आठवड्याचे समालोचन -आशा सुटेना देव भेटेना – २७ जून ते ३० जून २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सलग सहा सिरीजची सांगता तेजीत झाल्यावर जूनच्या सिरीजची सांगता मंदीत झाली. १४०७९५८ कोटी एवढी रेकोर्ड उलाढाल गुरुवार तारीख २९ जुलै २०१७ रोजी झाली. जुलै सिरीजची सुरुवात मंदीने होणार हे उघडच. ज्या पोझिशन कॅर्री फॉरवर्ड झाल्या त्या मन्दीच्याच दिशेच्याच. म्हणजेच अनिश्चिततेचा व मार्केटचा ३६ चा आकडा आहे असेच म्हणावे लागेल. पूर्वी जेव्हा राजकीय अनिश्चितता होती तेव्हाही मार्केट असेच मंदीत  होते. पण सध्याची मंदी ही तात्पुरती आहे GSTचे बस्तान बसले की ही मंदी जाईल असा अंदाज आहे.

 

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये ओबामाकेअरच्या जागी दुसरी पॉलिसी येत असल्यामुळे DR रेड्डीज या कंपनीचे नुकसान होईल असे कंपनीने जाहीर केले.
 • पंतप्रधानांच्या USA दौऱ्यात एक प्रकारचे सौहार्दाचे वातावरण होते एनर्जी आदान प्रदान करण्यावर जोर दिला गेला. त्यांनी व्हिसा धारकांसाठीही बोलणी केली.
 • USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी USA च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अनुसरून ‘FAMILY’ ची व्याख्या बदलून जर बदललेल्या व्याखेप्रमाणे एखादा नातेवाईक USA मध्ये सध्या राहत असेल तरच लिबिया, इराण, सोमालिया, सुदान, सिरीया, येमेन या देशातील नागरिकांना नवीन व्हिसा देण्यात येईल आपणाला जर व्यवसायासाठी USA मध्ये यायचे असेल तर हे संबंध formal आणी WELL DOCUMENTED असले पाहिजेत.

