आठवड्याचे-समालोचन – सलाम सलाम GST ला सलाम – जुलै ३ २०१७ ते जुलै ७ २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

सलाम सलाम GST ला सलाम (जुलै ३ २०१७ ते जुलै ७ २०१७)

GST ही करविषयक सुधारणा मार्केटच्या पसंतीला उतरली असे समजावे का ? पण सोमवार तारीख ३ जुलै २०१७ रोजी मार्केटमध्ये जी तेजी दिसली त्यावरून हाच निष्कर्ष निघतो. मार्केट उघडल्यापासून तेजीतच होते. ITC चा पुढाकार होता. बऱ्याच ब्रोकरेज हाउसनी ‘ITC’ चे टार्गेट वाढवले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • इन्फोसिस उत्तर कॅरोलिनामध्ये (USA मध्ये) आपला दुसरा टेक्नोलॉजी आणी इनोव्हेशन हब उघडणार आहे. या मध्ये बहुसंख्य USA मधील स्थानिक रहिवाश्यांची भरती केली जाईल.
 • दार्जिलिंगमध्ये चाललेला संप आणी अस्थिर परिस्थितीमुळे उच्च प्रतीच्या चहाच्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चहाच्या किंमती वाढल्या आहेत. रशिया आणी इराण येथून चहाला मागणी खूप आहे ही मागणी वाढत आहे. त्यामुळे चहाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे चहा उत्पादन करणार्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले – गुडरिक, आसाम टी, जयश्री टी, टाटा टी

सरकारी अन्नौंसमेंट

 • पंतप्रधानांचा मंगळवार तारीख ४ जुलै २०१७ रोजी इझ्रायलचा दौरा सुरु झाला. जे देश तंत्रज्ञान देण्यास तयार आहेत अशा देशांबरोबर करार होणार आहेत. इझरायल तंत्रज्ञान देण्यास तयार आहे. या प्रवासात संरक्षण तंत्रज्ञानाविषयी अनेक करार होतील, MOU होतील. ही ऐतिहासिक घटना आहे. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी इझरायलची यात्रा केली नव्हती. याचा फायदा सरंक्षण आणी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना होईल. वालचंदनगर इंडस्ट्रीज, रिलायंस डिफेन्स, ASTRA MICROWAVE पुंज लॉईड या कंपनीने प्रथम इझरायल बरोबर काम करण्यास सुरुवात केली.
 • उत्तर प्रदेशातील गंगा सफाईसाठी इझरेलबरोबर करार झाला. अंतरीक्ष क्षेत्र, कृषी क्षेत्र तसेच संरक्षणविषयात करार झाले एक डिफेन्स टेक्नोलॉजीकल फंड स्थापन करणार आहेत. ७ महत्वाचे करार झाले. इझरायली कंपनी लेसिको बरोबर TEXMAKO रेल आणी TEXMACO इन्फ्रानी करार केला.
 • TEX REL आणी गरवारे WALL रोप्स यांना इझ्रायल कडून ऑर्डर मिळाली.
 • कर चोरी करण्यासाठी मदत केली असेल तर अशा १२ चार्टर्ड अकौंटंटवर कारवाई केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ही कारवाई करेल. आय कर विभागाने तक्रार केली होती की ज्यावेळी आय कर विभाग कंपनीकडे काही गोष्टींबाबत खुलासा मागत असे त्या त्या वेळी कंपन्या सांगत असत की आम्हाला माहीत नाही, आमच्या CA (चार्टर्ड अकौंटंट) ला विचारा कर कायदेशीर मार्गाने वाचवा पण कर चोरी करू नका असे थोडक्यात पंतप्रधानांनी सुचवले.
 • ‘ITC’ ला ADDITIONAL EXISE DUTY भरावी लागणार नाही.
 • खताच्या कंपन्यांना जुना STOCK GST लावून सप्टेंबर २०१७ पर्यंत विकण्यास परवानगी दिली.जुन्या STOCK वर नवीन MRP छापण्यास परवानगी दिली.
 • स्पाईस जेटला Rs २२९ कोटींची बँक GURANTEE देण्यास दिल्ली हायकोर्टाने सांगितले.
 • जेट एअरवेज २४% हिस्सा डेल्टा एअरवेजना विकणार आहे. आणी Rs २००० कोटी उभारणार आहे. यासाठी एत्तीहादची मंजुरी गरजेची आहे.
 • हायड्रो पॉवर पॉलिसी तयार करण्याचे काम सुरु आहे. ह्या महिन्याअखेर ह्या पॉलिसीला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. याचा फायदा NHPC, SJVN अशा कंपन्यांना होईल.
 • SODAA ASH चे भारतात DUMPING होत असे. यावरील ANTI DUNPING ड्युटी २ जुलै २०१८ पर्यंत लागू केली. याचा फायदा GHCL, DCW, टाटा केमिकल्स यांना होईल.
 • TRACTOR वरील GST १८% वरून १२% केला. खतावरील GST १२% वरून ५% केला.
 • साखरेवरील आयात ड्युटी ४०% वरून ६०% केली. त्यामुळे साखर कंपन्यांना फायदा होईल. ज्या कंपन्यांकडे साखरेचा साठा भरपूर आहे अशा कंपन्यांना फायदा होईल. राजश्री शुगर, धारणी शुगर, उगार शुगार, धामपूर शुगर, KCP शुगर.
 • मुंबईमध्ये २४ तास दुकाने सुरु राहतील. त्यामुळे फ्युचर रिटेल, V २ रिटेल, D MART, TRENT या कंपन्यांच्या शेअर्सला फायदा होईल.
 • एअर इंडियाचे Rs २०००० कोटींचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय आणी देशांतर्गत अशी विभागणी होण्याची शक्यता आहे.
 • सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये Rs ४०००० कोटी घालण्याची शक्यता आहे.
 • पुढील आठवड्यात पॉवरसेक्टरसाठी काही ‘BAIL OUT PACKAGE’ सरकार जाहीर करण्याची शक्यता आहे. याचा फायदा PFC, REC, EMCO, PTC या कंपन्यांना होण्याची शक्यता आहे.
 • भारत नेट फेज २ चे काम सुरु होईल. १ लाख ग्राम पंचायती जोडल्या जातील.फायबर नेटवर्कचे जाळे पसरले जाईल. याचे ऑक्शन होईल. टेलिकॉम कंपन्याही या ऑक्शनमध्ये भाग घेऊ शकतील. याचा फायदा तेजस नेटवर्क, अक्ष ओप्टीफायबर, फिनोलेक्स, ITI, स्टरलाइट, युनिव्हरसल केबल, स्मार्ट लिंक, डी लिंक या कंपन्यांना होईल

