आठवड्याचे समालोचन – लग्नाला यायचं हं – १२ जून २०१७ ते १६ जून २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

सरकारनी GST च्या विवाहाचा मुहूर्त १ जुलै २०१७ हा ठरवला आहे. जय्यत तयारी चालू आहे. कुणाचा मानपान कसा करायचा म्हणजेच कोण रूसेल आणी काय काय सवलती मागेल याचा विचार करून योग्य तिथे,योग्य तेवढा  मान राखला जात आहे. काही व्यापारी ‘अजुनी रुसून आहे’ या थाटात आमची तयारी झाली नाही म्हणून हरताळ करीत आहेत. हा मुहूर्त लाभणार नाही असे म्हणत आहेत. तारीख १ सप्टेंबर २०१७ पर्यंत पुढे ढकला असे सांगत आहेत. पण GST चे बाशिंग बळ नाही आहे. 10 वर्षे खटपट केली आणी हा मुहूर्त जुळून आला. त्यामुळे सरकार आता आणखी वाट पहायला तयार नाही. सरकारने कंबर कसली आहे. काही मानकरी ‘आम्ही नाही जा’ च्या थाटात आज तयारी नाही असे सांगून दुसऱ्या दिवशी आम्ही तयार आहोत असे सांगत आहेत. कोणी लग्नाला या ‘आलात तर तुमच्या उपस्थितीत, नाही आलात तर तुमच्या अनुपस्थितीत, आणी वेळ आली तर तुमच्याकडे थोडे दुर्लक्ष करून’ पण आम्ही हे लग्न १ जुलै २०१७ रोजीच करणार असा सरकारचा दृढ निश्चय आहे. ज्यांचे रुसवे फुगवे काढायचे राहतील त्यांना सत्यनारायणाच्या दिवशी बोलावून त्यांचा मान पान करू. याचसाठी GST कौन्सिलने आपले दरवाजे कोणत्याही सुचना, प्रस्ताव यांचे स्वागत करण्यासाठी खुले ठेवले आहेत. आता मार्केटमधील गुंतवणूकदार, ट्रेडर्स यांच्या हातात काय तर ‘शुभ मंगल सावधान’ असे म्हणून अक्षता टाकणे एवढेच राहिले आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी 

 • USA FED ने असे जाहीर केले की USA अर्थव्यवस्थेतील वाढ आणी सतत सुधारत असलेले जॉब मार्केट यामुळे आपण व्याजाचे दर २५ बेसिस पॉईण्ट (०.२५%) वाढवीत आहोत. तसेच आम्ही आमच्याकडे असलेले बॉंडस आणी सेक्युरिटीजचे होल्डिंग कमी करू. फेडने गेल्या तीन महिन्यात व्याजदरात केलेली ही दुसरी वाढ आहे.
 • USA दर महिन्याला US$१०अब्जचे बोंन्द्स विकणार आहे सध्या मार्केटमध्ये सुरु असलेली RALLY लिक्विडीटीमुळे चालू आहे. बॉंड विक्रीमुळे लिक्विडीटी कमी होईल असे वाटते आहे. परिस्थितीमध्ये बदल होतो आहे. सध्या तरी मार्केटमध्ये फारशी कमजोरी दिसत नाही.
 • बँक ऑफ इंग्लंड ने आपल्या बँक रेट मध्ये काहीही बदल केला नाही. तो ०.२५% वर ठेवला.

