनेटायझेशनच्या त्रासाला कंटाळलेल्या गुंतवणूकदारांना काहीतरी उत्तेजन हवे होते. USA चे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नवीन धोरणात्मक घोषणांचे संकट दारात उभे ठाकले आहे. त्यामुळे बजेटकडे सर्वजण आशाळभूतपणे पाहत होते. नेहमीपणे खते, अवजारे, सिंचनाच्या योजना, शिक्षण, संरक्षण याकडे सर्वांचे लक्ष होते. पण सर्वांचे जास्तीतजास्त समाधान होईल असे बजेट आल्यामुळे जणू जोकरच हाती आला डाव मस्त रंगला आणी आनंदात पूर्ण झाला.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी :-

 • USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्व USA आणी पर्यायाने जग ढवळून निघत आहे. त्यांनी सांगितले आहे “BUY अमेरिकन , MAKE अमेरिकन and USE अमेरिकन”
 • त्यांनी विशिष्ट देशातून येणाऱ्या त्या त्या देशातील नागरिकांवर USA मध्ये तीन महिन्यांसाठी प्रवेश बंदी जाहीर केली आहे.
 • USA मध्ये आयात होणार्या वस्तूंवर २०% आयात ड्युटी लावली आहे. त्यामुळे आता USA मध्ये आयात होणार्या सर्व वस्तू २०% महाग होतील. त्यांचा आग्रह असा आहे की या वस्तू जर USA मध्ये बनवल्या तर स्वस्त पडतील आणी USA च्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. पण याचा परिणाम मागणीवर आणी पर्यायाने विक्रीवर होईल. अर्थव्यवस्थेसाठी असे संरक्षण योग्य आहे की अयोग्य? याची चर्चा रंगली आहे.
 • USA च्या संसदेमध्ये H1B व्हिसासाठी परदेशी नागरिकांना कमीतकमी US $ १३००००(सध्या US $ ६०, ०००) पगार हवा. तसेच शिक्षण पूर्ण केल्यावर जो व्हिसा मिळतो तोही रद्द करावा अशी सुधारणा सुचविली आहे. तसेच USA मध्ये काम करणार्या विदेशी नागरिकांच्या जोडीदाराला वर्किंग व्हीसा मिळतो तोही रद्द व्हावा अशी सुधारणा सुचविली आहे. याचा फटका IT  क्षेत्रातील कंपन्या विशेषतः इन्फोसिस आणी टीसीएस याना बसेल  तसेच आता USA मध्ये काम करणारे लोक नाईलाजाने भारतात परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. USA मधील क्रुडऑइलच्या साठ्यात वाढ झाल्यामुळे क्रूड पुन्हा स्वस्त होत आहे.
 • USA च्या सेन्ट्रल बँक फेडने आपल्या रेट्समध्ये कोणताही बदल केला नाही.
 • UK च्या संसदेने पंतप्रधान थेरेसा मे यांना ब्रेक्झीटची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी EU बरोबर वाटाघाटी करण्यासाठी मंजुरी दिली.
 • बँक ऑफ जपाननेही (जपानची सेन्ट्रल बँक) आपल्या रेट मध्ये काही बदल केले नाहीत.

