अब की बार निफ्टी दस हजार – १३ मार्च ते १७ मार्च २०१७ – आठवड्याचे समालोचन

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC – wikipedia

कोणत्याही सुधारणा करत असताना BJP ला (भारतीय जनता पार्टीला) राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे बिल पास होत नव्हते आता UP मध्ये बहुमताने निवडून आल्यामुळे राज्यसभेतील संख्याबळ वाढेल. कोणत्याही सुधारणांसाठी मार्ग मोकळा होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सुधारणा वेग पकडतील अशी आशा आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणी मणिपूर येथे BJP ची सरकारे स्थापन झाली. राजकारणात स्थैर्य आले. त्यामुळे निफ्टी आणी सेन्सेक्सने उच्चांक प्रस्थापित केला. आता भारतात राजकीय स्थिरता आल्यामुळे परदेशातूनही गुंतवणुकीचा ओघ वाढला. निफ्टी १०००० ची पातळी गाठेल अशी गुंतवणूकदारांना आशा वाटू लागली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • फेडने आपल्या बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये ०.२५% ने वाढ केली. USA ची सुधारती अर्थव्यवस्था, वाढते ‘जॉब गेन्स’ आणी २% च्या आसपास राहणारी महागाई यामुळे फेड ने हे रेट वाढवले. एवढेच नाहीतर २०१७ ते १८ या वर्षात आणखी तीनवेळा आणी २०१८-२०१९ या वर्षात तीनदा वाढ केली जाईल असे घोषित केले. मात्र ही वाढ हळू हळू केली जाईल असे सांगितले.
 • UK च्या पंतप्रधान थेरेसा मे यांना EU शी ब्रेक्झीट साठी वाटाघाटी करायला UKच्या दोन्ही सदनानी मंजुरी दिली.
 • चीनने SUBSTANDARD स्टील उत्पादनात १० कोटी टन कपात केली. चीनची स्टीलची निर्यात १२ कोटी टनांवरून ६ कोटी टन झाली.
 • वेदांताचे अनिल अगरवाल हे UK मधील अंग्लो अमेरिकन PLC मध्ये १३% स्टेक US $ २.४ बिलियन ला खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. ही कंपनी PLATINUM, हिरे, इतर बेस मेटल्स आणी खनिजे यांचाही बिझिनेस करते. हिरे उद्योगाचे केंद्र DEE BEERS (हिरे शोधणे, त्यांचे मायनिंग आणी विक्री करते) याच कंपनीच्या मालकीचे आहे.

