आठवड्याचे समालोचन – चाहूल लागली बदलाची – ६ नोव्हेंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

चाहूल लागली बदलाची – ६ नोव्हेंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७

शेअरमार्केट ज्या प्रमुख गोष्टींवर अवलंबून असतो. त्यात चलन, क्रूड, व्याजाचा दर आणी सोने यांचा समावेश असतो. गेल्या तीन वर्षात क्रूडचा दर कमी होत होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील ताण कमी झाला आणी चलनाचा विनिमय सुधारला. पण २०१७ मध्ये हळूहळू क्रूड वाढत जात आहे. क्रूडचा भाव US$ ६० पर्यंत पोहोचला. त्यामुळे रुपयाचा इतर चलनाबरोबरचा विनिमय दर कमी कमी होत गेला. रुपयाचा विन्मय दर US $1 =Rs ६३ वरून  US$1=Rs ६५ इतका हा दर कमी झाला. त्यामुळे रथाची चाके पुन्हा उलटी फिरणार काय अशी शंका येऊ लागली. काही प्रमाणात मार्केटमध्ये प्रॉफीट बुकिंग सुरु झाले आणी फार्मा, IT तसेच सरकारी बँकांच्या शेअर्सची खरेदी सुरु झाली. एकंदरीतच मार्केटची चाल बदलली.

गेल्या तीनचार वर्षांचा काळ क्रूडचा भाव पडण्याचा होता. पण आता मुलभूत बदल होत आहे. क्रूडचा भाव US $ ६४ पर्यंत झाला आहे. हा भाव US$ ७० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • सौदी अरेबियातील राजकीय घडामोडींमुळे आणी त्यांच्या इराणबरोबरील संबंधातील ताणतणावामुळे क्रूडची किंमत २ वर्षातील कमाल स्तरावर वाढली.
 • जपानच्या अध्यक्षांनी सांगितले की आम्ही loose मॉनेटरी पॉलिसी चालू ठेवू.

सरकारी अनौंसमेंट

 • कोल इंडियाची सबसिडीअरी महानदी कोल फिल्ड्स या कंपनीला ओडिशा सरकारने Rs २१ कोटी दंड ठोठावला.
 • MMTC आणी STC या दोन्ही कंपन्यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये सरकारची हिस्सेदारी ९०% आहे. त्याशिवाय LIC कडे ५% हिस्सेदारीआहे. ५% शेअर्स पब्लिककडे आहेत. VRS साठी सरकारला कमी पैसा (STC च्या कर्मचाऱ्यांच्या VRS साठी Rs २५० कोटी) खर्च करावा लागेल

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

9 ते १० नोव्हेंबरला GST कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेतले गेले.

