आठवड्याचे-समालोचन – जसा पाउस तशी छत्री – 28 ऑगस्ट २०१७ ते १ सप्टेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जसा पाउस तशी छत्री – 28 ऑगस्ट २०१७ ते १ सप्टेंबर २०१७

गेला आठवडा वेगवेगळ्या घटनांमुळे गाजला. प्रथम अतिवृष्टी, नंतर USA मध्ये आलेले वादळ, उत्तर कोरियाने जपानवरून डागलेले क्षेपणास्त्र, RBI ने इशू केलेली ४० NPA कंपन्यांची यादी, आणी मंत्रिमंडळात नजीकच्या भविष्यात होणारे बदल,या घटनांमुळे दोलायमान अवस्थेत गेला.’पाउस पडेल तशी छत्री धरावी’हे ध्यानात ठेवूनच मार्केटमध्ये व्यवहार करावे लागले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये हरिकेन हार्वे या नावाच्या वादळामुळे पेट्रोनास आणी शेल या दोन रिफायनरीज बंद कराव्या लागल्या. याचा फायदा भारतातील OMC कंपन्यांना होईल उदा BPCL, HPCL, IOC
 • USA वारंवार करीत असलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून उत्तर कोरियाने आपले क्षेपणास्त्र जपानच्या पलीकडे असलेल्या ग्वाम या USAच्या सैनिकी तळाकडे परीक्षणासाठी डागले. जरी यात वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसली तरी जगभरात खळबळ माजली आणी जगभरातील नार्केट काही काळ पडली. सोने आणी इतर धातूंच्या किंमतीत तेजी आली.
 • कारमायकेल प्रोजेक्टवर आता अडानी एन्टरप्रायझेस काम सुरु शकेल. ऑस्ट्रेलियन सरकारने स्पष्टपणे सांगितले की अडानी एन्टरप्रायझेसला सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्या आहेत आता त्यांना हवे असल्यास ते कोळसा आणी युरेनियम कारमायकेल माईन्समधून निर्यात करू शकतात. याचा फायदा अडानी एन्टरप्रायझेस आणी अडानी पॉवर या कंपन्यांना होईल. पर्यायाने भारतात स्वस्त वीज निर्मिती करणे शक्य होईल.
 • लिबियामधील दोन ऑईल फिल्ड मधून क्रूडचा पुरवठा कमी झाला.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सोने आणी चांदीच्या खरेदीविक्रीच्या प्रत्येक व्यवहारासाठी PAN कार्ड अनिवार्य केले जाण्यावर सरकार विचार करत आहे.
 • सरकारने कनसॉलिडेटेड FDI पॉलिसी जाहीर केली. प्रिंट मेडीया आणी विमानवाहतूक करणाऱ्या कंपन्यांसाठी २६% ठेवली. १००% FDI असणाऱ्या कंपन्यांवर याचा काहीही परिणाम होणार नाही
 • सणासुदीचे दिवस असल्यामुळे सरकारने साखरेसाठी STOCK लिमिट जाहीर केली.
 • मंत्रिमंडळाने GST COMPENSATION ACT मध्ये वटहुकुमाद्वारे सेस १५% ते २५% पर्यंत वाढविण्याचा अधिकार मिळवण्यासाठी मंजुरी दिली लक्झुरी कार्स आणी ड्रायव्हर धरून १५ सीटर गाड्यांवर आता २५% सेस लावला जाईल. या वटहुकुमावर राष्ट्रपतींची सही झाल्यावर अर्थमंत्रालय याबाबतीत नोटिफिकेशन जाहीर करेल. हा विषय ९ सप्टेंबरला होणार्या GST कौन्सिलच्या मीटिंगमध्येही ठेवला जाईल.
 • सरकारने ASBESTOS शीटवरील GST २८% वरून १८% केल्यामुळे हैदराबाद इंडस्ट्रीजला फायदा होईल
 • PAN ला AADHAAR लिंक करण्यासाठी मुदत ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सरकारने वाढवली.
 • PSU बँकांचे मर्जर आणी इतर रीऑर्गनायझेशन सोपे व्हावे म्हणून अर्थ मंत्रालयाने PSU बँकांना COMPETITION ACT मधील काही कलमांतून १० वर्षेपर्यंत सूट दिली आहे.
 • इंटर मिनिस्टेरियल ग्रूप ने स्पेक्ट्रम पेमेंटची मुदत १० वर्षावरून १६ वर्षे करण्याची तसेच कर्जावरील व्याजाचा दर MCLR प्रमाणे आकारण्याची शिफारस केली.
 • सरकारने दक्षिण कोरिया, थायलंड, आणी युरोपिअन युनियन मधून आयात होणाऱ्या सिंथेटिक रबरवर ANTI DUMPING ड्युटी लावली.
 • सरकारने सरकारी कंपन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. क्रूड वाहतुकीसाठी जे दीर्घ मुदतीचे करार आहेत ते शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे द्या असे सांगितले आहे. .