सरकारी अनौंसमेंट

 • तामिळनाडू पेट्रो आणी निरमा या कंपन्यांनी डीटरजंटमध्ये जे केमिकल वापरले जाते त्याचे डम्पिंग चालू आहे याबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे या केमिकल्सवर सरकारने ANTI DUMPING ड्युटी लावली.
 • अल्युमिनियम फॉईल वर ANTI DUMPING लावण्याचा सरकार विचार करत आहे.
 • कर्नाटक सरकारने दारूवरील VAT (VALUE ADDED TAX) रद्द केला. वाईन, बियर, हार्ड लिकर वरील VAT रद्द केला. कर १२% वरून १८% वर नेला होता हा अतिरिक्त करही रद्द केला.
 • महाराष्ट्र राज्य सरकार पॉवर कंपन्यांना Rs ३००० कोटींचे कर्ज देईल.
 • सरकारने क्लीन गंगा प्रोजेक्ट साठी Rs १९०० कोटी मंजूर केले. याचा फायदा ITD सिमेंटेशन, व्हाटेक वाबाग यांना होईल.
 • VIRTUAL करन्सी (उदा. बीटकॅईन) रेग्युलेट करण्यासाठी एक कमिटी नेमली आहे. ही कमिटी यावरती अहवाल तीन महिन्यात सादर करील.
 • सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेखाली सरकारी हॉस्पिटल्समध्ये इलाज फुकट होतील असे सांगितले. सरकारने कोलबेड मिथेन GAS ची किंमत ठरवण्याचा अधिकार उत्पादकांना दिला.
 • देशभरात बायोटॉयलेट लावले जाणार आहेत. याचे तंत्रज्ञान स्टोन इंडियाकडे आहे.
 • लॉजिस्टीक्सला इंफ्राचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे. ज्या कंपन्या वेअरहाउस, कोल्ड स्टोअरेजच्या क्षेत्रात काम करतात त्यांना फायदा होईल.
 • चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाने आपल्या कक्षेत येणारे सर्व हायवेज जिल्हा रोड म्हणून जाहीर केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे मद्यार्कासंबंधीचे निर्णय या रोडला लागू होणार नाही.
 • डीमटेरिअलाईझड शेअर्सच्या तारणावर Rs २० लाखापर्यंत कर्ज निळू शकेल.
 • ITAT(INCOME TAX APPELLATE TRIBUNAL) ने UK मधील CAIRN ENERGY PLC या कंपनीला Rs १०,००० कोटी कॅपिटल गेन्स कर भरावयास सांगितला आहे. याच प्रश्नावर कंपनी आणी भारत सरकार यात आरबीट्रेशन प्रोसीडिंग सिंगापूरमध्ये सुरु आहेत.
 • सरकार युनायटेड बँकेत Rs ४१८ कोटी गुंतवणार आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • भारताच्या निर्यातीमध्ये २७.४८% वाढ होऊन ती फेब्रुवारी २०१७ मध्ये US $ २४.५ बिलियन झाली. परंतु आयात २१%ने वाढून US $ ३३.३ बिलियन झाली. निर्यातीमध्ये इंजिनीअरिंग गुड्समध्ये तर आयातीमध्ये सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय वाढ झाली. या उलट ट्रेड डेफिसिट US ४ ८.८ बिलियन झाली.
 • किरकोळ महागाई फेब्रुवारी २०१७ साठी (RPI) ३.६५ % झाली. (जानेवारी २०१७ मध्ये ३.१७%) घाऊक महागाई निर्देशांक (WPI)फेब्रुवारी २०१७ मध्ये वाढून ६.५५ झाला. (जानेवारी २०१७ मध्ये ५.२५% होता) अन्न धन्य फळफळावळ तसेच डाळी जानेवारी २०१७ च्या तुलनेत महाग झाल्यामुळे मुख्यतः ही महागाई झाली
 • IIP चे आकडे सुधारले. जानेवारी २०१७ मध्ये IIP २.७% झाला. कॅपिटल गुड्स आणी MANUFACTURING मध्ये वाढ झाली.
 • रुपयाचा USA $ मधील विनिमय दर १६ महिन्याच्या उच्चतम स्तरावर होता.
 • ‘सेन्सेक्स 50’ हा नवीन निर्देशांक BSE वर सुरु झाला आहे. याचे मार्केट कव्हरेज ६५% आहे. यात मोठ्या आणी लिक्विड कंपन्यांचा समावेश आहे. लॉट साईज ७५ आहे. मंगळवार १४ मार्च २०१७ पासून यात ट्रेडिंग सुरु झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सेंच्युरी टेक्स्टाईलचे अनेक उद्योग आहेत. त्यात कपडा, सिमेंट कागद अशा उद्योगांचा समावेश आहे. यापैकी पेपर उद्योग एखाद्या पेपर कंपनीच्या व्यवसायापेक्षा मोठा आहे. हा व्यवसाय Rs ६००० कोटींना विकण्याच्या विचारात आहे. यामुळे कंपनी DEBT FREE होईल. यालाच VALUE UNLOCKING असे म्हणतात. सेंच्युरी टेक्स्टाईलमध्ये सेंच्युरी इंकाचे मर्जर होणार आहे.
