आठवड्याचे-समालोचन – शेअरमार्केट्ची गाडी सहाव्या गिअरमध्ये – 30 ऑक्टोबर २०१७ ते ३ नोव्हेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी गोष्ट या आठवड्यात ३१ ऑक्टोबर २०१७ या दिवशी घडली. “EASE OF DOING BUSINESS” या निर्देशांकात भारताची स्थिती ३० अंकांनी सुधारली. तुम्ही म्हणाल आम्हाला यात चांगलं काय? वाईट काय? काही कळले नाही. कोणताही उद्योग करायचा म्हणजे अनेक परवानग्या, अनेक सरकारी खात्यांकडून विविध कारणांसाठी मंजुरी, वीज,पाणी, जमीन,यंत्रसामुग्री, कच्चा माल.पर्यावरण आणी वाहतूक या सर्वांची जमवाजमव करावी लागते. या सर्व प्रक्रियेत वेळ, पैसा, आणी त्रास खूप होतो. परदेशातील लोक उद्योग सुरु करण्यासाठी आपल्या देशात येतात, त्यामुळे आपल्या देशात परदेशातून पैशाचा ओघ सुरु राहतो. पण परदेशातील लोकांना उद्योग सुरु करताना अडचणी आल्या, प्रत्येक ठिकाणी अडवणूक झाली तर ते भारतात येण्यास फारसे उत्सुक नसतात. यासाठी WORLD बँकेने काही निकष ठरवले आहेत. त्यानुसार या निकषांवर आधारीत माहिती संकलीत करून ही बँक रेटिंग देते. आपला या यादीत १३० वा नंबर होता तो आता १०० वा झाला भारतात ज्या सुधारणा केल्या गेल्या त्यामुळे भारतात बिझिनेस सुरु करणे आणी तो सुरळीतपणे चालू ठेवणे अधिक सोपे, सुलभ आणी फायदेशीर झाले. भारतात केल्या गेलेल्या या सुधारणांचे जागतिक पातळीवर कौतुक झाले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनमध्ये प्रदूषणाच्या कारणास्तव उद्योगांवर बरीच नियंत्रणे घातली आहेत. त्यामुळे भारतीय कंपन्यांकडे केमिकल्सची मागणी वाढली. केमिकल कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले. उदा बालाजी अमाईनस, इंडिया ग्लायकॉल, नवीन फ्लूओरिन, नोसील, मेघमणी ओर्गानिक्स,हिकल केमिकल्स, सुदर्शन केमिकल्स, विनती ओर्गनिक्स
 • बँक ऑफ इंग्लंड ने आपले रेट वाढवले.
 • FEDने आपल्या रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.
 • USA मध्ये औषधांच्या किंमती १३% ने कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • इथेनॉलची किंमत Rs ३९ वरून Rs ४०.८५ केली. ही किंमत २०१७-२०१८ साठी ठरवली. नेहेमी मार्केटमध्ये एकाचा फायदा तर दुसर्याचे नुकसान असते. ऑईल मार्केटिंग कंपन्या इथेनॉल खरेदी करतात इथेनॉलची किंमत वाढवली की साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढतात तर HPCL, BPCL IOC यांचे शेअर पडतात. ओईल मार्केटिंग कंपन्यावर वाईट परिणाम होतो.
 • फरटीलायझर कंपन्यांसाठी Rs १०००० कोटींच्या सबसिडीला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
 • नाल्कोची ऑफर फोर सेल Rs ६९ प्रती शेअर या भावाने येणार आहे. सध्या नाल्कोचा भाव Rs ९५ च्या आसपास आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • इन्डोकाउंट इंडस्ट्रीजच्या दोन डायरेक्टर्सना शेल कंपन्यांशी संबंधीत असल्यामुळे कॉर्पोरेट मंत्रालयाने अपात्र घोषित केले.
 • फर्जी इमेल संबंधात सेबीने सुप्रीम टेक्सपोर्ट LTD च्या प्रमोटर्सवर आणी त्यांच्याशी संबंधीत १० कंपन्यांवर कारवाई केली. त्यांना स्टॉक एक्स्चेंजशी संबंधीत कोणतेही कामकाज करण्यावर बंदी घालण्यात आली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी 

