आठवड्याचे-समालोचन – नर्व्हस 90s – नर्व्हस निफ्टी ९९०० – 17 जुलै २०१७ ते २१ जुलै २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

क्रिकेटमध्ये आणी शेअरमार्केटमध्ये बरेच साम्य आहे. २०-२०, वन डे, किंवा कसोटी क्रिकेटप्रमाणेच मार्केट मध्येसुद्धा इंट्राडे, शॉर्ट टर्म, मेडियम टर्म आणी लॉन्ग टर्म गुंतवणूक असे प्रकार असतात. पण दोन्ही ठिकाणचा आशावाद नेहेमीच खुणावतो. एखादा फलंदाज जेव्हा शतकाच्या जवळ येतो तेव्हा तो स्वतः आणी सामना बघणारे प्रेक्षक दोघांनाही हुरहूर लागते. कारण शतक हा एक, (मग तो कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये असो) मानबिंदू आहे. खेळ स्लो होतो. फलंदाज नर्व्हस ९० मध्ये सापडला आहे असे प्रेक्षकांना वाटते. शतक पुरे झाले म्हणजे फलंदाजही निश्वास सोडतो आणी प्रेक्षकही आनंदित होतात. तसेच मार्केटमध्ये घडत आहे. निफ्टी १०००० च्या आसपास पोहोचताना थोडे अडखळत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA ने सर्व देशांना बजावले आहे की USA मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांविषयी मागितलेली माहिती त्या त्या देशाने पुरविणे जरुरीचे आहे. जर अशी माहिती पुरवली नाही तर त्या देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली जाईल.
 • USFDAच्या अड्वायझरी कमिटीने ब्रेस्ट कॅन्सरसाठी बायोसिमिलर ‘TRASTUZUMAB’ ला मंजुरी दिली. या औषधाला ३ सप्टेंबर २०१७ पर्यंत ‘USFDA’ ची अंतिम मंजुरी मिळेल असे बायोकॉन या कंपनीने सांगितले. या औषधासाठी जगामध्ये US$ ६.९ बिलियन तर USA मध्ये US$ २.६ बिलियन चे मार्केट उपलब्ध आहे. या बातमीनंतर शेअर ऑल टाईम हायला गेला.
 • UK ने प्रथमच कबुल केले की ब्रेकझीट साठी त्यांना युरोपिअन युनियनला GBP १०० बिलियन एवढे पेमेंट करावे लागेल.
 • चीनच्या अर्थव्यवस्थेत (GDP) मध्ये दुसर्या तिमाहीत ६.९% वाढ आली. ही वाढ काही अंशी उत्पादनातील वाढ आणी निर्यातवाढीमुळे आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने ऑईल आणी GAS क्षेत्रातील दुसऱ्या मर्जरची घोषणा केली. ‘IOC’ ही कंपनी ‘ऑईल इंडिया’या कंपनीतील सरकारचा ६६% स्टेक विकत घेईल. या मर्जरची वेळ आणी बाकीच्या प्रोसिजरल डीटेल्स नंतर ठरवले जातील पण हे मर्जर आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये पुरे केले जाईल.
 • E-VECHICLE ला प्रोत्साहन देण्यासाठी आणी BATTERY SWAPPING स्टेशन बनवण्यासाठी नियम बनवले जातील. NTPC आणी पॉवर ग्रीड या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्या BATTERY SWAPPING स्टेशन बनवतील यासाठी खास परमिटची जरुरी असणार नाही.
 • सरकारने चार्जर आणी ADAPTAR याच्यावर ANTIDUMPING ड्युटी बसवली. कस्टम ड्युटी १०% लावली. याचा फायदा डीलिंक आणी स्मार्टलिंक या कंपन्यांना होईल.
 • पन्ना मुक्ता ताप्ती ऑईल फिल्ड विषयीच्या केसमध्ये सरकारने RIL, SHELL आणी ONGC या तीन कंपन्यांना संयुक्तरीत्या US$ ३ बिलियन दंड भरायला सांगितला आहे.
 • सरकारने ONGC आणी HPCL यांच्यातील कॉर्पोरेट एक्शनला मंजुरी दिली. या प्रमाणे ONGC HPCL मधील ५१% सरकारचा स्टेक Rs ३० ते Rs ४० प्रीमियम देऊन कॅश मध्ये खरेदी करेल ONGC ला ओपन ऑफर आणण्यापासून सरकारने सुट दिली आहे. ONGC कडे असलेल्या कॅश रिझर्व्ह वर परिणाम होईल. पैशाची सोय करण्यासाठी ONGC ही कंपनी IOC मधील आपला हिस्सा विकेल.HPCL ही ONGC ची सबसिडीअरी कंपनी म्हणून कार्यरत राहील. त्यामुळे HPCL ची BRAND VALUE सुरक्षित राहील.MRPL ही कंपनी HPCL ची सबसिडीअरी असल्यामुळे तीही ONGC ची सबसिडीअरी बनेल.