सरकारी अन्नौंसमेंट :-

 • सरकारने FIPB ( FOREIGN INVESTMENT PROMOTION BOARD) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • LONG TERM कॅपिटल गेन्स तसेच आयकराच्या SLAB मध्ये बदल केला नाही. FDI चा अर्ज ऑन लाईन भरता येईल. अचल संपतीवरील (immovable property) कॅपिटल गेन्सला पात्र होण्यासाठीची मर्यादा ३ वर्षावरून २ वर्ष केली. तसेच इंडेक्सेशन साठी वर्ष १९८१ वरून २००१ पर्यंत पुढे आणले
 • डीमॉनेटायझेशनमुळे FY २०१८ च्या ग्रोथमध्ये ०.५% घट होईल असा अंदाज आहे त्यामुळे FY २०१८ मध्ये ग्रोथ रेट ६.७५ ते ७.५० राहील असा अंदाज आहे. यावेळी गरीब कल्याण योजनेमधून बराच कर मिळेल पण क्रूडच्या रेट मधील घटी मुळे मिळणारा आयातीतील फायदा असणार नाही.
 • कर्जावरील व्याजाचे दर कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेस जोर मिळेल. GST पासून किती कर मिळेल याचाही अंदाज करणे कठीण आहे.
 • ज्यांचे करपात्र उत्पन्न Rs २.५० लाख ते Rs ५.०० लाख असेल त्यांच्या उत्पन्नावरील आयकराचा दर १०% वरून ५% केला. ज्यांचे करपात्र उत्पन्न Rs ५० लाख ते Rs १ कोटी असेल त्यांच्यावर 10% सरचार्ज लावणार
 • ३,००,००० ( तीन लाख) च्यावर व्यवहार कॅश मध्ये करता येणार नाही
 • IRCTC तर्फे बुकिंग केले तर त्या बुकिंगवरचा सेवा कर काढून टाकला.
 • LNG वरची कस्टम ड्युटी ५% वरून २.५ % केली.
 • राजकीय पक्षांना आता देणग्या कॅशमध्ये फक्त Rs २००० पर्यंत स्वीकारता येतील. सरकार इलेक्टोरल BONDS काढण्याच्या विचारात आहे.
 • सरकार रेल्वेशी संबंधीत IRCTC, IRCON आणी IRFC या कंपन्यांचे लिस्टिंग करेल. एकंदर १६ कंपन्यांमध्ये विनिवेश करेल.
 • सर्व ऑईल प्रोड्युसिंग आणी ओईल मार्केटिंग कंपन्या एकत्र करून एक मोठी कंपनी स्थापन करण्याचा आपला मानस सरकारने जाहीर केला.
 • फिस्कल डेफिसिट चे लक्ष्य (फिस्कल डेफिसिट / GDP) २०१७-२०१८ साठी ३.२% तर २०१८ ते २०१९ साठी ३% निर्धारित केले.
 • अफोर्डेबल हौसिंगला इन्फ्रास्ट्रक्चर चा दर्जा दिला. Rs ५० कोटी पेक्षा कमी टर्न ओव्हर असलेल्या कंपन्यांना कॉर्पोरेट करामध्ये सवलत दिली. या कंपन्यांना २५% कॉर्पोरेट कर लावला जाईल.
 • जर तुम्हाला Rs ५०००० पेक्षा जास्त भाडे द्यायचे असेल तर तुम्हाला त्यातून ५% TDS वजा करून भरावा लागेल.
 • MAT योजनेखालील क्रेडीट आता १० वर्षाऐवजी १५ वर्षापर्यंत कॅर्री फॉरवर्ड करता येईल.
 • अंदाजपत्रकात ‘BAD BANK’ स्थापन करण्यासाठी विचार करण्यात आला आहे ‘BAD BANK’ नंतर ‘पब्लिक सेक्टर ASSET REHABILITETION कंपनी स्थापन करेल. ही कंपनी विकत घेतलेले, त्यांच्याकडे TRANSFER केलेले ‘BAD ASSETS’ विकण्याचा /देणी वसुल करण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न करेल. ‘BAD BANK’ ही संकल्पना जर्मनी, स्वीडन,फ्रान्स या देशात यशस्वी झाली आहे. BAD बँकेच्या या बातर्मीमुळे बँकांच्या शेअर्स मध्ये वाढ झाली.
 • ग्रामीण भागात १००% विद्युतीकरण मे २०१८ पर्यंत पुरे होईल.
 • ३ फेबृआरी २०१७ रोजी BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) च्या शेअर्सचे NSE वर Rs १०८५ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये अर्ज केलेल्या आणि शेअर्स मिळालेल्या अर्जदारांना चांगला लिस्टिंग गेन्स झाला. शानदार लिस्टिंग झाले. तसेच आणखी एक गोष्ट आपल्या EXCHANGE वर हजारो कंपन्या लिस्टिंग करणाऱ्या BSE च्या स्वतःच्या शेअर्सचे लिस्टिंग मात्र NSE वर झाले
 • टाटा कम्युनिकेशन म्हणजेच VSNL ची जमीन सरकार विकणार आहे याचा फायदा सरकार आणी इतर MINORITY शेअरहोल्डर्सना होईल. यावर कॅपिटल गेन्स कर लागणार नाही. प्रत्येक शेअरहोल्डरला प्रत्येक शेअर पाठीमागे Rs ४०० फायदा होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी :-

 • बजाज फायनांस, विजया बँक, ONGC, SREI INFRA, ग्लेनमार्क फार्म, महिंद्र हौसिंग मारुती ltd यांचे निकाल चांगले आले.
 • मारुती LTD ने आपल्या सर्व वाहनांवर Rs ५००००पर्यंत सूट जाहीर केली.
 • सोना कोयो या कंपनीचे प्रमोटर्स त्यांचा ३५% स्टेक Rs ८४ प्रती शेअर या दराने JKEKT या जपानी कंपनीला विकला.
 • ग्लोबल ऑफशोअर या कंपनीने घेतलेली कर्जे SBI ने NPA म्हणून घोषित केली.