 • IDFC बँक आणी श्रीराम कॅपिटल यांच्यात मर्जरचे प्लान सुरु होते. VALUATION विषयी एकमत झाले नाही त्यामुळे हे मर्जर रद्द झाले.
 • अल्केम LABच्या LT LOUIS या युनिटला USFDA क्लीन चीट मिळाली
 • रेल्वेने रूळ मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी टेंडर मागवले. याचा फायदा ‘SAIL’ होईल.
 • TCS या कंपनीने मलेशियन एअरलाईन्ससाठी ‘कलाउड सर्विस, चालू केली.
 • ऑरीकोन एनटरप्रायझेस या कंपनीने RESTRUCTURING चा मोठा प्लान सोमवार ३०/१०/ २०१७ रोजी सादर केला
 • सोलार इंडस्ट्रीजला Rs ११४३ कोटींची ऑर्डर कोल इंडिया या कंपनीकडून मिळाली.
 • टाटा ग्लोबल बिव्हरेजीस या कंपनीने बंगलोरमध्ये आपला पहिला टी कॅफे सुरु केला.
 • टाटा टेलीमधील डोकोमो चा हिस्सा टाटा सन्सला ट्रान्स्फर केला.
 • खादिम या कंपनीचा IPO येत आहे. त्यामुळे बाटा, लिबर्टी, मिर्झा या शेअर्सकडे लक्ष ठेवावे
 • सेन्ट्रम कॅपिटल या कंपनीला मायक्रोफायनान्समध्ये व्यवहार करण्यासाठी मंजुरी मिळाली.
 • कोलगेट या कंपनीत LICने आपला स्टेक वाढवला.
 • NTPC च्या रायबरेली प्लांटमध्ये दुर्घटना झाल्यामुळे उंचाहारमधील युनिट नंबर ६ बंद केले.
 • नेलकास्ट सारख्या कंपन्या TRACTORSचे स्पेअर पार्टस् पुरवतात.
 • DIVI’S LAB या कंपनीच्या विशाखापट्टणम युनिट II वर USFDA ने लावलेला IMPORT ALERT उठवला

कॉर्पोरेट एक्शन

 • इन्फोसिसने आपल्या शेअर BUYBACK Rs ११५० प्रती शेअर या भावाने Rs १३००० कोटींचा BUYBACK जाहीर केला. आपल्याला इन्फोसिस एक फॉर्म पाठवील. त्या फॉर्मवर तुमचा DEMAT अकौंट नंबर तुमच्या नावावर असलेल्या शेअर्सची संख्या आणी BUYBACK मध्ये इन्फोसिस किती शेअर्स BUYBACK करेल ते लिहिलेले असेल. ठराविक मुदतीत जेवढे शेअर्स तुम्हाला BUYBACK साठी द्यायचे असतील (तुम्ही तुमच्याजवळ असलेले सर्व शेअर्स BUYBACK साठी ऑफर करू शकता कंपनी मात्र त्यांच्या नियमानुसारच शेअर्स BUY BACK करेल.) त्या शेअर्स साठी DIS भरून जेथे तुमचा DEMAT अकौंट असेल तेथे द्यावी. तुम्हाला जेवढे शेअर्स BUYBACK साठी द्यावयाचे असतील ते कंपनीने दिलेल्या DEMAT अकौंटमध्ये जमा होतील. आपण BUYBACK साठी दिलेलं शेअर्स या अकौंटमध्ये जमा झाले की नाही त्याची चौकशी करावी. जेवढे शेअर्स तुम्ही ऑफर केले असतील त्यातून कंपनीने BUYBACK केलेले शेअर वजा जाता बाकीचे शेअर्स तुमच्या DEMAT अकौंटला पुन्हा जमा होतील. तसेच जेवढे शेअर्स कंपनीने BUY BACK केले असतील तेवढ्या शेअर्सचे Rs ११५० प्रती शेअर या भावाने पैसे आपल्या बचत खात्यात जमा होतील.
 • अलेम्बिक फार्मा या कंपनीने ‘ORILL’ या कंपनीचे अधिग्रहण पुरे केले.
 • ड्रेजिंग कॉर्पोरेशन मधली सरकारची हिस्सीदारी पूर्णपणे विकण्यासाठी केंद्र सरकारला मंजुरी मिळाली.
 • रिलायंस इन्फ्राने RSSS ट्रान्स्मिशनमधील स्टेक अडाणी पॉवरला विकला.
 • मर्केटर लाईन्स त्यांची इंडोनेशियामधील कोळशाची खाण विकणार आहे.
 • IDFC आणी पर्यायाने IDFC बँकेच्या व्यवस्थापनात मोठा बदल होणार आहे या बातमीचे IDFC ने खंडन केले.
 • MAX लाईफ ही कंपनी लक्ष्मी विलास बँकेमध्ये १०% स्टेक घेणार आहे. सरकारी बँकेमध्ये सरकार भांडवल घालते पण खाजगी बँकांमध्ये कोण भांडवल घालणार हा प्रश्न असतो. खाजगी बँकांना खाजगी रित्याच भांडवल गोळा करावे लागते.
 • टॉरेंट फार्मा ह्या कंपनीने  युनिकेम LAB चा BRANDED  फॉर्म्युलेशंस चा भारत आणी नेपाल मधील बिझिनेस Rs ३६०० कोटींला विकत घेतला.
 • भारत फोर्ज ही कंपनी AMTEK ऑटो ही कंपनी खरेदी करणार आहे. USA मध्ये क्लास 8 ट्रकची विक्री वाढली याचा फायदा भारत फोर्जला होईल.
 • UFO मुवीजनी क्युबा सिनेमाबरोबर मर्जर केले. त्यामुळे एकंदर ७३०० स्क्रीनचा फायदा घेता येईल.
 • UCO बँक स्टील ASSET मधील ५१% हिस्सा विकणार आहे.
 • डी-लिंक ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.
 • DEVONSHIRE कॅपिटल रुची सोया या कंपनीमध्ये ५१% स्टेक Rs ४००० कोटीला खरेदी करणार आहे.
 • हेक्झावेअर, इंटर ग्लोब एविएशन, DR रेड्डीज, HDFC सिम्फनी, DHFL, अजंता फार्मा, ल्युपिन, मेरोको सिंडीकेट बँक, सुप्रीम इंडस्ट्रीज, KPIT, UPL BEL कॅपिटल फर्स्ट, कॉनकॉर टाटा पॉवर, GE T&D, टायटन चे निकाल चांगले आले
 • CDSL सेन्चुरी प्लायवूड, कजारीया, हिरो मोटो यांचे निकाल समाधानकारक आले.
 • महिंद्र लाईफ, WOCKHARDT, सेन्ट्रल बँक, IDBI, स्ट्राईड शासून, आंध्र बँक या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक आले.
 • टी सिरीज, सोनी म्युझिक, आणी सारेगम यांच्यावर ED ने मनी लॉनडरिंगसाठी केस दाखल केली.
 • ऑक्टोबर महिन्यात ऑटो विक्रीचे आकडे चांगले आले. मारुती, आयचर मोटर्स, बजाज ऑटो, टी व्ही एस मोटर्स, या कंपन्यांची विक्री वाढली.
 • RCOM या कंपनीने आपल्या जवळील स्पेक्ट्रम आणी टॉवर बिझिनेस विकण्याची तयारी दाखविली आहे. त्याचे त्यांना Rs १७००० कोटी मिळतील असा अंदाज आहे. त्यांनी LENDAR फोरममधील बँकांना ५१% कॅपिटलमध्ये हिस्सा देऊ केला आहे.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • पुढील आठवड्यात नोव्हेंबर ६ २०१७ रोजी रिलायंस नीपॉन ASSET MANAGEMENT कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.