 • भारती एअरटेल ही कंपनी भारती इन्फ्राटेल या कंपनीचे ४० कोटी शेअर्स विकणार आहे.
 • उत्तर प्रदेशात आता BJP चे सरकार येणार असल्यामुळे ज्या कंपन्यांचे कामकाज उत्तर प्रदेशात आहे त्यांना फायदा होईल. उदा :- PNC इन्फ्राटेक
 • ग्लेनमार्कच्या अंकलेश्वर युनिटला USFDA ने क्लीन चीट दिली.
 • NHS स्कॉटलंड कडून विप्रोला १२ वर्षांसाठी ऑर्डर मिळाली.
 • सेन्ट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने टाटा केमिकल्सला त्यांचा हल्दिया प्लांट बंद करायला सांगितला.
 • सन फार्माच्या मोहाली युनिटला २०१३ पासून इम्पोर्ट ALERT जारी केला होता. हा ALERT दूर केला. सन फार्माच्या मालनपुर प्लांटच्या इन्स्पेक्शननंतर USFDA ने कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.
 • ALKEM LAB च्या बड्डी प्लांटसाठी USFDA ने इन्स्पेक्शन करून ३ त्रुटी जाहीर केल्या.
 • MYLAN ROCHE यांच्यात सेटलमेंट झाली त्याचा फायदा बायोकॉनला होईल.
 • वेगवेगळ्या कंपन्यांनी भरलेल्या ADVANCE TAXचे आकडे यायला सुरुवात झाली. यात येस बँक, स्टेट बँकेने गेल्या वेळेपेक्षा जास्त ADVANCE TAX  भरला आहे. आगाऊ भरलेल्या करावरून यावर्षीच्या कंपनीच्या नफ्याचा अंदाज बांधता येतो.
 • NBCC ला मॉरीशसकडून सुप्रीम कोर्टाची बिल्डींग बांधण्यासाठी कंत्राट मिळाले. NBCCने VIDC बरोबर Rs ६००० कोटींचा करार केला.
 • IOC लुब्रीझोल इंडियामधील २४% स्टेक लुब्रीझोल कॉर्पोरेशनला विकणार आहे. IOC च्या बरौनी प्लांटमध्ये सुधारणा (Rs १८७८ कोटींच्या) करण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
 • हेरीटेज फूड्स लवकरच आपले पशुआहार उत्पादन युनिट आंध्रप्रदेशमध्ये चालू करीत आहे.
 • रिलायंस कॅपिटल आपला रिटेल हेल्थकेअर बिझिनेस अलग करून त्याची अलग सबसिडीअरी कंपनी बनवणार आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • HCL Tech या IT क्षेत्रातील कंपनीने २० मार्च २०१७ रोजी शेअर्स ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे. कंपनी Rs ५३७७ कोटीचे शेअर्स ‘BUY BACK’ करू शकते.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकेला २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने वेगवेगळ्या रीतीने शेअर्स इशू करून (FPI, QIP, राईट्स इशू GDR आणी ADR) Rs १५००० कोटी उभारण्यास मान्यता दिली आहे.
 • COROMONDEL INTERNATIONAL ही मुरुगप्पा ग्रुपची कंपनी ‘नागार्जुना FERTILIZERS अंड CHEMICALS’ ही कंपनी Rs ३००० ते ३६०० कोटी ना खरेदी करण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांची उत्पादन युनिट्स काकिनाडा येथे असल्याने सिनर्जी आणी कॉस्टमध्ये बचत होईल.
 • CKP ग्रूप डायमंड पॉवर ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेली कंपनी विकत घेणार आहे. नवीन प्रोमोतर या कंपनीत Rs १२०० कोटी आणतील.
 • इंडस इंड बँक IL&FS ही ब्रोकरेज कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे.
 • MARATHON NEXTGEN REALTY या कंपनीने शेअर ‘BUY BACK वर विचार करण्यासाठी १७ मार्च रोजी बैठक बोलावली आहे
 • MPHASIS ने Rs ६३५ प्रती शेअर ‘BUY BACK’ जाहीर केला.
 • महिंद्र लाईफस्पेस ह्या कंपनीने राईट्स इशूवर विचार करण्यासाठी २० मार्च २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • ‘नक्षत्र वर्ल्ड’ IPO साठी गीतान्जली जेम्स या कंपनीने DRHP दाखल केले. या IPO द्वारा कंपनी Rs ४०० कोटी उभारणार आहे.
 • म्युझिक ब्रॉडकास्टिंगचा शेअर Rs 413 वर लिस्ट झाला. मात्र नंतर Rs 375 पर्यंत खाली आला.