 • उत्तर प्रदेश आणी महाराष्ट्र या राज्यातील साखर कारखान्यांनी साखरेचे भाव वाढवले. पूर्वी उसाला SAP (STATE ADMINISTRATIVE PRICE) प्रमाणे किमत दिली जात होती. आता FAP ( FAIR AND REMUNERATIVE PRICE) प्रमाणे उसाला भाव दिला जाईल असे UP राज्य सरकारने सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना तोटा होईल तर उत्तर प्रदेशातील कारखान्यांना फायदा होईल.
 • महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र उसाची शेती करायची असेल तर ड्रिप इरिगेशनचाच वापर केला गेला पाहिजे असे सांगितले याचा फायदा जैन इरिगेशनला होईल.
 • सरकार जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी लेदर सेक्टरला काही सवलती देणार आहे. यासाठी Rs २६०० कोटी खर्च केले जातील. या योजनेला ‘इंडियन फुटवेअर, लेदर, एन्ड अक्सेसरीज डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ असे नाव दिले आहे. जादा रोजगार दिला तर आयकरात सवलत मिळणार आहे. निर्यातीला उत्तेजन देणे हा एक उद्देश आहे. Rs १५००० च्या जवळपास पगार असेल तर EPF मध्ये भाग घेतला नाही तरी चालेल. जर १५० ते २५० तास रोजगार पुरवला तरी वरील प्रमाणे सवलती उपलब्ध असतील.
 • सरकारने ३४ मेगा मल्टी मोडल लॉजीस्टिक पार्क बांधण्यासाठी मंजुरी दिली यावर सरकार Rs २००००० कोटी खर्च करेल. हे प्रोजेक्ट राज्य सरकारच्या जमिनीवर पब्लिक-प्रायव्हेट पार्टनर्शीपच्या माध्यमातून केले जाईल.
 • सरकार BEML मधील २६% स्टेक विकणार आहे. सरंक्षण मंत्रालयाकडून यासाठी मंजुरी मिळाली.
 • CAG ने ६ टेलिकॉम कंपन्यांचे आणी IFCI चे ऑडीट केले. या कंपन्यांनी २०११ ते २०१५ या काळात आपले उत्पन्न कमी दाखवले आहे असे आढळले.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • INOX विंड या कंपनीच्या INSOLVANCY प्रोसिडिंग सुरु करायला NCLT च्या चदिगढ बेंचने मंजुरी दिली.
 • RBI ने बँकांना प्रथम ‘वन टाईम सेटलमेंट’ चा विकल्प तपासून पहायला सांगितले आहे. ही प्रोसेस सहा महिन्याच्या आत पूर्ण झाली नाही तर बँकांनी लिक्विडेशन प्रोसेस सुरु करावी असे सांगितले आहे.
 • GST कौन्सिलने सिगारेट्सवरील कर (GST) २८% + ५% ad valorem cess असा वाढवला. तसेच सिगारेटच्या लांबीवर अवलंबून १००० सिगारेट्सवर खालीलप्रमाणे कर लावला. ६५-७० mm Rs ४८५, ७० -७५ mm Rs ६२१ आणी ७५ mm च्यावर Rs ७९५ असा न्युमरिकल सेस लावला. या करवाढीमुळे सरकारला Rs ५००० कोटींचे उत्पन्न मिळेल. या GST कौन्सिलच्या निर्णयाचा परिणाम ITC, आणी सिगारेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला.
 • NGT (NATIONAL GREEN TRIBUNAL)ने त्रिवेणी इंजिनिअरींगला त्यांच्या मुझफ्फरनगर येथील काम थांबवायला सांगितले.
 • गुजरात हायकोर्टाने एस्सार स्टील या कंपनीने केलेल्या अर्जाच्या विरोधात असा निकाल दिला की RBI आणी कर्ज देणार्या बँकांना IBC खाली BANKRUPTCYसाठी कारवाई सुरु करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या कंपनीला दिलेलं कर्ज सर्व बँकांनी मार्च २०१६ ला NPA केले आहे.
 • NCLT ने मोंनेट इस्पात या कंपनीच्या इन्साल्वन्सीसाठी मंजुरी दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