मार्केटने काय शिकवले

आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा आपल्याला किती रुपये किती दिवसांत मिळतील याचा अंदाज येण्यासाठी जर तो शेअर वायदेबाजारात असेल तर अंदाज घेता इतो. पुट रायटर कोणत्या भावाला खडे आहेत ते पाहावे आणी कॉल रायटर कितीवर आहे हे पहा त्यातून अंदाज येतो किती रुपयांच्या खाली शेअरची किंमत जाणार नाही आणी कोणत्या किंमतीला रेझिस्टन्स येईल हे समजते.

गेल्या गुरुवारी २६ ऑक्टोबर २०१७ रोजी  एक्सपायरी झाली सोमवार नोव्हेंबर सिरीजचा पहिला दिवस. अशा दिवशी वायदा बाजाराचे निरीक्षण केल्यास असे दिसले की  १०३०० चा पुट आहे. ११००० चा CALL घेतलेला दिसत आहे. म्हणजे लोकांना अजूनही तेजी अपेक्षित आहे असे जाणवते. पुट CALL रेशियो सुद्धा १.४५ वरून १.३८ झाला आहे.हे सर्व  पाहता मार्केट वाढेल पण वाढण्याचा वेग कमी होईल असे जाणवते.

एखादे डील होणार या अपेक्षेने शेअरमध्ये ट्रेडिंग करणार असाल तर बातम्यांकडे लक्ष द्या. जर ते डील रद्द होणार अशी कुणकुण लागली तर शेअर्स विकून टाका. ज्याप्रमाणे IDFC आणी श्रीराम ग्रूप यांच्यातील डील रद्द झाले

यावेळी शेअर मार्केटने EASE OF DOING बिझिनेसमध्ये मिळालेल्या चांगल्या रेटिंगची दखल घेतली. लागणार्या तिमाही निकालांकडेही मार्केटचे लक्ष होते. तिमाही निकालांनी फारशी निराशा केली नाही. बँकांच्या तिमाही निकालात जी कसर असते ती सरकार बँकांचे रीकॅपिटलायझेशन करणार आहे या बातमीने भरून काढली. त्यामुळे मार्केट (निफ्टी आणी सेन्सेक्स) ऑल टाईम हायला बंद झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३६८५, NSE निर्देशांक निफ्टी १०४५२ वर तर बँक निफ्टी २५६५० वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे-समालोचन – शेअरमार्केट्ची गाडी सहाव्या गिअरमध्ये – 30 ऑक्टोबर २०१७ ते ३ नोव्हेंबर २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – चाहूल लागली बदलाची – ६ नोव्हेंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s