आठवड्याचे-समालोचन – कदम कदम बढाये जा खुशीके गीत गाये जा – १० जुलै ते १४ जुलै २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोमवारी निफ्टी आणी सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वात उच्चस्तराला उघडले. खरे पाहता पार्टीसिपेटरी नोटची खबर होती पण मार्केटने सर्वांना धक्का दिला. सोमवारी तारीख १० जुलै २०१७ रोजी निफ्टी ९७०० च्या वर उघडले आणी ९७०० च्या वर बंद झाले. ९७८२ पर्यंत मार्केट इंट्रा डे गेले होते. आता निफ्टीची ट्रेडिंग रेंज बदलली आहे. निफ्टी ९६५० ते ९८५० झाली. मंगळवारी तारीख ११ जुलै २०१७ रोजी निफ्टी ने ९८०० ला स्पर्श केला. हे मार्केट लिक्विडीटीमुळे तेजीत सुरु आहे. बुधवारी PUT CALL रेशियो १.४० झाला.बुधवारी निफ्टी ९८१६ ला पोहोचले. गुरुवारी तर ९९०० गाठण्यासाठी ३ पाइंट उरले होते. BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२००० झाला. शुक्रवारी निफ्टी ९९०० वर उघडले आणी सेन्सेक्स ३२१०० वर तर बँक निफ्टी २३९५० वर पोहोचला. शुक्रवारी PUY CALL रेशियो १.४६ होता. ही ओव्हर बॉट पातळी आहे. आपली पोझिशन हलकी करा.

या सर्व घटनांमुळे असे आढळले की मार्केट नवीन नवीन शिखरे सर करत आहे. लोकांचा आनंद ओसंडून वाहत आहे. मार्केटमध्ये खुशी होती. लिक्विडीटी भरपूर होती. ज्या लोकांचे शेअर्स अडकले असतील त्यांना विकण्याची संधी मिळाली.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये क्रूडचे उत्पादन वाढत आहे. OPEC देशांची निर्यात वाढत आहे. त्यामुळे ONGC वर वाईट परिणाम होत आहे. USA FED ने सांगितले की BALANCESHEET सुधारणे बॉंड विक्री करणे, रेट वाढवणे, हे सर्व हळू हळू आणी वेळोवेळी येणारा डेटा बघून केले जाईल. USA मध्ये जॉब डेटा समाधानकारक आल्यामुळे आणी प्रोड्युसर्स प्राईस वाढल्यामुळे रेट वाढण्याची शक्यता वाढली आहे.
 • UKने युरोपीयन युनियन शी असलेले राजकीय आर्थिक आणी कायदेशीर संबंध तोडण्यासाठी कायदा प्रसिद्ध केला.
 • लेबाननमध्ये ऑईल आणी GAS साठी ONGC विदेश बोली लावणार आहे.