सरकारी अन्नौंसमेंट

 • अर्थमंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या कंसॉलिडेशनवर विचार चालू आहे असे सांगितले.
 • त्यांनी सांगितले की RBI लवकरच ज्या NPA खात्यांवर IBC (INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE) अंतर्गत कारवाई करायची आहे अशा NPA  खात्यांची यादी बनवत आहे.
 • सायबर थ्रेटचा धोका कमी करण्यासाठी फायनान्सिअल इमर्जन्सी रीसपॉन्स टीम तयार करणार आहे.
 • GST कौन्सिलने सामान्य माणसाच्या उपयोगात येणाऱ्या बऱ्याच गोष्टींवरचा GST चा रेट कमी केला. लोणची, केचप, सॉसेस यावर १२%, काजू, उदबत्ती, इन्शुलीन यावर ५% तर स्टीलची भांडी, वह्या यावर १२%, स्कूल बॅंगावर १८% GST आकारला जाईल असे जाहीर केले.
 • RESTAURANT, MANUFACTURERS आणी ट्रेडर्स यांना कॉम्पोझिट योजनेखाली येण्यासाठीची मर्यादा वाढवून Rs ७५ लाख केली.
 • राज्यामागून राज्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी जाहीर करत आहेत. त्यात आपलाही वाटा असावा म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०१८ साठी ‘इंटरेस्ट सबवेंशन स्कीम जाहीर केली. या योजनेद्वारे जो शेतकरी Rs ३,००,००० पर्यंतचे पीककर्ज १ वर्ष मुदतीने  घेईल त्याला ५% व्याज सरकार परत करेल. सरकार यासाठी Rs १९००० कोटी खर्च करेल.
 • मंत्रिमंडळाने फायनांसियल रेझोल्युशन आणी डीपॉझीट इन्शुरन्स बिल २०१७ मंजूर केले. यामुळे बँका आणी इतर फायनांसियल सेक्टर आणी इन्शुरन्स कंपन्यांसाठी INSOLVENCY आबी BANKRUPTCY कोड चे काम करेल.
 • ईंडीपेंडनट डायरेक्टर्सना काढण्याची प्रक्रिया सरकारने अधिक कडक करावी असे सेबीने सरकारला सुचवले आहे. यासाठी स्पेशल रेझोल्युशन आवश्यक करावे असा सेबीने उपाय सुचवला आहे.
 • अलाहाबाद बँक आणी PNB यांचे मर्जर होणार आहे. हे डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अल्लाहाबाद बँकेच्या ३ शेअर्ससाठी PNB चे दोन शेअर्स मिळतील. दोन्ही बँकांचे NPA ARC ला विकावे लागतील. PNB आपले नोन कोअर ASSET विकणार आहे.
 • देना बँकही कोणत्यातरी मोठ्या आणी सुस्थितीत असलेल्या बँकेत मर्ज होईल.
 • आज सरकारने जाहीर केले की सार्वजनिक क्षेत्रात फक्त ५ सरकारी बँका राहतील.
 • सरकारने शिपिंग कारभारातून पूर्णपणे बाहेर पडावे असे नीती आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे सरकार आपला SCI (शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मधून स्टेक विकून बाहेर पडेल. SCI चा उपयोग सरकार क्रूड आयात करण्यासाठी करीत असे. शिपिंग सेक्टरमध्ये आता खूप स्पर्धा आहे त्यामुळे या सेक्टरमधून सरकारने बाहेर पडावे असे नीती आयोगाने सुचवले. सरकार प्रथम २६% स्टेक विकेल आणी २ चरणात हे काम करेल.
 • सरकारने हायड्रोजन पेरॉक्साइड या केमिकलवर ANTI DUMPING ड्युटी बसवली आहे. याचा फायदा NATIONAL पेरॉक्साईड, HOCL, गुजराथ अल्कली या कंपन्यांना होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी  

 • मे महिन्यासाठी CPI (CONSUMER PRICE INDEX) २.१८% (एप्रिलमध्ये २.९९% ) झाले. महागाई कमी झाली कारण अन्नधान्य आणी भाजीपाल्याच्या किंमती कमी झाल्या. मान्सूनविषयी चांगले अंदाज वर्तविले जात असल्यामुळे जर अन्नधान्य आणी इतर पिके चांगली आली तर CPI आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
 • WPI(होलसेल प्राईस इंडेक्स) मे महिन्यामध्ये २.१७ % (एप्रिलमध्ये ३.८५%) एवढे कमी झाले. अन्नधान्य भाज्या आणी इतर सर्व सेक्टर मध्ये WPI कमी झाले. मान्सून चांगला होईल असा अंदाज असल्याने महागाई नियंत्रणामध्ये राहील असे वाटते.
 • एप्रिल २०१७ मध्ये IIP मध्ये वाढ ३.१%(मार्च मध्ये ३.७५%) झाली. MANUFACTURING सेक्टरमध्ये २.६% वाढ झाली
 • सोमवार १९ जून २०१७ पासून टाटा मोटर्स DVR आणी कोटक महिंद्र बँक सेन्सेक्स मध्ये सामील होईल आणी GAIL सेन्सेक्स मधून बाहेर पडेल.
 • RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था RBI ने सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकेवर PCA ( PROMPT CORRECTIVE ACTION) खाली कारवाई केली. लागोपाठ दोन वर्षे झालेला तोटा तसेच ROA(RETURN ON ASSETS) निगेटिव्ह आणी BAD लोन्सचे प्रमाण १६% वर गेल्यामुळे RBI ने ही कारवाई केली. या कारवाईमुळे लाभांश जाहीर करणे, नवीन शाखा उघडणे आणी काही इतर गोष्टींवर RBI चे नियंत्रण येते.
 • RBI ने १२ कंपन्यांविरुद्ध ज्यांच्याकडे एकूण NPA पैकी २५% कर्ज बाकी आहे त्यांच्या विरुद्ध INSOLVENCY आणी BANKRUPTCY कोर्टात कारवाई करायला सांगितली आहे. या १२ कंपन्यांमध्ये भूषण स्टील, भूषण पॉवर, LANCO इन्फ्राटेक, विडीओकॉन, jaypee ग्रूप, इस्सार, ABG शिपयार्ड, पुंज लॉइड, इलेक्ट्रोस्टील्स स्टील्स, अबन होल्डिंग्स, मोंनेट इस्पात, प्रयागराज पॉवर, एरा ग्रूप यांचा समावेश आहे.
 • या १२ अकौंटशिवाय ज्या कंपन्यांचे एकूण कर्ज Rs ५००० कोटी असून त्यापैकी ६०% कर्ज ३१-०३-२०१६ रोजी NPA असेल तर बँकांनी ताबडतोब कारवाई सुरु करावी. बँकांनी या अकौंटचे रेसोल्युशन सहा महिन्यात करायचे आहे. जर हा रेझोल्युशन प्लान नामंजूर झाला तर कंपनीच्या ASSETS चे लिक्विडेशन केले जाईल.
 • याची दुसरी बाजू म्हणजे बँकांच्या बॅंलन्सशीटची साफसफाई सुरु झाली. म्हणजे बँकांच्या आर्थिक स्थितीचे खरेखुरे चित्र लोकांसमोर येईल. त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय घेणे सोपे जाईल. कर बुडवणार्या लोकांनाच पुन्हा कर्ज मिळते याला लगाम बसेल. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे जर कर्ज भरले नाही तर तारण ठेवलेली मालमत्ता विकली जाईल.
 • सेबीने लोढा ग्रूपच्या मन्नन फिनसर्व या कंपनीकडे VASCON इंजिनिअरिंग या कंपनीबरोबरचे डील रद्द केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.
 • सेबीने असे कळवले आहे की बोनस शेअर्स जारी करायला उशीर झाला तर कंपनीला उशीर झालेल्या प्रत्येक दिवसासाठी Rs २०००० दंड भरावा लागेल.
 • रबर उत्पादन करणाऱ्यानी रबराचा पुरवठा कमी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रबराचे भाव वाढतील. टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे मार्जिन कमी होईल. त्यामुळे टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले.

