आठवड्याचे-समालोचन – तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची – ११ सप्टेंबर २०१७ ते १५ सप्टेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची – ११ सप्टेंबर २०१७ ते १५ सप्टेंबर २०१७

उत्तर कोरियाच्या वारंवार होणार्या अणु चाचण्यामुळे युनायटेड  नेशन्सच्या सिक्युरिटी कौन्सिलने  आपादकालीन बैठक बोलावली होती. पण या वेळच्या बैठकीत नरमाईचे धोरण स्वीकारले गेले.त्यामुळे युद्धाचे ढग दूर होताहेत असे वाटले आणी जगातील सर्व शेअर्समार्केटनी तेजी दाखवून स्वागत केले बरीच वाट पाहिल्यानंतर या आठवड्यात बँक निफ्टी २५००० च्या वर गेला, आणी निफ्टीने ही पुन्हा १००००चे दर्शन दिले. तोच जणू याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने शुक्रवारी पुन्हा अणुचाचणी केली. त्यामुळेच काही कायम स्वरूपाची उपाययोजना करण्यासाठी युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी कौन्सिलने शुक्रवारी संध्याकाळी आपादकालीन तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे शुक्रवारी मार्केट थोडेसे पडले पण लगेच सावरले. घडणाऱ्या सर्व गोष्टींचा मार्केटवर फारसा परिणाम होताना दिसत नाही. मार्केटला कसलीही भीती काळजी जाणवत नाही. मार्केट आपल्याच थाटात दिमाखात पुढे पुढे चालले आहे असे वाटते.

मंगळवारी जपानचे पंतप्रधान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या उद्घाटनासाठी भारतात आले होते. जपान भारतात करत असलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल. त्यामुळे या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मध्ये ज्या कंपन्यांना काम मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या. उदा रोलिंग STOCK साठी भेल, TRACK आणी बोगदे बनवण्यासाठी लार्सेन & टुब्रो HCC, NCC , लाईट्ससाठी बजाज इलेक्ट्रिकल, HAVELLS, CROMPTON, ऑटोमेशनसाठी MIC इलेक्ट्रोनिक्स,BARTRONICS, तिकीटांसाठी HCL इन्फो आणी टी सी एस, सिग्नल व्यवस्थेसाठी GE पॉवर, सिमेन्स, ABB, CROMPTON. WATER ट्रीटमेटसाठी THERMAX, VHAA TECH VABAG जपान सरकार बरोबर उर्जा संरक्षण आणी परिवहन या क्षेत्रात करार झाले. जपान भारतात ४.७ अब्ज US $ ची गुंतवणूक करेल. जपानने भारतात बिझिनेस सपोर्ट सेन्टर्स, रेस्टारंट उघडण्याचे आवाहन केले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA H1B व्हिसावर कोणतेही निर्बंध घालणार नाही, पूर्वीपेक्षा जास्त भारतीयांना व्हिसा दिले याचा IT सेक्टरवर अनुकूल परिणाम होईल.
 • INDIVION PLC या कंपनीने DR रेड्डीज, MYLAN, TEWA या कंपन्यांविरुद्ध ‘SUBOXONE’च्या पेटंट विषयी केस दाखल केली