भारतातून होणारी निर्यात जून २०१७ मध्ये ४.३९% ने वाढून US$ २३.५ बिलियन झाली. ही गेल्या चार महिन्यातील किमान निर्यात आहे. भारतात होणारी आयात मात्र १९%ने वाढून US $ ३६.५ बिलियन झाली. यामुळे जून २०१७ साठी ट्रेड GAP US$ १२.९ बिलियन(मे २०१७ मध्ये US $ १३.८४ बिलियन) झाली. सोने आणी प्रेशस स्टोन यांची आयात दुप्पट झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • मुक्ता आर्ट्स दसऱ्यापर्यंत अहमदाबादमध्ये २ आणी आंध्र प्रदेशात ४ मल्टीप्लेक्स चालू करणार आहे.
 • अल्केम LAB च्या तळोजा प्लांटची ची USFDA ने तपासणी केली. यात कोणतीही त्रुटी दाखवण्यात आली नाही.
 • इंद्रप्रस्थ GAS LTD या कंपनीला गुरूग्राममध्ये सिटी GAS डीस्ट्रीब्युशन नेटवर्क्ससाठी मंजुरी मिळाली.
 • JSPL चा छत्तीसगढमधील पॉवर प्लांट JSW एनर्जी घेणार आहे.
 • पिनकॉन स्पिरीटला संरक्षणखात्याकडून ऑर्डर मिळाली.
 • रूपा कंपनी त्यांचे दोन BRAND ‘MICROMAN’ आणी ‘MICRO WOMAN’ USA मध्ये इंट्रोड्युस करणार आहेत.
 • HCL इन्फोसिस्टिम्स ही कंपनी APPLE या कंपनीबरोबर डीस्ट्रीब्युशन नेटवर्क साठी करार करणार आहे.
 • गोल्डन टोबॅंको या कंपनीची इंडियाबुल्स फायनान्स या कंपनी कडे कर्जासाठी गहाण ठेवलेली मरोळ अंधेरी येथे असलेली जमीन विकण्यासाठी इंडिया बुल्सने नोटीस दिली आहे.
 • टाटा मोटर्स या कंपनीने बायो मिथेन इंजिन तयार केले.
 • ज्युबिलीयंट फूड्स, ACC, इंडियन मेटल (लॉस मधून प्रॉफीटमध्ये) हिंदुस्थान झिंक, रिलायंस इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक, RBL बँक, बर्जर पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, DCB,,विप्रो, मास्टेक, इंडियन बँक, टीनप्लेट, यांचे तिमाही निकाल चांगले आले. तर कॅनरा बँक, फोर्स मोटरचे, कर्नाटक बँक या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होता. बजाज ऑटोचा निकाल ठीक होता.
 • रिलायंस ज्ञीओने शुक्रवारी AGM मध्ये 4G स्मार्ट फोन जीओ फोन लौंच केला. या फोंनवर CABLE टी व्ही दिसेल असे जाहीर केल्यामुळे DTH आणी केबल टी व्ही कंपन्यांचे शेअर्स पडले. तसेच जीओ फोन बरोबर दिलेल्या सवलतींमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स पडले.
 • फेडरल बँकेची FII मर्यादा ४९% वरून ७४% केली.
 • एल आय सी ने टाटा ग्लोबल बिव्हरेजीसमधील शेअर्स विकून आपली हिस्सेदारी कमी केली.
 • अशोक LEYLAND ने इलेक्ट्रिक व्हेईकल बनवण्यासाठी सन मोबिलिटीबरोबर करार केला.
 • भेल या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला पतरातू सुपर थर्मल पॉवर प्लांटसाठी Rs १०२६६ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • टाटा एलेक्सी या कंपनीचे टी सी एस मध्ये मर्जर होण्याची शक्यता आहे.
 • नाटको फार्माच्या कोथूर युनिटला USFDA ने केलेल्या १६ ते २४ जानेवारी दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने क्लीन चीट दिली.
 • सन फार्मा, ल्युपिन, कॅडीला हेल्थकेअर, ऑरोबिन्दो फार्मा या कंपन्यांना त्यांच्या औषधांसाठी USFDA ची मंजुरी मिळाली.
 • NTPC ही पॉवर उत्पादन क्षेत्रातील कंपनी आता पॉवर डीस्ट्रीब्यूशन क्षेत्रात उतरण्याचा विचार करत आहे.
 • बालाजी टेलीमध्ये रिलायंस इंडस्ट्रीजनी २४% पेक्षा जास्त स्टेक Rs १६४-Rs १६५ या भावाने खरेदी केला.बालाजी टेली ही कंपनी प्राईम फोकस आणी मुक्ता आर्ट्स या कंपन्यांप्रमाणेच कंटेंट प्रोव्हायडरचे काम करतात. रिलायंस इंडस्ट्रीजला गल्फ आफ्रिका पेट्रोमधील हिस्सेदारी विकली त्यातून Rs १०८७ कोटी मिळाले.
 • बॉम्बे डाईंग या कंपनीने आपली पुण्याची जमीन Rs २०० कोटींना विकली.

