आठवड्याचे-समालोचन – नवरात्रीचे रंग मार्केटच्या संग- २५ सप्टेंबर २०१७ ते २९ सप्टेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून नवरात्राला आरंभ झाला. नव्या विचारांची घटस्थापना आणी जुन्या विचारांचे सीमोल्लंघन करण्याचा निश्चय आपण सर्वांनी केलाच होता. नवरात्र सुरु झाले. मार्केटनेही नवे नवे रंग दाखवायला सुरुवात केली. रुपयाच्या विनिमयदरामध्ये झालेली घसरण, क्रूडचा वाढलेला दर, यामुळे मार्केटचा रंगच बदलला. जे शेअर पूर्वी वाढत होते ते पडू लागले आणी जे पडत होते ते वाढू लागले. त्यामुळे ट्रेडर्सना नवे नवे विचार करावे लागले. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हे करेक्शन म्हणजे एक मेजवानीच ठरली.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA आणी उत्तर कोरिया यांच्यातील ताणतणाव वाढतच आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले की USA ने आमच्याविरुद्ध युद्ध पुकारले आहे.
 • जर्मनीच्या निवडणुकीत विद्यमान CHANCELLOR अन्गेला मर्केल यांच्या पक्षाला जास्त मते मिळाल्यामुळे मर्केल चौथ्या वेळेला CHANCELLOR होतील.
 • जपानच्या पंतप्रधानांनी जपान मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली.
 • USA आणी उत्तर कोरिया मधील तणावामुळे युद्धजन्य परिस्थितीचे ढग जमा होऊ लागले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी युरोपमधील देश आणी चीन मध्ये क्रूडची मागणी वाढली आहे. ओपेक देशांनी उत्पादन घटवल्यामुळे आणी USA मध्ये लागोपाठ आलेल्या दोन वादळामुळे रीफायनरीज बंद होत्या म्हणून क्रूडचे उत्पादन कमी झाले. उत्पादन कमी झाले आहे.
 • म्यानमार सीमेवर नागा उग्रवाद्यांच्या कॅम्पवर भारताने स्ट्राईक केले.
 • चीनची शेअर मार्केट्स १ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०१७ या दरम्यान बंद राहतील.
 • ऑक्टोबर २०१७ पासून फेडरल रिझर्व (USAची सेन्ट्रल बँक) बॉंड विकायला सुरुवात करेल.
 • सतत वाढणारी मागणी आणी कमी होणारा पुरवठा यामुळे क्रूडचे भाव वाढत आहेत. क्रूडचे दोन निर्देशांक
 • न्यायमेक्स क्रूड US$ ५२ तर BRENT क्रूड US $ ६० एवढे आहे.
 • गेल्या तीन वर्षातील कमी होणाऱ्या क्रूडच्या किमतीमुळे भारताच्या आयात बिलात लक्षणीय घट झाली होती. पण भारतात या तीन वर्षात क्रूडचे साठे शोधण्याचा किंवा क्रूड साठवण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाले नाहीत. भारतात क्रूडची मागणी उद्योग आणी सामान्य जनता यांच्या कडून सतत वाढत आहे. त्यामुळे भारतातही क्रूडचे भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम क्रूड उत्पादन करणार्या कंपन्यांवर सकारात्मक उदा ONGC OIL इंडिया रिलायंस तर OMC, पेंट, केमिकल उद्योगावर नकारात्मक होईल.