सरकारी अन्नौंसमेंट

 • टेबलवेअर आणी किचनवेअरवरील GST १८% वरून १२% केला. याचा फायदा ला ओपाला आणी बोरोसील ग्लास या कंपन्यांना होईल
 • नोझल आणी स्प्रिंकलर्स अशा शेती उत्पादनावर GST १८% वरून १२% केला. याचा फायदा EPC आणी जैन इरीगेशन यांना होईल. इलेक्ट्रोनिक्स वस्तूंवर GST कमी केला. याचा फायदा MIC, MIRK, ION, HCLइन्फो यांना होईल.
 • सरकारने मिड सेगमेंट कार्सवर २%, मोठ्या कार्सवर ५% तर SUV वर ७% सेस वाढवला.
 • चीनमध्ये बनलेल्या आणी चीन मधून आयात केलेल्या FLAT स्टीलवर सरकारने CVD (काऊनटर व्हेलिंग ड्युटी) लावली.
 • महाराष्ट्र राज्य सरकारने पुढील वर्षाच्या गुढी पाडव्यापासून प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यावर मनाई हुकुम लागू होईल असे जाहीर केले. त्यामुळे ताग उत्पादन करणार्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. या उद्योगातील लिस्टेड कंपन्या GLOSTER, LUDLOW आणी
 • महाराष्ट्र FDA ने PACKAGED पाण्याची तपासणी करण्याचे ठरवले आहे. पाण्याच्या २० ते २५ नमुन्यांची तपासणी केली जाईल.
 • दीपक फरटीलायजरने अमोनियम नायट्रेटसारख्या केमिकल्सवर ANTI DUMPING ड्युटी लावण्याची मागणी केली. सरकारने रशिया जॉर्जिया, इंडोनेशिया, इराण येथून येणाऱ्या केमिकलवर US $ ११,५० ते US $ ६० पर्यंत ANTI DUMPING ड्युटी लावली. याचा फायदा दीपक नायट्रेट, GNFC यांना होईल.
 • दूरदर्शनच्या वाहिन्यांनी पेट्रोल आणी डीझेल दरवाढीविरुद्ध चालवलेल्या मोहिमेला सरकारने बोलावलेल्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या बैठकीत कोणतेही कर कमी होऊ शकणार नाहीत आणी आम्ही OMC कंपन्यांच्या कामात ढवळाढवळ करणार नाही असे सांगून थंडा प्रतिसाद दिला.
 • कर्नाटक सरकारने EV (इलेक्ट्रिक व्हेईकल) पोलिसी जाहीर केली. जे कोणी कर्नाटकात कारखाना लावतील त्यांना करात सवलत मिळेल. याचा फायदा अमरराजा BATTERY आणी एक्साईड यांना होईल.
 • सरकारने आर्बिट्रेशन अवार्डमध्ये मंजूर झालेले पैसे लवकर परत करावेत आणी याबाबतची परिस्थिती PMOला ५ सप्टेंबरपर्यंत अवगत करावी अशी शिफारस केली. याचा फायदा HCC, रिलायंस इन्फ्रा, पटेल इंजिनीअरिंग यांना होईल.
 • १० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या डीझेल गाड्यांवर बंदी घालण्यास NGT (NATIONAL GREEN TRIBUNAL) ने नकार दिला.
