आठवड्याचे समालोचन – गंगा आली रे अंगणी – ३ एप्रिल २०१७ ते ७ एप्रिल २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या मार्केटमध्ये मज्जाच मज्जा चालू आहे. रोजचीच दिवाळी चालू आहे. मार्केटमध्ये भरपूर पैसा येतो आहे.

कोणत्याही बातमीमुळे मार्केटमध्ये काही काळ मंदी येते. पण लगेच खरेदी होते आणी मार्केट सुधारते. मोदी सरकारचा रीफॉर्म्सवर जोर दिसतो आहे. सरकार रीफॉर्म्स करीत आहे त्याबरोबरच ज्या कंपन्या त्यांचे प्रोजेक्ट वेळेच्या आधी पूर्ण करीत आहेत त्यांना बोनस देऊन उत्तेजन देत आहे. रोज नव्या नव्या बातम्या येत आहेत. पण ही बातमी खरी किती? खोटी किती? हे न पाहता त्या बातमीच्या संबंधीत शेअर्स १०% पर्यंत वाढतात. म्हणजेच जेवणाचे आमंत्रण येताच लोक ढेकर देतात तसं काहीतरी..

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे विमानाला उपयोगी असणाऱ्या इंधनाचे भाव कमी झाले. याचा फायदा विमानवाहतूक करणाऱ्या कंपन्याना होईल.
 • सिरीयामध्ये झालेल्या GAS हल्ल्याच्या विरोधात USA ने सिरीयावर ५९ मिसाईल्सचा भडीमार केला. यामुळे मध्यपूर्वेत भौगोलिक आणी राजकीय ताणतणाव निर्माण झाले.. सिरीयाची क्रूड उत्पादनाची क्षमता प्रतिदिन ३०००० BARREL आहे त्यामुळे क्रुडऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम होईल या भीतीने क्रुडचे भाव वाढले.
 • USAने असा निर्णय घेतला की आता एन्ट्रीस्तरावरील जॉबसाठी H1B व्हिसा दिले जाणार नाहीत. ज्या जॉबमध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करायच्या असतील किंवा काही महत्वाचे निर्णय घ्यावयाचे असतील अशा जॉबसाठीच H1B व्हिसा देण्यात येतील.
 • एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारताच्या इकॉनॉमीमध्ये FY २०१७-१८ मध्ये ७.४% तर २०१८-१९ मध्ये ७.६% ने वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला.
 • बाल्टिक ड्राय निर्देशांकाने १२००चा स्तर पार केला. २८% ने वाढला हा निर्देशांक शिपिंग कंपन्यांच्या शिपिंग फ्रेट साठी वापरतात.

सरकारी अन्नौंसमेंट

 • भारत सरकारने आपल्या व्हीसाच्या नियमात बदल केले आहेत. जे भारतात पर्यटनासाठी येतात ते आता २ महिने राहू शकतील. जे वैद्यकीय इलाज करण्यासाठी भारतात येतात त्यांनाही काही सवलती दिल्या आहेत.
 • मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवे स्टील धोरण जाहीर करण्याचा निर्णय झाला.
 • GST संबंधीत चारही प्रस्ताव कोणत्याही दुरुस्तीशिवाय सदनाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. आता विविध राज्य सरकारांच्या विधानसभा आणी विधानपरिषदेत हे प्रस्ताव मंजूर होणे जरुरीचे आहे. GST कौन्सिलमध्ये सर्व राज्यसरकारांचे या प्रस्तावाच्या बाबतीत एकमत झाले असल्यामुळे यात काही अडचण येईल असे वाटत नाही. माननीय अर्थमंत्र्यांनी जुलै १ २०१७ पासून ठरल्याप्रामाने GST सर्व देशात लागू करता येईल अशी आशा व्यक्त केली.
 • नाबार्ड आपले भाग भांडवल Rs ५००० कोटींवरून Rs ३०००० कोटी करणार आहेत यासाठी संशोधन बिल लोकसभेत प्रस्तावित केले.
 • अफोर्डेबल हौसिंगला इंफ्राचा दर्जा दिला.
 • मंत्रिमंडळाने नवीन रेल डेव्हलपमेंट AUTHORITY स्थापन करण्यास मंजुरी दिली. ही AUTHORITY  रेल्वेचे प्रवासी आणी मालवाहतुकीचे भाडे ठरवेल. आणी रेल्वेच्या विकासाकडे लक्ष देईल.
 • सरकारने पॉवर कंपन्यांना LNG साठी जी सबसिडी दिली जात असे ती बंद केली.
 • सरकार वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना सवलती देण्याच्या विचारात आहे. या प्रकारामध्ये पॉली मेडीक्युंअर, इंद्रप्रस्थ मेडिकल, BPL, ऑपटो सर्किट या कंपन्या येतात. या सवलती व्याजदरात सूट, स्वस्त दरात वीज, नवीन प्लांट लावणे, जुन्या प्लांटचा विस्तार आणी नुतनीकरण करणे, निर्यातीवर सवलत या स्वरूपात असतील.
 • आता ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल डीझेल यांच्या दरांचा दैनिक आढावा घेऊन प्रत्येक दिवशीसाठी पेट्रोल आणी डीझेलची किंमत ठरवू शकतील.
 • सरकारने १२ जून २०१७ पर्यंत ५ लाख मेट्रिक टन RAW शुगर ड्युटी फ्री आयात करण्याची परवानगी दिली.