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • NBCC ला रेल LAND डेव्हलपमेंट ऑथारीटीकडून १० रेल्वे स्थानक विकसित करण्यासाठी परवानगी मिळाली. भारती एअरटेलला एअरसेल मधला स्पेक्ट्रम घेण्यासाठी CCI (COMPETITION COMISSION ऑफ INDIA) ने परवानगी दिली.
 • ज्योती STRUCTUREच्या बाबतीत NCLT ने इंसोल्वन्सी प्रोसिडिंग चालू करायला परवानगी दिली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • BOB (बँक ऑफ बरोडा) चे १२ अकौंट IBC मध्ये आले. यात Rs ७२०० कोटींचे एक्स्पोझर आहे . या पैकी ५०% प्रोविजन बँकेने केली. १०० %प्रोविजन करण्याची गरज नाही असे बँकेला सांगितले. त्यामुळे शेअर वाढला.
 • गळ्यात हार घातला असेल तर चांगला वाटतो खरा. पण हाराचे वजन एवढे असू नये की माणूस त्याखाली दबला जाईल. हीच कथा NTPC ची झाली. LANKO इफ्रा ही कंपनी NTPC च्या गळ्यात घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे NTPC चा शेअर पडला.
 • JMC प्रोजेक्ट्स ला ४-५ ऑर्डर्स मिळाल्या.
 • अंबुजा सिमेंटला ऑक्शनमध्ये ४२ मिलियन टनचा लाईमस्टोनचा १ ब्लॉक मिळाला.
 • स्पायडरमॅन होम हा सिनेमा रिलीज होणार आहे याचा फायदा मुक्ता आर्ट्स, INOX लीजर, एरोस, PVR या कंपन्यांना होईल.
 • भारती एअरटेल आणी अनलिस्टेड टाटा टेलीसर्विसेस आणी टाटा स्काय आणी लिस्टेड टाटा कम्युनिकेशन यांचे मर्जर करण्याची शक्यता अजमावून पाहिली जात आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • IDBI ने क्लिअरिंग कॉर्पोरेशनमधील हिस्सेदारी विकली.
 • PETRONET LNG ची एक्स डेट सोमवार ३ जुलै रोजी होती. त्यामुळे शेअरचा भाव Rs २१५ झाला.
 • सोमवारी SANWAARIYA अग्रो एक्सबोनस झाला.
 • SBI जनरल इन्शुरन्स नजीकच्या भविष्यकाळात IPO आणण्याचा विचार करत नाही.SBI लाईफ अशुअरन्सच्या IPO साठी IRDA ने सैद्धांतिक मंजुरी दिली. पण UTI AMC मधला स्टेक विकण्याचा विचार आहे.
 • NSE पुन्हा DRHP दाखल करण्याची शक्यता आहे.
 • इन्फोसिस ‘CLOUDYN SOFT’ मधील आपली हिस्सेदारी US $ ४९ लाखांना मायक्रोसॉफ्टला विकणार आहे.
 • २६ जुलैला येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये तिमाही निकाल आणी शेअरस्प्लिटवर विचार केला जाईल.
 • ११ जुलै रोजी NTPC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे. या बैठकीत बोनस शेअर इशू करण्यावर विचार केला जाईल.
 • NMCE (NATIONAL MULTI COMMODITY EXCHANGE) आणी ICEX ( INDIAN COMMODITY EXCHANGE) यांचे मर्जर होणार आहे. यात ICEX चा ६२.८% हिस्सा असेल तर NMCE चा राहिलेला हिस्सा असेल
 • श्रीराम ट्रान्सपोर्ट आणी श्रेराम सिटी युनियन या कंपन्यांचे IDFC बँकेत मर्जर होण्याची शक्यता आहे. पिरामल एन्टरप्रायझेसचा श्रीराम ग्रूपमध्ये स्टेक आहे.
 • पंजाब आणी सिंध बँकेचे PNB मध्ये मर्जर होईल.
 • ABC बेअरिंग ही कंपनी टीमकीन या कंपनीमध्ये मर्ज होईल.
 • ICICI प्रू सहारा लाईफ इन्शुरन्समध्ये हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे.
 • STC आणी PEC चे MMTC मध्ये मर्जर होण्याची शक्यता आहे.
 • A B NUVO च्या १० शेअर्स मागे ग्रासिमचे १५ शेअर्स मिळतील.