 • ओडिशा सरकारने वेदान्ताच्या ६ युनिटवर बंद करण्यास सांगितल्यामुळे अल्युमिनियमच्या उत्पादनावर परिणाम होईल. वेदांताने ओडिशामधील आपली ३ उत्पादन युनिट तात्पुरती बंद केली.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • HDFC लाईफच्या IPO बद्दल सेबीने काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे. HDFC आणी HDFC लाईफ यांच्या हिताचे रक्षण होत आहे का हे पहायचे आहे. त्यामुळे HDFC लाईफच्या IPO ला उशीर होईल.
 • सुप्रीम कोर्टाने जे पी ASSOCIATE ला २७ ऑक्टोबर पर्यंत Rs २००० कोटी जमा करायला सांगितले.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ऑगस्ट २०१७ मध्ये WPI १.८८% वरून ३.२४% झाला. अन्नधान्य (५.७५%) इन्धन आणी उर्जा (९%) आणी प्रायमरी आर्टिकल्स (२.६६%) यात मोठी वाढ झाली.
 • IIP मध्ये जुलै २०१७ साठी १.२% वाढ दाखवली.
 • ऑगस्ट २०१७ मध्ये CPI मध्ये २.३६% वरून ३.३६% वाढ झाली. त्यामुळे महागाईत १% वाढ झाली/ही वाढ मुख्यतः घरे, इंधन, आणी अन्नधान्यातील किंमतीच्या वाढीमुळे झाली. ही CPI मार्च २०१७ पासून कमाल स्तरावर आहे.
 • FTSE चे RIBALANCING केले जाणार आहे FTSE मध्ये मोतीलाल ओसवाल, फ्युचर रिटेल, D-MART यांचा समावेश केला जाईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • HFCL ही कंपनी सप्टेंबर २०१७ पासून CDR (CORPORATE DEBT RESTRUCTURING) मधून बाहेर आली.
 • टाटा पॉवर आणी टाटा केमिकल्स यामध्ये जे क्रॉसहोल्डिंग आहे ते टाटा सन्स खरेदी करणार आहे.
 • JENBURKT फार्माने शेअर ‘BUY BACK’ जाहीर केला. ‘BUY BACK’ प्रती शेअर Rs ५७६ या भावाने केला जाईल. ‘BUY BACK’ साठी कंपनी Rs १२ कोटी खर्च करेल.
 • ऑस्ट्रेलियातून जे एल एन जी आयात होते, त्याची किंमत ठरली आहे नवीन करार करून त्यापेक्षाही कमी किंमतीत भारत एलएनजी आयात करण्याची शक्यता आहे. २००९ मध्ये हे डील झाले होते. याचा फायदा गेल आणी पेट्रोनेट एलएन जी याना होईल. पेट्रोनेट एल एन जी ने श्रीलंकेतील प्रोजेक्टसाठी जपानी कंपनी की2 बरोबर करार केला.
 • IRB इन्फ्राला कैथाल राजस्थान प्रोजेक्ट चा टोल २७ वर्षे वसूल करण्यासाठी मंजुरी मिळाली. गेल्या चार महिन्यांपासून टोल वसुली सुरु झाली.
 • दीप इंडस्ट्रीजच्या अंकलेश्वर प्लांटसाठी ‘LOA’ मिळाला. ONGC कडून दीप इंडस्ट्रीजला ऑर्डर मिळाली.
 • भारती एअरटेल IUC (INTERCONNECT USAGE CHARGE) ४०% ते ५०% ने कमी करणार आहे. हा चार्ज पूर्वी Rs ०.१४ होता तो आता Rs ०.०७ किंवा Rs ०.०८ करणार आहे.
 • कोची शिपयार्डचे लिस्टिंग झाल्यानंतरचा पहिला तिमाही निकाल चांगला आला
 • आसाममधल्या एका खाणीत IOC, ऑईल इंडिया आणी HOEC भागीदार आहेत. त्या खाणीत ११ सप्टेंबर २०१७ पासून व्यापारी तत्त्वावर उत्पादन सुरु झाले. याचा फायदा HOEC ला होईल.
