आठवड्याचे समालोचन – ६ फेब्रुवारी २०१७ ते १० फेब्रुवारी २०१७- दिसतं तसं नसतं

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या महिनाभर कंपन्यांचे तिमाही निकाल येत आहेत. या निकालातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अपेक्षा आणि वास्तव या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात कार्य करीत असतात. आणी हेच दुःखाचे आणि आनंदाचे कारण असते.

यावेळी तिमाही निकाल चांगले लागतील अशी अपेक्षा अजिबात नव्हती. डीमॉनेटायझेशनमुळे कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण बहुतेक कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले. मार्केटने कौतुकाची थाप दिली आणि निफ्टी ८८०० पर्यंत गेला.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये उद्योग, सामान्य जनता यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या इमिग्रेशन पोलीसीचा विरोध करण्यास सुरुवात केली. त्यातच कोर्टाने या निर्बंधांवर स्टे दिल्याने गोंधळ वाढला.
 • USA मधील क्रूडचे साठे वाढल्यामुळे क्रूडच्या किमतीच्या वाढीचा वेग कमी होईल.
 • टोयोटा आणी सुझुकी या दोन ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपन्या मर्जर करण्याच्या विचारात आहेत. यामुळे टोयोटाची हायब्रीड, इलेक्ट्रिकल आणी विनाड्रायव्हर कारच्या बाबतीत असलेली तांत्रिक क्षमता आणी सुझुकीचे जगभर पसरलेले मार्केट यांचा परस्परांना फायदा होईल. टोयोटाला भारतात आपले R &D सेंटर उघडता येईल.

सरकारी अनौंसमेंट

 • सरकारने नेमलेल्या कमिटी ऑफ सेक्रेटरीजने १५ वर्षापेक्षा जास्त जुनी असणारी वाहने ( ट्रक्स, बसेस आणी इतर कर्मर्षियल वाहने) स्वेच्छेने मोडीत काढण्यासाठी तयार केलेल्या योजनेला मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली. यासाठी खालीलप्रमाने तीन फायदे दिले जातील. (१) नव्या वाहनांवर रोड कर आणी एक्साईज ड्युटीमध्ये ५०% सुट मिळेल. (२) जुन्या वाहनातील SCRAP ला योग्य किंमत (३) आणी वाहन उत्पादकांकडून किंमतीत सुट दिली जाईल.
 • सरकारने आपला ITC मधील ‘SUUTI’ (SPECIFIED UNDERTAKING ऑफ UTI) योजनेखाली असलेला २% स्टेक Rs ६७०० कोटींना विकला. यापैकी बहुतांशी शेअर्स LIC ने खरेदी केले. सरकारने या ‘SUUTI’तर्फे होणार्या शेअर्सच्या विक्रीसाठी सर्व क्लीअरंस घेऊन ठेवले आहेत. मार्केटचा मूड बघून सरकार हे शेअर्स विकेल. SUUTI ची स्थापना २००३ मध्ये झाली. SUUTI योजनेखाली एक्सिस बँकेचा ११.६६, ITC चा ११.७७ आणी  L&T मध्ये ८.१८% स्टेक आहे. ज्या कंपन्यांना ‘BAIL OUT’ PACKAGE द्यावे लागते त्या कंपन्यांची मालमत्ता आणि देणी सरकारने ‘SUUTI’ मार्फत खरेदी केली.
 • सरकारने ‘ पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान’ या योजनेला परवानगी दिली. या योजनेचा फायदा HCL INFO, मेगा SOFT, EDUCOM या कंपन्यांना होईल.
 • सरकारने हिंदुस्थान झिंक मधील सरकारचा स्टेक डायव्हेस्ट करण्यावर विचार करण्यासाठी एक समिती नेमली.

