आठवड्याचे समालोचन – उतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका – ८ मे २०१७ ते १२ मे २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मार्केट एखाद्या चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे रोज नव्या नव्या सीमा ओलांडत आहे. नवे नवे प्रदेश जिंकत आहे. आणी आपला ठसा काळाच्या पडद्यावर उमटवत आहे. काल होते ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही अशी स्थिती आहे. निफ्टी आणी सेन्सेक्स हे निर्देशांकच नव्हे तर वेगवेगळे सेक्टोरल निर्देशांक आळीपाळीने चौकार षटकार मारत आहेत आणी बाजूला होऊन दुसर्या निर्देशांकांना वाट करून देत आहेत.पण त्यातल्या त्यात एक बरे आहे जसे एका खेळाडूने षटकार मारला, नंतर सिंगल्स घेतल्या, धावफलक हालता ठेवला, एकाग्रता ढळू दिली नाही नंतर पुन्हा एक षटकार मारला असे झाले तर मजा येते. तसेच सध्या सुरु आहे. प्रत्येक लेव्हलवर मार्केट स्थिरावते आहे.. नंतर पुढची चाल सुरु होते आहे. पण मार्केट्ची लहर सांभाळावी लागते हेच खरे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • या आठवड्यात झालेल्या दोन राष्ट्रातील निवडणुकांच्या निकालांनी राष्ट्राराष्ट्रातील शांतता आणी सौहार्द वाढण्यास मदत होईल असे वाटते.
  • दक्षिण कोरिआमध्ये समन्वयवादी आणी उदारमतवादी Moon Jae–in अध्यक्ष म्हणून निवडून आले. यामुळे उत्तर कोरिआ आणी दक्षिण कोरिआ याच्या संबंधात सुधारणा होईल. नव्या अध्यक्षांनी उत्तर कोरीआला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे USA आणी उत्तर कोरिआ यांच्यातील तणाव थोडा कमी होईल असे वाटते.
  • फ्रान्स मध्ये मध्यममार्गी आणी युरोपिअन युनियनमध्ये विश्वास ठेवणारे श्रीMACRON फ्रांसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यामुळे आता बहुचर्चित फ्रेकझीट होण्याचा संभव राहिला नाही तसेच फ्रांस ‘प्रोटेक्शनीझम’ च्या आहारी जाणार नाही असे वाटते.
  • USA आपले व्हिसा धोरण अधिकाधिक कडक करीत आहे. आता व्हिसासाठी अर्ज करणार्याला आपली १५ वर्षाची व्यक्तीगत माहिती द्यावी लागेल. यात पासपोर्ट डीटेल्स, सोशल मेडिया डीटेल्स यांचा समावेश आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

