आठवड्याचे-समालोचन – १३ ते १७ फेब्रुवारी २०१७ – MAN OF THE MATCH ‘HDFC BANK’

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

mktandme-logo1.jpgया आठवड्यात मार्केटने (निफ्टी) ने ८९०० चा टप्पा गाठला. बँक निफ्टीने सुद्धा नवी पातळी गाठली. HDFC बँकेची मार्केट कॅप वाढली. त्यामुळे रिलायंसला मागे टाकत HDFC बँक २ रया क्रमांकावर पोहोचली. प्रथम क्रमांकावर टीसीएस आहे एवढे जरी असले तरी बाकीच्या शेअर्सनी RALLY मध्ये भाग घेतला नाही. HDFC बँकेची ओव्हर ऑल FII लिमिट (७४% ऑफ पेड अप कॅपिटल) ओलांडली त्यामुळे आता FPI (Foreign Portfolio Investor) हा शेअर खरेदी करू शकणार नाहीत. ही गोष्ट HDFC बँकेची जागतिक बाजारातील पत किती चांगली आहे हे दाखवते.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की सरकार आपले पब्लिक स्पेन्डिंग वाढवेल आणी करांमध्ये सवलती जाहीर करेल या त्यांच्या घोषणेनंतर USA मधील सर्व शेअर मार्केट निर्देशांक वधारले. त्याचबरोबर फेडने आपण लवकरच आपल्या व्याजदरात वाढ करू असे जाहीर केले. जगातील सर्व  निर्देशांकात वाढ झाली.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने असे सांगितले की विडी सोडून इतर सर्व तंबाखू आणी तंबाखूजन्य पदार्थांवर GST अंतर्गत जास्तीतजास्त म्हणजे २८%+ जादाचा सेस या दराने GST बसवावा. विड्यांवर मात्र सरकार १२% कर लावणार आहे.
 • केंद्रीय मंत्रीमंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्टेट बँकेच्या सबसिडीअरिज आणी महिला बँकेच्या मर्जरला मंजुरी दिली. स्टेट बँकेने सांगितले की हे मर्जर एप्रिल २०१७ च्या पहिल्या दोन आठवड्यात पुरे होण्याची शक्यता आहे.
 • सरकार आपला पब्लिक सेक्टर बँकांमधील स्टेक लवकरच डायव्हेस्ट करेल. यासाठी नियमांत काही बदल होण्याची शक्यता आहे.
 • सरकार POTASH वरची सबसिडी १७% ने कमी करणार आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