 • GST कौन्सिलने १७८ वस्तूंवरचा GST २८% वरून १८ % केला. १३ वस्तूंवरील GST १८% वरून १२% केला. २ वस्तूंवरचा GST २८% वरून १२% केला. रेस्टॉरंट आणी हॉटेल्सवरचा GST ५% केला. ६ वस्तुंवरील GST ५% वरून ०% केला. ८ वस्तूंवरचा GST १२% वरून ५% केला. रेस्टॉरंट आणी हॉटेल यांना इनपुट क्रेडीट मिळणार नाही. GST कौन्सिलच्या या बैठकीत रिअल इस्टेटवर चर्चा होऊ शकली नाही.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • RIL आलोक इंडस्ट्रीज चे पॉलिएस्टर युनिट खरेदी करण्याचा विचार करत आहे.
 • REC (रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन) रेल्वेला इलेक्ट्रिफिकेशनच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमासाठी ४ ते ५ वर्षात Rs ३०००० कोटींचे कर्ज वार्षिक ९% व्याजाने देणार आहे.
 • SCHNEIDAR ही फ्रेंच कंपनी आणी TAMASEK हे लार्सेन & टूब्रो चा इलेक्ट्रिक आणी ऑटोमेशन बिझिनेस Rs १५००० कोटी ते Rs १७००० कोटीना विकत घेणार आहेत.
 • USFDA ने ल्युपिन या कंपनीला त्यांच्या गोवा आणी पिठमपूर प्लांटसाठी वार्निंग लेटर इशू केले आहे. त्याचप्रमाणे ३ फॉर्म नंबर 483 इशू केले आहेत. यामुळे कंपनीचे नवीन प्रोडक्ट USA मध्ये लॉनच करण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून ल्युपिनचा शेअर १६% पडला.
 • आय फोन १० मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळाला याचा फायदा HCL इन्फोसिस्टीमला होईल.
 • RCOMया कंपनीचा टॉवर बिझिनेस घेण्यासाठी जी ब्रूकफिल्ड बरोबर बोलणी चालू होती ती फिसकटली.
 • OMRU हॉस्पिटलमध्ये नाटको फर्माने स्टेक घेतला.
 • NHAI ने HCC, लार्सन आणी टूब्रोला नोटीस पाठवली
 • युनिकेम LABची मार्केट कॅप Rs २६०० कोटी आहे पण त्यांना १२० BRAND विकून Rs ३६०० कोटी मिळाले. म्हणजे Rs १००० कोटींचा फायदा झाला. त्यामुळे शेअरहोल्डर्सना स्पेशल लाभांश मिळेल अशी अपेक्षा आहे.
 • पनामा पेपरप्रमाणेच ‘PARADISE’पेपरचा धमाका झाला आहे. ७१४ लोकांच्या नावांचा, यात काही आंतरराष्ट्रीय तसेच राजकीय नेत्यांचा, उद्योग जगतातील लोकांचा, सिनेजगतातील लोकांचा, तसेच काही कंपन्यांचा समावेश आहे.
 • सदभाव इंजिनिअरिंग या कंपनीला महाराष्ट्र राज्यात Rs ६७५ कोटींचे काम मिळाले.
 • HDFC लाईफचा इशू येतो आहे. त्यांची इंद्रप्रस्थ मेडिकलमध्ये हिस्सेदारी आहे त्यामुळे या IPO ला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर इंद्रप्रस्थ मेडिकलच्या शेअरची किंमतीवर परिणाम होईल.
 • महिंद्र लाईफ स्पेस २ औद्योगिक प्रोजेक्टमध्ये Rs ६०० कोटींची गुंतवणूक करेल.
 • ज्योती LAB चा हेन्केल या कंपनीबरोबरचा करार रिन्यू होऊ शकला नाही.
 • मंचरमध्ये मेगा प्रोजेक्टसाठी पराग मिल्क प्रोडक्ट या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून Rs २८० कोटी उत्तेजनार्थ मिळाले.
 • अडानी पॉवरने 1496MW क्षमतेचा पॉवर परचेस करार बांगलादेशबरोबर केला.
 • आसाम आणी केनयामध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे चहाचे दर ५% ते 11% ने वाढले. त्यामुळे चहा कॉफी उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.
 • ड्रेजिंग कॉर्पोरेशन ही कंपनी तोट्यातून नफ्यात आली. (टर्नअराउंड झाली). Rs १४ कोटी नफ्याएवजी Rs १९ कोटी फायदा झाला.
 • स्टेट बँक ऑफ इंडियाचा निकाल चांगला झाला. NII (नेट इंटरेस्ट इन्कम) वाढले, NPA कमी झाले. PCR (प्रोविजन कव्हरेज रेशियो सुधारला. कासा रेशियो (करंट अंड सेविंग डीपॉझीट/ एकूण डीपॉझीट) सुधारला.
 • MRF, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, चेन्नाई पेट्रो, युनायटेड ब्रुअरीज, महानगर GAS, टायटन, सौराष्ट्र सिमेंट, GIPCL, KEC, सिप्ला, महानगर GAS ALLSEC टेक्नॉलॉजी, IRB इन्फ्रा, वाबको, पेट्रोनेट LNG, बॉम्बे डायींग, व्होल्टास, ऑरोबिंदो फार्मा यांचे तिमाही निकाल चांगले आले
 • ‘JUST DIAL’ , कॅस्ट्रोल या कंपन्यांचे निकाल ठीक आले.
 • टाटा पॉवर, REC, OBC, SRFचा निकाल असमाधानकारक आले.
 • नागार्जुन फरटीलायझर, फ्युचर कन्झ्युमर, V MART, डेन नेटवर्क, हाथवे, ट्रेनट या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.

कॉर्पोरेट एक्शन

 • अरविंद लिमिटेड या कंपनीने आपले ब्रांडेड APPAREL आणी इंजिनीअरिंग बिझिनेस डीमर्ज केले. कंपनी तिच्या Rs १० दर्शनी किमत असलेल्या ५ शेअर्समागे अरविद FASHION चे Rs ४ दर्शनी किमतीचा १ शेअर आणी जर तुमच्याकडे २७ शेअर्स असतील तर अनुप (इंजिनीअरिंग बिझिनेस) चा Rs १० दर्शनी किमतीचा एक शेअर तुमच्याकडे अरविंद चे २७ शेअर्स असतील तर देण्यात येईल. ही डीमर्जरची प्रक्रिया ८ ते ९ महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर हे शेअर्स लिस्ट होतील.
 • प्रायव्हेट इक्विटी फर्म एव्हरस्टोन व्हीडीओकॉनचा ’केनस्टार’ हा किचन आणी होम अप्लायन्सेस ब्रांड विकत घेणार आहे.
 • ICICI बँकेने ICICI सिक्युरिटीज या त्यांच्या सबसिडीआरीचा IPO आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही
 • सबसिडीअरी इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणे ब्रोकिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
 • MAX लाईफ ही कंपनी लक्ष्मी विलास बँकेत १०% स्टेक घेण्याची शक्यता आहे.
 • टाटा केमिकल्सचा हल्दिया येथील फॉस्फेट फर्टिलायझर प्लांट इंडोरामा ग्रूप Rs ३७५ कोटींना विकत घेणार आहे.
 • कॅस्ट्रोल या कंपनीने १:१ बोनस दिला.
 • महिंद्र आणी महिंद्र या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला. महिंद्र आणी महिंद्र या कंपनीचा तिमाही निकाल चांगला लागला. मर्जीन १३% वरून १६% झाले.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • रिलायंस नीपपॉन लाईफ या कंपनीच्या शेअर्सचे Rs २९४ ला लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये २५२ ला दिला होता
 • महिंद्र लॉजीस्टिक्सचा शेअर Rs ४२९ वर लिस्ट झाला.