खाजगी कंपन्याच्या घडामोडी

 • अशोक LEYLAND मध्ये हिंदुजा फौंड्रीचे मर्जर झाले.
 • डिजिटल सोल्युशन्ससाठी टीसीएसने अलिबाबा क्लौंउड बरोबर करार केला.
 • रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड आणी BP यांनी असे जाहीर केले की ते कृष्णा गोदावरी खोर्यातील नवीन GASFIELD मधून प्रती दिवशी ३० ते ३५ मिलियन क्युबिक मीटर GAS उत्पादन करण्यासाठी Rs ४०००० कोटीची गुंतवणूक करतील. त्यांनी असेही जाहीर केले की आम्ही वाहतुक आणी विमानाला लागणाऱ्या इंधनाच्या रिटेल सेक्टरमध्ये भागीदारी करू.
 • IPCA LAB या कंपनीला USFDA ने रतलाम सिल्वासा आणी इंदोर या प्लान्टसाठी इम्पोर्ट अलर्ट जाहीर केला. रतलाम येथील युनिटमध्ये उत्पादन बंद करायला सांगितले

कॉर्पोरेट एक्शन 

 • जयंत अग्रो या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला. तुमच्याजवळ एक शेअर असेल तर तुम्हाला एक बोनस शेअर मिळेल.
 • WARBURG PINCUS ग्रूप टाटा टेक्नोलॉजीमधील ३०% स्टेक टाटा मोटर्सकडून आणी १३% स्टेक टाटा कॅपिटलकडून असा एकूण ४३% स्टेक Rs २३२३ कोटींना विकत घेणार आहे. टाटा टेक्नोलॉजी ही कंपनी ब्लू चीप ऑटोमोटीव, एअरोस्पेस, आणी इंडस्ट्रीअल मशिनरी उत्पादकांसाठी काम करते.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • रिलायंस जनरल इन्शुरन्स ही रिलायंस कॅपिटलची १००% सबसिडीअरी आपला IPO आणणार आहे. या कंपनीची नेट वर्थ Rs १२५७ कोटी असून कंपनीने आपल्या प्रीमियममध्ये २०१७ मध्ये ४०% वाढ झाली. या वर्षीच्या अखेरपर्यंत या कंपनीचे लिस्टिंग होईल.
 • एरिस लाईफसायन्सेस या कंपनीचा IPO १६ जून २०१७ रोजी उघडून २० जून २०१७ रोजी बंद होईल.प्राईस Rs ६०० ते ६०३ आहे. ही फार्मा क्षेत्रातील १० वर्ष अस्तित्वात असलेली डेटफ्री कंपनी आहे. या कंपनीची प्रोडक्ट्स प्राईस कंट्रोल खाली नाहीत किंवा ही कंपनी निर्यात करीत नाही. ही कंपनी मुख्यतः कार्डियालॉजी आणी डायबेटीससाठी औषधे बनवते. पण कंपनीने हा इशू महाग किंमतीला आणला आहे. इशू साईझ  Rs २८८७५००० चा आहे आणी लोट साईझ २४ शेअर्सची आहे.
 • CDSL या डीपॉझीटरी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा IPO १९ जून पासून ओपन होत आहे. ही BSE या STOCK एक्स्चेंजची सबसिडीअरी आहे. प्राईस BAND Rs १४५ ते १४९ चा आहे. मिनिमम लॉट १०० शेअर्सचा आहे.
 • महिंद्रा लॉजिस्टीकच्या IPO ला सेबीची मंजुरी मिळाली.