RBI SEBI आणी इतर प्रशासनीक संस्था

 • सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की एक्सिस बँक आणी येस बँक यांच्याकडे गहाण ठेवलेले फोर्टिस हेल्थकेअरचे शेअर्स एक्सिस बँक, येस बँक किंवा सिंग बंधू विकू शकणार नाहीत.
 • RBI ने ४० NPA अकौंट झालेल्या कंपन्यांची यादी जाहीर केली. बँकांना आदेश दिले की त्यांनी या खात्यांचे रेझोल्युशन १३ डिसेंबर २०१७ पर्यंत करावे. जर हे शक्य झाले नाही तर या कंपन्यांना IBC खाली INSOLVENCY साठी रिफर करावे. बंकाना आता या अकौंटवर जास्त प्रोव्हिजन करावी लागेल. पर्यायाने त्यांच्या प्रॉफीटेबीलिटीवर परिणाम होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • इन्फोसिसचे संस्थापक श्री NR नारायण मूर्ती यांनी आपल्या गुंतवणूकदार आणी शेअरहोल्डर्स बरोबर केलेया वार्तालापात इन्फोसिसच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयीची उच्च परंपरा आणी ती कसोशीने पाळ्ण्याची परंपरा यांचा उहापोह केला. मधल्या काळात झालेल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या खालावलेल्या पातळीची काही उदाहरणे देवून ती उघड करण्यात मी माझे शेअरहोल्डरचे कर्तव्य बजावले असे सांगितले. नवीन नॉन एक्झीक्युटीव्ह चेअरमन श्री नंदन निलेकणी यांच्यावर विश्वास व्यक्त करून इन्फोसिसचे भविष्य उज्ज्वल आहे असे सांगितले. आपण भविष्यातही जर कंपनीत काही चुकीचे घडत असेल तर असेच काम करत राहू असे सांगितले.
 • वंदना सिक्का यांनी इन्फोसिस फौंडेशनमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 • उज्जीवन फायनान्स या कंपनीला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला.
 • टाटा एलेक्सी या कंपनीने वीनोवा या कंपनी बरोबर विडीओ डीलीव्हारीसाठी करार केला.
 • MRF ने लक्झरी आणी प्रीमियम कारसाठी नवे टायर बाजारात आणले.
 • CESC चे चार विभागात १ ऑक्टोबर २०१७ पासून विभाजन होईल. ते या प्रमाणे (१) जनरेशन, (२) डीस्ट्रीब्युशन, (३) स्पेन्सर हॉटेल, (४) CESC व्हेंचर्स CESC चे १० शेअर्स असतील ५ शेअर्स जनरेशन, ५ शेअर्स डीस्ट्रीब्युशन, ३ शेअर्स स्पेन्सर्स, आणी २ शेअर्स CESC व्हेंचर्स चे शेअर्स मिळतील. या RECONSTRUCTION विषयी माहिती ‘GST ची वरात मार्केटच्या दारात’ या १५ मे ते १९ मे या ब्लोगमध्ये दिली आहे.
 • यावेळी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ऑक्टोबर २०१७ पासून सुरु होईल. नेहेमी हा हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. कामगार दिवाळी झाल्यानंतर गंगास्नान करून कामावर रुजू होतात. यावेळी दिवाळी लवकर आहे. दुसरे कारण असे की गेली ५ वर्षे उस पिकवणारे शेतकरी, शेतकी संशोधक आणी सरकार यांच्या प्रयत्नातून असा उस पिकवला आहे की जो गाळण्यासाठी लवकर तयार होतो आणी मिळणार्या साखरेच्या उताऱ्यावर काही परिणाम होत नाही. यामुळे साखरेचा पुरवठा वाढेल आणी साखरेच्या किमती नियंत्रणात राहतील.
 • आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर जेट एअरवेजनी ६ सप्टेंबर २०१७ पर्यंत २०% सुट दिली आहे.
 • अडानी ग्रूपने SAAB बरोबर सिंगल इंजिन फायटर जेट बनवण्यासाठी करार केला.
