आठवड्याचे समालोचन – हाजीर तो वजीर – २७ मार्च ते ३१ मार्च २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वेलकम २०१७-२०१८ आणी गुडबाय २०१६-१७ (दोन्ही आर्थिक वर्ष) असे म्हणण्याची वेळ आली आहे. नव्याचे स्वागत आणी जुन्याला निरोप हे निसर्गाचे चक्र आहे. पण एकंदरीत मार्केटच्या (प्रायमरी आणी सेकंडरी) दृष्टीने २०१६-१७ हे वर्ष चांगले गेले. मार्केट ‘तावून सुलाखून’ अनेक संकटांना तोंड देत नवे नवे उच्चांक गाठत राहिले, नवी नवी शिखरे गाठत राहिले. वाटेत आलेल्या ब्रेक्झीट, रेक्झीट, फेडची दरवाढ, डीमॉनेटायझेशन,USAची अध्यक्षीय निवडणूक, सात राज्यातील निवडणुका, GST, आणि अंदाजपत्रक यासारख्या अडथळयाना न जुमानता वाढत राहिले. त्याबरोबरच प्रायमरी मार्केटमध्येही न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दिला. जर चांगल्या कंपनीचा IPO असेल तरच गुंतवणूक करावी हेही सुचवले. नाहीतर तुम्ही एप्रिल फूल होऊ शकता. ज्या लोकांचा पैसा काही शेअर्समध्ये अडकून पडला होता त्यांना ते शेअर विकता आल्याने आनंद झाला.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

ओबामा केअरच्या जागी ट्रम्प यांनी आणलेली हेल्थकेअर योजना USA च्या सिनेट ने मंजूर केली नाही,  ओबामा यांनी पर्यावरण रक्षणाकरता जी बंधने विविध उद्योगांवर घातली होती ती सरकारने मागे घ्यावीत असा प्रयत्न ट्रम्प यांनी चालवला आहे. या सर्वांचा परिणाम USA च्या मार्केटवर दिसून आला. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने त्वरीत पूर्ण होऊ शकतील हा विश्वास हळू हळू का होईना डळमळीत होऊ लागला आहे.

UK च्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रेकझीट च्या वाटाघाटीना २८ मार्च रोजी सुरुवात केली. आता २८ मार्च २०१९ पर्यंत वाटाचाटी पूर्ण करून UK ला EU च्या बाहेर पडता येईल. तो पर्यंत UK  आता असलेल्या अधिकार आणी जबाबदाऱ्यांसकट EU मध्ये राहील.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने खाद्यतेलाच्या निर्यातीवरचे सर्व निर्बंध उठवले. याचा फायदा रुची सोया, बजाज कॉर्प आणी अडाणी एन्ट प्राईझेस यांना होईल.
 • १ एप्रिल २०१७ पासून ‘GAS’ च्या किंमती वाढणार आहेत.
 • कर्नाटक सरकारने लिकर आणी मूव्हीजवरचा VAT कमी केला.
 • सरकारने गहू आणी तूरडाळ यांच्यावर १० % इम्पोर्ट ड्युटी लावली.
 • बिहार राज्य सरकारने विजेचे दर ५५% ने वाढवले.
 • उत्तर प्रदेश सकट ५ राज्यांनी अनधिकृत कत्तलखान्यावर बंदी घातल्यामुळे venky’s चा फायदा झाला.
 • सोमवारी लोकसभेत GST बिल मंजूर झाले.
 • NPA या बँकांना सतावणाऱ्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केंद्र सरकार लवकरच आपले धोरण जाहीर करेल
 • पण सरकार सरकारी बँकांना भांडवल पुरवण्याशिवाय आणखी कोणत्याही प्रकारची मदत करण्याची शक्यता कमी आहे.
 • सरकारने PPF, किसान विकास पत्र, NSC या सर्वावरील व्याजाचे दर एप्रिल-जून २०१७ या तिमाहीसाठी ०.१०% ने कमी केले.
 • सरकार Organic food निर्यातीसाठी मदत करणार आहे. थायलंडमध्ये तांदुळाच्या किमती US $ २ ते US $ ४ एवढ्या वाढल्या आहेत. त्याच बरोबर यावर्षी पाउस यथातथाच असेल असे भाकीत केले जात आहे. एका वर्षी १०००० टन तांदूळ निर्यात करता येईल असे यावर्षी कोणतेही बंधन राहणार नाही.
 • युरिआ कंपन्यांना जास्त सबसिडी देण्याचा सरकार विचार करत आहे. युरिआ आयात करून स्वस्त पडत असल्याने भारतातील कंपन्या स्पर्धा करू शकत नाही. युरिआ कंपन्यांना पॉवर सप्लायचा प्रश्न असल्यामुळे या कंपन्या gas बेस्ड करण्याच्या विचारात सरकार आहे.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सेबीने २००७ च्या एका केसमध्ये रिलायंस आणी इतर १२ कंपन्यांवर वायदा बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली. त्याचबरोबर रिलायंस इंडस्ट्रीज वर Rs ४४७ कोटींचा दंड लावला आणी हा दंड ४५ दिवसात भरायला सांगितला.
 • सुप्रीम कोर्टाने BS III वाहनाच्या उत्पादनावर, विक्री आणी रजिस्ट्रेशन वर बंदी घातली. १ एप्रिल २०१७ पासून BSIV नॉर्म्स लागू केले. या सुप्रीम कोटाच्या निर्णयाचे  परिणाम दुचाकी वाहन आणी कमर्शियल वाहने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर होईल उदा :-. हिरो मोटो, अशोक LEYLAND,  परंतु मारुती आणी बजाज ऑटो यांनी या निर्णयाचा आमच्या कंपनीवर फारसा परिणाम होणार नाही असे जाहीर केले. सुप्रीम कोर्टाने सांगितले की नफातोटा यापेक्षा पर्यावरण दुषित झाल्यामुळे होणारे परिणाम जास्त महत्वाचे आहेत. शिवाय BS IV नॉर्म्स लागू व्हायची तारीख १ वर्षापासून कळवली होती.
 • कोल इंडिया या सरकारी कंपनीवर CCI ने लावलेला Rs १७७३ कोटी दंड कमी करून Rs ५९१ कोटी केला.
 • NGT (NATIONAL GREEN TRIBUNAL) ने BSI आणी BS II ट्रक्सना दिल्लीमध्ये प्रवेशबंदी केली.
 • ONGC ला गुजरात आणी आसाममध्ये ऑईल आणी GAS साठी ड्रिलिंग करण्याची पर्यावरणाची मंजुरी मिळाली आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • DIVI’s LABच्या विशाखापट्टणम येथील उत्पादन युनिटसाठी USFDA ने जाहीर केलेला इम्पोर्ट अलर्ट विषयी आम्हाला काही पूर्वसुचना दिली गेली नव्हती असे कंपनीने सांगितले. आम्ही या प्लांटमधून ३२% निर्यात USA ला करतो. आम्ही लवकरच USFDA ने सांगितलेली उपाययोजना करू असे कंपनीने सांगितले. तसेच आम्ही या इम्पोर्ट अलर्टला ३१ मार्च पर्यंत उत्तर देऊ असे सांगितले.
 • कोटक बँकेने आपली ८११ ही नवीन डिजिटल बँकिंग योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत आधार कार्ड आणी PAN कार्ड यांच्या आधारे तुम्हाला घरबसल्या खाते उघडता येईल. कोटक बँकेची वर्तमान ग्राहक संख्या १ वर्षात दुप्पट करण्याचा संकल्प आहे.
 • UCO बँकेत सरकार Rs ११५० कोटी भांडवल जमा करणार आहे.
 • स्टेट बँकेने जाहीर केले की तिच्या पांच सबसिडीअरी आणी महिला बँकेचे मर्जर पूर्ण झाले आहे. तसेच SBI लाईफ मधील आपला १०% स्टेक स्टेट बँक विकणार आहे.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • कोचीन शिपयार्डने IPO साठी DRHP दाखल केले.
 • एसबींआय लाईफ लवकरच IPO आणण्याची तयारी करत आहे.
 • मार्च ३१ २०१७ रोजी शिक्षण क्षेत्रातील CL EDUCATE या कंपनीचे Rs ४०० वर लिस्टिंग झाले. या कंपनीने IPO मध्ये Rs ५०२ ला शेअर दिले होते.

