आठवड्याचे-समालोचन – नाताळच्या आधी नाताळची भेट – १३ नोव्हेंबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नाताळच्या आधी नाताळची भेट – १३ नोव्हेंबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१७

मुडी’ज ही आंतरराष्ट्रीय एजन्सी भारत आणी भारतातील शेअरमार्केटसाठी ‘सांताक्लाज’ सिद्ध झाली. या एजन्सीने १३ वर्षानंतर भारताचे रेटिंग वाढवले. नाताळच्या एक महिना आधी नाताळची भेट दिली. यावर्षी दिवाळी आधी तुम्हीआम्ही शेअरमार्केटमध्ये दिवाळी साजरी केली. आता नाताळ आधी नाताळ साजरा करु या. मुडीजने भारतीय सरकारच्या कर्जरोख्यांचे रेटिंग Baa3 वरून वाढवून Baa2 केले. अविकसित देशात भारत सर्वात वरच्या स्तरावर असेल आणी भारताचा प्रगतीचा रेट FY १८ साठी ६.७% FY 19 साठी ७.५% आणी FY २० नंतर प्रगतीचा वेग वाढेल असे अनुमान केले. यामुळे रुपया मजबूत होईल. परदेशी गुंतवणूकदारांचा भारताविषयी विश्वास वाढेल. या रेटिंगमध्ये सुधारणा केल्यामुळे भारतीय कंपन्यांना परदेशात स्वस्त दराने कर्ज मिळेल. म्युच्युअल फंडांची भागीदारी वाढेल. हे ग्रेडिंगमध्ये Upgradation  म्हणजे आर्थिक प्रगतीचे आणी सुबत्तेचे द्योतक आहे.

परदेशी गुंतवणूकदार गेले काही दिवस सतत विक्री करत होते. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे क्रेडीट वाढल्यामुळे भारताकडे पाठ फिरवलेले परदेशी गुंतवणूकदार परत आपली गुंतवणूक भारतात आणतील. भारतीय सरकार निरनिराळ्या क्षेत्रात सुधारणा करत आहे. त्या सुधारणांना मिळालेली ही पावती मानावी लागेल. ‘इज ऑफ डूइंग बिझिनेस’ निर्देशांकात सुधारणेनंतर सरकारच्या सुधारणांना मिळालेली ही दुसरी पावती.