RBI सेबी आणी इतर प्रशासकीय संस्था

 • RBI ने आपली तिमाही वित्तीय पॉलिसी ६ मार्च २०१७ रोजी जाहीर केली. RBI ने रिव्हर्स रेपो रेट (हा रेट RBI कडे बँकांच्या असलेल्या पैशावर दिला जातो.) ०.२५% ने वाढवून ६% केला. RBI ने आशा व्यक्त केली की यामुळे बंकांजवळ असलेल्या जादा लीक्विडीटीवर फरक पडेल. RBI गव्हर्नरनी पुन्हा एकदा बँकांना सांगितले की त्यांनी रेटकटचा १००% फायदा कर्जदारांना दिला नाही. अर्थव्यवस्थेच्या भावी प्रगतीबद्दल आशादायी मत व्यक्त केले. त्यांनी यासाठी युद्धपातळीवर केलेले रीमॉनेटायझेशन, GST  देशभर लागू होणे, तसेच बँकांनी कर्जावरील व्याजाचे कमी केलेले दर ही कारणे दिली. किरकोळ महागाई निर्देशांक एप्रिल-सप्टेंबर तिमाहीत ४.५% तर उरलेल्या २०१७-२०१८ या वर्षात तो ५% राहील असे वर्तवले. कर्जमाफीबद्दल RBI ने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे क्रेडीट क्षेत्रातील शिस्त बिघडते आणी कर्ज परतफेड करण्याची प्रवृत्ती कमी होते असे मत व्यक्त केले. बँकांना REITs  (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) आणी InVITs (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) या मध्ये  गुंतवणूक करू देण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला.
 • TRAI (TELECOM REGULATORY AUTHORITY OF INDIA) ने रिलायंस जीओला आपली ‘SUMMER SURPLUS’ ही योजना मागे घ्यायला सांगितली. या योजनेप्रमाणे जे लोक १५ एप्रिल पर्यंत इनिशिअल फी भरतील त्यांना तीन महिने फ्री सर्व्हिस दिली जाणार होती. यामुळे इतर टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्याना दिलासा मिळेल.
 • IRDA ने एडेलवेईस या कंपनीचा विमा कंपनी काढण्यासाठीचा अर्ज स्वीकारला.
 • सरकारने स्पष्ट केले आहे की Rs २००००० च्यावर रोखीने व्यवहार करता येणार नाही पण ही Rs २००००० प्रती दिवसाची मर्यादा राष्ट्रीयीकृत, खाजगी किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस यात रोख रक्कम भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी लागू होणार नाही.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या काळात इंडोको रेमिडीजच्या गोवा युनिटची USFDA ने तपासणी करून काही त्रुटी नोंदविल्या.
 • सुप्रीम कोर्टाने BS III वाहने ३१ मार्च २०१७ नंतर रजिस्टर केली जाणार नाहीत असा निर्णय जाहीर केल्यामुळे आपल्याजवळील वाहनाचा साठा विकून टाकण्यासाठी ऑटो कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर सूट जाहीर केली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे ऑटो कंपन्यांनी आपला वाहनांचा शिलकी साठा हा हा म्हणता निकालात काढला.
 • डेल्टा कॉर्प या कंपनीने त्यांचे बिझिनेस मोडेल बदलले. ऑफ लाईन आणी ऑन लाईन या दोन्ही प्रकाराने व्यवसाय सुरु केला.
 • ILFS TRANSPORT या कंपनीने ९ किलोमीटरचा बोगदा ५ वर्षात पुरा केला. प्रोजेक्ट कॉस्ट ३७५० कोटी होती. या पुढे १५ वर्षे कंपनीला दरवर्षी Rs ६३५ कोटी मिळत राहतील.
 • भेलने ५०० MW प्लांट उत्तर प्रदेशात कमिशन केला.
 • रिलायंस कॅपिटल आता कन्झ्युमर फायनान्सिंगच्या व्यवसायात उतरणार आहे. तसेच कंपनी ‘प्राईम फोकस’ या कंपनीतील ३३% स्टेक विकणार आहे.
 • KEC INTERNATIONAL या कंपनीला Rs १७८१ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने सर्व खाणीमधून निघणाऱ्या कोळशाची ग्रेड कमी केली त्यामुळे कोळशाचे भाव कमी होतील. कोल इंडियाचे उत्पन्न Rs ८००० कोटींनी कमी होईल.
 • प्रीमिअर एकस्प्लोझीवज या कंपनीला आंध्र प्रदेश सरकारने २०० एकर जमीन दिली.
 • पी व्ही सी च्या किंमती भारत आणी चीनमध्ये कमी झाल्या आहेत याचा फायदा PACKAGING कंपन्यांना होईल.
 • इमामी अग्रोमार्फत इमामी ग्रूप खाद्य तेलाचा नवा BRAND बाजारात आणत आहे. हल्दिया, कांडला, जयपूर येथे उत्पादन करणार. अमिताभ बच्चन बरोबर मार्केटिंगसाठी करार केला आहे.
 • IVORY COAST या देशातून टाटा मोटर्सला ५०० बससाठी ऑर्डर मिळाली. या प्रोजेक्टचे फायनान्सिंग EXIM बँक करणार आहे.टाटा मोटर्सच्या जाग्वार आणी LANDROVARS या BRAND ची विक्री ६०% ने वाढली.
 • महिंद्राची आणी एस्कॉर्टसची ट्रकविक्री चांगली वाढली. याचा फायदा स्वराज इंजिन या कंपनीला होईल.
 • आसाममध्ये खूप पाउस पडला आहे. त्यामुळे चहाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चहाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा MACLEOD, जयश्री टी, टाटा ग्लोबल बिव्हरेजीस या कंपन्यांना होईल.
 • गुजराथमध्ये २०१७ च्या शेवटी निवडणुका आहेत यामुळे ‘संदेश’ या शेअरमध्ये हालचाल दिसून आली.
 • सन फार्मा या कंपनीच्या दादरा येथील युनिटचे USFDA ने सरप्राईज इन्स्पेक्शन चालू केले.