सरकारी अन्नौंसमेंट

 • कॅनरा बँकेमध्ये देना बँक आणी विजया बँक यांचे मर्जर होणार आहे.
 • OFSच्या माध्यमातून RCF मधील आपली हिस्सेदारी सरकार ५% कमी करणार आहे. गुरुवार आणी शुक्रवारी OFS झाला ७.२% डीसकौंट वर हिस्सेदारी विकली. Rs ७४.२५ भाव ठरला. त्यावेळी मार्केट प्राईस Rs ८० होती.
 • एअर इंडियाच्या डायव्हेस्टमेंटला परवानगी मिळाली, एअर इंडियाला असलेले कर्ज मालमत्ता हॉटेल्स याविषयीचे निर्णय एक समिती घेईल.
 • हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशनसाठी शनिवारपासून बोली मागविली जाणार आहे लिलाव सुरु होणार आहे, याचा फायदा एक्सप्लोरेशन कंपन्या, ड्रीलिंग कंपन्या, पाईप उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांना होईल – ABAN डॉल्फिन जिंदाल SAW, महाराष्ट्र सीमलेस, ISMT जिंदाल ड्रिलिंग, GOL ऑफशोअर
 • ITDC ने त्यांची भोपाल आणी आसाम येथील हॉटेल्स राज्य सरकारांकडे सुपूर्द केली.
 • आता NELP बरोबरच HELP ही नवी पॉलिसी ऑईल आणी GAS क्षेत्रात येणार आहे.
 • नैसर्गिक वायुला GST च्या कक्षेत आणणार आहेत याचा फायदा टाईल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल. हेअर ऑईल वर पूर्वी २३%ते २४% कर आकारला जायचा. आता GST खाली १८% लागेल. याचा फायदा मेरिको ला होईल.
 • सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजाचे दर ०.१०% ने कमी केले. आता PPF वरील व्याजाचा दर ७.८% तर किसान विकास पत्रावर ७.५ % राहील.
 • सरकारने ७ व्या पे कमिशन ची सुधारीत भत्त्यांसाठी शिफारस मंजूर केली. यासाठी सरकार Rs ३०७८४ कोटी खर्च करेल.
 • १ जुलै २०१७ पासून सर्व वर्तमान ‘PAN’ धारकांना आपला PAN नंबर आधार कार्डा बरोबर लिंक करावा लागेल. हे आपण आयकर रिटर्न भरताना बँक अकौंट ओपन करताना आणी Rs ५०००० पेक्षा जास्त रकमेचे फायनांशियल TRANSACTION साठी आवश्यक आहे.
 • CDSL मधील २६% हिस्सेदारी BSEने IPO द्वारा विकली.याचा फायदा BSE ला होईल.
 • युनिकेम LAB च्या गोवा उत्पादन युनिटला USFDA कडून क्लीन चीट मिळाली
 • एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक घेण्यात इंडिगोने रुची दाखवली तेव्हापासून या कंपनीचा शेअर सतत पडत आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सेबीने OFS च्या नियमात सुधारणा केली. कर्मचारी आणी ऑफिस स्टाफ आता OFS मध्ये भाग घेऊ शकतील.
 • RBI ने IBC कडे सुपूर्द केलेल्या NPA खात्यांवर कर्ज दिलेल्या बँकांनी प्रथम ५०% आणी जर कंपनी लिक्विडेशन मध्ये गेली तर १००% प्रोविजन करावी असे बँकांना आदेश दिले.
 • RBI लवकरच Rs २०० ची नोट चलनात आणील.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ३० जून पासून ‘रेप्को होम फायनान्स’, SREI इन्फ्रा, मन्नापुरम फायनान्स, चेन्नाई पेट्रो, आणी ICICI प्रुडेशियल, या कंपन्यांचा वायदा बाजारात समावेश होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • इंडिया बुल्स रिअल मध्ये पिरामल नी आपला स्टेक वाढवला.
 • टाटा मेटालिक्स, टाटा स्पॉंज या टाटा ग्रूपच्या दोन्ही कंपन्या टाटा स्टीलमध्ये मर्ज होणार अशी खबर आहे.
 • आंध्र प्रदेशातील काकिनाडाला स्मार्ट किती बनवणार आहेत. त्यासाठी स्टरलाइट टेक्नोलॉजी या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली.
 • लाओपाला ग्लासमध्ये FII लिमिट २४% वरून ३५% केली.
 • नवीन फ्लूओरीनमध्ये मफतलाल इंडस्ट्रीज आणी नोसिलचा स्टेक आहे हा स्टेक या कंपन्या विकणार आहेत
 • सोना कोयो आणी भारत फोर्ज या दोन कंपन्यांनी AMTEK ऑटो मध्ये स्टेक घेण्यात इंटरेस्ट दाखवला.
 • JSW स्टील ग्रूपची JSW सिमेंट या कंपनीने शिवा सिमेंटमध्ये शेअर्स खरेदी केले. जेव्हा एखादा मोठा ग्रूप एखाद्या कंपनीत लक्ष देत असेल तर आपणही लक्ष ठेवावे.
 • कावासाकी हेवी बरोबर BHEL ने हाय स्पीड ट्रेन साठी करार केला.

कॉर्पोरेट एक्शन

 • नेस्ले ही कंपनी आपले शेअर्स BUY BACK करेल.
 • बजाज ऑटो ची लाभांशासाठी डेट ८ जुलै २०१७ आहे
 • PETRONET LNG च्या बोनस साठी रेकोर्ड देत ४ जुलै २०१७ आहे.
 • माइंड ट्रीने Rs 625 ला BUY BACK जाहीर केला.
 • गोदरेज अग्रोव्हेट मधील हिस्सेदारी IPO द्वारा विकली जाणार आहे. याद्वारे Rs ४०० कोटी गोळा होतील.
 • क्रिसिलने ‘केअर’मधील ८.९% हिस्सेदारी Rs १६५९.९१ प्रती शेअर या भावाने खरेदी केली.कॅनरा बंकेनी हि हिस्सेदारी विकली. कॅनरा बँक ही हिस्सेदारी विकणार ही खबर मार्केटला बरेच दिवसापासून होती. ही टांगती तलवार दूर झाल्यामुळे ‘केअर’ चा शेअर वाढला. कॅनरा बँकेने २६ लाख शेअर्स विकून Rs ४३२ कोटी जमा केले.
 • कुओनी ग्लोबल डेस्टिनेशन MANAGEMENT नेटवर्क ही कंपनी THOMAS कूक या कंपनीने विकत घेतली. त्यामुळे २१ देशात कारभार पसरेल. यामुळे Rs ८७०० कोटींचा टर्नओव्हर होईल.
 • MACDONALDची ४३ लायसेन्स दिल्लीमध्ये रद्द केली. वेस्टलाईफ डेव्हलपमेंट ही व्यस्था बघते. या कंपनीच्या शेअरवर परीणाम झाला.

