आठवड्याचे समालोचन – नाच नाचूनी अती मी दमले – २९ मे ते २ जून

पावसाचे ढग जमू लागले, तर उत्तर कोरीआने मिसाईल्सचे परीक्षण केले. शेअरमार्केटच्या दृष्टीने या परस्परविरोधी  घटना म्हणाव्या लागतील.त्याचबरोबर जेम्स आणी ज्युवेलरीवरील GST चा दर ठरवताना अनेक अडचणी येत आहेत. मार्केटही आता धावून धावून थकले मार्केटलाही आता विश्रांतीची गरज आहे. अशी विश्रांती मार्केटने या आठवड्यात घेतली. मार्केट आता सार्वकालीक उच्च स्तरावर असल्याने कुणालाही खरेदीमध्ये रस नाही व बुल रन असल्यामुळे आणखी किती वाढेल सांगता येत नाही. पुन्हा स्वस्तात मिळणार नाही अशा मनस्थितीत गुंतवणूकदार आहेत. या आठवड्यात वायदेबाजारात निफ्टीमधील १०००० चे सौदे दिसू लागले. त्यामुळे निफ्टी लवकरच १०००० च्या स्तरावर पोहोचेल अशी आशा मूळ धरू लागली आहे. STOCK स्पेसिफिक मार्केट चालू होते असे जाणवले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की USA PARIS CLIMATE AGREEMENT मधून बाहेर पडले आहे. हा करार कार्बन एमिशन कंट्रोल करण्यासाठी होता.
  • USA मध्ये रोजगारीचे आकडे चांगले आले, US$ मजबूत झाला. त्यामुळे फेड रेट वाढवण्याची शक्यता आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार युरोपिअन देशांचा दौरा चालू आहे. यामध्ये आर्थिक, परमाणु आणी विज्ञान या विषयांवर द्वीपक्षीय करार करण्याचा हेतू आहे तसेच EU बरोबर फ्रीट्रेड अग्रीमेंट करण्यावर जोर असेल.
  • सरकार लेदर उद्योगाला तो लेबर इंटेनसिव असल्यामुळे उत्तेजन देण्यासाठी Rs ४००० कोटींचे PACKAGE देणार आहे. कमी व्याजाने कर्ज, मशिनरी खरेदीमध्ये सवलत, कमी दराने ड्युटी आकारणे अशा स्वरूपात  PACKAGE असेल. याचा फायदा मिर्झा INTERNATIONAL, बाटा, लिबर्टी, सुपर हाउस, RELAXO सारख्या कंपन्यांना होईल.
  • टेलिकॉम कंपन्यांना जी कर्जे दिलेली आहेत त्यांच्या परतफेडीची मुदत ४० वर्षे करावी आणी त्यांच्याकडे असलेला स्पेक्ट्रम कर्जासाठी सिक्युरिटी म्हणून गहाण ठेवण्याची तरतूद असावी असा विचार चालू आहे.
  • इन्फ्रा सेक्टरमधील NPA झालेल्या प्रोजेक्टसाठी NIIF (NATIONAL INVESTMENT AND INFRASTRUCTURE FUND)कडून फंड्स दिले जातील. पण ही प्रोजेक्टस पूर्ण होतील असा विश्वास सरकारला वाटला पाहिजे.
  • डाटा सुरक्षेसाठी सरकारचे IT मंत्रालय नवीन कायदा बनवणार आहे. जर डाटा लीक झाला तर त्या गुन्ह्यासाठी तुरुंगवासाची कायद्यात तरतूद असेल.
  • LNG ला डीझेलबरोबर MATCH करून त्याचा ऑटो इंधनासारखा उपयोग करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यासाठी पेट्रोनेट LNG ने गुजरात GAS बरोबर करार केला आहे.
  • सरकारने आता NPA चा प्रश्न सोडविण्यासाठी टॉप ५० NPA खात्यांची सविस्तर माहिती मागवली आहे. या खात्यांवर RBI, केंद्र सरकार आणी सरकारच्या विविध VIGILANCE एजन्सीज लक्ष ठेवतील.
  • महाराष्ट्र राज्य सरकारने असे जाहीर केले की ज्या नव्या बिल्डींग होतील त्यात LED बल्ब आणी इतर उपकरणांचा वापर केला पाहिजे याचा फायदा सूर्या रोशनी, HPL इलेक्ट्रिक याना होईल.
  • CPSE ETF च्या माध्यमातून सरकार त्यांचा हिस्सा विकणार आहेत. SBI, BOB, PNB, AXIS, L&T, ITC यातील हिस्सा विकणार आहे. SAIL, NALCO ,MOIL , कोल इंडिया, NMDC याही कंपन्या यात असतील. यात मुख्यतः मायनिंग कंपन्यांचा समावेश असेल.
  • सरकारने एअर इंडिया या विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रातील सरकारी कंपनीचे खाजगीकरण करायचे ठरवले आहे. सरकार ही कंपनी या क्षेत्रातील देशी किंवा विदेशी कंपनीला विकू शकते.

