आठवड्याचं समालोचन – पैसा वाचवा,कमवा आणि वाढवा – 17 एप्रिल २०१७ ते २१ एप्रिल २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या आठवड्यात मार्केटचा मूड वेगळाच होता. करू की नको, जाऊ की नको, येऊ की नको, खेळू की नको अशी जशी सामान्य माणसांची अवस्था असते तशीच संभ्रमावस्था या आठवड्यात मार्केटमध्ये आढळली. मार्केट धड पडतही नाही आणी धड वाढतही नाही आणि अगदी छोट्या रेंजमध्ये फिरते होतं. त्यामुळे निर्णय घेणे अवघड झाले . येऊ घातलेले वार्षिक निकाल आणी जागतिक स्तरावरच्या बातम्या अशाप्रकारची टांगती तलवार सातत्याने मार्केटवर आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • UKच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी UK मध्ये ८ जून रोजी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकानंतर UKला EU रेफरंडमच्या संदर्भात निश्चितता, स्थैर्य आणी मजबूत लीडरशिप मिळेल असे सांगितले. यामुळे ब्रेकझीटसाठी करावयाच्या वाटाघाटी सुलभ आणी सोप्या होतील.
 • USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी H1B व्हिसा तसेच अन्य व्हीसांचा प्रशासनिक रिव्ह्यू करावा असे सांगितले. परंतु या वर्षी कोणत्याही नियमांना हात न लावल्यामुळे या वर्षीसाठी इंडियन IT आणी फार्मा क्षेत्रातील कंपन्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. ट्रम्प यांनी आता ‘BUY अमेरिकन, HIRE अमेरिकन’ अशी घोषणा केली. कोणतेही काम प्रथम अमेरिकन माणसाला देऊ केले पाहिजे असे जाहीर केले.
 • USA मध्ये GASOLINE चे नवे साठे सापडल्यामुळे क्रुडऑइलच्या किमती कमी होतील.
 • USA आणी उत्तर कोरिआ यांच्यातील ताणतणाव वाढण्याच्या मार्गावर आहे.
 • IMF (INTERNATIONAL MONETARY FUND) यांनी भारताच्या प्रगतीचा वेग FY २०१८ साठी ७.२% वर्तवला तर हा वेग FY २०१९ मध्ये ७.७% होईल असा अंदाज व्यक्त केला. IMF ने ग्लोबल अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग वाढेल असा अंदाज व्यक्त केला.
 • ऑस्ट्रेलियानेही 457 ही व्हिसा प्रणाली रद्द केली आणी त्याजागी अधिक कडक आणी ऑस्ट्रेलियाच्या हिताची काळजी घेणारी व्हिसा प्रक्रिया अमलांत आणली जाईल असे सांगितले.