 • आंध्र बँकेने १०३ खात्यामधील Rs २६३० कोटीच्या NPA साठी बोली मागवल्या आहेत
 • DCB बँकेचे मुख्य प्रमोटर आगाखान फौन्डेशन हे पाकिस्तानातील हबीब बँकेचेही प्रमोटर आहेत.USA मध्ये या बँकेला मनीलोंनडरिंगच्या आरोपाखाली दंड ठोठवला आहे.त्यामुळे DCB बँकेचा शेअर पडला.
 • स्टर्लिंग बायोटेक या कंपनीचा Rs ८ कोटींचा व्यवहार संशयास्पद वाटल्यामुळे आयकर विभागाने धाडी घातल्या.
 • या वेळी सर्व ऑटो उत्पादन करणाऱ्या कंपन्याच्या औटो विक्रीमध्ये चांगली वाढ दिसून आली. मारुती, ASHOK LEYLAND , महिंद्र आणी महिंद्र, बजाज ऑटो, आयचर मोटर्स या कंपन्यांच्या ऑटो विक्रीमध्ये वाढ झाली. बजाज ऑटोने GST लागू होण्याच्या वेळेस भारी डीसकौंट न दिल्यामुळे तसेच पुणे मुंबई आणी इतर शहरात रिक्षांचे नवीन परवाने देणार असल्यामुळे, तसेच त्यांनी नवीन व्हरायटी व्हेईकल बाजारात आणल्यामुळे शेअर वाढला. तसेच इतरही ऑटो उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वधारले.
 • सद्भाव इंजीनिअरिंगने गुजरात मधील Rs९०० कोटींच्या रोड प्रोजेक्टसाठी कमीतकमी बोली दिली आहे.
 • जे पी असोशीएट कर्ज कमी करण्यासाठी आपला भिलाई प्लान्ट विकण्याचा विचार करत आहेत. य्यातून Rs १५०० कोटी मिळतील.
 • १६ जानेवारी ते २४ जानेवारी २०१७ या काळात USFDAने झायडसच्या अहमदाबाद युनिटची तपासणी केली. त्याना EIR दिला झायडस .ही कॅडिला हेल्थकेअरची सबसिडीअरी असल्यामुळे कॅडीलाला फायदा होईल.
 • कामत हॉटेल्सने कॅनरा बँकेकडून जे कर्ज घेतले आहे त्याची सेटलमेंट स्कीम मंजूर झाली. ही सेटलमेंट हप्त्याहप्त्याने केली जाईल.
 • RBL बँक, EDELWEISS या कंपन्या मन्नापूरम फायनान्स ही कंपनी विकत घ्यायला उत्सुक आहे.
 • गुडइअर टायर ही कंपनी ‘ग्रीन रेव्होल्युशन ’या तत्वावर सोयाबीन आधारीत एक रबर कामपाउंड तयार करून त्याचा उपयोग टायर बनवण्यासाठी करणार आहेत.
 • ७०० रेल्वे स्टेशन्सवर सोलर इन्व्हर्टर लावले जातील याचा फायदा ABB या कंपनीला होईल.
 • पठाणकोट-अमृतसर टोल रोड IRB इन्फ्रा InVit कडे देणार आहेत याचे त्याना Rs १६३० कोटी मिळतील.
 • आर्वी डेनिम, नंदन डेनिम या कंपन्यांमध्ये प्रमोटर आपला हिस्सा वाढवत आहेत.
 • USA मधील कोर्टात चालु असलेल्या पेटंट केसचा निकाल DR रेड्डीज च्या बाजूने लागला.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • BPCL, UPL, बजाज फायनान्स हे शेअर्स निफ्टीमध्ये सामील होणार आहेत.
 • FY २०१८ च्या पहिल्या तिमाहीत GDP GROWTH ६.१% वरून ५.७ % झाली. वित्तीय घाटा Rs ६३००० कोटी तर राजस्व घाटा Rs ३९२०० कोटी झाला. स्टील, वीज आणी नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढले.
 • NSE ने ऑप्शन ट्रेडर्स साठी ‘DO NOT EXERCISE’ ही नवीन FACILITY उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्ही ‘IN THE MONEY’ ऑप्शन मध्ये असाल तर तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी ४-३० ते ५.०० वाजेपर्यंत ‘DO NOT EXERCISE’ हे ऑप्शन वापरून ऑप्शन AUTOMATICALLY EXERCISE झाल्यामुळे द्याव्या लागणाऱ्या STT ची बचत करू शकता.