मार्केटने त्वरीत या सुधारीत रेटिंगची दखल घेतली आणी मार्केट शुक्रवार तारीख १७ नोव्हेंबर २०१७ रोजी नव्या स्तरावर पोहोचले याचा फायदा HDFC STANDARD लाइफच्या लिस्टिंगलाही झाला.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनने असे जाहीर केले की बँका आणी ASSET MANAGEMENT कंपन्यातील परदेशी मालकीवरील मर्यादा काढली जाईल. तसेच परदेशी कंपन्यांना स्थानीय सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करणाऱ्या कंपन्या आणी विमा कंपन्या याच्यात मेजॉरीटी स्टेक घेण्यास परवानगी दिली जाईल. या प्रकारे चीन हळू हळू आपली अर्थव्यवस्था परदेशी भांडवलास खुली करत आहे. चीनमध्ये धातुंसाठी असलेली मागणी कमी झाल्यामुळे झिंक. निकेल, स्टील यांचे भाव गडगडले. त्याबरोबरच या धातूंमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या कंपन्यांचे शेअर गडगडले.
 • UK ने असे जाहीर केले की ते मार्च २९ २०१९ रोजी युरोपिअन युनियन मधून बाहेर पडतील. या प्रकारे त्या दिवशी ब्रेकझीटची प्रक्रिया पुरी होईल.
 • व्हेनिझुएला या देशाच्या चलनाची किंमत फारच कमी झाल्यामुळे तो देश दिवाळखोर देश म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. व्हेनिझुएलाची सरकारी कंपनी PDUSA ने ONGC ला देणे असलेली रक्कम दिली नाही.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने Strategic विक्री करण्यासाठी १८ कंपन्यांची यादी बनवली आहे. या कंपन्यांकडे असलेली अनावश्यक जमीनही सरकार विकणार आहे. यात ड्रेजिंग कॉर्पोरेशन, सेन्ट्रल इलेक्ट्रॉनिक, स्कूटर्स इंडिया, हिंदुस्थान prefab आणी पवन हंस या कंपन्यांचा समावेश आहे.
 • भारत नेट फेज II सोमवारपासून सुरु झाली. यासाठी सरकारने Rs ३४००० कोटींचे टेंडर मागवले आहे.
 • EPFवर दिले जाणारे व्याज ८.६५% वरून ८.५०% करण्याचा सरकार विचार करत आहे.
 • सरकारने भारत ETF २२ हा एक्स्चेंज ट्रेडेड फंड मार्केटमध्ये आणला. या फंडात ६ सेक्टर मधील २२ कंपन्याचे शेअर्स असतील यापैकी १९ कंपन्या सरकारी तर ३ खाजगी क्षेत्रातील आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २०% कोटा आरक्षित ठेवण्यात आला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना ३% डीस्कॉउंट देण्यात आला. हा NFO (न्यू फंड ऑफर) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत ओपन राहीला. या फडाद्वारे सरकार Rs ८००० कोटी उभारेल.
 • दिल्ली NCR एरिआमध्ये वातावरणातील प्रदुशणाचे प्रमाण खूपच वाढले आहे. हे प्रदूषण डीझेल वापरणाऱ्या गाड्यांमुळे होते असा अंदाज आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट या गाड्यांच्या किमतीच्या एक निश्चित % पर्यावरण सेस लावण्याची शक्यता आहे. सरकारने BSVI इंधन वापरण्याचा कालावधी दिल्लीसाठी २०२० साला ऐवजी एप्रिल २०१८ पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणजे हे पेट्रोल आताच्या पेट्रोलपेक्षा महाग असेल. तसेच हे पेट्रोल वापरल्यावर गाडीचे ‘माईलेज’ कमी होईल. तसेच कार्सच्या किमतीही वाढतील.
 • सरकार सरकारी बँकांच्या रीकॅपीटलायझेशनबद्दल डिसेंबर २०१७ पर्यंत निर्णय घेईल.
 • सरकार आयात कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रोनिक वस्तू मोठ्या प्रमाणावर आयात होतात. त्यासंबंधीचे धोरण सरकार लवकरच जाहीर करेल. याचा परिणाम मर्क आणी BPL यांच्यावर होईल.
 • सरकारने दिल्ली NCR मधील बांधकामावर असलेली बंदी उठवली
 • सरकारने सर्व प्रकारच्या डाळी आणी पल्सेस यांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले.
 • सरकारने ‘FPI’ च्या निवेशाची मर्यादा ४९% केली. याचा फायदा पेट्रोनेट LNG( ४०% वरून ४९%) आणी ICICI लोम्बार्डला (२४% वरून ४९%) होईल.
 • सरकारने आपण जर डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड PAYtm यांच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर GST मध्ये २% सूट दिली जाईल असे जाहीर केले. याचा फायदा TVS इलेक्ट्रॉनिकला होईल.
 • सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कार्पेट एरिआ १२० वर्गमीटर एवढा केला आता या घरानांही सवलत मिळेल. याचा फायदा रिअल एस्टेट सेक्टर, हौसिंग फायनान्स आणी सिमेंट या सेक्टर्सना होईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सेबीने जानेवारी २०१८ पासून IPO ची प्रक्रिया T+३ करण्याचे ठरवले आहे, या प्रक्रियेप्रमाणे IPO बंद होण्याच्या दिवसापासून ३ दिवसांच्या आत शेअर्सचे लिस्टिंग होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ‘IIP’ आकडे आले. सप्टेंबर २०१७ साठी IIP निर्देशांकात ३.८% (ऑगस्ट मध्ये ४.५%) वाढ झाली. एकूण वाढ कमी  झाली असली तरी कॅपिटल गुड्स चे उत्पादन ७.४% ,इलेक्ट्रिसिटी, उत्पादन यांच्या निर्देशांकात लक्षणीय वाढ झाली. तसेच रोज वापरातील वस्तूंचे उत्पादन १०% ने वाढले ही वाढ ग्रामीण मागणी वाढली असल्याचे दाखवते.
 • ऑक्टोबर महिन्यात WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) ३.५९% ने वाढला. (सप्टेंबर महिन्यात २.६०% वाढला होता.) ही वाढ मुख्यतः अन्न धान्य आणी भाजीपाला, इंधन आणी उर्जा यांच्या किंमतीत झाली.
 • CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ऑक्टोबर २०१७ या महिन्यात ३.५८% ने वाढले. ही गेल्या सात महिन्यातली कमाल वाढ आहे. अन्नधान्य आणी भाजीपाला, इंधन उर्जा यांच्या बाबतीत जास्त वाढ दिसून आली.
 • MSCI निर्देशांकात काही बदल करण्यात आले. या निर्देशांकात ३० शेअर्सचा समावेश करण्यात आला तर १० शेअर्स वगळण्यात आले.
 • ऑक्टोबर २०१७ मध्ये भारताची निर्यात US $२३.१ बिलियन तर आयात US $ ३७.१ बिलियन झाली. ऑक्टोबर महिन्यासाठी ट्रेड डेफिसिट US $ १४ बिलियन एवढी झाली. GSTच्या बाबतीत असलेल्या अनिश्चिततेमुळे निर्यात कमी झाली.
 • ट्यूब इन्व्हेस्टमेंट हा शेअर ‘T’ ग्रूप मधून ‘B’ ग्रूप मध्ये आला आणी सर्किट वाढवून २०% केले.