सरकारी अनौन्समेंट 

 • ज्या कंपन्या परदेशातून एअरक्राफ्ट भाड्याने घेतात त्याना GST लागणार नाही.
 • सरकारने साखर कंपन्यांची विनंती ऐकली आणी साखरेवरची आयात ड्युटी ४०% वरून ५०% केली. गडकरी (मंत्री केंद्र सरकार) यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले की की उत्तरप्रदेशात बस, taxi सारखी वाहने इथेनॉलवर चालवा. उत्तर प्रदेशात इथेनॉलचे उत्पादन चांगले होते. याचा फायदा UP मधील साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल.
 • महाराष्ट्र सरकारने रिअल्टी सेक्टरसाठी सुचना केली. कोणीही बिल्डर्सनी सरकारकडे अर्ज केल्यास त्यावरचा निर्णय ८ दिवसात घेतला पाहिजे.
 • Rs १ लाखाचे दागिने विकल्यास Rs ३००० GST लागेल. जुन्या दागिन्यांची दुरुस्ती करायची असेल तर ५% GST लागेल. कारण हे जॉब वर्क समजले जाईल.
 • एअरलाईन्समध्ये १००% FDI ला परवानगी देऊ नये. २/३ डायरेक्टर्स आणी चेअरमन भारतीय असले पाहिजेत. इंटेलिजन्स ब्युरोने अशी सुचना केली आहे. कारण USA आणी कॅनडा मध्येसुद्धा फक्त २५% विदेशी गुंतवणुकीस परवानगी आहे.
 • लहान बँकांमध्ये सरकार मर्जरच्या आधी भांडवल गुंतवेल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • IIP चे आकडे आले. मे २०१७ या महिन्यातील औद्योगिक उत्पादन १.७% (एप्रिल २०१७ मध्ये २.८९ % होते) ने वाढले.
 • CPI जून २०१७ साठी १.५४% (मे २०१७ मध्ये २.१८ होता) होता. WPI जुनसाठी ०.९% (मे मध्ये २.२% होता) होता
 • अशा प्रकारे किरकोळ आणी घाऊक महागाईचे निर्देशांक कमी झाल्यामुळे RBI ने आता रेट कमी करावा अशी मार्केट्ची आणी गुंतवणूकदारांची अपेक्षा असल्यामुळे मार्केट वधारले.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • जे हायवे शहरातून जातात त्यांना राज्य सरकार डीनोटीफाय करीत असल्यास सुप्रीम कोर्टाची काही तक्रार नाही. डिनोटीफाय केल्यानंतर त्या हॉटेल्समधून दारू विकता येईल.
 • सेबीने सांगितले की पोर्टफोलीओमध्ये शेअर नसेल तर पी नोटच्या माध्यमातून ट्रेड करता येणार नाही.
 • पशुवध कायद्यामध्ये बदल करण्यास सुप्रीम कोर्टाने सरकारला सांगितले