या आठवड्यातील IPO

HDFC लाईफचा IPO एकूण ४.९ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला. QIP १६.६ वेळा, HNI कोटा २.२८ वेळा तर रिटेल कोटा ०.९ वेळेला सबस्क्राईब झाला.

मार्केटने काय शिकवले

NHAI ने काही कंपन्यांवर प्रतिबंध घातले आणी या कंपन्यांना ऑर्डर्स दिल्या जाणार नाहीत असे जाहीर केले. यात HCC तसेच लार्सन एंड टुब्रो यांचा समावेश होता. पण वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी NHAI ला काळजीपूर्वक पूर्ण चौकशी करा असा सल्ला दिला.

गुगल ही कंपनी ‘JUST DIAL’  ही कंपनी विकत घेणार आहे अशी बातमी होती. त्यामुळे ‘JUST DIAL’ चा शेअर बर्यापैकी वाढला. शुक्रवारी कंपनीने स्पष्टीकरण दिले की अशी कोणतीही बोलणी चालू नाहीत. पूर्वी ‘JUST DIAL’ ह्या कंपनीला अमाझोन ही कंपनी विकत घेणार आहे अशी बातमी होती

USFDA ने DIVI’ज LAB ला दिलेले WARNING लेटर परत घेतले.

इंडिगोच्या बाबतीत त्यांनी एका प्रवाश्या बरोबर अशोभनीय वर्तन केले अशी बातमी आली पण याचा कंपनीच्या बिझिनेसवर कोणताही आर्थिक परिणाम होणार नसल्यामुळे मार्केटने या बातमीकडे दुर्लक्ष केले.

राधाकृष्ण दमाणी एक मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांनी  ADLAB च्या मालकीचे एक हॉटेल विकत घेतले. यामुळे ADLAB चा शेअरची किंमत वाढली.

या अशा परस्पर विरोधी बातम्या सतत मार्केटमध्ये येत असतात जर तुम्ही बातमींवर आधारीत ट्रेड करत असाल तर फार सावध आणी चपळ राहिले पाहिजे. बातमीचा आणी त्याच्याविरुद्ध आलेली बातमी दोन्हींचा फायदा करून घेतला पाहिजे. त्या वेळेवर त्या शेअरबाबत त्वरीत निर्णय घेता आला पाहिजे. नाहीतर म्हणलेच आहे ‘थांबला तो संपला’

शेअरमार्केट म्हणजे क्रिकेट सामन्याप्रमाणेच असते. क्रिकेटमध्ये  २०-२०, वन डे, कसोटी सामना, खेळले जातात. त्याचप्रमाणे मार्केटमध्येसुद्धा लोक विविध प्रकारच्या म्हणजे इंट्राडे, अल्प मुदतीसाठी, मध्यम मुदतीसाठी, आणी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक/ट्रेड करत असतात. कधी कधी असे होती की सामन्याचा रंग दर तासागणिक बदलत असतो. दोन्ही बाजूच्या लोकांची उत्सुकता ताणली जाते. पण  शेवटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपतो. तसेच काहीसे या आठवड्यात झाले कधी मार्केट बेअर्सच्या बाजूने तर कधी बुल्सच्या बाजूने झुकले. पण शेवटी काहीच  निर्णय लागला नाही. बुल्स किंवा बेअर्स कोणीही चांगला व्यवहार करू शकले नाहीत. आठवडा गोंधळाचा गेला.

GST कौन्सिलने ज्या वस्तूंवर GST कमी केला आहे त्या वस्तूंशी संबंधीत कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढतील. तरी अशा कंपन्यांच्या शेअर्सवर पुढील आठवड्यात लक्ष ठेवा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३३१४ वर तर NSE निर्देशांक निफ्टी १०३२१ वर तर बँक निफ्टी २५४९८ वर बंद झाले

 

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – चाहूल लागली बदलाची – ६ नोव्हेंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७

 1. पिंगबॅक अनामित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s