खाजगी कंपनांच्या घडमोडी

 • AXIS बँकेत BAIN, CAPITAL INTERNATIONAL, (दोन्ही मिळून US $ १.६ बिलियन) आणी LIC US $२ मिलियनची गुंतवणूक शेअर्स आणी शेअर वारंटच्या स्वरूपात करेल. यामुळे बँकेची कॅपिटल ADEQUACY १८.६६% इतकी होईल. या व्यवहारातून बँक Rs ११६२६ कोटी भांडवल उभारेल.
 • JP ग्रूपची कंपनी जे पी इन्फ्राटेक पूर्ण किंवा अंशतः खरेदी करण्यात JSW ग्रूप. वेदान्ता,लोढाग्रूप आणी डच बँक यांनी रस दाखवला.
 • RCOM चा मुंबईतील पॉवर व्यवसाय अडाणी ट्रान्समिशन खरेदी करेल. हा सौदा Rs १६००० ते Rs १७००० कोटीमध्ये होईल.
 • लारसन आणी टुब्रो या कंपनीचा तिमाही निकाल चांगला आला. पण त्यांनी भविष्यातील ऑर्डर फ्लो चा गायडंस कमी केला.
 • आयडीया आपला टॉवर बिझिनेस ATC टेलिकॉम ला Rs ३८५० कोटींना विकेल. हा सौदा २०१८ च्या पहिल्या तिमाहीत पुरा होईल. तसेच वोडाफोनही आपला टॉवर बिझिनेस ATC टेलिकॉमला Rs ४००० कोटींना विकणार आहे.
 • अलाहाबाद बँक डिसेंबर २०१७ पर्यंत Rs १२६१ कोटीचे ६१ NPA अकौंट विकेल.
 • महिंद्र आणी महिंद्र आणी फोर्ड याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेदान कारसाठी JOINT वेंचर होईल. ही कंपनी मेक्सिकोच्या मार्केटमध्ये EV आणण्याची तयारी करत आहे.
 • इंडिया बुल्स हौसिंगने ओक नॉर्थ बँकेतील १०% हिस्सा Rs ७७० कोटीना विकला
 • USFDAने ल्युपिनच्या गोवा प्लांटसाठी वार्निंग लेटर इशु केले.
 • RECने ‘पतरातु’ प्रोजेक्टसाठी Rs १४००० कोटीचे कर्ज मंजूर केले.
 • ABBOT LAB, क्विक हिल, नेकटर लाईफसायन्सेस, गोदरेज फिलिप्स, न्यू इंडिया अशुअरंस, GIC, टेस्टी बाईट्स, मार्कसंस फार्मा यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • अडानी पॉवर, BASF, TSL, TD पॉवर या कंपन्या टर्नअराउंड झाल्या. कोल इडिया, आणी NCC चे निकाल असमाधानकारक आले.
 • पडबिद्री ब्लेड प्लांट सुझलोंनने संपामुळे बंद केला
 • जस्टीस लीग आणी तुम्हारी सुलू हे चित्रपट रिलीज होणार आहेत. याचा फायदा INOX आणी PVR यांना होईल.