या आठवड्यात झालेली लिस्टिंग

या आठवड्यात शंकर बिल्डिंग प्रोडक्ट्स या कंपनीच्या शेअर्सचे Rs. ५४५ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ४६० ला दिला असल्यामुळे चांगला लिस्टिंग गेन्स झाला.

मार्केटने काय शिकवले

गेल्या आठवड्यात रिलायंस इंडस्ट्रीज DTH व्यवसायात उतरणार अशी बातमी आली आपण बातमीकडे लक्ष देत नाही बातमीचा पाठपुरावा करत नाही. ज्या दिवशी ही बातमी आली त्यादिवशी डिश टीव्ही आणी हाथवे हे शेअर्स पडले. पण थोडा विचार केल्यास असे आढळले की DTH सेवा चालू करण्यास खूप वेळ लागेल कारण ७०% एरिआ ग्रामीण आहे. असे लक्षात आले की ज्या कारणाने शेअर्स पडतात त्याच कारणाने पुन्हा वाढतात.

सध्या मार्केट तेजीत आहे. पुष्कळसे शेअर्स महागच आहेत. 52 WEEK हाय किंवा लाईफ टाईम हाय अशी बिरुदावली बर्याच शेअर्सला लागलेली आहे. नेमकी अशाच वेळी शेअरमार्केटचे किस्से सांगणाऱ्यांची चलती असते. असे किस्से ऐकून नवे नवे लोक मार्केटमध्ये शिरतात. नव्या नव्या शेअर्सच्या टिपा मोबाईलवरून येतात. या शेअरची तिकीट साईझ म्हणजेच किंमत कमी असते. लोक भरपूर प्रमाणात खरेदी करतात. जे वेळेवर विकतात ते सुटतात पण ज्यांना वेळेवर विकणे जमत नाही ते सापळ्यात अडकतात. शेअरमार्केटच्या नावाने बोटं मोडत राहतात. वाहत्या गंगेत वेळेवर हात धुतले पाहिजेत. गंगा आली रे अंगणी हेही खरे तितकेच गंगेचे पाणी आटले हे ही खरे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २९७०६ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९१९८ वर बंद झाले

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – गंगा आली रे अंगणी – ३ एप्रिल २०१७ ते ७ एप्रिल २०१७

 1. पिंगबॅक घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे -१० एप्रिल २०१७ ते १४ एप्रिल २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s