कॉर्पोरेट एक्शन

 • विप्रो ही IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी Rs ३२० प्रती शेअर या भावाने Rs११००० कोटी किमतीचे शेअर्स टेंडर ऑफर या पद्धतीने ‘BUY BACK’ करेल.
 • ‘JUST DIAL’ ह्या कंपनीने २४ जुलै रोजी शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • ATLAS सायकल या कंपनीने ४ ऑगस्ट रोजी शेअर स्प्लिट वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • रिलायंस जीओ राईट्स इशू द्वारे Rs २०००० कोटी उभारेल.
 • रिलायंस इंडस्ट्रीजने तुमच्याजवळ असलेल्या १ शेअरमागे १ शेअर बोनस दिला जाईल असे जाहीर केले. म्हणजे १: १ बोनस जाहीर केला.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • ICICI लोम्बार्ड या विमा क्षेत्रातील कंपनीने IPO साठी सेबी कडे अर्ज केला.
 • HDFC लाईफ या कंपनीचा Rs १०००० कोटींचा IPO ऑक्टोबर /नोव्हेंबर २०१७ मध्ये येत आहे. या द्वारे २०% इशुड शेअर कॅपिटल IPO द्वारे विकणार आहेत. MAX लाईफ बरोबरचे मर्जर रद्द झाले नसले तरी त्याचा IPO नंतरच विचार केला जाईल असे सांगितले.HDFC लाईफ ने या IPO साठी IRDA कडे परवानगी मागितली.
 • SBI लाईफ ने IPO साठी अर्ज केला. IPO च्या माध्यमातून १२ कोटी शेअर्स जारी करणार.
 • सलासर टेक्नोलॉजी हा IPO २७३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला; तर रिटेल कोटा ५६ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
 • गोदरेज अग्रोव्हेट ही कंपनी १.२३ कोटी शेअर्सच्या IPO द्वारा Rs ३००० कोटी भांडवल उभारणार आहे. याचा फायदा गोदरेज इंडस्ट्रीज आणी ASTEC लाईफ सायन्सेस या कंपन्यांना होईल.

मार्केटने काय शिकवले

लिमयेंनी १७ जुलै २०१७ रोजी NSE चा चार्ज स्वीकारल्यावर जर प्रथम कोणते काम केले असेल तर सेबीच्या कोलोकेशनविषयीच्या तक्रारीकडे लक्ष दिले. दंड स्वीकार केला. पण चूक मान्य केली नाही. कोलोकेशनविषयीचा गुंता सोडवायला सुरुवात केली. गुंता सुटला तर NSE च्या IPO चा रस्ता मोकळा होईल. ज्या ज्या कंपन्यांचा NSE मध्ये स्टेक आहे अशा कंपन्यांकडे लक्ष द्यावे. राधाकृष्ण दमाणी आणी राकेश झुनझुनवाला यांनी कोठे गुंतवणूक केली याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यांनी जे पी असोसिएट आणी ज्युबिलीयट लाईफ मध्ये हिस्सा खरेदी केला.

स्वदेशी (DOMESTIK) फंड आणी विदेशी निवेशक यांचे खरेदीविक्रीचे आकडे पाहिल्यास असे आढळते की मार्केट वाढण्याचा वेग कमी होत आहे. या लेव्हलवर कोणीही कॉम्फरटेबल नाही. कारण तिमाही निकालांचा विचार केल्यास निकाल खूप चांगले येत आहेत असे दिसत नाही. काहीही म्हणा मार्केट नर्व्हस ९९०० मध्ये अडकले असे म्हणावे लागेल. वाट पाहुया आणी जसे निफ्टी १०००० वर पोहोचेल तसे सेलब्रेट करू या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२०२८ वर तर NSE निर्देशांक निफ्टी ९९१५ तर बँक निफ्टी २४२८४ वर बंद झाला.

Advertisements

One thought on “आठवड्याचे-समालोचन – नर्व्हस 90s – नर्व्हस निफ्टी ९९०० – 17 जुलै २०१७ ते २१ जुलै २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – अनंत हस्ते कमलावराने देता, किती घेशील दो कराने – २४ जुलै २०१७ ते २८ जुलै २०

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s