  • DPCO च्या नियंत्रणाखाली मेडिकल इक्विपमेंट बनवणार्या कंपन्यांना आणण्याचा संभव आहे. कोणत्याही वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी किती रक्कम आकारावी या संबंधी सरकार काही नियम करण्याच्या विचारात आहे. यामुळे लाल पाथ LAB, थायरो केअर या कंपन्यांच्या उत्पनावर परिणाम होईल.
  • सरकारी कंपन्यांच्या ETFचा दुसरा चरण सुरु होईल. यात SBI, बँक ऑफ बरोडा आणी PNB यांचा समावेश असेल. २५ सरकारी कंपन्या यासाठी शॉर्टलिस्ट केल्या आहेत. या मध्ये ‘SUTTI ’ मधील काही कंपन्या सामील आहेत.
  • केंद्र सरकारच्या शेती मंत्रालयाने जाहीर केलेल्या तिसऱ्या अंदाजाप्रमाणे जून २०१७ च्या वर्ष अखेरीस अन्नधान्य, डाळी यांचे उत्पादन २७३.३८ मिलियन टन होईल. यामुळे मार्केटला आणखी एक शुभ शकून झाला.
  • सरकारने पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन या कंपनीला NATIONAL LONG DISTANCE आणी इंटरनेट पुरविण्यासाठी युनिफाईड परवाना दिला.
  • सरकारने स्टीलच्या ४७ प्रोडक्ट्सवर पांच वर्षासाठी US $ ४७८ ते US $ ५६१ एवढी ANTI DUMPING ड्युटी लावली
  • 11 मे २०१७ रोजी केंद्र सरकारची डिफेन्स प्रोक्युअरमेंट पॉलिसीअंतर्गत खाजगी कंपन्यांबरोबर बैठक आहे यात BEL, BEML, L & T, M & M. वालचंदनगर इंडस्ट्रीज, ASTRA मायक्रोवेव्ह अशा कंपन्यांचा समावेश आहे.
  • पंतप्रधान श्री लंकेचा दौरा करणार आहेत या दरम्यान ऑईल, GAS क्षेत्रात बरेच करार होण्याची शक्यता आहे. IOC ला याचा फायदा होईल.
  • केंद्र सरकारच्या संरक्षण धोरणाच्या अंतर्गत ४ विभाग करण्यात आले आहेत. (१) सिंगल इंजिन फायटर प्लेन (२) हेलीकॉप्टर (३) सबमरीन (४) आर्म्ड लडाखू वाहन. ज्या कंपनीला ज्या विभागासाठी ऑर्डर दिली असेल ती कंपनी तो विभाग बदलू शकत नाही. या कंपन्या ४९% विदेशी भांडवल आणू शकतात. आणी विदेशी कंपन्यांबरोबर करार करू शकतात.
  • सरकार अतिरिक्त साखर आयात करायला परवानगी देणार नाही.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • WPI, CPI आणी IIP चे आकडे आले. हे सगळे आकडे मार्केटसाठी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे द्योतक आहेत.
  • WPI एप्रिल महिन्यासाठी ५.२९% वरून ३.८५% झाले. WPI (WHOLESALE PRICE INDEX) च्या सिरीजचे बेस वर्ष २००४-०५ बदलून २०११-१२ करण्यात आले. या निर्देशांकात १९९ नवे आयटेम घेण्यात आले. आधी या निर्देशांकात ६२० आयटेम होते. यामुळे अधिक चांगला डाटा मिळेल त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चांगले चित्रण समाजासमोर येईल. WPI मध्ये इनडायरेक्ट करांचा समावेश केलेला नाही.
  • IIPचे बेस वर्षही २०११-२०१२ ठरवण्यात आले IIP औद्योगिक उत्पादनातील प्रगती दाखवते. मार्च महिन्यासाठीचा IIP १.९ वरून २.७ झाला.
  • एप्रिल २०१७ या महिन्यासाठीचा CPI (CONSUMER PRICE INDEX) हा किरकोळ महागाईचा निर्देशांक ३.८९% वरून २.९९% झाला.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • सुप्रीम कोर्टाने BSIV च्या नियमातून TRACTOR आणी शेतकी इक्विपमेंटला सूट दिल्यामुळे M & M, आयशर, संघवी मूव्हर्स, ACE, अशोक LEYLAND, एस्कॉर्टस यांच्या शेअर्सचे भाव वाढले.
  • ऑरोबिंदो फार्मा या कंपनीच्या हैदराबाद प्लांटचे इन्स्पेक्शन करून USFDA ने ७ त्रुटी असलेला फोरम नंबर ४८३ दिला.
  • RBI ने IDBI बँकेचे नेट NPA जास्त आहेत आणी ROA (RETURN ON  ASSETS) निगेटिव्ह असल्यामुळे PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) खाली सुधारणात्मक कारवाई सुरु केली आहे  यामुळे त्यांना नवीन शाखा उघडता येणार नाहीत तसेच लाभांश देता येणार नाही.
  • येस बँकेने NPA च्या संदर्भात जी आकडेवारी दिली त्याबद्दलही RBIने शंका व्यक्त केली.
  • MET डिपार्टमेंटने सरासरीपेक्षा जास्त पाउस पडेल असा अंदाज वर्तविला. तसेच त्याचे LPA (LONG PERIOD AVERAGE) १०० % असेल असे सांगितले. तसेच अल्निनो या भीतीदायक वादळाच्या पुनरावृत्तीचा धोका कमी झाला आहे असे सांगितले. यामुळे FMCG कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणी एक सुखद वातावरण मार्केटमध्ये पसरले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • देना बँकेने व्हिडीओकोन इंडस्ट्रीज हा मोठा अकौंट NPA म्हणून घोषित केला. याचा परिणाम म्हणून ज्या इतर बँकांनी व्हिडीओकोन इंडस्ट्री या कंपनीला कर्ज दिले असेल त्या सर्व बँकांना हा अकौंट NPA म्हणून घोषित करावा लागेल.
  • प्रवासी वाहनांची विक्री एप्रिल २०१७ या महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा १४.६८% ने वाढली. या वर्षी बरीच नवीन मॉडेल्स कंपन्यांनी बाजारात आणली आणी मारुतीने खूपच चांगली प्रगती (२३%) दाखवली. परंतु कमर्शिअल वाहने आणी रिक्षा यांच्या विक्रीत घट दिसून आली.
  • कोटक महिंद्र बँक Rs ५६०० कोटींचा QIP करणार आहे. या रकमेचा विनियोग BAD ASSETS विकत घेण्यासाठी करणार आहे
  • GRANUELS,PNB हौसिंग,हिरो मोटो (मार्जीन कमी झाले), गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, पेट्रोनेट LNG, सिकल  लॉजीस्टिक, HCL-TECH,  मैथान ALLOYS, सिंडीकेट बँक TRIDENT,आयचर मोटर्स, BSE या कंपन्यांचे निकाल चांगले आले.
  • देना बँक, OBC, भारती एअरटेल, MAJESCO, कॅनरा बँक, युनियन बँक, लाल पाथ LAB, DR रेड्डीज, ग्लेनमार्क फार्मा (गायडंस निराशाजनक) या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.
  • इंडिगो ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी ‘उडान’ या योजनेखाली ५० उड्डाणे सुरु करणार आहे.
  • EID PARRY या कंपनीच्या NUTRA FACILITY साठी USFDA ची परवानगी मिळाली.
  • CESC त्यांच्या रिटेल बिझिनेसमधून बाहेर पडणार आहेत.
  • EROS WORLDWIDEने EROS INTERNATIONAL या कंपनीतला स्टेक ४% कमी केला.
  • DABUR इंडिया या कंपनीने करीना कपूर हिची BRAND AMBASADAR म्हणून निवड केली.
  • दिल्ली मेट्रोची केस रिलायंस इंफ्राने जिंकली. कंपनीला Rs २९५० कोटी मिळतील.
  • L&T ला आर्टिलरी गन बनवण्यासाठी Rs ४५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
  • १५ एप्रिलपासून ग्रासिम, आयशर मोटर्स, REC, ICICI बँक यांचे MSCI निर्देशांकातील रेटिंग बदलणार आहे.

