आठवड्याचे समालोचन – शेअरमार्केट मंगळावर – ५ जून २०१७ ते ९ जून २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जीवसृष्टीच्या शोधात माणूस मंगळावर पोहोचला तसे प्रॉफीटच्या शोधात शेअर मार्केटचे निर्देशांक ब्लू स्काय प्रदेशात पोहोचून मंगळ आणी त्याही पलीकडील ग्रह पादाक्रांत करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. त्यासाठी ९६% मान्सूनची शक्यता, ग्रामीण भागात वाढणारी मागणी, आणी GSTचे १ जुलै २०१७ पासून लागू होणे आणी कमी होणारी महागाई, जागतिक शेअरमार्केटमध्ये येणारी तेजी, क्रूडची कमी होणारी किंमत आणी केंद्रीय सरकारची इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणारी गुंतवणूक अशी एका मागून एक याने सोडली जात आहेत. निफ्टी ९६६० वर तर सेन्सेक्स ३१००० वर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडी 

  • PARIS करारातून बाहेर पडण्याचा निर्णय ट्रम्प यांना बदलावा लागेल असे दिसते. पण USA या करारातून २०२० पर्यंत बाहेर पडू शकत नाही असे तज्ञाचे मत आहे. USA मधील सर्व उद्योग PARIS करारातील सर्व अटींचे पालन करून सुरु आहेत.
  • ECB ने आपल्या दरात कोणतेही बदल केले नाहीत.
  • UK मधील सार्वत्रिक निवडणुकात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे ‘HUNG’ पार्लमेंट स्थापन होईल.

सरकारी अन्नौंसमेंट 

  • GST चा दर सोन्यावर आणी ज्युवेलरीवर ३% तर रफ डायमंड्स वर ०.२५% लागणार आहे. याचा फायदा PC ज्युवेलर्स, टायटन, गीतांजली जेम्स, TBZ अशा कंपन्यांना होईल.
  • टेक्स्टाईलवर ५%, रेडीमेड गारमेंट्स वर १२%, नैसर्गिक यार्नवर ५% आणी मानवनिर्मित यार्नवर १८% GST लागेल. याचा फायदा गोकुळदास एक्स्पोर्ट,मॉनटे कार्लो, सेंच्युरी, अरविंद, रेमंड, बॉम्बे डाईंग इत्यादी कंपन्यांना होईल.
  • सर्वप्रकारच्या बिस्किटांवर १८% GST तर ट्रेडमार्कवाल्या PACKAGED फूडवर ५% GST लागेल.
  • Rs ५०० पेक्षा कमी किंमत असलेल्या पादत्राणांवर ५% तर Rs ५०० पेक्षा जास्त किंमत असणाऱ्या पादत्राणांवर १८% GST लागेल.
  • बिडीसाठी वापरण्यात येणाऱ्या पानांवर १८% तर बिडीवर २८% GST लागेल. सोलार एनर्जीवर ५% GST आकारणार आहेत. याचा फायदा WEBSOL एनर्जी या कंपनीला होईल.
  • GST लागू झाल्यानंतर सिरामिक सेक्टर मधील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना संघटीत क्षेत्रात सामील व्हावे लागेल. त्यामुळे आता संघटीत क्षेत्राला असंघटीत क्षेत्रापासून होणारी स्पर्धा कमी होईल. याचा फायदा कजारिया सेरामिक्स, मुरुडेश्वर, सोमाणी, निटको या कंपन्यांना होईल.
  • GST मुळे QUICK RESTARAUNT चा फायदा होईल. त्यामुळे वेस्टलाईफ DEVELOPEMENT आणी जुबिलीयंट सारख्या कंपन्यांना फायदा होईल.
  • बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक आपल्या सबसिडीअरिज मधील स्टेक विकून भांडवल उभारणार आहे.
  • २४ कॅरेट सोन्याच्या निर्यातीवर सरकार बंदी आणण्याच्या विचारात आहे.
  • आतापर्यंत फक्त ५ शहरांमध्ये रोजच्या रोज पेट्रोल आणी डीझेलच्या किंमती ठरवण्याचा प्रयोग पायलट तत्वावर चालू होता. यालाच डायनामिक प्राइसिंग असे म्हणतात. हा प्रयोग यशस्वी होतो आहे असे आढळून आल्यामुळे आणखी काही शहरात १६ जून २०१७ पासून रोजच्या रोज पेट्रोल आणी डीझेलच्या किमती जाहीर केल्या जातील. त्यामुळे ऑईल मार्केटिंग कंपन्यांना होणारा तोटा कमी होईल.
  • सरकार पर्यटन आणी वेलनेस पोलिसी जून २०१७ मध्ये जाहीर करेल. या बाबत विविध भारतीय दूतावासाकडून माहिती मागवली आहे. ‘हेल्थ अंड वेल्थ साथ साथ’ या धोरणाखाली मेडिकल पर्यटन पोलिसी जाहीर होणार आहे.
  • उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी’ एक समिती नेमण्यात आली आहे. या संदर्भातील सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न ही समिती करेल.
  • सरकार हायड्रोपॉवर सेक्टरला Rs १६००० कोटींचे PACKAGE देण्याच्या विचारात आहे. याचा फायदा NHPC आणी SJVN यांना होईल.
  • शिक्षणासाठी रोख रकमेचा उपयोग करू नये अशा प्रकारच्या सुचना सरकारने दिल्या आहेत.
  • सरकार तंबाखू आणी तंबाखूशी संबंधीत कंपन्यातील आपला स्टेक विकण्याच्या विचारात आहे.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था 