कॉर्पोरेट एक्शन

 • वक्रांगी सॉफटवेअरने १:१ असा बोनस जाहीर केला
 • या आठवड्यातील लिस्टिंग न्यू इंडिया अशुअरन्स या कंपनीचे शेअर्स Rs७५० वर झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ७७० ला किरकोळ अर्जदारांना दिला होता.
 • एअरटेल या कंपनीने त्यांचा भारती इन्फ्राटेलमधील ४.४९% स्टेक Rs ३३२५ कोटींना विकला
 • EDELWEISS ही कंपनी Rs २८५ प्रती शेअर या भावाने QIP आणणार आहे.
 • नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात लोक देशी परदेशी प्रवासास जातात. आता पुन्हा क्रूडचे भाव कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना फायदा होईल.
 • RBL बँकेने स्वाधार फिनसर्वमध्ये २% हिस्सेदारी वाढवली. आता RBL ची हिस्सेदारी ६०% झाली.
 • क्रिसिलने PRAGMATIKS मध्ये १००% हिस्सेदारी खरेदी केली.

या आठवड्यातील लिस्टिंग

न्यू इंडिया अशुअरंसचे Rs ७५० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ८०० ला दिला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना Rs ७७० ला दिला होता.

खादीम इंडिया या काम्पानीच्या शेअर्सचे लिस्टिंग Rs ७३० (IPO किंमत Rs ७५०) वर झाले.

इंडिया इनफोलाईनमधून डीमर्ज झालेली कंपनी ५ पैसा.कॉम या कंपनीचे NSE वर Rs ४०० वर लिस्टिंग झाले.

(डीमर्जर या कॉर्पोरेट एक्शन विषयी सविस्तर माहिती ‘मार्केट आणी मी’ या माझ्या पुस्तकात दिली आहे)

मार्केटने काय शिकवले

९ दिवसांपासून मार्केटमध्ये ‘लोअर हाय लोअर लो’ होत आहे. बहुतेक वेळा ८ दिवसानंतर मार्केटचा ट्रेंड बदलतो. एखाद्या शेअरमध्ये रेकॉर्ड VOLUME असले तर तो शेअर काही दिवसांकरता कनसॉलिडेट होतो. घरातल्या एखाद्या व्यक्तीने काही चांगले काम केले तर घरातून त्याचे कौतुक होते. पण बाहेरच्या कुणी शाबासकी दिली बक्षीस दिले किंवा त्या कामाची दाखल घेतली, वर्तमान पत्रातून छापुन आले की त्याला अधिक महत्व प्राप्त होते. अशीच स्थिती मुडीजने रेटिंग वाढवल्यामुळे झाली.

भारतात मात्र सरकारला त्यांनी केलेल्या सुधारणासाठी टीकेला तोंड द्यावे लागत आहे. सामान्य जनतेला फक्त महागाई कमी झाली तरच सुधारणा झाली असे वाटते. पण सरकारच्या सुधारणांची आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीने दखल घेतली हे कौतुकास्पदच आहे. मार्केटनेही सलामी दिली. या सलामीचा फायदा मार्केट पडू लागल्यानंतर मार्केट पासून दूर गेलेल्या लोकांना झाला नाही.

मला मार्केट्ची तुलना बॉक्सिंगच्या खेळाशी करावीशी वाटते. बॉक्सिंगमध्ये खेळाडू पडतो पण पुन्हा उठतो पण मैदान सोडून पळत नाही. खेळात सुधारणा करतो त्याचवेळी यशस्वी होतो. हेच तत्व मार्केट मध्ये आचरणात आणल्यास तेजीचा आनंद लुटता येईल.

या आठवड्याचा शेवट आनंदात झाला. मार्केटने नवा उच्चांक प्रस्थापित केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३३४२, NSE निर्देशांक निफ्टी १०२८३ वर तर बँक निफ्टी २५७२८ वर बंद झाला.

3 thoughts on “आठवड्याचे-समालोचन – नाताळच्या आधी नाताळची भेट – १३ नोव्हेंबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – मूडीने रचला पाया S & P होईल का कळस? – २० नोव्हेंबर २०१७ ते २४ नोव्हेंबर २०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s