या आठवड्यातील IPO

 • A U फायनांस स्माल बँकेचा इश्यू ५४ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला. परंतु रिटेल कोटा ३ वेळा भरला त्यामुळे शेअर्स ALLOT होण्याची शक्यता आहे.
 • GTPL चे आज लिस्टिंग झाले. IPO मध्ये Rs १७० ला शेअर्स दिले होते. लिस्टिंगही Rs १७० वर झाले.

मार्केटने काय शिकवले

सोमवारी मार्केटने १७ सेशन्सच्या कनसॉलिडेशननंतर ५ EMA (EXPONENTIAL MOVING AVERAGE), १३ EMA, २० EMA च्या वर ९६१५ वर निफ्टी बंद झाला. निफ्टी ने मल्टीपल शॉर्ट टर्म AVERAGE ओलांडला. आता निफ्टीचा ब्रेकऑउट झाला आणी BULLISH PATTERN प्रस्थापित झाला.

एक महिन्यापूर्वी बरोबर ६ जून २०१७ रोजी निफ्टी ९७०९ पर्यंत गेला होता. गुरुवारी ६ जुलै २०१७ रोजी निफ्टी ९७०० पर्यंत पोहोचेल. गुरुवारी बँक निफ्टीची साप्ताहिक एक्सपायरी असते. तांत्रिक बाबी पाहिल्या तर असे सांगता येते की ब्रेकऑउट किंवा ब्रेकडाऊन झाल्यास फॉलोअप खरेदी किंवा फॉलोअप विक्री हवी आणी volume जास्त हवेत तरच ती ‘MOVE’ टिकाऊ असते. निफ्टी ९७०० पर्यंत जाऊन मार्केट पडण्यास सुरुवात झाली. पण ट्रेडर्सची प्रॉफीट बुकिंग झाली आणी USA मधील आणी युरोपमधील मार्केट्स मंदीत होती. तेथून मार्केटने क्लू घेतला असे जाणवले.

शाळेत जशी काही मुले मस्तीखोर,नटखट, दंगेखोर असतात. तसेच मार्केटमध्ये काही शेअर्स असतात. अशा शेअर्सना मी पेंनी STOCKS म्हणते. हे शेअर कधी रुसतात, तर कधी हसतात. अशा शेअरमध्ये ट्रेड करून काही जणांना फायदाही होतो. असे बरेच शेअर या आठवड्यात चालले. पण अशा शेअर्सना किंवा अशा मुलांना कधीही डोक्यावर बसवून घेऊ नये. नाहीतर असे शेअर कधी आपल्या टाळूवरचे लोणी खाऊन जातात समजत नाही आपण पहात बसण्यापेक्षा काही करू शकत नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१३६४ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९६६३ वर बंद झाले

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

5 thoughts on “आठवड्याचे-समालोचन – सलाम सलाम GST ला सलाम – जुलै ३ २०१७ ते जुलै ७ २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – कदम कदम बढाये जा खुशीके गीत गाये जा – १० जुलै ते १४ जुलै २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s