इकॉनोमीच्या गोष्टी

  • MSCI निर्देशांकातून डिविज LAB काढला आणी REC आणी IOC चा समावेश केला. ICICI बँक, ग्रासिम यांचे वेटेज वाढवले.
  • लॉरस Labs, नवनीत एज्युकेशन, आणी सिनजीन या कंपन्यांचा MSCI स्माल कॅप निर्देशांकात सामील केल्या.
  • भारताची GDP २०१६-१७ या वर्षात ७.१ % ने वाढले. हा वाढीचा वेग गेल्या दोन वर्षापेक्षा कमी आहे. तर हीच वाढ २०१६ -१७ च्या चौथ्या तिमाहीत ६.१ % होती. हा डीमॉनेटायझेशनचा परिणाम आहे असे तज्ञांचे मत आहे. पण रीमॉनेटायझेशन, चांगला पावसाळा, आणी RBI ने रेट कट केले तर आणी १ जुलै पासून लागू होणारी GST ची करप्रणाली यामुळे २०१८ मध्ये पुन्हा GDP मध्ये आवश्यक तेवढी वाढ होईल असे वाटते.

RBI, सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

  • सेबी P नोट साठी प्रती गुंतवणूकदाराला US $ १००० लेव्ही बसवणार आहे. P नोट्ससाठी KYC चे नियम MANDATORY केले. सेबी P नोट्सच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. सेबीला २०२० पर्यंत P नोट्सचा वापर संपुष्टात आणायचा आहे. सध्याच्या मार्केटमध्ये  विदेशी निवेशक आणी घरेलू  निवेशक दोघेही गुंतवणूक करीत आहेत. नुसत्या विदेशी निवेशकांवर आपण अवलंबून नाही. त्यामुळे सेबीने ही योग्य वेळ गाठली आहे.
  • फार्मा सेक्टरने DPCO ला औषधांच्या किमती लवकर जाहीर करण्यासाठी विनंती केली आहे. कारण लेबलिंग, PACKAGING, DISTRIBUTION यासाठी ९० दिवस लागतात.
  • GST कौन्सिलने Rs १०० प्रती किलो आणी त्यापेक्षा जास्त दराने विकल्या जाणाऱ्या बिस्किटांवर (प्रीमियम बिस्किटांवर) १८% तर त्याच्या पेक्षा कमी किंमतीला विक्री होणाऱ्या बिस्किटांवर १२% GST लागेल असे जाहीर केले.
  • पावसाचे चांगले अनुमान, आणी कमी होणारी महागाई यामुळे RBI रेट कट करील का? या अपेक्षेने सगळ्यांचे  लक्ष आहे.
  • RBI आपली तिमाही क्रेडीट पॉलिसी ७ जून रोजी जाहीर करेल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • हेल्थ प्रोडक्ट रेग्युलेटरी ऑथारीटी आयर्लंड यांनी वोखार्तचे शेंद्र युनिट तपासले आणी क्लींअरंस दिला.
  • मनपसंद बिव्हरेजीसने पार्ले प्रोडक्ट्स बरोबर डीस्ट्रीब्युशनसाठी करार केला.
  • गुजराथमध्ये सिमेंटचे दर प्रती पोत्यामागे Rs १० वाढवले. याचा फायदा अल्ट्राटेक, अंबुजा, ACC यांना होईल.
  • RCOM आपण इशू केलेल्या NCD ( नॉन कॉनव्हरटीबल डिबेंचर्स) चे पेमेंट वेळेवर करू न शकल्यामुळे आपल्या कर्जाच्या परतफेडीत DEFAULT करेल असे वाटत आहे अशा बातमीमुळे RCOMचा शेअर सार्वकालिक (लाईफ टाईम) किमान पातळीवर आला. कंपनीने सांगितले आहे की आम्ही नॉन कोअर ASSET विकून लवकरच कर्जात कपात करू. R COM चे एकूण कर्ज Rs ४०००० कोटींपेक्षा जास्त आहे. २ जून २०१७ रोजी झालेल्या कर्ज देणाऱ्या बँकांच्या बैठकीत कंपनीच्या SDR ला सैद्धांतीक मंजुरी दिली गेली. आणी ३ आठवड्याच्या आत याला अंतिम मंजुरी दिली जाईल असा निर्णय घेतला गेला. कंपनीला सप्टेंबर २०१७ पूर्वी Rs २५००० कोटी एवढी कर्जाची परतफेड करायची आहे.
  • BILT (बल्लारपूर इंडस्ट्रीज LTD) आणी पंजाब अल्कली या दोन्ही कंपन्या कर्ज देणाऱ्या बँकांना ५१% शेअर्स देणार आहेत. या कंपन्या कर्ज देणाऱ्या बँका टेकओव्हर करतील.
  • ‘रावा’ फिल्डच्या विस्तार योजनेसाठी वेदान्ता या कंपनीला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
  • JSW स्टील ही कंपनी ‘उत्तम गाल्वा’ या कंपनीला खरेदी करेल अशी मार्केटमध्ये बातमी आहे.
  • SJVN (इतर इन्कम Rs ८४ कोटी), महिंद्र आणी महिंद्र,बर्जर पेंट्स, हिंदाल्को, कोलते पाटील, युनायटेड स्पिरीट MOIL, SAIL, टाटा ग्लोबल, एवरेस्ट कान्टो, IRB INFRASTRUCTURE यांचे निकाल चांगले आले.
  • ओरीएंट सिमेंट ही कंपनी JAYPEE ग्रुपचे भिलाई आणी निगरी येथील प्लांट Rs १९४६ कोटींना विकत घेणार आहे. हे डील मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल.
  • एव्हरेडी आणी MaCLEOD रसेल यांनी आपापसात करार केला आहे. त्यामुळे आता चहा आणी BATTERY सेल यांची विक्री एकत्र होताना दिसेल.
  • मारुती आणी अशोक LEYLAND याची निर्यात LATIN अमेरिका आणी नायजेरिया यातील अशांतीमुळे कमी झाली. बजाज ऑटोची विक्री १०% तर निर्यात ३% घटली.
  • SAIL ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी आपले ३ प्लांट जुन २०१७ मध्ये विकणार आहे.

