घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे -१० एप्रिल २०१७ ते १४ एप्रिल २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हा आठवडा पूर्णपणे ‘जिओ पॉलिटिकल टेन्शन’ मध्ये संपला. मार्केट थोडे थोडे कमजोर होत गेले. पूर्णपणे पडत नव्हते पण वाढतही नव्हते. आता ‘जिओ पॉलिटिकल टेन्शन’ म्हणजे काय ? हा प्रश्न आलाच. जिओ म्हणजे जीऑग्राफिकल म्हणजेच भौगोलिक आणी पॉलिटिकल म्हणजेच राजकीय. अर्थातच भूकंप, पूर, बेकारी, जागतिक मंदी या भौगोलिक गोष्टी पण युद्धसदृश वातावरण हे राजकीय संकट. त्याची लागणारी झळ ! उदाहरणच द्यायचे झाल्यास तर रस्तारुंदीकरण. आपल्या घरी काही झाले नाही पण रस्ता रुंदीकरणामुळे आपले घर पूर्णपणे रस्त्यावर येईल की अर्धवट रस्त्यात जाईल अशी वाटणारी भीती.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA आणी रशिया, सिरीया, आणी UK यांच्यातील ताणतणाव दूरचे म्हणता म्हणता भारत पाकिस्तानमध्ये एकमेकाला धडा शिकवण्याच्या गोष्टी चालू झाल्या आहेत. त्यामुळे ‘जीओपॉलिटीकल टेन्शन’ आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले.
 • गार्टनर रिपोर्टप्रमाणे IT साठी जागतिक स्तरावर खर्च कमी होईल. त्यामुळे भारतीय IT क्षेत्रातील कंपन्याच्या बिझीनेसवर विपरीत परिणाम होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
 • USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाला त्यांच्या पक्षातूनच विरोध होत असल्यामुळे जाहीरनाम्यातील वचनांची पूर्ती करणे अवघड होत आहे.
 • सिरीया आणी लिबिया यांच्याकडून होणारा क्रूडचा पुरवठा कमी होईल त्यामुळे क्रूडचा भाव वाढेल.

सरकारी अन्नौंसमेंट

 • उत्तर प्रदेश सरकारने साखर कारखान्यांकडे असलेली उस उत्पादक शेतकरयांची थकबाकी(Rs ४००० कोटी) चौदा दिवसात फेडायला सांगितली. त्यामुळे साखर कारखानदार त्यांच्याकडील साखरेचा साठा कमी भावाला विकत आहेत.
 • राज्यामागून राज्ये दारूबंदी जाहीर करत आहेत. मध्य प्रदेश सरकारने जाहीर केले की ते हळू हळू पण निश्चितपणे सर्व राज्यात दारूबंदी करतील.
 • मध्य प्रदेश सरकारने प्लास्टिकच्या आवरणावर १ मे पासून बंदी घातली आहे. यामुळे कागद आणी तागाची आवरणे बनविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या. उदा :- LUDLOW ज्यूट, CHEVIOT, GLOSTER.
 • सरकार मद्रास फरटीलायझर या कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी कर्जाचे रुपांतर शेअर्स मध्ये करणार आहे.
 • सरकारने रेल्वेशी संबंधीत असलेल्या ९ PSU च्या लिस्टिंगसाठी मंजुरी दिली.
 • पामऑईलसाठी दिली जाणारी सबसिडी वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
 • GST बिलांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली.
 • कर्नाटक सरकारने विजेचे दर ८% ने वाढवले.
 • बांगलादेशबरोबर केंद्र सरकार पॉवर क्षेत्रात बरेच करार करणार आहे.
 • सरकार लवकरच इलेक्ट्रोनिक धोरण जाहीर करणार आहे.