सरकारी अन्नौन्समेंट

 • कॅश व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांमध्ये १००% FDI ला परवानगी दिली जाणार आहे. म्हणजेच कॅशची वाहतूक करणार्या आणी कॅश मोजणारी मशीन बनवणार्या कंपन्यांचा समावेश होतो. उदा :- TVS इलेक्ट्रोनिक्स, ITI न्युक्लीअस सॉफटवेअर, HCL इन्फो
 • सरकार लवकरच स्वस्त औषधे मिळण्यासाठी कायदा करेल.
 • सरकार लवकरच खालील सात सरकारी कंपन्यांमधील आपल्या स्टेकमधील काही हिस्सा विकेल. त्या खालीलप्रमाणे REC ५%, PFC, SAIL, NTPC, NHPC यातील १०%, NLC १५% आणी IOC तील ३% स्टेक विकेल.
 • सरकार लवकरच आयर्न आणी स्टील यांच्या किमतीत स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करील. इतर मंत्रालयांनी त्यांच्या कामात इंडियात बनवलेले स्टील वापरावे यासाठी स्टील मंत्रालयाच्या त्यांच्याबरोबर वाटाघाटी चालू आहेत.
 • साखर उद्योगासाठी असलेले STOCK होल्डिंग लिमिट ६ महिन्यांसाठी वाढविले.
 • सिमेंटच्या किमतीमधील अचानक आणी प्रमाणाबाहेर झालेल्या वाढीची आपण चौकशी करू असे आंध्र प्रदेशच्या राज्य सरकारने जाहीर केले.
 • ऑर्गनिक तांदुळाच्या निर्यातीवरची सगळी बंधने काढून टाकली.
 • NPA धोरणाबाबत पंतप्रधानांचे कार्यालय, अर्थमंत्रालय, आणी RBI यांच्यात या धोरणाविषयी तत्वतः एकमत झाले. RBI कायद्यात या विषयी तरतुद असल्यामुळे मंत्रीमंडळाची मंजुरी आवश्यक नाही. या पॉलिसीद्वारे NPA ओव्हरसाईट कमिटीला विशेषाधिकार दिले जातील. बँकांनी किती हेअर कट घ्यायचा याची मर्यादा निश्चित केली जाईल. जॉईट फोरम ऑफ लेन्डर्स मध्ये त्वरीत निर्णय घेण्याची प्रक्रिया सोपी केली जाईल. NPA कंपनी त्याच क्षेत्रातील एखाद्या चांगल्या कंपनीत मर्ज करण्याची शक्यता अजमावली जाईल.
 • PMGKY (पंतप्रधान गरीब कल्याण योजना) ही योजना ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली.
 • पंतप्रधान २७ एप्रिल रोजी प्रादेशिक विमान वाहतूक ‘उड्डाण’चे सिमल्याहून उद्घाटन करणार आहेत. या योजनेद्वारे किफायती दरात देशातील प्रमुख शहरे विमान मार्गाने जोडली जातील.याचा विमानवाहतूक सेक्टरला फायदा होईल.
 • ITDCच्या हॉटेल व्यवसायातून सरकार बाहेर पडणार आहे. राज्यसरकारच्या जमिनीवर असलेली ( ज्यात केंद्र सरकारचा स्टेक ५१% आणी राज्य सरकारचा ४९% आहे ) अशी हॉटेल्स राज्य सरकारांना दिली जातील. सरकार काही हॉटेल्स लीजवर देण्याची शक्यता आहे.
 • PNB, बँक ऑफ बरोडा, आणी कॅनरा बँक यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे
 • VVPAT या वोटिंग मशीनच्या खरेदीसाठी मंत्रीमंडळाने मजुरी दिली. या मशीनची मागणी निवडणूक आयोगाने केली होती. ही मशीन्स ‘BEL’बनवत असल्यामुळे BEL चा शेअर वधारला.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • WPI ६.५५ % वरून कमी होऊन ५.७० % झाला.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • कोल कंट्रोलर’स ऑर्गनायझेशन १७७ कोळशाच्या खाणी कंट्रोल करते. या संस्थेने या खाणीतून निघणारा कोळसा डाऊनग्रेड केला. त्यामुळे कोळशाच्या किमती कमी होतील. याचा फायदा NTPC JSW स्टील, JSW एनर्जी यांना होईल. या कंपन्या इंडियन कोल वापरतात. याचा तोटा कोल इंडियाला होईल.