सरकारी अन्नौंसमेंट 

 • पंतप्रधान नरेंद्र मोदिनी पॉवर सेक्टर साठी ‘सौभाग्य’ ही नवीन योजना जाहीर केली. या योजनेवर एकूण Rs १६३२० कोटी खर्च केले जातील. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत ३ कोटी घरांमध्ये वीज पुरवण्याचे लक्ष्य आहे. गरीब लोकांना विजेचे कनेक्शन मोफत दिले जाईल. दुर्गम भागात सौर उर्जेचा उपयोग करून वीज पुरवठा केला जाईल. लोड शेडिंगची समस्या राहणार नाही. या योजनेसाठी REC या कंपनीला नोडल एजन्सी म्हणून नेमले आहे. पंतप्रधांनानी देशातील तरुणांना विजेचा घरगुती कामात उपयोग करण्यासाठी उपकरणे बनवण्याचे आवाहन केले. यासाठी ONGC Rs १०० कोटी खर्च करेल
 • PNGRB ने युनिफाईड TARIF रेट असला पाहिजे इंटरकनेक्ट पाईपलाईनमुले याचा फायदा GAIL ला होईल याचा तोटा महानगर GAS आणी इंद्रप्रस्थ GAS यांना होईल. जर MGL आणी IGL यांनी GASच्या किमती वाढवल्या तर ग्राहकांना तोटा होईल. १ ऑक्टोबर पासून GAS च्या किमती १५% ने वाढणार आहेत याचा फायदा MGL IGL आणी GAIL यांना होईल.
 • भूमिगत पाण्याचा वापर करणाऱ्या कंपन्यांना सेंट्रल ग्राउंड WATER ऑथोरिटी कडून NOC घ्यावी लागेल. NOC नसल्यास FSSAI लायसेन्स देणार नाही. हा नियम मनपसंद बिव्हरेजीस, टाटा ग्लोबल, वरुण बिव्हरेजीस इत्यादी कंपन्याना लागू होईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ४ ऑक्टोबर रोजी वित्तीय धोरण जाहीर करणार आहे. RBI ने आपल्या आगामी वित्तीय धोरणात रेट कट करावा म्हणून सरकार RBI वर दबाव आणत आहे. बँकांच्या विलीनीकरणाची बातमी मागे पडणार आहे असे दिसते. विजया आणी देना बँकेचे प्रथम विलीनीकरण होईल असे समजते.
 • SEBI कडे शेअर्समधील गुंतवणूकदाराच्या आणी ट्रेडर्स यांच्या तक्रारी येत आहेत की आमच्या अकौंटमध्ये आमच्या अपरोक्ष आणी सूचनेशिवाय शेअर्स मध्ये खरेदीविक्री होते. याकरता आता सेबीने असा नियम केला आहे की प्रत्येक ब्रोकरने त्याच्या क्लायंट बरोबर झालेल्या EMAIL,पत्र , फोनचे रेकॉडिंगर्च रेकॉर्ड ठेवले पाहिजे. जर एखादी डीसप्यूट झाली तर क्लायंटने सुचना दिली होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी (ओनस ऑफ प्रूफ) ब्रोकरची असेल.
 • ६ ऑक्टोबरला GST कौन्सिलची मीटिंग आहे.
 • नीती आयोगाने शिफारस केली आहे की सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बॅंकांमध्ये १ लाख कोटी एवढे भांडवल सरकारने घालावे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • AMAZON या कंपनीने शॉपर्स STOP या कंपनीतील ५% स्टेक प्रती शेअर Rs ४०८ या भावाने खरेदी केला.
 • GSK फार्माने त्यांची ठाण्यातली जमीन ओबेराय रिअल्टीला Rs ५६० कोटीला विकली.
 • न्युक्लीअस सॉफटवेअर या कंपनीने PAY–SE या नावाने प्रीपेड WALLET बाजारात आणले.
 • VST टीलर्स आणी TRACTORS या कंपनीने कोरियाच्या कुकजी मशिनरी या कंपनीबरोबर करार केला.
 • टाटा कॅपिटल आपला फॉरीन एक्स्चेंज बिझिनेस THOMAS COOK ला विकणार आहे. रेग्युलेटरकडून मंजुरी आल्यावर डील फायनल होईल.
 • IFCIने आपला NSE मधला ०.८६% स्टेक विकला.
 • IDBI ने SIDBI मधील आपला १% स्टेक विकला.
 • ११ सप्टेंबर २०१७ ते १५ सप्टेंबर २०१७ या काळात USFDA ने अल्केम LAB च्या बद्दी युनिटचे इन्स्पेक्शन केले. फॉर्म नंबर ४८३ दिला. उत्पादन आणी प्रक्रिया नियंत्रण यात २ त्रुटी दाखवल्या.
 • USFDA ने डीवी’ज LAB च्या विशाखापट्टणम युनिटच्या इन्स्पेक्शनमध्ये ६ त्रुटी दाखवल्या.औषधांचे रेकोर्ड ठेवले नाही आणी साफसफाई नाही या त्रुटी होत्या.
 • RCF आणी NFL या कंपन्यांना तीन महिन्यासाठी युरिया आयात करण्याची परवानगी मिळाली.
 • भारती एअरटेलने बँगलोरमध्ये 5G केबलसाठी HUWAI बरोबर करार केला.
 • CALL DROPचे नियम १ जानेवारी २०१८ पासून लागू होतील.
 • रिलायंस इंफ्राने बुलेट ट्रेनसाठी जपानी कंपनीबरोबर करार केला. लवकरच कंपनी राईट्स इशू आणेल.
 • DR रेड्डीजच्या श्रीकाकुलम युनिट नंबर १ ला EIR (ESTABLISHMENT INSPECTION REPORT) दिला. क्लीन चीट दिली.
 • रुची सोयाने पतंजली बरोबर ३ वर्षासाठी त्यांच्या प्रोडक्ट डीस्ट्रीब्युशनसाठी करार केला.
 • इथेनॉलची किंमत Rs २ ने वाढवणार आहेत. याचा फायदा प्राज इंडस्ट्रीजला होईल.
 • ‘CYIENT’ या कंपनीचे पुष्कळ शेअर्स Rs ४७० प्रती शेअर या भावाने म्युच्युअल फंडानी खरेदी केले. मुकंदमध्येही खरेदी चालू आहे.
 • रुपयाचा विनिमय दर कमी होत असल्यामुळे ज्यांनी विदेशी चलनात कर्ज घेतले असेल त्या कंपन्याना त्रास होईल. उदा अदानी ग्रुप, JSW स्टील
 • KEC INTENATIONAL या कंपनीला Rs १०२२ कोटीची ऑर्डर मिळाली.
 • HPCL, बजाज फायनान्स, UPL हे शेअर्स निफ्टीमध्ये सामील होतील. टाटा मोटर्स DVR, ACC,बँक ऑफ बरोडा, टाटा पॉवर हे शेअर्स निफ्टीमधून बाहेर पडतील.
 • रोटो पंप्स या कंपनीला नेव्हीकडून Rs ८ कोटीची ऑर्डर मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • इंडियन हॉटेल्सने आपल्या राईट्स इशुची किमत Rs ७५ निश्चित केली.
 • लक्ष्मी विलास बँकेने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक राईट्स इशुवर विचार करण्यासाठी दिनांक २७ सप्टेंबर रोजी बोलावली होती. या बैठकीत Rs ८०० कोटीचा राईट्स इशू आणण्याचे ठरवले.
 • IFCI ने टुरिझम फायनान्समधील २४% स्टेक म्हणजे १.०९ कोटी शेअर्स विकले.
 • रिलायंस लिमिटेड ही डेन नेटवर्क्स ही कंपनी खरेदी करणार आहे.
 • लव्हेबल लींगरी या कंपनीची ६ ऑक्टोबरला शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • प्रताप SNAKSचा IPO ४८ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला
 • ICICI लोम्बार्ड चे २७ सप्टेंबर २०१७ रोजी Rs ६५१ वर लिस्टिंग झाले.
 • पुढील आठवड्यात ३ ऑक्टोबरला SBI लाइफचे, ५ ऑक्टोबरला प्रताप SNACKSचे लिस्टिंग होणार आहे.
 • गोदरेज अग्रोव्हेट या कंपनीचा IPO ४ ऑक्टोबर २०१७ ते ६ ऑक्टोबर २०१७ या दरम्यान येत आहे. प्राईस BAND Rs ४५० ते Rs ४६० ठेवला आहे. त्यामुळे गोदरेज इंडस्ट्रीज आणी ASTEC लाईफसायन्सेस या कंपन्यांच्या शेअर्स कडे लक्ष ठेवा