RBI , SEBI आणी इतर प्रशासनीक संस्था

 • RBI ने आपले वित्तीय धोरण ८ फेबृआरी रोजी जाहीर केले . RBI ने आपल्या रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट किंवा CRR, SLR यामध्ये कोणताही बदल केला नाही. RBI ने बँकांना सांगितले की बँकांनी RBI ने पूर्वी केलेला रेट कट पूर्णपणे कर्जदारांना द्यावा. यापुढील काळात रेट कट होण्याची शक्यता कमी असल्याचेही जाहीर केले. ‘BAD बँक’ स्थापन करण्याचा विचार चालू असल्याचे सांगितले. सायबर सिक्युरिटी साठी STANDING COMMITTEE स्थापन केली. RBI ने सायबर सिक्युरिटीसाठी १ एप्रिल २०१७ पासून एन्फोर्समेंट विभाग चालू करणार असे सांगितले.
 • डीमॉनेटायझेशनच्या वेळी बचत खात्यातून पैसे काढण्यावर घातलेले  निर्बंध RBI ने हळूहळू उठवायला सुरुवात केली. फेब्रुवारी २० पासून दर आठवड्याला Rs ५०,०००, तर मार्च १३, २०१७ पासून हे निर्बंध पूर्णपणे उठवण्यात येतील असे जाहीर केले.
 • सुप्रीम कोर्टाने ऐअरसेल MAXIS केसमध्ये मारन बंधूंना निर्दोष ठरवण्याविरुद्ध केलेली याचिका रद्द केली. त्यामुळे सन टी व्ही च्या शेअर्सची किंमत वाढली.
 • टेलिकॉम कमिशनने TRAI ने टेलिकॉम कंपन्यांवर लावलेल्या Rs ३०५० कोटी दंडासाठी आणी PIO देण्यासाठी ९० दिवसांच्या मुदतीसाठी स्पष्टीकरण मागितले.
 • CCI ने रिलायंस एअरोस्पेस आणी DASSALLTS जॉइंट व्हेन्चरला मंजुरी दिली.
 • HPCL या कंपनीला त्यांच्या मुंबईतील Rs ३२०० कोटींच्या विस्तार योजनेला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
 • MSCI निर्देशांकात ग्रासिम या कंपनीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच टेक महिंद्र या कंपनीचे वेटेज वाढवण्यात आले आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टाटा टेलीसर्विसेस ‘VIOM’मधील आपला ३२% स्टेक अमेरिकन टॉवर कंपनीला विकणार आहे. जर हा व्यवहार एप्रिलपर्यंत पुरा झाला तर टाटा टेलीसर्विसेस या कंपनीला Rs ४५०० कोटी मिळतील.
 • वेलस्पन इंडिया ही कंपनी इजीप्सिअन कॉटन असोसिएशन बरोबर करार करणार आहे आणी US $३ मिलियनची गुंतवणूक करणार आहे.
 • टाटा एलेक्सी ही कंपनी M स्टार बरोबर सेट टॉप बॉक्स सोल्युशन्स साठी करार करणार आहे.
 • ITC ही कंपनी सिगारेटच्या किमतीत १४% वाढ करण्याची शक्यता आहे.
 • बाटा, बॉम्बे डाईंग, हिरो मोटो, कल्याणी स्टील, व्येंकीज, ल्युपिन, युनायटेड बँक, एस्कॉर्टस, इप्का labs, सिम्फोनी, स्टेट बँक ऑफ इंडिया,देना बँक, हिन्दुस्थान झिंक अल्केम LAB, सोना कोयो, महाराष्ट्र\ सीमलेस ट्यूब, CESC या कंपन्यांचे निकाल चांगले आले.
 • युनियन बँक ऑफ इंडिया, M & M, यांचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी होते.