RBI दर दोन महिन्यांनी आपले वित्तीय धोरण जाहीर करते. या मध्ये RBI अर्थव्यवस्थेच्या वर्तमान परिस्थितिचा आढावा घेते. आणी येणार्या नजीकच्या काळातील अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर भाष्य करते. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे काम RBI चे तर ग्रोथ बघण्याचे काम सरकारचे असते.  यावेळी RBI ने २०१७ -२०१८च्या पुर्वार्धासाठी २%-३.५% (आधीचा अंदाज ४.५%) तर उत्तरार्धासाठी ३.५% ते ४.५% (आधीचा अंदाज ५%) महागाईचा दर असेल असे भाष्य केले आहे. पण RBI ने सरकारी नोकरांच्या हातात येणारी पगारवाढीची थकबाकी आणी ग्रामीण भागात वाढणारे मजुरीचे दर यामुळे महागाईच्या बाबतीत सावध राहावे लागेल असे सुचवले. तसेच RBI ने भारताच्या प्रगतीचा वेग आर्थिक वर्ष २०१८ साठी ७.३% असेल असे सांगितले. RBI ने असे सांगितले की आम्ही GST लागू झाल्यानंतर होणार्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत. तसेच वारंवार राज्य सरकारांनी कर्जमाफी केल्यास आतापर्यंत पाळलेली फिस्कल शिस्त धोक्यात येऊ शकते.

या पॉलिसीद्वारे RBI रेपो रेट (या दरावर RBI बँकांना कर्ज देते) आणी रिव्हर्स रेपो रेट (या दरावर बँका त्यांच्या कडील शिलकी पैसा RBI कडे ठेवू शकतात.) तसेच CRR (कॅश रिझर्व रेशियो, या रेशियोप्रमाणे प्रत्येक बँकेला RBI कडे आपल्या एकूण डीपॉझीटच्या एक निश्चित परसेंटेज कॅश रिझर्व ठेवावे लागतात.), SLR (STATUTORY लिक्विडीटी रेशियो) या रेशियो प्रमाणे प्रत्येक बँकेला दिवसाच्या शेवटी आपल्या एकूण डिमांड आणी टाईम लायबिलीटीजचे एक निश्चित पर्सेंटेज लिक्विड ASSETS (सोने, किंवा इतर मंजूर केलेल्या सिक्युरिटीज) च्या स्वरूपात रिझर्व म्हणून RBI कडे ठेवाव्या लागतात.तसेच RBI बँकांना तातडीची मदत म्हणून MSF (MARGINAL STANDING FACILITY) देते. या सर्व गोष्टींवर RBI आपला दृष्टीकोन सांगते आणी आवश्यक  असेल तसे बदल करते.