मार्केटने काय शिकवले

१ ऑक्टोबर २०१७ पासून सेबीने नियम कडक केले. जर कंपन्यांनी कर्ज घेतले असेल आणी कर्जाचा एखादा हफ्ता जरी भरू शकले नाहीत तरी त्याची माहिती २४ तासात STOCK एक्स्चेंजना दिली पाहिजे. यामुळे कंपनीची आर्थिक स्थितीवर लोकांचे लक्ष राहील आणी त्यांना शेअर्स खरेदी विक्रीचे निर्णय घेण्यात मदत होईल. पूर्वी असे झाले होते की ‘प्लेज शेअर’ हे शब्द ऐकले की शेअरचा भाव पडत होता आणी प्लेज केलेले शेअर्स सोडवले की शेअरच्या भावात सुधारणा दिसत होती पण आता लोकांना सवय झाली परिस्थिती बदलली. आपल्याजवळचे शेअर तारण ठेवून कर्ज घेणे आणी नंतर कर्ज फेडले की शेअर सुटतात ही नेहेमीची प्रक्रिया समजून लोकांनी त्याकडे लक्ष देणे बंद झाले. यालाच मार्केट MATURE झाले असे म्हणतात. १ तारखेपासून असेच होईल. काही काल लोक घाबरतील कारण सब घोडे बारा टक्के असे समजून Rs ५ चा डीफॉल्ट केला तरी डीफॉल्टर म्हणून ठप्पा बसेल.  नंतर लोकांना घोडा आणी गाढव यांच्यातील फरक समजू शकेल.

विजयादशमीच्या मुहूर्तावर हा लेख आपण वाचत आहात. माणूस चुकता चुकता शिकतो, पडता पडताच चालतो, नाकातोंडात थोडे थोडे पाणी पोहोताना जातेच, पडता पडताच सायकल शिकतो, म्हणजे पडलेच पाहिजे असे नव्हे. पण या नैसर्गिक गोष्टीना घाबरून न जाता माझे काय चुकले याचा विचार करून पुन्हा तशी चूक करू नये हेच खरे शिक्षण. हीच खरी विजयाची सुरुवात असते. यातूनच शेअरमार्केटविषयीचे अज्ञान दूर होईल आणी ज्ञानाचा प्रकाश पसरल्यामुळे लक्ष्मीचे आगमन होईल हेच खरे.

विजयादशमीच्या आपल्याला शुभेच्छा. दसर्याच्या दिवशी शेअर मार्केटमधील सोने लुटून आपला आनंद द्विगुणीत व्हावा हीच शुभेच्छा

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१२८३ वर NSE निर्देशांक निफ्टी ९७८८ वर तर बँक निफ्टी २४०५३ वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

8 thoughts on “आठवड्याचे-समालोचन – नवरात्रीचे रंग मार्केटच्या संग- २५ सप्टेंबर २०१७ ते २९ सप्टेंबर २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – दिवाळीच्या आधी दिवाळी – ४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s