कॉर्पोरेट एक्शन

 • जे के पेपर या कंपनीने १४ सप्टेंबर २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक नोलाव्ली आहे. या बैठकीत बोनस शेअर्स इश्यू करण्यावर विचार होण्याची शक्यता आहे.
 • NTPC या कंपनीचा ऑफर फॉर सेल मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट नॉन रिटेल आणी ३० ऑगस्ट २०१७ रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन होता. फ्लोअर प्राईस Rs १६८ ठेवली होती. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ५% डीस्काउंट ठेवला होता. नॉन रिटेल कोटा ओव्हर सबस्क्राइब झाला पण किरकोळ गुंतवणूकदारांचा प्रतिसाद यथातथाच होता.
 • सेन्ट्रल बँक आणी युनियन बँक यांचे मर्जर होईल अशी ऐकीव बातमी आहे.
 • SCHAEFFLER INDIA (पूर्वीची FAG BEARING) या कंपनीचे आणी INA BEARINGS INDIA आणी LUK INDIA या दोन कंपन्यांबरोबर मर्जर होणार आहे ह्या कंपन्या ऑटोमोटीव कॉम्पोनट च्या क्षेत्रात सुप्रस्थापित कंपन्या आहेत. हे मर्जर पूर्ण झाल्यावर जर्मन प्रमोटर्स आपला स्टेक ७४.१३# पर्यंत वाढवतील.
 • ४ सप्टेंबर २०१७ रोजी रिलायंस कॅपिटलची सर्व CONTRACTS बंद होतील. कारण ६ सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट आहे. ५ सप्टेंबर पासून नवीन करार होतील. ४ सप्टेंबर पासून रिलायंस कॅपिटलमधून होम फायनांस वेगळा होईल. ज्यांच्या जवळ रिलायंस कॅपिटलचा १ शेअर आहे त्यांना रिलायंस होम फायनान्स चा १ शेअर मिळेल.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • आदित्य बिर्ला कॅपिटलचे (ग्रासिममधून डीमर्जर झालेल्या कंपनीचे) NSE वर Rs २५० ला लिस्टिंग झाले

मार्केटने काय शिकवले

कोणत्याही कंपनीचा IPO येण्याआधी ज्यांच्याकडे शेअर्स असतात त्यांना शेअर्स चे लिस्टिंग झाल्यापासून १ वर्ष संपेपर्यंत शेअर्स विकता येत नाहीत. ही मुदत RBL बँकेच्या बाबतीत संपली. ही बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक सिद्ध होऊ शकते. ह्या शेअर्स विक्रीची जी टांगती तलवार असते ती नष्ट झाल्यामुळे शेअर्सच्या किंमतीला स्थैर्य येते. RBL बँकेचा शेअर वाढला.

आपण आपल्याला येणार्या गुंतवणूकीविषयी सल्ला देणाऱ्या SMSचे कधी स्वागत केले आहे का? हे SMS प्रसिद्ध ब्रोकर्सच्या इमेल अड्द्रेसशी मिळत्याजुळत्या अड्द्रेसवरून पाठवल्या जातात. हे SMS तुम्हाला माहित नसलेल्या आणी अप्रसिद्ध कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करून वरचे टार्गेट्स देऊन विन्ड्फॉल फायद्याचे आश्वासन देतात. पण प्रत्यक्षात ९०% केसेसमध्ये हे विंडफॉल प्रॉफीट न होता हृदयविदारक तोटा होतो. आपण मोठ्या ब्रोकरकडून मेल आली आहे असे समजून या कंपन्यात गुंतवणूक करता आणी फशी पडता. यापैकी काही कंपन्यांची नावे : NECC, VKJ इन्फ्रा, महास्टील, SWADEIN, साईबाबा इन्व्हेस्टमेंट आणी कम्युनिकेशन. या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत बहुतांशी कमी असते आणी तुम्हाला दुप्पट ते तिप्पट टार्गेट अचिव्ह होईल असे आमिष दाखवले जाते.

आता आपल्याला याची पद्धती समजावून घेतली पाहिजे. टेलिकॉम कंपन्या त्यांच्या PACKAGEप्रमाणे ‘BULK SMS’ पाठवण्याची FACILITY देतात. नंतर हे लोक डेटाबेस विकणार्या लोकांकडून तुमचा टेलिफोन नंबर मिळवतात. आणी BULK SMS पाठवतात. SMS माझ्या मोबाईलवर पाठवू नका असे टेलिकॉम कंपन्यांना सांगितले तरी अशा प्रकारचे SMS येत राहतात. असे SMS तुम्हाला आल्यास सेबीच्या खालील वेबसाईटवर कळवा – WWW.SEBI.GOV.IN . आपण १८००२६६७५७५ या नंबरवर फोन करू शकता.