या वेळच्या पॉलिसीत RBI ने रेपो रेट (६.२५%), रिव्हर्स रेपो रेट (६%) CRR (४%) आणी MSF रेट(६.५%) या   मध्ये काही बदल केला नाही. SLR मात्र कमी करून २४ जून २०१७ पासून  २०% (२०.५% वरून) केला. अशा प्रकारे बँकांना जास्त फंड्स उपलब्ध करून दिले. यामुळे हौसिंग सेक्टरसाठी जास्त फंड्स उपलब्ध होतील. याचा BACKWARD आणी FORWARD परिणाम होतो. घरबांधणीसाठी लागणाऱ्या सामानाची (उदा सिमेंट स्टील, पाईप्स) मागणी वाढेल आणी कुशल आणी अकुशल कामगारांसाठी रोजगार उपलब्ध होईल..

बँका निरनिराळ्या प्रकारची कर्जे देत असतात. त्या कर्जाच्या परतफेडीच्या (कर्जाचा हफ्ता आणी कर्जावरील व्याज)  परिस्थितीप्रमाणे आणी त्या कर्जासाठी उपलब्ध असलेल्या सिक्युरिटीवर आधारीत RBI त्या कर्जांचे वर्गीकरण करते आणी प्रत्येक कर्जासाठी बँकांना त्यांच्या नफ्यातून एक निश्चित पर्सेंटेज प्रोविजन करायला सांगते. जशी जशी कर्जाच्या परतफेडीची अवस्था बिघडत जाते तसे तसे प्रोविजनचे पर्सेंटेज वाढत जाते. ज्यावेळी कर्ज (लॉस ASSETS) निश्चित बुडणार अशी परिस्थिती येते तेव्हा कर्ज आणी त्यावरील व्याज यासाठी १००% प्रोविजन करावी लागते.