कॉर्पोरेट एक्शन

 • वेदान्ता या कंपनीने Rs १७.७० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. याची रेकोर्ड डेट १२ एप्रिल २०१७ आहे
 • ORACLE Financial सर्विसेस या कंपनीने Rs १७० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला याची रेकोर्ड डेट २० एप्रिल आहे.
 • टाटा ग्लोबल बीव्हरेजीस आणी टाटा कॉफी या कंपन्यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे.
 • पंजाब आणी सिंध बँक PNB मध्ये मर्ज होण्याची शक्यता आहे

मार्केटने काय शिकवले

सरकारी धोरणामध्ये जेव्हा वेगवेगळे बदल वारंवार होत असतात तेव्हा त्या बदलांचा परिणाम कोणत्या कंपन्यांवर होईल, त्या कंपन्यांचे शेअर्स लिक्विड आहेत का? कोणत्या शेअरमध्ये वाढ होईल कोणत्या शेअरवर वाईट परिणाम होईल त्याप्रमाणे पटकन खरेदीविक्रीचा निर्णय घेतल्यास फायद्याचे प्रमाण वाढते. कारण काही शेअर्स असे मिळतात की जिकडे कोणाचे लक्ष गेलेले नसते. त्यामुळे शेअर्स स्वस्त असतात. त्यामुळे हाजीर तो वजीर हेच खरे !

मार्केटमध्ये शेअर्सचे भाव खूप वाढले आहेत त्यामुळे एकंदरीतच मार्केट महाग झाले आहे. सेक्टर रोटेशन बरोबर हीच गोष्ट दाखवते आहे. संगीत खुर्ची चालू आहे, कधी संगीत बंद होईल सांगता येत नाही. वेळेवर प्रॉफीट बुकिंग करा नंतर स्वतःच्या चुकीचे खापर मार्केटवर फोडू नका. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य तो निर्णय घेणे फायद्याचे असते.

BSE निदेशांक सेन्सेक्स २९६२० तर NSE निर्देशांक निफ्टी ९१७३ वर बंद झाले.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

4 thoughts on “आठवड्याचे समालोचन – हाजीर तो वजीर – २७ मार्च ते ३१ मार्च २०१७

 1. Sachin shinde

  Madam …
  Tumchya blog varil upyukt mahitimule trading karne khup sope zhale…aatvdyache samalochan vachun pudil disha tharvne khup sope jate..agdi sadya v sopya bhashet lihlela tumcha majkur kharokar khup chhan asto..Market madlya ghadamodi agdi sopya bhashet sangnyache tumche skill khup chhan aahe…Tumchya ya karyala khup khup shubbechyaa…

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – गंगा आली रे अंगणी – ३ एप्रिल २०१७ ते ७ एप्रिल २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s