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी 

 • HDFC इन्व्हेस्टमेंटने ट्यूब इन्व्हेस्टमेंटमध्ये २% स्टेक घेतला
 • गीअर उत्पादन करणाऱ्या कंपन्या मंगळवार तारीख ११ जुलै २०१७ रोजी तेजीत होत्या. भारत गीअर, शांती गिअर्स, हाय टेक गीअर
 • टाटा पॉवर आणी अडानी पॉवरच्या बाबतीत समस्या सारखीच आहे. या दोन्ही कंपन्यांना कोळसा आयात करावा लागतो. तो महाग पडतो. पण पॉवरचे रेट वाढवता येत नाहीत. त्यामुळे उच्च पातळीवरची बैठक बोलावली आहे.
 • टाटा मोटर्सने कार्गो सेगमेंटमध्ये ३ नवीन गाड्या बाजारात आणल्या आहेत.
 • NCL तामिळनाडू, उत्तरप्रदेशात, ९९२ MW पॉवरचे सोलार प्लांट लावणार आहे.
 • गुजराथमध्ये पेट्रोकेम कॉम्प्लेक्सच्या विस्ताराला रिलायंसला मंजुरी मिळाली. Rs २१०० कोटी विस्तारावर खर्च करणार.
 • कॅम्लिन फाईन केमिकल्स या कंपनीने चीनच्या कंपनीमध्ये ५१% हिस्सा खरेदी केला.
 • अक्ष ऑपटी फायबरला जयपूर स्मार्ट सिटी साठी ऑर्डर मिळाली.
 • कॅडिला हेल्थकेअरच्या मोरैया प्लांट मधून जनरिक औषधाच्या उत्पादनास USFDA ची मंजुरी मिळाली.
 • बायोकॉनने कॅन्सरच्या नव्या औषधाच्या मंजुरीसाठी अर्ज दिला. या बाबतीत विचार करण्यासाठी USA च्या ADVISORY कमिटीची बैठक झाली. त्यांना मंजुरी मिळाली. MORGAN STANLEYने बायोकॉनचे टार्गेट Rs ४५० दिले तर CLSA ने Rs १८६ दिले. प्रत्येकाजवळ त्यांच्या दिलेल्या टार्गेट्सच्या समर्थनार्थ आपापली कारणे आहेत. आपण आपले टार्गेट ठरवून निर्णय घ्यावा हे उत्तम.
 • टी सी एस लखनौ सेंटर बंद करणार आहे. येथे १००० कर्मचारी काम करतात. त्यांना नोइडा वाराणसी येथे ट्रान्स्फर करणार म्हणजेच कॉस्ट कमी करण्याचा विचार आहे.
 • कतार एअरवेज भारतात अंतर्गत प्रवासी विमान सेवा सुरु करणार आहे. सध्या लीगल टीमबरोबर चर्चा चालू आहे.
 • FM रेडियोसाठी Rs ५३.४ कोटीची बोली सन टी व्ही ने जिंकली.
 • ‘FITCH’ ही कंपनी ‘CARE’ या कंपनीचा व्यवसाय खरेदी करण्ताची शक्यता आहे. ‘ICRA’ आणी ‘CRISIL’ या दोन्ही कंपन्याही शर्यतीत आहेत.
 • ‘गती’ ही कंपनी ‘SNAPDEAL’ चा लॉजिस्टीक कारभार खरेदी करण्याची शक्यता आहे
 • KEC INTERNATIONALला Rs १८४५ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • धन धना धन योजनेखाली रिलायंस जियो नवीन PACKAGE देणार आहे. यात २०% डेटा जास्त मिळेल.
 • A U. फायनान्स Rs ५२५ वर लिस्ट झाला.
 • डिविज LAB या कंपनीच्या विशाखापट्टणम युनिटला जो इम्पोर्ट ALERT दिला होता तो काढून टाकला. SYMPHONY आणी ब्ल्यू स्टार यांच्यात तुलना केली असता SYMPHONYचा EPS २५ तर ब्लू स्टार चा १२ आहे. त्यामुळे SYMPHONY ५३ पट तर ब्लू स्टार५१ पट चालू आहे.
 • स्टरलाईट लाईटिंगला बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने लोन दिले होते. हे लोन शेअर्समध्ये कन्व्हर्ट केले त्यामुळे ही कंपनी बजाज इलेक्ट्रिकलला मिळाली. त्यामुळे बजाज इलेक्ट्रिकलचा स्टेक १८% वरून ४७% झाला.
 • इंडस इंड बँकेचा तिमाही निकाल लागला. फायदा कमी झाला. पण इतर उत्पन्न वाढले NPA मध्ये थोडी वाढ झाली
 • टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा १ल्या तिमाहीचा निकाल समाधानकारक नव्हता. कंपनीचा रेव्हेन्यू US$ ४.५९ बिलियन तर नेट प्रॉफीट US $ ९२३ मिलियन झाले. कंपनीने USA मधील कंपन्यांनी IT वर कमी केलेला किंवा पुढे ढकललेला खर्च, मजबूत रुपया, आणी पगारवाढ तसेच USA मधील व्हिसाचे प्रोब्लेम ही कारणे सांगितली. ऑपरेटिंग मार्जीन २३.४% (गेल्या तिमाहीत २५.१%) होते. ATTRITION रेट ११.६ होता.
 • आज इन्फोसिसचे पहिल्या तिमाहीचे निकाल आले. इन्कम Rs १७०२८ कोटी तर नेट प्रॉफीट Rs३४८० कोटी होते. निकाल अपेक्षेपेक्षा थोडे चांगले आहेत. आम्ही सायबर सिक्युरिटी वर जास्त लक्ष केंद्रित करू असे कंपनीने सांगितले.
 • HDFC लाईफ त्यांचे MAX लाईफ बरोबर होणारे मर्जर रद्द करून IPO आणण्याचा विचार करत आहे जून २०१६ मध्ये ठरलेले मर्जर IRDA ने रद्द केले.
 • TORRENT फार्माच्या दहेज युनिटची तपासणी २६ ते ३० जून या कालावधीत केली होती. या तपासणीत ५ त्रुटी आढळल्या. SAMPLE आणी टेस्टिंगमध्ये त्रुटी आढळल्या. क्वालिटी संबंधात तक्रारी आहेत
 • टाटा स्टील युरोपने त्यांचे दोन स्टील पाईप बनवणारे प्लांट लिबर्टी हाउस या कंपनीला विकले.
 • इन्फोसिस, हडसन अग्रो, CYIENT, गोवा कार्बन या कंपन्यांचा तिमाही निकाल चांगला आला.