ज्या कर्जांची मुद्दल आणी व्याज यांची परतफेड नियमित असते आणी पुरेशी सिक्युरिटी उपलब्ध असते अशा कर्जांना STANDARD ASSETS असे म्हणतात. बँकांनी दिलेल्या आणी STANDARD ASSET म्हणून वर्गीकृत केलेल्या हौसिंग लोनवरील प्रोविजनचा रेट ०.४०% वरून ०.२५% केला. तसेच RBI ने प्रत्येक कर्जासाठी ‘RISK WEIGHT’ ठरवलेले असते.बँका RISK ADJUSTED RETURN या धोरणानुसार हौसिंग कर्जावरील व्याज दरामध्ये बदल करू शकतील. याला आपण प्रत्येक कर्ज देताना परतफेडीबाबत असलेल्या धोक्याची पातळी म्हणू शकतो. LOAN-TO-VALUE रेशियो म्हणजे सिक्युरिटी म्हणून ठेवलेल्या घराच्या किंमतीच्या प्रमाणात बँक किती जास्तीतजास्त कर्ज देऊ शकते.हे सांगणारा रेशियो होय. जर हौसिंग कर्जाची रक्कम Rs ७५ लाखापेक्षा जास्त असेल आणी LTV ७५% पेक्षा जास्त असेल तर RBI ने RISK WEIGHT ५०% (आधी ७५% होते) आणी जर हौसिंग कर्जाची रक्कम Rs. ३० लाख ते Rs ७५ लाख असेल आणी LTV ८०% पेक्षा जास्त असेल तर RISK WEIGHT ३५% (आधी ५०% होते) एवढे कमी केले. या दोन्हीमुळे बँका हौसिंग लोन वरील व्याज दर कमी करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • ल्युपिन ही फार्मा क्षेत्रातील सुस्थापीत कंपनी. या कंपनीच्या इंदोर प्लांटमधील USFDA ने दाखवलेल्या त्रुटी कंपनीने अद्याप दुरुस्त केल्या नाहीत. या त्रुटी उत्पादनाची आणी त्यावरील कंट्रोल्सची रेकॉर्ड्स पुरी करण्याच्या बाबतीत आहेत.
  • गुजरात पिपावाव पोर्ट ह्या भारतातील पहिल्या खासगी पोर्टमधील आपला ४३.१% स्टेक APM TERMINALS यांनी विकायला काढला आहे. या स्टेकची VALUE Rs २९८५ कोटीपर्यंत होईल असा अंदाज आहे.
  • व्हीव्हीमेड LABS या कंपनीच्या स्पेन मधील युनिटच्या निरीक्षणात USFDA ला काहीही त्रुटी आढळल्या नाहीत.
  • CADILA हेल्थकेअर या कंपनीच्या बद्दी युनिटला EIR मिळाला. याचा अर्थ USFDA ने ज्या त्रुटी नोंदवल्या होत्या त्याकडे लक्ष देऊन कंपनीने त्यात सुधारणा केल्या.
  • जेट एअरवेज ७५ विमाने खरेदी करणार आहे.
  • युनायटेड स्पिरीट या कंपनीने सांगितले की येत्या ४ वर्षात कंपनी आपल्यावरील कर्ज ५०% ने कमी करेल आणी वर्किंग कॅपिटलही कमी करेल.
  • स्ट्राईडस शसून या कंपनीला त्यांचे बँगलोर युनिट तपासल्यावर फॉर्म नंबर ४८३ इशू केला. यात ३ त्रुटी दाखवल्या.
  • युनिकेम LAB च्या गाझियाबाद युनिटला USFDA कडून EIR(ESTABLISHMENT INSPECTION REPORT) मिळाला.
  • BSNL संचार मंत्रालयाबरोबर २५००० WAI FAI बसवण्यासाठी MOU  करणार आहे. यातील बहुतेक साधनसामुग्री ITI तयार करीत असल्यामुळे ITI (इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज) चा शेअर वाढला.
  • टाटा कम्युनिकेशन लवकरच LAND डीमर्जर करणार आहे. याबाबतीत कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पुढील आठवड्यात निर्णय घेतील. कंपनी ही जमीन विकून आलेला पैसा स्पेशल लाभांशाच्या स्वरूपात शेअरहोल्डर्सना देईल.
  • इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक सदस्य आणी प्रमोटर्स आपला १२.७५% स्टेक (VALUE Rs २८००० कोटी) विकून टाकण्याच्या विचारात आहेत. कंपनीच्या वर्तमान व्यवस्थापनाबरोबर झालेल्या बेबनावाचा हा परिणाम आहे.

 कॉर्पोरेट एक्शन 

  • PC ज्युवेलर्सच्या बोनसची रेकॉर्ड डेट ७ जुलै २०१७ तर बायोकॉनच्या बोनसची रेकॉर्ड डेट १७ जून आहे.
  • HCL टेक चा BUY BACK १२ जून ते २३ जून पर्यंत चालू राहील.
  • BAYER CROP CHEM ही कंपनी Rs ४९०० प्रती शेअर या भावाने २.८९% शेअर्स Rs ५०० कोटी खर्च करून BUY BACK  करणार आहे.
  • SBI चा QIP मंगळवारी तारीख ६ज्ञून  २०१७ रोजी आणणार आहे. यात ५०% हिस्सा LIC विकत घेणार आहे. शुक्रवारी हा QIP ओव्हरसबस्क्राईब झाला.
  • कॅनफिना होम्सने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक STOCK SPLIT वर विचार करण्यासाठी २३ जून २०१७ रोजी  बोलावली आहे.