कॉर्पोरेट एक्शन :-

 • NHPC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने १०% शेअर्स ‘BUY BACK OF SHARES’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.
 • ADVANCE ENZYMEने १४ फेबृआरी २०१७ रोजी शेअर्स स्प्लिट करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • सासकेन कम्युनिकेशन ही कंपनी ३ फेबृआरी ते १६ फेबृआरी या दरम्यान शेअर ‘BUY BACK’ करेल.
 • HOCL (हिंदुस्तान ऑर्गनिक केमिकल्स) ही कंपनी त्यांचा HFL मधील आपला ५७% स्टेक विकणार आहे HFL ची मार्केट कॅप ३० कोटी आहे. HOCL ही लॉस मेकिंग कंपनी आहे.
 • कोर्टाने दयानिधी आणि कलानीथी मारन बंधुना निर्दोष घोषित केल्यामुळे त्यांची असलेली सन टी व्ही ह्या कंपनीच्या शेअर्सची किंमत वधारली.
 • वोडाफोन आणी आयडीया या दोन टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचे मर्जर होणार आहे.
 • इंडस इंड बँक आणी भारत फायनांसियल इन्क्लुजन या फायनान्स क्षेत्रातील दोन कंपन्यांचेही मर्जर होणार आहे.
 • स्ट्राईडस शसून त्यांचा API कारभार सिक्वेंट सायंटीफिकमध्ये विलय करणार आहे. १ ऑक्टोबर २०१७ ही मर्जर साठी तारीख ठरली आहे. सिक्वेंट सायंटीफिक आपला वूमेन हेल्थकेअर कारभार बाजूला काढणार स्वाप रेशियो ठरवून नवी कंपनी बनवून तिचे लिस्टिंग करणार.

मार्केटने काय शिकवले :-

‘कनसॉलिडेशन’ चे मोठे हत्यार सरकारने शेअरमार्केटच्या हातात दिले. शेअरमार्केटवाले यालाच ट्रिगर म्हणतात. एखाद्या बातमीच्या संबंधीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी विक्री होते. ज्या शेअरमध्ये फायदा होत असेल कंपनीची प्रगती होत असेल ते खरेदी करणे आणि ज्या कंपन्यांना तोटा होत असेल त्यांचे शेअर्स विकणे. अशा कंपन्या शोधून काढण्याचे काम सुरु होते. आणी बातमीचे कृतीमध्ये रुपांतर झाले की  त्या शेअर्सचा नाद सोडणे हेच मार्केटचे तंत्र. यालाच ‘BUY ON  RUMOUR AND SELL ON NEWS’ असे म्हणतात.

गुंतवणूकदारांच्या हातातल्या बजेटच्या बातमीची हवा आता निघून गेली. आता नवीन खेळणे म्हणजे RBI ची पॉलिसी. RBI रेट कट करेल की नाही याची चर्चा सुरु झाली. आपणही पाहु या काय होते ते !

यावेळेला प्रथमच सरकारने लोकांना ‘खर्च करा’ असा संदेश दिला. प्रत्येक करदात्यांना Rs १२०००पर्यंत आयकरात सुट दिली. सरकार स्वतःसुद्धा सार्वजनिक खर्चात लक्षणीय वाढ करणार आहे. सेव्हिंग अर्थव्यवस्थेतून स्पेंडीग अर्थव्यवस्थेकडे वाटचालीचे या अंदापत्रकात सुतोवाच केले. यामुळे मार्केटमध्ये तेजी येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८२४० आणी NSE निर्देशांक निफ्टी ८७४० वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ – जोकर बजेटचा!

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ६ फेब्रुवारी २०१७ ते १० फेब्रुवारी २०१७- दिसतं तसं नसतं | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s