श्री अजय त्यागी यांची सेबीचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. ते १ मार्च २०१७ पासून आपला  कार्यभार  सांभाळतील.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • IIP (इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीअल प्रॉडक्शन) डिसेंबर २०१६ मध्ये -०.४% (नोव्हेंबर २०१६ ५.७ %) झाला, वस्तूंचे उत्पादन मागणी कमी झाल्यामुळे कमी झाले. या वेळी कॅपिटल गुड्स (-३%) आणी ग्राहकोपयोगी वस्तूंचे (-६.०८%) उत्पादन कमी झाले. डीमॉनेटायझेशनमुळे मागणी कमी झाल्यामुळे IIP मध्ये घट झाली.
 • CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) जानेवारी २०१७ मध्ये ३.१७% झाले. अन्नधान्य, भाजीपाला यांची महागाई कमी झाली. हाही डीमॉनेटायझेशनचाच परिणाम म्हणावा का ?
 • WPI (WHOLESALE PRICE INDEX) ३.३९% वरून ५.२५ % झाला, गेल्या चार महिन्यातील या निर्देशांकातील ही पहिलीच वाढ आहे. इंधनाच्या किंमतीत सगळ्यात जास्त वाढ झाली
 • भारताच्या प्रगतीचे लक्ष्य ७.५ % वरून ६.५% ते ६.७५%पर्यंत कमी करण्यात आले.
 • जानेवारी २०१७ या महिन्यासाठी आलेल्या ट्रेड डेटाप्रमाणे भारताची निर्यात सतत पाचव्या महिन्यात वाढली. USA, युरोपिअन युनियन आणी जपान या देशातील मागणी वाढल्यामुळे निर्यात वाढली. जानेवारीमध्ये निर्यात US$२२.१ बिलियन तर आयात US$ ३१.९ बिलियन झाली. अशा प्रकारे US $ ९.८ बिलियन ची व्यापारी तूट राहिली. क्रूडच्या आयातीमध्ये ६१% वाढ झाली.
 • आयडिया सेल्युलर, आणी भेल हे दोन शेअर्स ३१ मार्च २०१७ पासून निफ्टीतून बाहेर पडतील आणी IOC आणी इंडियाबुल्स फायनान्स या कंपन्या निफ्टीमध्ये सामील होतील.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • MAX व्हेंचर्स त्यांचा MAX स्पेशालिटी फिल्म मधील ४९% स्टेक जपानी कंपनीला विकणार आहेत.
 • टाटाचा गोंधळ संपल्यावर आता इन्फोसिसमधील संस्थापक त्रयी आणी व्यवस्थापन यांच्यात  कलगी तुरा सुरु झाला. वर्तमानपत्राची पानेच्यापाने भरून कंपनीला प्रसिद्धी मिळाली आता ही इष्ट की अनिष्ट हे आपणच ठरवायचे.
 • या आठवड्यात BEML, SJVN, HPCL, MMTC, अडाणी पोर्ट, वेदांत, नाटको फार्मा, फोर्टिस हेल्थकेअर. सद्भभाव इंजीनीअर्स, मदरसन सुमी, AIA इंजीनीअर्स, हिंदाल्को, NMDC, NBCC, ब्रिटानिया, इंफिबीम, KEI इंडस्ट्रीज, नेक्टर लाईफ सायंसेस या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • पेट्रोनेट एल एन जी, DLF, HDIL, प्रेस्टीज इस्टेट या कंपन्यांचे तिमाही निकाल असमाधानकारक होते
 • GVK इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या कन्सोर्शियमला नवी मुंबई विमानतळाचे CONTRACT मिळाले.
 • कॅनरा बँकेने आपला कॅनफिना होम्स मधील स्टेक विकण्यासाठी मर्चंट बंकर्सची नियुक्ती केली.
 • कॅडिला हेल्थकेअर या कंपनीच्या मोरेय्या उत्पादन युनिट साठी USFDA ने फोरम नो. ४८३ इशू केला नाही. कंपनीची पुष्कळ उत्पादने याच उत्पादन युनिट्मधून उत्पादन केली जातात.
 • PNB आपले नॉनकोअर ASSETS आपले कॅपिटल वाढवण्यासाठी विकणार आहे.
 • बायोकॉन या कंपनीच्या प्रस्तावित ‘बायोसिमिलर’ला USFDA ने मान्यता दिली.
 • रुची सोया या कंपनीने पतंजली या कंपनीबरोबर ३ वर्षासाठी करार केला.
 • बजाज ऑटो या कंपनीने आपण BS4 नॉर्म्स साठी सज्ज आहोत असे सांगितले.
 • MCX हे कमोडीटी EXCHANGE सिंगापूर डायमंड इन्व्हेस्टमेंट EXCHANGE बरोबर करार करणार आहे MCX लवकरच डायमंड CONTRAT लॉनच करणार आहे.
 • टाटा मोटर्स या कंपनीचा तिमाही निकाल खुच असमाधानकारक आला. प्रवासी वाहनांच्या व्यापारामध्ये बर्यापैकी प्रगती असली तरी कमर्शियल वाहनांचा व्यापार सुधारणे जरुरीचे आहे. हेजिंग पॉलिसीमुळे तोटा वाढला आहे असे दिसते. व्यवस्थापनाने दिलेला भविष्यासाठी गायडंसही आशादायक नाही.
 • HAVELLS ही कंपनी Lloyds इलेक्ट्रिक या कंपनीचा कन्झ्युमर ड्यूरेबल्सचा बिझिनेस खरेदी करण्याच्या विचारात आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • कॉनकॉर या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने १:४ या प्रमाणात बोनस जाहीर केला. तुमच्याजवळ ४ शेअर्स असतील तर तुम्हाला १ शेअर बोनस मिळेल.
 • टीसीएस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने शेअर्स ‘BUY BACK ‘ वर विचार करण्यासाठी २० फेब्रुवारी २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे. या पाठोपाठ इन्फोसिस, विप्रो, HCL TECH या कंपन्या शेअर ‘BUY BACK’ जाहीर करतील असा गुंतवणूकदारांचा होरा आहे.
 • SJVN या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने प्रती शेअर Rs २.२५ अंतरिम लाभांश जाहीर केला. या शेअरर्ची किंमत आता Rs ३४ च्या आसपास आहे म्हणजे हा लाभांश ६.७५% झाला. या लाभांशावर आयकर लागत नाही. त्यामुळे तुम्हाला १ महिन्यात तुमच्या गुंतवणुकीवर ७.५ % एवढा रिटर्न मिळतो. हा लाभांश अंतरिम असल्याने १ महिन्याच्या  आंत तुमच्या बचत खात्याला जमा होतो.
 • REC (RURAL ELECTRIFICATION CORPORATION) या कंपनीने Rs ७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला आहे. याची रेकोर्ड डेट २८ फेब्रुवारी २०१७ आहे.
 • सरकार त्यांचा BEL मधील ५%स्टेक संस्थागत गुंतवणूकदारांना विकणार आहे.
 • नाल्कोमधील आपला १०% स्टेक OFS च्या माध्यमातून डायव्हेस्ट करणार आहे. यासाठी EDELWEISS ची बंकर म्हणून नियुक्ती केली आहे.
 • सरकार आपला ‘IRCON’मधील १०% स्टेक IPO द्वारा ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत विकणार आहे.
 • सुंदरम फायनान्समध्ये इन्शुरन्स, ब्रोकिंग, इनफ्रेट लोंजिस्टिकचा विलय होईल. नंतर सुंदरम फायनान्स इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे लिस्टिंग होईल. मर्जर झाल्यावर १:१ शेअर फ्री मिळेल.
 • J &K बँक जम्मू आणी काश्मीर सरकार बरोबर ARC बनवणार आहे. या कम्पनीचे भांडवल Rs १०० कोटी असेल. J &K  सरकारचा स्टेक  ५१% असेल. J & K बँकेच्या NPA मध्ये सुधारणा व्हावी हा हेतू आहे.