या आठवड्यातील लिस्टिंग

  • या आठवड्यात इंडिया पॉवर ग्रीडच्या InVIT चे लिस्टिंग झाले इशू प्राईस Rs १०० असलेल्या InVIT चे लिस्टिंग Rs ९९.०२ ला झाले.
  • नजीकच्या काळात येणारे IPO ICICI लोम्बार्डला IPO साठी परवानगी मिळाली आहे. ICICI त्यांचा स्टेक कमी करणार आहेत.
  • IREDA( INDIAN RENEWABLE ENERGY DEVELOPMENT AGENCY) चा IPO आणून २५% विनिवेश करायला परवानगी दिली. १३.९ कोटी शेअर्स इशू होतील.
  • तेजस नेटवर्क्स या कंपनीचा IPO पुढील आठवड्यात जून १४ ते जून १६ या दरम्यान येत आहे. IPO चा प्राईस BAND Rs २५० ते Rs २५७ आहे. कंपनी या IPO प्रोसीड्सचा उपयोग विस्तार योजनेसाठी करील.
  • रिलायंस म्युच्युअल फंड त्याचा फंडाचे डोमेस्टिक STOCK एक्स्चेंजवर लिस्टिंग करेल. NIPPON ASSET MANAGEMENT त्यांचा म्युच्युअल फंडातील १०% स्टेक विकेल.

मार्केटने काय शिकवले 

TCS चा BUY BACK ३१ मे ला पूर्ण झाला. शेअरहोल्डर्सनी आणी प्रमोटर्सनी BUY BACK मध्ये शेअर्स दिले. कंपनीने सुद्धा शेअर्स BUY BACK केले. सर्व BUY BACK केलेल्या शेअर्सची रकम शेअरहोल्डर्सच्या खात्यामध्ये ५ जून २०१७ ला जमा झाली  त्यामुळे गुंतवणूकदार खुश झाले. त्यामुळे शेअर्सची संख्या कमी झाली, BALANCESHEET ची गुणवत्ता वाढली, EPS वाढले, ROE वाढला. म्हणून शेअर Rs २०० नी वधारला. कॉर्पोरेट एक्शन आणी त्याचा फायदा याविषयी माझ्या पुस्तकात खुलासेवार वाचायला मिळेल. याविरुद्ध BAYER CROP CHEM ने कमी प्रीमियमवर BUY BACK घोषित केल्यामुळे शेअर पडला

काही शेअर्समध्ये सर्क्युलर ट्रेडिंग चालू असावे असे वाटते म्हणून ED ची नजर आहे. तर काही शेअर्स कारण नसताना वाढले तसेच कारण नसताना पडले. हे शेअर्स बहुधा सर्किट ते सर्किट वाढतात आणी त्याच पद्धतीने पडतात. असे शेअर्स सेबीच्या निरीक्षणाखाली असतात. स्वस्त मिळतात म्हणून असे शेअर्स विकत घेऊन फसू नका.

जेव्हा मोठे मोठे फंड काही कंपन्यांचे शेअर्स नोठ्या प्रमाणात खरेदी करतात त्याकडे लक्ष ठेवावे. सध्या अशी खरेदी पर्सिस्टंट आणी CYIENT या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली.

गाडी मोशनमध्ये असेल, निश्चित सिग्नल नसेल तर जात आहे त्याच दिशेत पुढे जात राहते. त्यामुळे मार्केट हळू हळू का होईना वाढत आहे. पण वाढणारे शेअर्स आणी कमी होणारे शेअर्स यांचा रेशियो पाहिल्यास तो एकास तीन या प्रमाणात आहे. कधी कधी यापेक्षाही हे प्रमाण जास्त आढळते. सामान्य माणसाला मार्केट जोरात पडल्याशिवाय अल्पावधीसाठी मंदी येऊ घातली आहे हे समजत नाही. त्यामुळे प्रॉफीट बुकिंग हेच सूत्र अवलंबले पाहिजे. मार्केट जरी मंगळाचा शोध घेत वर वर चालले असले तरी श्वसनासाठी पुरेशी हवा नसेल तर माघारी यावे लागते व घुसमट होते. त्याचप्रमाणे वेळेवर विकता न आल्यामुळे पुन्हा तो भाव आला नाही तर घुसमट होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१२७२ वर तर NSE  निर्देशांक निफ्टी ९६६७ वर बंद झाले.

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – शेअरमार्केट मंगळावर – ५ जून २०१७ ते ९ जून २०१७

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – लग्नाला यायचं हं – १२ जून २०१७ ते १६ जून २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s