RBI, सेबी, आणी इतर प्रशासनिक संस्था

 • CERC आणी APTEL यांनी अदानी पॉवर आणी टाटा पॉवर यांना विजेचे दर वाढवायला परवानगी दिली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही परवानगी देणारा आदेश रद्द केला.
 • प्रदूषण बोर्डाने इंडिअन मेटल या कंपनीला २ खाणी बंद करायला सांगितल्या.
 • RBI ने आज त्यांच्या (PROMPT CORRECTIVE MEASURES) खाली ज्या बँकां अडचणीत आहेत त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यात व्यवस्थापनात मोठे बदल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे निर्णय बदलणे, तसेच दुसर्या बँकेबरोबर अमाल्गा-मेशन,RECONSTRUCTION, आणी वेळ आली तर वाईंडिंग अप आदी उपाययोजनांचा समावेश असेल असे सांगितले. जर NPA १२% पेक्षा जास्त वाढले तर शाखा विस्तार, व्यवस्थापनाला मिळणारा मोबदला तसेच डायरेक्टर्स फी आदीवर नियंत्रण आणले जाईल. या सर्व उपाययोजनांसाठी FY २०१७ ची BALANCESHEET आधारभूत समजली जाईल. जर बँकेकडून डीपॉझीटर्सच्या बाबतीत कोणताही DEFAULT झाला तर PCA ला न कळवता वरील प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • फेब्रुवारी २०१७ या महिन्यासाठी IIP मध्ये -१.२% (जानेवारी ३.३%) वाढ झाली.
 • मार्च २०१७ या महिन्यात CPI मध्ये ३.८१% वाढ झाली (जानेवारी २०१७ मध्ये ३.६५ %) झाली.
 • भारताने आपले कर्ज आपल्या GDP (GROSS DOMESTIC PRODUCT) च्या ६० % पर्यंत साल २०२३ पर्यंत मर्यादित करावे. फिस्कल डेफिसिट २.५% आणी रेव्हेन्यू डेफिसीट ०.८ % करावी असे तज्ञांच्या कमिटीने सांगितले.
 • मार्च २०१७ मध्ये निर्यात २७.६ % ने वाढून US$ २९.२ बिलियन झाली. लागोपाठ सातव्या महिन्यात निर्यात वाढली. यात ENG गुड्स, टेक्स्टाईल, आणी पेट्रोलियम आघाडीवर आहेत. आयात ४५,२५% वाढून US$ ३९.६ बिलियन झाली. यात सोने क्रूड आघाडीवर होते. ट्रेड डेफिसिट US$१०,०४ बिलियन झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • शोभा डेव्हलपर्स च्या प्रमोटर्सनी आपला ४.१५ स्टेक विकला.
 • USFDA लुपिन या कंपनीच्या औरंगाबाद प्लांटची १७ एप्रिलपासून पुन्हा तपासणी करणार आहे.
 • DIVI’ज LAB या कंपनीची काही औषधे USFDAने इम्पोर्ट अलर्ट मधून काढून टाकली.
 • ३ एप्रिल ते ७ एप्रिल या काळात USFDAने अजंता फार्माच्या दाहेज प्लांटची तपासणी केली. यासाठी ४८३ फॉर्म इशू केला नाही.
 • सुझलोन एनर्जीला कर्नाटकमध्ये ५० MW विंड पॉवर चे काम मिळाले.
 • बायोकॉनने मधुमेहासाठी YPSO पेन मलेशियामध्ये जारी केले.
 • इमामी या कंपनीने पुरुषांसाठी WATERलेस फेस वाश मार्केटमध्ये आणले.
 • रिलायंस जीओला त्यांची ‘समर स्पेशल’ही ऑफर TRAI ने मागे घ्यायला सांगितल्यावर कंपनीने आता ‘दे धनाधन’ ही ऑफर मार्केटमध्ये आणली आहे.
 • मार्च महिन्यात ऑटो सेक्टर मधील विक्री वाढली. प्रवासी वाहन. कमर्शियल वाहन, M&HCU यांच्या विक्रीत वाढ झाली. ऑटो निर्यातीमध्येही वाढ झाली.
 • भूषण स्टील या कंपनीला S4A ही स्कीम लागू होणार नाही. या कंपनीसाठी डीप restructuring करावे लागेल असे कंपनीच्या बँकर्सनी सांगितले. JSW स्टील आणी वेदान्ता ग्रूपने भूषण स्टील या कंपनीमध्ये रस दाखविला आहे. भूषण स्टील या कंपनीला ५० बँकर्सनी Rs ४५००० कोटी कर्ज दिले आहे.
 • इंडोको रेमिडीज या कंपनीच्या USFDA केलेल्या तपासणीत २ त्रुटी दाखवल्या.
 • १३ एप्रिलला इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे वार्षिक निकाल आले.ही कंपनी संस्थापक सदस्य आणी वर्तमान व्यवस्थापन यांच्यातील वादामुळे अलीकडच्या काळात वादाच्या भोवऱ्यात होती. PAT Rs ३५६० कोटी झाले. FY २०१८ मध्ये भागधारकांना US$ २ बिलियन एवढी रक्कम लाभांशाच्या किंवा ‘BUY BACK’ च्या स्वरूपात दिली जाईल असे कंपनीने सांगितले. CONSTANT करन्सीमध्ये ६.५ ते ८.५ चा रेव्हेन्यू ग्रोथचा गायडंस दिला. ऑपरेटिंग मार्जीन २३% ते २५% राहील असे सांगितले. लाभांश Rs १४.७५ प्रती शेअर जाहीर केला.
 • गोवा कार्बन या कंपनीचा हा वार्षिक निकाल चांगला आहे