कॉर्पोरेट एक्शन

 • कॅनरा बँक तुमच्याजवळ असलेल्या १० शेअरला ३ राईट्स शेअर Rs २०७ प्रती शेअर या भावाने देणार आहे. बँकेला यामुळे Rs ११२४ कोटी मिळतील.
 • NHPC ही १०% शेअर्स Rs ३२.२५ प्रती शेअर या भावाने STOCK EXCHANGE च्या माध्यमातून ‘BUY BACK’ करणार आहे.
 • त्रिवेणी इंजिनीअरिंग ह्या कंपनीने शुगर आणी टर्बाईन बिझीनेस वेगळा काढण्याचा  निर्णय रद्द केला.
 • व्होडाफोन आणी आयडीया या कंपन्यांच्या मर्जरसाठी मॉर्गन स्टेनले यांना बँकर म्हणुन नियुक्त केले.
 • कॉंकार ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने बोनस इशू करण्यावर विचार करण्यासाठी फेब्रुवारी १३ २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • पॉली मेडीक्युअर या कंपनीने १:१ बोनस शेअर जाहीर केला.
 • प्रकाश इंडस्ट्रीजने PVC पाईप बिझिनेस डीमर्ज करण्यावर विचार करण्यासाठी फेब्रुवारी १४ २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे
 • लाफार्ज होलीसेम ही कंपनी ACC आणी अंबुजा सिमेंट या कंपन्यांचे मर्जर करणात आहे. ACC ही अंबुजा सिमेंटची सबसिडीअरी आहे. या मर्जरमुळे सिनर्जीचे फायदे आणी कॉस्ट कटींग होईल असा अंदाज आहे. ACC ची उत्पादन क्षमता ३४.६ MT तर अम्बुजाची ३० MT आहे. हे मर्जर होणार होणार म्हणून  २०१३ पासून गाजतय . या मधून १+१ =२ का १+१=३ होणार ते पहावे लागेल.
 • ICRA ही रेटिंग क्षेत्रातील कंपनी Rs ४५०० प्रती शेअर Rs ४० कोटीपर्यंत ‘buy back’ करणार आहे.
 • इन्फोसिस शेअर्स ‘BUY BACK’ करण्याची शक्यता आहे. कंपनी ‘BUY BACK” वर Rs १२००० कोटीपर्यंत खर्च करेल. यामुळे ROE (रिटर्न ऑन इक्विटी) सुधारतो आणी BALANCE SHEET सुधारायला मदत होते.
 • DR रेड्डीज चा निकाल ठीक होता पण बहुतेक नव्या प्रोडक्ट्स FY १८ मध्ये लॉनच होणार असल्याने चौथ्या तिमाहीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या श्रीकाकुलम उत्पादन युनिटला कॅनडा हेल्थ आणी जपानी ऑडीटने क्लीन चीट दिली.
 • टाटा स्टील्सने स्पेशालिटी स्टील बिझिनेस लिबर्टी हाउस ग्रुपला Rs ६३९ कोटीला विकण्यासाठी करार केला आहे. टाटा स्टील्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनी तोट्यातून फायद्यात आली.
 • इन्फोसिसची संस्थापक त्रयी आणी व्यवस्थापन यांच्यातील गंभीर मतभेद प्रथमच उघड झाले आहेत. त्यामुळे आता टाटा ग्रूपप्रमाणेच इन्फोसिसमध्येही काही महत्वाचे बदल होतात का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण एक मात्र खरे की मार्केटच्या हातात कोलीत देऊ नये.आपापसातील भांडणे सर्वांपर्यंत पोहोचली की शेअरची किंमत कमी होते आणी शेअरहोल्डर्सचे नुकसान होते.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • D-MART या कंपनीचा IPO २२ फेब्रुवारी उघडून २७ फेब्रुवारी २०१७ ला बंद होईल, या IPO चा प्राईस BAND Rs २९० ते Rs २९९ आहे. मिनिमम लॉट ५० शेअर्सचा असेल. या IPO द्वारा ६.२४ कोटी शेअर्स कंपनी ऑफर करत आहे.

मार्केटने आपल्याला काय शिकवले

सध्या मार्केट वाढते आहे. पण ते असेच वाढत राहील अशी शाश्वती कोणीही  देऊ शकत नाही. सगळे ठीक चालले आहे असे म्हणून हाताची घडी घालून बसू शकत नाही. अशावेळी आपण rally ची गुणवत्ता पहावी असे मला वाटते. सध्या लार्ज कॅप शेअरपेक्षा मिडकॅप आणी स्माल कॅप शेअर्सच्या किंमती जास्त वाढल्या आहेत. अशा शेअर्सला एकदा लोअर सर्किट लागायला लागले की विकणे कठीण जाते त्यामुळे वेळेवर प्रॉफीट बुक करावे.

कोणताही राईट्स इशू आपल्याला फायदेशीर आहे का? हे पाहूनच शेअर्स खरेदी करावेत. उदा :- सध्या कॅनरा बँकेचा राईट्स इशू आला आहे. कॅनरा बँकेच्या शेअर्सचा भाव Rs 309 आसपास आहे. राईट्स शेअर्स Rs १०० कमी भावाने म्हणजे Rs २०७ प्रती शेअर या भावाने मिळत आहेत. हे राईट्स शेअर्स तुमच्याकडे १० शेअर्स असतील तर ३ राईट्स शेअर मिळणार. म्हणजे Rs ३०० चा फायदा १० शेअर्समध्ये विभागला जाईल.राईट्स इशू झाल्यानंतर शेअर्सची संख्या वाढते आणी शेअर पडतो. त्यामुळे हा राईट्स इशू फायदेशीर नाही.

 

सध्या रिस्क रिवार्ड रेशियो गुंतवणूकदारांच्या बाजूने नाही. कधी वाजंत्री थांबेल सांगता येत नाही. पैशाचा प्रवाह आहे. बाहेर सगळीकडे व्याजाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे  लोक इक्विटीकडे वळू लागले आहेत. लोकांचा कल सध्या शेअर्स विकण्याकडे नाही किंवा खरेदी करण्याकडेही नाही. पण निफ्टी ९००० होईल अशी चाहूल लागली आहे म्हणून आहे त्याच पातळीवर मार्केट झोके घेत आहे. पुढील ट्रिगरची मार्केट वाट पहाते आहे आपणही पाहु या.

 

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८३२५ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८७९३ वर बंद झाली.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ६ फेब्रुवारी २०१७ ते १० फेब्रुवारी २०१७- दिसतं तसं नसतं

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – १३ ते १७ फेब्रुवारी २०१७ – MAN OF THE MATCH ‘HDFC BANK’ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s