 • टाटा स्टीलचा UK मध्ये जो पेन्शन फंडाबरोबर वाद चालला होता तो मिटला.
 • विप्रोने रोमानियामध्ये सॉफटवेअर सोल्युशन सेंटर उघडले
 • इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या अडचणीत आहेत. बँका या प्रोजेक्टसाठी कर्ज देण्यास तयार नाहीत. प्रोजेक्ट्स ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे ठराविक प्रोजेक्टसाठी बॉंड इशू करावेत असे सरकारने ठरवले आहे.
 • इक्विटी इंटेलिजन्स इंडिया या फंडाने जेथे गुंतवणूक केली त्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले असे आढळले.
 • सेन्चुरी टेक्स्टाईलचा पेपर बिझिनेस विकल्यानंतर सेंच्युरीचे ग्रासिममध्ये मर्जर होईल गेल्या पांच वर्षात सेंच्युरी आणी ग्रासिम यांचे मर्जर अशी खबर आहे. पण या आठवड्यातील मीटिंगमध्ये या विषयी काहीच बोलणी झाली नाहीत.
 • इंडिया बुल्स रिअल इस्टेट ने गुरूग्राममध्ये एक प्लॉट खरेदी केला.
 • IPHONE 8 आज इंडियात येत आहे याचा फायदा HCL INFO आणी रेडिंगटन याना होईल.
 • कॅपिटल फर्स्ट मधील FPI लिमिट २४% वरून ५०% केली.
 • टाटा ग्लोबल बिव्हरेजीसकडे टाटा केमिकल्सचे १.०५ कोटी शेअर्स आहेत. हे शेअर्स टाटा सन्सला विकून त्यांना Rs ७५० कोटी मिळणार आहेत.
 • जेट एअरवेजच्या तिमाही निकालामध्ये प्रॉफीट मार्जीन आणी ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले.
 • टायरचे भाव वाढले आणी सरकारही बरेच दिवसापासून असलेली ANTI DUMPING ड्युटीची मागणी पुरी करेल असे वाटते.
 • भारती एअरटेलने SK टेलिकॉमबरोबर STRATEGIC करार केला.
 • ज्युबिलंट फूडच्या बाबतीत एक विचित्र बातमी आली. पिझाबरोबर जे ओरगेनोचे जे पाकीट देतात त्यात किडे आढळले. त्यामुळे शेअर Rs १०० ने पडला. कंपनीने स्पष्टीकरण दिले की ही पाकिटे भरण्याचे काम ऑउट सोर्स केले आहे.
 • टाटा केमिकल्स आपला हल्दिया येथील फोस्फरीक केमिकल्स चा बिझिनेस विकणार आहे. हा विकत घेण्यात NETHERLANDS च्या एका कंपनीला इंटरेस्ट आहे.
 • एरीक्ससंने R COM वर IBC खाली दिवाळखोरीचा मामला दाखल केला..एअरसेलला स्पेक्ट्रममध्ये ट्रेडिंग करता येणार नाही. DOT ने RCOM आणी एअरसेलच्या मर्जरला विरोध केला होता एअरसेल या कंपनीवर विविध बँकांनी दिलेले Rs १६००० कोटींचे कर्ज बाकी आहे.
 • त्रिनेत्र आणी त्रिशूल यांचे मर्जर होणार आहे. याचा फायदा इंडिया सिमेंटला होईल
 • टाटा कम्युनिकेशनकडे असलेली VSNL ची ७३८ एकर जमीन विक्रीतील सर्व अडचणी दूर झाल्या. कंपनी NCLT मध्ये जमीन ट्रान्स्फर करण्यासाठी अर्ज करील. जमीन HPIL मध्ये ट्रान्स्फर होईल. या जमिनीची किंमत अंदाजे Rs १५००० कोटी होईल.