मार्केटने काय शिकवले

सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूमधील AIDMK ची सर्वे सर्वा असलेल्या शशीकलाच्या विरोधात निकाल दिला.  तिला ४ वर्ष जेलमध्ये पाठवले. तुम्ही म्हणाल ही घटना पूर्णपणे राजकीय आहे त्याचा शेअरमार्केटशी काय संबंध? शेअरमार्केटवर लहानातल्या लहान घटनेचा परिणाम होतो. कोणत्याही प्रकारची अस्थिरता (राजकीय आर्थिक अगदी सामाजिकसुद्धा) शेअरमार्केटला अपायकारक असते. कारण गुंतवणूकदार आपापल्या परीने या अस्थिरतेच्या परिणामांचा विचार करून खरेदी किंवा विक्री करायला सुरुवात करतात. म्हणजेच ही अस्थिरता हळू हळू शेअरमार्केटमध्ये दाखल होते. या घटनेचा त्वरीत परिणाम म्हणजे सन टी व्ही  आणि राज टी  व्ही चा शेअर वधारला.

सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेश, पंजाब गोवा उत्तराखंड या राज्यातील निवडणुकांच्या निकालाकडे आहे. पंजाब गोवा. उत्तराखंड राज्यातील मतदान पूर्ण झाले आहे

तर उत्तर प्रदेशातील मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत या निवडणुकीत मायावतीचे सरकार आले तर JP असोसिएशट, JP  इन्फ्रा, JP पॉवर या कंपन्यांना फायदा होईल असे ट्रेडर्सना वाटले असावे त्यामुळे हे शेअर्स वधारले. मार्केटमध्ये डीस्ट्रीब्युशन आढळते आहे अशावेळी प्रॉफीट बुकिंग करणे योग्य आहे. सध्या स्माल कॅप आणि  मिड कॅप ची rally सुरु आहे. त्याकडे लक्ष ठेवा. २०% ते २५% गुंतवणूक काढून घेवून कॅशमध्ये रहा. म्हणजे चांगली संधी आल्यास चांगल्या शेअर्समध्ये कमी पैशात गुंतवणूक करता येईल भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. ग्लोबल शेअर्समध्ये गुंतवणूक करताना जास्त काळजी घेणे जरुरीचे आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २८४६८ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८२१ वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे-समालोचन – १३ ते १७ फेब्रुवारी २०१७ – MAN OF THE MATCH ‘HDFC BANK’

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २० फेब्रुवारी २०१७ ती २४ फेब्रुवारी २०१७ – जीओ(JIO)और जिने दो | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s