तांत्रिक विश्लेषण

 • तांत्रिक विश्लेषणाच्या संदर्भात आपले लक्ष वेधावे असे काही लक्षात आल्यास मी आपल्याला सांगत असते.
 • ७ जून २०१७ ते १६ जून २०१७ या कालखंडातला बँक निफ्टीचा चार्ट पाहिल्यास तुम्हाला ‘हेड आणी शोल्डर’ PATTERNचा  ब्रेकडाऊन पहायला मिळतो. याविषयी अधिक माहिती मी माझ्या पुस्तकात दिली आहे.
 • या आठवड्यात ‘बेअरीश बेल्ट होल्ड’ PATTERN पहायला मिळाला.हा PATTERN अपवर्ड ट्रेंड सुरु असताना फॉर्म होतो. सुरुवातीची किंमत ही आदल्या दिवशीच्या बंद भावापेक्षा जास्त असते.
 • ओपनिंग प्राईस हीच त्या दिवशीच्या ट्रेडिंग सेशनची इंट्राडे कमाल किंमत असते. अपर SHADOW नसते. दिवसभर शेअर्स पडतात. लार्ज बॉडी आणी SMALL LOWER SHADOW असते. याचा अर्थ ‘लोअर हाय आणी लोअर लो’ असे चालू झाले.याचा अर्थ हायर लेव्हलवर बेअर्सची सत्ता चालते आहे ते बुल्सचा शिरकावं होऊ देत नाहीत. याचा अर्थ इन्व्हेस्टर सेंटीमेंट बदलते. बुलीशचे बेअरीश होते.. पण याची खात्री होण्यासाठी कमीतकमी ३ दिवसाच्या ट्रेडिंगचा विचार करावा.

मार्केटने काय शिकवले

एखादी बातमी आली तर शेअर्सच्या किमती वाढतात. वाढलेल्या भावाला विक्री होते म्हणजेच  ट्रेडर्स खरेदी करतात आणी गुंतवणूकदार प्रॉफीट बुकिंग करतात. म्हणजेच डीस्ट्रीब्यूशन चालू आहे. मिडकॅप SMALL कॅप मधून बाहेर पडून लार्ज कॅपमध्ये प्रवेश करायला मिळाला तर करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यामागून राज्ये शेतकऱ्यांची कर्ज माफ करत आहेत. यामध्ये राजकारणाचा विचार जास्त आणी अर्थशास्त्राचा विचार शून्य आहे. पण शेअर मार्केटचा स्वतःचा एक विचार असतो. कर्ज फेडण्याची वृत्ती नाहीशी होईल आणी नवे कर्ज मिळायला त्रास होईल. सरकारी बँकांची स्थिती आणखी खराब होईल या विचाराने मार्केट पडायला सुरुवात झाली. मी शेतीकर्जमाफी हे तात्कालिक कारण मानते. कारण मार्केट खूप वाढले आहे थकले आहे फक्त ट्रेडिंग सुरु आहे, पैसा खेळतो आहे. गुंतवणूकदार प्रॉफीट बुकिंग करत आहेत. ज्या लोकांना आपली बुल रनची संधी हुकली असे वाटत असेल त्याना थांबावेच लागेल. मार्केटला स्पष्ट दिशा नाही. विकण्याइतकी मंदी नाही खरेदीसाठी ट्रिगर नाही. मार्केट या आठवड्यात खूपच मर्यादित रेंजमध्ये कारभार करीत होते.

पंतप्रधानांचा USA चा दौरा २६ जून पासून सुरु होत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान IT आणी फार्मा क्षेत्रातील अडचणींबाबत बोलणी होतील असा अंदाज आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१०५६ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९५८८ वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

5 thoughts on “आठवड्याचे समालोचन – लग्नाला यायचं हं – १२ जून २०१७ ते १६ जून २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – योगाशी करा सहयोग तर साधेल योगायोग – १९ जून २०१७ ते २३ जून २०१७ | Stock Market आणि मी

 2. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – १९ जून २०१७ ते २३ जून २०१७ – योगाशी करा सहयोग तर साधेल योगायोग | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s