कॉर्पोरेट एक्शन

 • भागधारकांनी AB NUVO आणी ग्रासिम यांच्या मर्जरला तसेच फायनानसिअल सर्विसेसच्या डीमर्जरला आणी लिस्टिंगला मंजुरी दिली.
 • केर्न आणी वेदांताचे मर्जर ११ एप्रिल २०१७ ला पुरे झाले. केर्न(इंडिया) च्या भागधारकांनाही Rs १७.७० अंतरिम लाभांश मिळेल.
 • हिंदुस्थान कॉम्पोझिट या कंपनीने आपला १ शेअर स्प्लीट करून त्याचे Rs ५ दर्शनी किमतीच्या २ शेअर्समध्ये रुपांतर केले. तसेच ज्यांच्याजवळ २ शेअर्स आहेत त्यांना १ बोनस शेअर दिला. अशा रीतीने ज्यांच्याजवळ आता Rs १० दर्शनी किमतीचा १ शेअर आहे त्यांना Rs ५ दर्शनी किमतीचे ३ शेअर्स मिळतील.
 • फेडरल बँक त्यांच्या फेडबँक फायनांसियल सर्विसेस मधील २६% स्टेक विकून Rs ५०० कोटी उभारण्याचा विचार करीत आहे.
 • मुथूट कॅपिटल सर्विसेस या कंपनीने १८ एप्रिल २०१७ रोजी बोनस शेअर्स इशूवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.

मार्केटने काय शिकवले

जसा पाउस असेल तशी छत्री धरावी असेच मार्केटचे म्हणणे असते. बदलत्या परिस्थितीप्रमाणे आपले निर्णय बदलायला शिकले पाहिजे. श्रीमंती असेल तर ऐश करा, पण गरिबी आल्यास काटकसर करा, पण झटपट निर्णय घ्या. थांबला तो संपला! ‘काळ मागे लागला धावत्याला शक्ती येई आणी रस्ता सापडे’ हेच खरे.

या आठवड्यात निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये लक्षांत येण्यासारखी हालचाल नव्हती पण स्माल कॅप, मिडकॅप शेअर्स चांगले चालले. मी आपल्याला गेल्या महिन्यापासून सांगत आहे आपले ‘DEMAT’ अकौंटचे स्टेटमेंट समोर घेवून बसा कोणते शेअर्स फायद्यात असतील तर विकून तुमचे भांडवल आणी थोडाफार फायदा शेअर्स विकून पदरात पाडून घ्या. उरलेल्या शेअर्ससाठी ट्रेलिंग STOPLOSS लावा. हे वार्षिक निकालांचे आख्यान अगदी जून महिन्यापर्यंत चालू राहते.आणी वार्षिक निकालांबरोबर जाहीर झालेला अंतिम लाभांश मिळायला ऑगस्ट उजाडतो. ९५% कंपन्यांचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असते पण काही कंपन्यांचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असते. त्यामुळे आलेला निकाल तिमाही आहे का अर्धवार्षिक आहे का वार्षिक आहे याकडे लक्ष द्यावे

BSE निर्देशांक सेन्सेक्स २९४६१ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ९१५० वर बंद झाले

 

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे -१० एप्रिल २०१७ ते १४ एप्रिल २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचं समालोचन – पैसा वाचवा,कमवा आणि वाढवा – 17 एप्रिल २०१७ ते २१ एप्रिल २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s