यात आपल्याला सांगायचे इतकेच की आपण यासारख्या SMSवर अवलंबून त्यांच्या सांगण्याप्रमाणे जर त्यांनी सांगितलेल्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केलीत तर आपल्याला धोका होऊन आपले पैसे बुडू शकतात. तेव्हा अशा SMS पासून सावध राहावे जरी आपल्याला एखाद्या कंपनीत गुंतवणूक करावी असे वाटले तरी फक्त अशा SMS वर अवलंबून न राहता त्या कंपनीचा फंडामेंटल आणी तांत्रिक अभ्यास करूनच योग्य वाटेल अशी आणी आपल्याला परवडेल अशी गुंतवणूक करा. SEBI आणी TRAI या बाबतीत योग्य ती कारवाई करतीलच. पण आपण सावध राहावे हेच खरे.

तसेच NSE च्या इन्स्पेक्शन टीमने असे कळवले आहे की आपल्याला ब्रोकरकडून येणारे पैसे किंवा आपण घेतलेले शेअर्स ब्रोकरकडे फार काळ ठेवू नका. पैसे मागून घ्या आणी शेअर्स DEMATला पाठवायला सांगा. ठराविक कालावधीत सेटलमेंट करा.

तसेच जर ब्रोकरला आपण PA दिली असेल आणी जर तुमचा DEMAT अकौंट ब्रोकरकडेच असेल तर आपण दर महिन्याचे आपल्या DEMAT अकौंटचे विवरण मिळवून त्याच्या सत्यतेची आणी सर्व व्यवहार बरोबर आहेत हे बघणे अत्यावश्यक आहे. आयकर खात्याने ४०० DEMAT खातेधारकांना आपण केलेल्या लक्षावधी रुपयांच्या शेअर्सव्यवहारात मिळवलेल्या प्रॉफीटवर आयकर भरा असे सांगितले. यापैकी बहुसंख्य DEMAT खातेधारकांनी आपण आपल्या DEMAT अकौंटवर एवढ्या रकमेचे व्यवहार केलेच नाहीत असे सांगितले. तेव्हा सावध रहा. योग्यवेळी वेळोवेळी घेतलेली खबरदारी आपल्याला भविष्यातील नुकसान आणी धोक्यापासून दूर ठेवू शकते. अशा वेळेला मला माहीत नव्हते, ब्रोकरकडे स्टेटमेंट कसे मागायचे? ब्रोकरवर अविश्वास कसा दाखवायचा हे सर्व बचाव उपयोगी पडत नाहीत. व्यवहार आणी माणुसकी या आपापल्या जागी ठेवा.

मंत्रिमंडळात होऊ घातलेले बदल, विशेषतः सरंक्षण आणी रेल्वे या खाजगी क्षेत्रासाठी ओपन होत असलेली  मंत्रालये  कोणाच्या ताब्यात सोपवली जातील या विषयी मार्केटमध्ये उत्सुकता आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील आपण मात्र आपला फायदा होऊ शकेल अशा शेअर्सवर नजर ठेवणे सोयीस्कर. हरघडी हर सेकंदाला होणाऱ्या बदलाचे, नाविन्याचे स्वागत करायला शेअर मार्केट नेहेमीच सज्ज  असते. प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ लावून ती घटना आपल्याला फायदेशीर कशी ठरेल आणी जर त्या घटनेपासून तोटा होणार असेल तर त्यापासून सुटका कशी करून घ्यावी हेच शेअर मार्केटमधील कौशल्य. म्हणजेच ज्या बाजूने पाउस येत असेल त्या बाजूला छत्री धरायची पण त्याच बरोबर वाऱ्याने आपली छत्री उडून जाणार नाही याची काळजी घ्यायची हेच योग्य.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१८९२ आणी NSE निर्देशांक ९९७४ आणी बँक निफ्टी २४४३४ वर बंद झाले.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे-समालोचन – जसा पाउस तशी छत्री – 28 ऑगस्ट २०१७ ते १ सप्टेंबर २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – मार्केट हाच गुरु – ०४ सप्टेंबर २०१७ ते ८ सप्टेंबर २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s