कॉर्पोरेट एक्शन

 • भारत फोर्ज ३० सप्टेंबरला एक्स बोनस होईल.
 • इंडसइंड बँक आणी भारत फायनांसियल यांच्यात मर्जरसाठी बोलणी सुरु आहेत.
 • टुरिझम फायनान्समध्ये जो IFCIचा २६.१% स्टेक आहे तो IFCI विकणार आहे. हा हिस्सा महिंद्र हॉलिडेज, COX AND KINGS खरेदी करू शकतात.
 • इंटरग्लोब एव्हीएशन Rs ११२५ ते Rs ११७५ या BANDमध्ये QIP इशू करणार आहेत. कदाचित एअरइंडिया आणी जेट एअरवेज मध्ये स्टेक खरेदी करण्यासाठी हा पैसा खर्च करण्याची शक्यता आहे.
 • PANACEA बायोटेक आपला रिअल्टी बिझिनेस एका वेगळ्या कंपनीत डीमर्ज  करून त्या कंपनीचे लिस्टिंग करतील
 • फ्युचर ग्रूप HYPERCITY ही कंपनी Rs १००० कोटींना विकत घेण्याचा विचार करत आहे. . .

या आठवड्यात आलेले IPO

 • CAPACIT’E इन्फ्राप्रोजेक्ट्स ह्या कंपनीचा IPO १३ सप्टेंबरला ओपन होऊन १५ सप्टेंबरला बंद झाला. प्राईस BAND Rs २४५ ते Rs २५० होता मार्केट लॉट ६० शेअर्सचा होता, ही कंपनी मुंबईची असून बिल्डर्सना इक्विपमेंट आणी एंड टू एंड बांधकाम सेवा पुरवते. त्याबरोबरच या कंपनीच्या स्वतःच्याही बिल्डींग प्रोजेक्ट्स चालू आहेत. या कंपनीचा नफा ६६.८३ कोटी होता. IPO ची प्रोसीड्स कंपनी इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी आणी खेळत्या भांडवलासाठी वापरेल. हा IPO १८६ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला. .
 • ICICI लोम्बार्ड या जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील कंपनीचा IPO १५ सप्टेंबरला उघडून १९ सप्टेंबरला बंद होईल प्राईस BAND Rs ६५१ते Rs ६६१ असून मिनिमम लॉट २२ शेअर्सचा आहे.
 • SBI लाईफचा IPO २० सप्टेंबर २०१७ पासून ओपन होईल. याचा प्राईस BAND Rs ६८५ ते Rs ७०० आहे. या शेअरचे लिस्टिंग ३ ऑक्टोबर २०१७ ला होईल.
 • SBI आपला क्लीअरिंग कॉर्पोरेशन, रेटिंग एजन्सी मधील स्टेक आणी नॉनकोअर ASSETS विकणार आहेत.
 • इंदोरस्थित PRATAAP SNACS या कंपनीचा Rs ५३० कोटींचा IPO सप्टेंबर २२ २०१७ ते सप्टेंबर २६ २०१७ या काळात ओपन असेल. याचा प्राईस BAND Rs ९३० ते Rs ९३८ आहे. यलो डायमंड हा वेफर्सचा ब्रांड प्रसिद्ध आहे. यासारखीच DMF फूड्स ही कंपनी आहे.
 • गोदरेज अग्रोव्हेटच्या IPO साठी सेबीची परवानगी मिळाली.
 • डिक्सन टेक चा इपो 117 वेळा (रिटेल कोटा १०.२ वेळा) ओव्हरसबस्क्राईब झाला. भारत रोड नेट वर्क्स चे रिटेल कोटा ६.९ पट ओव्हरसबस्क्राईब झाला.

मार्केटने काय शिकवले

या आठवड्यात पॉवर सेक्टरचा बोलबाला होता. एनर्जी एक्स्चेंजवर सातत्याने VOLUME वाढत आहेत. त्याचा फायदा पॉवर ट्रेडिंगला होईल. पॉवर एक्स्चेंजचे VOLUME वाढले मर्चंटपॉवरचे रेट वाढले. गेल्या तीन वर्षातल्या कमाल स्तराला पोहोचले. त्याचबरोबर मेटल RALLY सुरु आहेच. यामध्ये पॉवर जनरेशन, डीस्ट्रीब्युशन, पॉवरला लागणारी साधने, आणी पॉवर कंपन्यांना कर्ज देणाऱ्या बॅंका यांचा एकत्रित विचार करावा. OBC सारख्या बँकेने ६५% कर्ज स्टील आणी पॉवर कंपन्याना दिले आहे. PTC, PTC फायनांस, टाटा पॉवर,रिलायंस पॉवर, JSPL, OBC, कोल इंडिया यांना फायदा होईल.

युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी कौन्सिलची बैठक शुक्रवारी संध्याकाळी आहे. या आठवड्यातील ही दुसरी बैठक आहे उत्तर कोरिया दांडगाई करत आहे कौन्सिल ‘लहान मुल’ आहे असे समजून साम, दाम, दंड, भेद असे उपाय करून उत्तर कोरियाला सोडते की जास्त कडक निर्बंध लावते याकडे सगळ्या जगाचे लक्ष आहे. या निर्बंधांचा जागतिक व्यापारावर पर्यायाने विविध देशांच्या चलनाच्या विनिमयदरावर आणी जगातल्या शेअरमार्केटमधील व्यवहारांवर परिणाम होईल. ‘पण मला काय त्याचे पैसा येतो आहे तोपर्यंत मी वाढतच राहीन, मला सभोवताली बघायची गरज काय?’ असे जणू मार्केट सांगते आहे असे वाटते.

पुढील आठवड्यात डिक्सन टेक्नोलॉजी,MATRIMONY,COM  आणी भारत रोडवेज याचे लिस्टिंग, FOMC ची १९ सप्टेंबर २०१७ ते २० सप्टेंबर २०१७ या दोन दिवशी होणारी मीटिंग ADVANCE TAXचे  आकडे, आणी बँक ऑफ जपानची पोलिसी, SBI लाईफचा IPO याकडे लक्ष ठेवावे लागेल. बघू या काय होते ते !

BSE निर्देशांक sensex ३२२७२ तर NSE निर्देशांक निफ्टी १००८५ वर तर बँक निफ्टी २४८४४ वर बंद झाले

 

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे-समालोचन – तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची – ११ सप्टेंबर २०१७ ते १५ सप्टेंबर २०१७

 1. पिंगबॅक अनामित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s