कॉर्पोरेट एक्शन

  • इगारशी मोटर्स ही कंपनी ‘AGILE ELECTRIK SUB ASSEMBLY PVT LTD’ ह्या कंपनीला आपल्यात मर्ज करणार आहे. या कंपनीच्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या जवळ असलेल्या ‘AGILE’ च्या ३२३ शेअर्स साठी इगारशी मोटर्सचे ८८ शेअर्स मिळतील. या मर्जरनंतर पब्लिक शेअरहोल्डिंगचे नॉर्म्स पुरे करण्यासाठी जेव्हढे शेअर्स इशू करण्याची जरुरी असेल तेवढे शेअर्स कंपनी पब्लिक शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स म्हणून इशू करेल याचा रेशियो आणी रेकॉर्ड डेट नंतर जाहीर केली जाईल.
  • लॉइड इलेक्ट्रिकल एन्ड इंजिनीअरिंग या कंपनीने फायनल लाभांश Rs १.५० आणी विशेष लाभांश म्हणून प्रती शेअर Rs २० मिळून एकूण Rs २१.५० लाभांश जाहीर केला.
  • सिटी युनियन बँकेचा निकाल चांगला आला. बँकेने १:१० या प्रमाणात बोनस जाहीर केला. तुमच्या जवळ १० शेअर्स असतील तर तुम्हाला १ शेअर बोनस मिळेल.
  • लार्सेन आणी टूब्रोचा निकाल चांगला आला. नफा ७% तर विक्री १२% ने वाढली. कंपनीने Rs २१ प्रती शेअर लाभांश आणी १:२ या प्रमाणात बोनस जाहीर केला.
  • BPCL या कंपनीने १:२ या प्रमाणात बोनस जाहीर केला.
  • नेस्को या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने Rs ११ प्रती शेअर लाभांश आणी एका शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट जाहीर केले.
  • जिंदाल पॉली ही कंपनी Rs २००० कोटी खर्चून DTF या कंपनीचा युरोपिअन बिझिनेस ही कंपनी विकत घेणार आहे.
  • प्रिकॉल ही कंपनी PMP ऑटोचे अधिग्रहण करेल.
  • डिसेंबर २०१७ च्या आसपास ONGC, HPCL ही ऑईलमार्केटिंग कंपनी US$४५० कोटींना विकत घेईल.
  • BAYER क्रॉपकेम ह्या कंपनीने BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे..
  • भारती एअरटेल आणी टेलेनॉर यांच्या मर्जरला सेबी आणी STOCK एक्सचेजनी मंजुरी दिली. आता NCLTची मंजुरी मिळणे बाकी आहे.
  • द्वारीकेश शुगर या कंपनीने आपल्या एका शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिट केले.

स्प्लिट, बोनस, लाभांश BUY BACK या सर्व कॉर्पोरेट एक्शनची खुलासेवार माहिती माझ्या पुस्तकात मिळेल. त्यामुळे शेअरमध्ये ट्रेडिंग गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे सोपे जाईल

या आठवड्यातील लिस्टिंग

  • या आठवड्यात PSP प्रोजेक्ट्स चे लिस्टिंग झाले लिस्टिंग Rs १९९ वर झाले. कंपनीने ज्या किंमतीला IPO मध्ये शेअर्स दिले होते त्या किंमतीपेक्षा कमी किमतीला लिस्टिंग झाले.