तांत्रिक विश्लेषण

शूटिंग स्टार मंगळवारी मार्केट उघडले तेव्हा निफ्टीने ९८०० चा आकडा ओलांडला. नंतर निफ्टी ९८३० पर्यंत गेला. नंतर ९७७८ चा लो मारला आणी ९७८६ वर बंद झाला. या ठिकाणी शूटिंग स्टार PATTERNची स्थिती आढळली. हा कॅण्डलस्टिक PATTERN होय. हा रिव्हर्सल PATTERN आहे. इन्व्हरटेड HAMMER प्रमाणे हा PATTERN असतो. शेअरची किंमत मार्केटच्या वेळेत ओपनिंग प्राईसच्या बरीच वर जाते. पण ओपनिंग प्राईसच्या खाली क्लोज होते. शूटिंग स्टारसाठी अपवर्ड ट्रेंड हवा. हायेस्ट प्राईस आणी ओपनिंग प्राईसमधील फरक हा शूटिंग स्टारच्या बॉडीच्या दुप्पट हवा. किमान किंमत आणी क्लोजिंग प्राईस यातला फरक फारंच कमी असतो. आधीचे बायर प्रॉफीटबुकिंग करू लागतात. शॉर्ट सेलर घुसतात त्यामुळे न्यू हायला स्पर्श केल्याबरोबर मार्केट वेगाने खाली येते.

कॉर्पोरेट एक्शन

 • झंडू रिअलीटी आणी इमामी इन्फ्रा यांचे मर्जर केले जाणार आहे.

नजीकच्या भविष्यात येणारे IPO

 • SBI लाईफ ८ कोटी शेअर्सचा IPO आणणार आहे.
 • रेल्वे आपल्या IRCTC, IRCON, RVNL, RIITES, या चार कंपन्यातील १०% स्टेक विकणार आहे. हे IPO ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात येतील.
 • सलासर टेक्नो इंजिनिअरिंग हा IPO १२ जुलै ते १७ जुलै या दरम्यान ओपन असेल IPO प्राईस Rs १०८ आहे.
 • BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२०२० वर तर NSE निर्देशांक निफ्टी ९८८६ वर बंद झाले. बँक निफ्टी २३९४१ वर बंद झाले.

मार्केटने काय शिकवले

PUT CALL रेशियो १.३४ झाला. हा १.३८ झाला म्हणजेच ओव्हरबॉट स्थिती झाली. अशावेळी प्रॉफीट बुकिंग करा. अशा वेळी कॅश मार्केटच्या शेअरमध्ये ट्रेडिंग करा. STOCK स्पेसिफिक रहा. मी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला विनंती करते की आपल्या मित्रांपैकी, नातेवाईकापैकी कोणाचे शेअरमध्ये पैसे अडकले असतील आणी त्या लोकांचे मार्केटकडे लक्ष नसेल तर त्यांना मार्केटच्या बुल रनची खबर द्या. ते आपले शेअर्स शक्य असतील तर प्रॉफीटमध्ये विकू शकतील.

Advertisements

One thought on “आठवड्याचे-समालोचन – कदम कदम बढाये जा खुशीके गीत गाये जा – १० जुलै ते १४ जुलै २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – नर्व्हस 90s – नर्व्हस निफ्टी ९९०० – 17 जुलै २०१७ ते २१ जुलै २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s