 • शेषशायी पेपर कंपनीला कावेरी नदीचे पाणी फक्त पिण्यासाठी वापरता येईल कारखान्यासाठी वापरता येणार नाही असे सांगितले.
 • मेट ने या वर्षी ९६ % पावसाची शक्यता वर्तवली.
 • २८ एप्रिलपासून १६ नवीन कंपन्यांचा F & O मार्केटमध्ये समावेश केला जाईल. फोर्टिस हेल्थकेअर, नेस्ले, रेमंड, NBCC, चोलामंडळम इन्व्हेस्टमेंट, बर्जर पेंट्स, MRPL, बजाज फिनसर्व, V गार्ड इंडस्ट्रीज , बलरामपुर चीनी, GSFC, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, कॅनफिना होम्स, MCX, गॉड फ्रे फिलिप्स, EIL.
 • RBI ने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना ‘JP ASSOCIATES’ ला दिलेल्या कर्जासाठी २५% प्रोविजन करायला सांगितली आहे. हा अकौंट बहुतेक कर्ज दिलेलेया बँका स्पेशल मेन्शन अकौंट किंवा STANDARD अकौंट म्हणून ट्रीट करत आहेत. या अकौंटसाठी येस बँक आणी इंडसइंड बँकेनेही प्रोविजन केली आहे.
 • रिलायंस डिफेन्स या कंपनीला CDR (कॉर्पोरेट DEBT RESTRUCTURING) मधून बाहेर काढण्यास CDR एमपॉवरड कमिटीने मंजुरी दिली. या कंपनीला दिलेल्या Rs ६००० कोटी कर्जाचे रीफायनांसिंग होणार आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • TCS या IT क्षेत्रातील कंपनीचा वार्षिक निकाल जाहीर झाला. कंपनीचा निकाल ठीक लागला. कंपनीने २६% ते २८% मार्जिन ठेवू शकू असा गायडंस दिला. कंपनीने Rs २७.५० प्रती शेअर अंतिम लाभांश दिला. कंपनीने सांगितले की USA सरकारच्या बदलत्या धोरणाला अनुसरून आम्ही  आमच्या बिझिनेस करण्याच्या पद्धतीत बदल करू. TCS शेअर  BUY BACK  करण्यासाठी Rs १६००० कोटी खर्च करणार आहे.
 • इंडसइंड बँक आणी येस बँक या दोन्हीचे निकाल चांगले लागले. NPA झालेली वाढ आणी त्याच्या मुळे करावी लागणारी प्रोविजन यांच्यात वाढ झाली.
 • गृह फायनान्स, HDFC BANK, जय भारत मारुती, HOEC, हिंदुस्थान झिंक यांचे निकाल चांगले आले.
 • अहलुवालिया CONTRCTS या कंपनीच्या प्रमोटर्सनी आपला १.६% हिसा विकला.
 • जैन इरिगेशन या कंपनीने USA मधील दोन इरिगेशन कंपन्या विकत घेतल्या. या कंपन्या शेतकर्यांना थेट माल विकतात. तसेच या कम्पन्यांचे ओपेरेटिंग मार्जीनही चांगले आहे.
 • जागतिक बाजारात लेडच्या किमती कमी होत आहेत याचा फायदा EXIDE, अमर राजा BATTERY यांना होईल.
 • IDFC BANK आणी RBL यांनी भारत फायनांसियल इन्क्लूजन ही कंपनी खरेदी करण्यात रस दाखविला.
 • अडाणी पोर्ट या कंपनीने मल्टी लॉजीस्टिक पार्क सुरु केला.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • S चांद अंड कंपनी या प्रकाशन व्यवसायात असणार्या कंपनीचा IPO २६ एप्रिल ते २८ एप्रिल २०१७ या काळात येत आहे. याचा प्राईस BAND Rs ६६० ते Rs ६७० आहे.
 • झोटा हेल्थकेअर या कंपनीचा २७ एप्रिल ते २९ एप्रिल २०१७ या काळात येईल. या IPO चा प्राईस BAND Rs १२१ ते Rs १२५ आहे.
 • DOLLAR इंडस्ट्रीजचे NSE वर लिस्टिंग झाले. लिस्टिंग चांगले झाले प्रथम हा शेअर कोलकाता STOCK एक्स्चेंजवर लिस्टेड होता
 • NALCO या कंपनीच्या OFS ला किरकोळ आणी संस्थागत गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
 • सन फार्मा या कंपनीच्या दादरा येथील प्लांटच्या निरीक्षणात USFDA ने ११ त्रुटी दाखवल्या.