नजीकच्या काळात येणारे IPO

  • GTPL HATHWAY ही केबल टी व्ही आणी BROAD BAND सेवा क्षेत्रात काम करणारी कंपनी जून महिन्यात IPO द्वारे Rs ६०० कोटी उभारेल. ही कंपनी या सेवा देशातील १६९ शहरात पुरवते.

मार्केटने काय शिकवले

आकडेवारी डोळसपणे पहा. विदेशी लोक इंडेक्स फ्युचर्समध्ये खरेदी करीत आहेत, आणी STOCK फ्युचर्स विकत आहेत. याचा अर्थ असा की ज्या मोठ्या मोठ्या शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक असते त्यांचे निकाल समाधानकारक नाहीत किंवा त्यांच्या अपेक्षेच्या पातळीवर उतरले नाहीत. बँक निफ्टीची पोझिशन कमजोर आहे. तेजीवाले निफ्टी ९६०० च्या वर ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत तर मंदीवाले निफ्टी ९६०० च्या खाली खेचत आहेत.

JP ASSOCIATES किंवा इतर JP ग्रुपचे शेअर, किंवा RCOM, त्यांच्यावर असलेल्या कर्जाची या कंपन्या  वेळोवेळी परतफेड करू शकत नसल्यामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या शेअर्सची किंमत किमान स्तरावर पोहोचली आहे. लोकांना आता हे शेअर्स खूपच स्वस्त झाले आहेत म्हणून घ्यावेसे वाटतात. ते या बाबतीत मला सल्ला विचारतात. ते म्हणतात लॉटरीचे तिकीट समजून घ्यावे अशा विचारात होतो. त्याना किंगफिशरची आठवण करून द्यावीशी वाटते. शेअर स्वस्त मिळतो आहे किंवा शेअर खूप पडला आहे हे खरेदीचे कारण असू शकत नाही. कंपनीच्या, उद्योगाच्या, अर्थव्यवस्थेच्या मुलभूत परिस्थितीत जर काही चांगले बदल होणार असतील तरच असे शेअर खरेदी करावेत. नाहीतर हळू हळू शेअरची किंमत कमी कमी होत किंमत येणे बंद होते. खूप कर्ज असलेल्या कंपन्यांच्या शेअर्स पासून नेहेमी दूर रहावे

सध्या मार्केट्ची चाल लक्ष देण्यासारखी आहे. मार्केट एक पाउल मागे येते आणी २ पाउले पुढे जात आहे. मार्केट वाढण्याचा वेग कमी झाला आहे.

ऑटो विक्रीचे आकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजेत. GST लागू होणार असल्यामुळे कोणालाही इंव्हेंटरी ठेवण्यात इंटरेस्ट नाही. कंपन्या मोठ्या प्रमाणावर किंमतीत सूट देऊन असलेली इंव्हेंटरी विकून टाकतील. त्यामुळे विक्रीचे आकडे चांगले दिसतील.पण प्रॉफीट मार्जिन कमी होईल. ग्राहकसुद्धा मोठी सुट मिळत असल्यामुळे आपली खरेदी प्रीपोन करतील. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जुलै-ऑगस्ट २०१७ मध्ये ऑटो विक्रीचे आकडे चांगले असणार नाहीत असे वाटते.

१ जुलैपासून GST लागू होणार आहे. त्यामुळे B2C(बिझिनेसTO CUSTOMER) विभागात बरीच हालचाल दिसते. मिडकॅप फंड आणी BALANCED फंड यामध्ये लोकांचा पैसा जास्त येत आहे. म्हणून मिडकॅप महाग झाले आहेत. पण हा ट्रेंड बदलेल असे वाटते. म्युच्युअल फंडांना ज्या साठी पैसा येतो त्यातच तो गुंतवावा लागतो. IT, फार्मा, FMCG या क्षेत्रात १८% ते २०% CAGR ग्रोथ होती. परंतु आता देशी तसेच विदेशी सरकारचे कायदेकानू, वाढती स्पर्धा, यामुळे या सेक्टरच्या  प्रगतीवर आणी पर्यायाने या सेक्टरमधील गुंतवणुकीत बदल होतो आहे.

मार्केट थकल्यामुळे विसावा घेत आह्रे. तुम्ही सुद्धा थोडे थोडे प्रॉफीट बुकिंग करा आणी योग्य संधीची वाट पहा

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१२७३ तर NSE निर्देशांक ९६५३ या लाईफ टाईम हाय वर बंद झाले.

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – नाच नाचूनी अती मी दमले – २९ मे ते २ जून

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – शेअरमार्केट मंगळावर – ५ जून २०१७ ते ९ जून २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s