 

या आठवड्यातील लिस्टिंग

 • तेजस नेटवर्कचे लिस्टिंग झाले. शेअर ज्या भावाला IPO मध्ये दिला त्याच भावाला म्हणजे Rs २५७ला लिस्टिंग झाले. IPO ला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
 • इरीस लाईफसायन्सेस या कंपनीचे Rs ६१६ वर लिस्टिंग झाले. IPO च्या निवेशकांना फारसा फायदा झाला नाही
 • IPO मध्ये हा शेअर Rs ६०३ ला दिला होता
 • CDSL चे लिस्टिंग दमदार Rs २५० ला झाले IPO प्राईस Rs१४९ वर Rs १०० लिस्टिंग गेन झाला.

भविष्यात येणारे IPO

 • जेनसेट उत्पादक ‘POWERICA’ नजीकच्या काळात IPO द्वारे Rs ८०० कोटी उभारेल..

मार्केटने काय शिकवले

लिक्विडीटी आणी VALUATION दोन्ही गोष्टीत झकाझकी चालू आहे. मार्केटमध्ये येणार्या पैशामुळे मार्केट फारसे पडत नाही. बरेच शेअर्स हाय VALUATIONवर ट्रेड करत असल्याने मार्केट फारसे वाढत नाही. माणूस आशेवर जगत असतो त्यामुळे काहीतरी घडेल आणी मार्केट पुन्हा वाढू लागेल असे वाटते

LIC ने सन फार्माचे ७ लाख शेअर्स खरेदी केले. तर हिरो मोटोमधील २% स्टेक कमी केला. आता हा स्टेक ५.१३% राहिला. DSP BLACK ROCK या म्युच्युअल फंडाने ARROW ग्रीनटेक मध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी केले. या म्युच्युअल फंडाचा स्माल कॅपमध्ये गाढा अनुभव मानला जातो. LIC आणी आणी म्युच्युअल फंड्स जेव्हा मार्केटमध्ये विकतात किंवा खरेदी करतात तेव्हा मार्केटला त्या प्रकारची गती मिळते. गुंतवणूकदारांना अंदाज घेता येतो. पुट /कॉल रेशियो १.१ वरून ०.९८ झाला. ज्यावेळी हा रेशियो 1 पेक्षा खाली येतो तेव्हा अग्रेसिव शॉर्ट करणे टाळावे. पण एक्सपायरी असेल तर ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड चा विचार करू नये,

३० जूनला रात्री १२ वाजता GST लागू होईल. सुरुवातीला काही अडचणी येतील. सध्या कोणाला किती आणी कसा फायदा होईल आणी नुकसान कोणाला होईल याचा अंदाज घेत मार्केट पुढे सरकत आहे. पण नेहेमी अंदाज आणी प्रत्यक्ष परिस्थिती यात फरक असतो. हा फरक येणारा काळच ठरवेल. म्हणून आपण नेहेमी म्हणतो ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’  परिणामाला सामोरे जावे तर लागेलच प्रश्न आहे पॉझीटीव किंवा निगेटिव! बघुया काय होते ते

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०९२० वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ९५२३ वर बंद झाले

 

Advertisements

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन -आशा सुटेना देव भेटेना – २७ जून ते ३० जून २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – सलाम सलाम GST ला सलाम – जुलै ३ २०१७ ते जुलै ७ २०१७ | Stock Market आणि मी

 2. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – रात्र थोडी सोंगे फार – २६ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८ | Stock Market आणि मी

 3. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – मार्केटचे प्रगतीपुस्तक – २३ एप्रिल २०१८ ते २७ एप्रिल २०१८ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s