मार्केटने काय शिकवले

IC – investopedia

INVERTED HAMMER (शूटिंग स्टार) हा PATTERN या आठवड्यात मंगळवारी तयार झाला होता. पण बुधवारची कॅण्डल मात्र या PATTERN च्या अनुरूप नव्हती. ज्या गुंतवणूकदारांनी कमी किमतीत खरेदी केलेली असते व ट्रेलिंग STOP लॉस लावून वाढणाऱ्या किमतीचा फायदा घेत असतात ते न्यू हाय हिट झाल्यावर प्रॉफीट बुकिंग सुरु करतात. काही लोक शॉर्टिंग करतात. त्यामुळे उच्चतम किमत होताक्षणी शेअरचा भाव कमी व्हायला सुरुवात होते. लिक्विडीटी कमी होण्यास सुरुवात होते. ही खरे पाहता ‘शूटिंग स्टार कॅण्डल’असते. खरेच ट्रेंड बदलला का याची निश्चिती दुसऱ्या दिवशीच्या कॅण्डल वरून मिळते. त्यावेळी ही ‘शुटींग स्टार’ की CONTINUATION कॅण्डल होती हे समजते. दुसर्या दिवशी हायर हाय होता कामा नये. परंतु पहिल्या कॅण्डलच्या क्लोज भावाखाली दुसऱ्या दिवशीचा क्लोज भाव असला पाहिजे. अशा वेळी एक गोष्ट समजते की किंमत वाढणे थांबले आहे. शूटिंग स्टारच्या दिवशी खरेदी करणारा प्रत्येकजण अडकला आहे. त्यामुळे  टेन्शन वाढत जाते. ‘GREED’ चे रुपांतर भीतीमध्ये होते. लिक्विडीटी कमी होते. त्यामुळे PANIC सेलिंग सुरु होते. त्यानंतर किमती कमी होण्याच्या कॅण्डल फॉर्म होतात. अशावेळी ‘WICK’किंवा ‘SHADOW’ही कॅण्डलच्या  बॉडीच्या दुप्पट असली पाहिजे. ही ‘WICK’ किंवा ‘SHADOW’काय दाखवते तर किती खरेदी करणारे गटांगळ्या खात आहेत किंवा अडकले आहेत! ‘शूटिंग स्टार’ याचा अर्थ किमतीच्या उच्चांकापासून सुरु झालेला उलट प्रवास. सातत्याने ‘HIGHER HIGH’ दाखवणारया तीन किंवा त्यापेक्षा जास्त कॅण्डलसची सिरीज सुरु असते. त्यावेळी खरेदीदारांचा संयम सुटतो अशावेळी बुडबुड्याप्रमाणे परिस्थिती तयार होते. ( LEAP FROG) हावरटपणाचा हा सर्वोच्च बिंदू असतो. हा PATTERN अपवर्ड ट्रेंड किंवा बुलीश ट्रेंड सुरु असताना आढळतो. हाय प्राईस आणी ओपनिंग प्राईस यातील अंतर शूटिंग स्टारच्या बॉडीच्या दुपटीपेक्षा अधिक असले पाहिजे. LOWEST प्राईस आणी क्लोजिंग प्राईस यामध्ये असणारा फरक किंचीतसा किंवा लक्षात न येण्यासारखा हवा.

हल्ली बिझिनेस वाहिन्या लावल्या की ‘अमुक अमुक शेअर वायदेबाजारात BAN आहेत’ अशी खबर येते. हा ‘BAN’ ही काय भानगड आहे ? ठराविक शेअर्स नेहेमी ‘BAN’ कसे येतात. लोकांना त्याच शेअर्समध्ये ट्रेडिंग करायला आवडते का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जसे स्पॉट मार्केट मध्ये शेअर किती रुपये वाढल्यावर किंवा पडल्यावर सर्किट लागते म्हणजेच त्यानंतर खरेदी किंवा विक्री होऊ शकत नाही त्याचप्रमाणे वायदा बाजारात सुद्धा नियम आहे का? प्रत्येक शेअरसाठी प्रत्येक ब्रोकरसाठी किंवा पूर्ण मार्केटसाठी किती पोझिशन घेता येते यावर बंधन आहे. तेवढी पोझिशन किंवा तेवढा ओपन इंटरेस्ट झाला की त्यानंतर पोझिशन घेता येत नाही. पण ऑपरेटर याचाच फायदा उठवतात. ‘आउट ऑफ द मनी’ CONTRACT घेतात.त्यामुळे तो शेअर ‘BAN’ मध्ये. त्यामुळे वायदेबाजारात ट्रेड करता येत नाही. त्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये त्यांना हवी तशी ‘PRICE-ACTION’ होऊ शकते. तेजीची पोझिशन खूप झाली तर कधी स्पॉट मध्ये खूप खरेदी करतात. त्यामुळे शेअर ‘BAN’ मधून बाहेर पडतो. कोणतीही बातमी नसताना शेअर ‘BAN’मध्ये येत असेल तर यात काहीतरी भानगड आहे असे समजावे.

सध्यातरी आलेले निकाल अपेक्षेप्रमाणेच होते. मार्केटमध्ये तेजी किंवा मंदी येणे हे नैसर्गिक आहे. पण निकालात काही विपरीत आढळल्यास आपल्याला आपला निर्णय बदलला पाहिजे. पाहू या पुढील आठवड्यातील मार्केटचा रागरंग कसा असेल ते !

BSE निर्देशांक सेन्सेक्स २९३६५ वर तर NSE निर्देशांक निफ्टी ९११९ वर बंद झाला.

 

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचं समालोचन – पैसा वाचवा,कमवा आणि वाढवा – 17 एप्रिल २०१७ ते २१ एप्रिल २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – IPL शेअरमार्केटचे – २४ एप्रिल ते २८ एप्रिल २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s