या आठवड्यातील IPO आणी लिस्टिंग

  • S चांद या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग NSE वर Rs ७०० आणी BSE वर Rs ७०७ वर झाले. हा शेअर Rs ६७० ला IPO मध्ये दिला होता आणी ६० वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला होता त्या मानाने लिस्टिंग फारच कमजोर झाले असे म्हणावे लागेल.
  • HUDCO या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचा IPO एकूण ७९.४७ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला. यात रिटेल कोटा १०.६० वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
  • PSP प्रोजेक्ट या कंपनीचा IPO १७ मेला ओपन होऊन १९ मे २०१७पर्यंत खुला राहील
  • STERLITE पॉवर ग्रीड व्हेंचर्स ही कंपनी आपल्या INDIA GRID TRUSTच्या Rs २२५० कोटींच्या InVIT IPO (प्राईस BAND Rs 98 ते Rs १००) १७ मे रोजी ओपन करेल. सुरुवातीला या फंडाकडे Rs ३७०० कोटींच्या २ प्रोजेक्ट असतील. राहिलेल्या ८ प्रोजेक्टवर या ट्रस्टचा पहिला अधिकार राहील.

कॉर्पोरेट एक्शन

  • पेट्रोनेट LNG आणी गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स या कंपन्यांनी १:१ या प्रमाणात बोनस दिला.
  • पिनकॉन स्पिरीट या कंपनीची २२ मे २०१७ रोजी राईट्स इशुवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.
  • शिल्पी केबल या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनस वर विचार करण्यासाठी २८ मे २०१७ रोजी बैठक आहे.
  • ACC आणी अंबुजा सिमेंट याचे मर्जर होणार आहे. हे मर्जर दोन्ही कंपन्यांसाठी विशेषतः अंबुजा सिमेंटसाठी लाभदायक आहे.
  • GILLET आणी PROCTOR AND GAMBLE यांच्या मर्जरची शक्यता आहे.  या दोन्ही कंपन्यांनी विशेष लाभांश जाहीर केला.

मार्केटने काय शिकवले

सध्या म्युच्युअल फंडांची कॅश लेव्हल वाढते आहे  असे  निरीक्षण केल्यास आढळते. मिडकॅप शेअरमधून गुंतवणूक काढून घेताना दिसत आहेत. DII(DOMESTIC INSTITUTIONAL INVESTORS) ची विक्री वाढत आहे, यावरून आपणही अर्थबोध घ्यावा सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

आता खरोखर संयमाची कसोटी लागत आहे. मार्केट हट्टी, अवखळ, लहरी असते. या गतीमध्ये मार्केट मर्यादेपेक्षा जास्त वाढते किंवा पडते. पण आपला पैसा आपण जपून वापरला पाहिजे. ज्याला आगत असेल त्याने स्वागत केले पाहिजे. भीती आणी हाव दोन्हीलाही मर्यादा नसेल तर माणूस वेडा ठरतो. त्यामुळे मार्केटपासून दूर पळायचे नाही पण हाव किंवा भीतीच्या आहारी न जाता योग्य वेळी योग्य किंमतीला योग्य प्रमाणात योग्य गुंतवणूक करण्याचा वसा टाकायचा नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०१८८ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९४०० वर बंद झाले.

 

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – उतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका – ८ मे २०१७ ते १२ मे २०१७

    1. surendraphatak

      ​आपण या मार्केटमध्ये stock स्पेसिफिक राहावे. IT आणी फार्मामध्ये २ वर्षाचा अवधी ठेवून गुंतवणूक करण्यास हरकत नाही. एखादा शेअर जर काही तात्कालिक बातमीमुळे  बराच पडला तरी घ्यायला हरकत नाही. यात शॉर्ट टर्म ट्रेडिंग होऊ शकते  बाकी मग आपण आपल्या फायद्याचे प्रमाण ठरवून मार्केट पडायला  लागण्याच्या आधी जो काही फायदा होत असेल तो घेवून आपली गुंतवणूक सतत एका शेअर मधून दुसर्या शेअर मध्ये फिरवत राहणे श्रेयस्कर. या अवधीत बर्याच कंपन्या बोनस, स्प्लिट इत्यादी कॉर्पोरेट एक्शन घेत आहेत. त्याचाही विचार करावा.  ​

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – GST ची वरात शेअर मार्केटच्या दारात – 15 मे २०१७ ते १९ मे २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s