मार्केटने काय शिकवले

शेअर मार्केटचं प्रशिक्षण चालू केल्यापासून माझ्याकडे आजकाल शेअर मार्केट शिकायला किंवा शिकण्याची चौकशी करायला बरेच लोकं येतात. त्यापैकी बऱ्याच जणांची तक्रार किंबहुना सारखीच असते – ‘माझे शेअरमार्केटमध्ये पैसे अडकले आहेत. काय करू समजत नाही’ किंवा  ‘दैव देते पण कर्म नेते अशी अवस्था झाली. फायदा होत होता पण आणखी फायदा होईल म्हणून थांबलो त्यानंतर २ वर्ष झाली पण माझा भाव आला नाही’.

अशी वेळ तुमच्यावर यायला नको असेल तर मार्केटकडे लक्ष द्या. ज्या शेअरमध्ये तुम्हाला अपेक्षित फायदा होत असेल तर तो वसूल करा किंवा मार्केटच्या भाषेत ‘घरी घेऊन या’. आपल्या पोर्टफोलिओमधून तेजीच्या मार्केटमध्ये वाढलेले ‘WEAK’ शेअर्स विकून टाकून कॅशमध्ये बसून रहा. ज्या बेळेला मार्केट पडेल त्यावेळी याच पैशातून तुम्हाला चांगले शेअर्स खरेदी करता येतील. ह्या तेजीचा उपयोग आपल्या पोर्टफोलिओमधील झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी करा. अश्या अजून काही क्लुप्त्या मी माझ्या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पुस्तक या website वरून विकत घेवू शकता – https://pothi.com/pothi/book/bhagyashree-phatak-market-aani-me-0

आता थोडे तांत्रिक विश्लेषणाविषयी सांगायचा प्रयत्न करते. मंगळवार तारीख १४ मार्च आणी बुधवार तारीख १५ मार्च हे दोन्ही दिवस मार्केटने ‘DOJI’ PATTERN फॉर्म केला. पण गुरुवार तारीख १६ मार्च रोजी तेजीचा ‘MARUBOZU’ PATTERN फॉर्म केला. हा जपानीज कॅण्डलस्टिक PATTER आहे. यामधे पूर्ण सेशन मार्केट एकाच दिशेने जात राहते.  “झुकणार नाही, वाकणार नाही, दिशा बदलणार नाही’ असा जणू मार्केटने निर्धार केलेला असतो. या pattern मध्ये ओपनिंग लो असते आणी क्लोजिंग हायला होते. म्हणजेच जणू खरेदी करणाऱ्यांनी शेअरच्या किंमतीवर ताबा मिळवलेला असतो. याला ‘WHITE MARUBOZU’ कॅण्डल  म्हणतात. ‘BLACK MARUBOZU’ च्या वेळी ओपनिंग प्राईस हीच हाय प्राईस असते आणी कमीतकमी किंमतीला मार्केट क्लोज होते. शेअर्स विकणार्यांच्या हातात कंट्रोल असते. अपट्रेंडच्या शेवटी ‘WHITE MARUBOZU’ फॉर्म झाल्यास अपट्रेंड सुरु राहतो. पण DOWN TREND च्या शेवटी फॉर्म झाल्यास ट्रेंड बदलतो. ‘DOWN TREND’ च्या शेवटी BLACK MARUBOZU फॉर्म झाल्यास DOWN ट्रेंड सुरु राहतो आणी अपट्रेंडच्या शेवटी झाल्यास ट्रेंड बदलतो. अशा प्रकारे ट्रेंडबद्दल चे आडाखे या PATTERNवरून मिळू शकतात.

९२१८ चे निफ्टीवर फक्त दर्शन झाले. ९२०० चे शिखर सर झाले. तेथून मार्केट पुन्हा खाली आले. सध्या तरी मार्केट पडण्यासाठी किंवा वाढण्यासाठी १ एप्रिलपर्यंत कोणतेही मोठे कारण दृष्टीपथात नाही. कारण निवडणुका आणी फेडची दरवाढ या दोन्ही घटना होवून गेलेल्या आहेत. आता येऊ घातलेल्या ADVANCE TAXच्या आकड्यांकडे लक्ष द्यावे आणी वार्षिक निकाल डोळ्यासमोर ठेवून शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा निर्णय घ्यावा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २९६४८ वर तर NSE निर्देशांक ९१६० वर बंद झाले

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “अब की बार निफ्टी दस हजार – १३ मार्च ते १७ मार्च २०१७ – आठवड्याचे समालोचन

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २० मार्च २०१७ ते २४ मार्च २०१७ – गुढीपाडवा हा आला, शेअरमार्केटचे पंचांग प

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s