आठवड्याचे समालोचन – अती परिचयात अवज्ञा – २७ नोव्हेंबर २०१७ ते १ डिसेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अती परिचयात अवज्ञा – २७ नोव्हेंबर २०१७ ते १ डिसेंबर २०१७

S & P या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीने आपल्या रेटिंगमध्ये काहीही बदल केला नाही. त्यामुळे थोड्याश्या हिरमुसल्या अवस्थेत मार्केट्ची सुरुवात झाली. पण मार्केट नेहेमी भविष्यात येणार्या घटनांची चाहूल घेत असते. त्याप्रमाणे मार्केटने अंदाजपत्रक आणी गुजरातच्या निवडणुकावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. गुरुवारी नोव्हेंबरच्या एक्सपायरीच्या दिवशी मार्केट ५०० पॉईंट पडले. चांगलाच दणका मिळाला. सर्वजण बेसावध होते. त्यामुळे दणका जास्त जाणवला. स्टेट बँकेने बल्क डीपॉझीटवर वाढवलेल्या १% दरामुळे अर्थव्यवस्थेमध्ये लीक्विडीटीचा अभाव जाणवू लागला आहे की काय अशी आशंका मार्केटच्या मनात आली. त्यात जाहीर झालेला वित्तीय घाटा, फिस्कल डेफिसिट यामुळे मार्केट वेगाने पडू लागले. मार्केटने ‘सावधान, सावधान’ असा इशारा दिला.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये DR रेड्डी’ज वर क्लास एक्शन सूट दाखल केली. कंपनीने सांगितले की आम्ही या एक्शन सूटला आव्हान देऊ.
 • ADB (एशियन डीव्हलपमेंट बँक) ५ राज्यांना रस्ते बनवण्यासाठी Rs ५० कोटी कर्ज देईल.
 • USA मध्ये क्रूडचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे क्रूडच्या दराचा फायदा USA ला होईल. रशियाचा मार्केटशेअर कमी होत आहे.
 • OPEC देशांनी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऑफशोअर कंपन्यांचा फायदा होईल.

सरकारी अन्नौंसमेंट

 • गारमेंट निर्यातदारांना मिळणार्या सवलती २% वरून ४% वाढवल्या. याचा परिणाम गोकुळदास एक्स्पोर्ट,A B FASHION, गार्डन सिल्क, इंडोरामा सिंथेटिक, बन्सवारा सिंटेक्स, इंडोकौंट इंडस्ट्रीज, GHCL,डोनिअर इंडस्ट्रीज यांच्या शेअर्सवर होईल.
 • रेलवे ७००० किलोमीटर लोहमार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन करणार आहे. याचा परिणाम कल्पतरू पॉवरवर होईल. तसेच रेल्वे फार मोठ्या प्रमाणार लोहमार्ग टाकण्याचे काम करण्यासाठी टेंडर मागवणार आहे. जास्त लांबीचे लोहमार्ग टाकण्याचे काम ‘SAIL’ आणी JSPL या दोन कंपन्या करतात.
 • लोकसभेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत भरेल.
 • लवकरच सरकार जेम्स आणी ज्युवेलरी क्षेत्रासाठी एक PACKAGE जाहीर करेल असा अंदाज आहे. यात आयात ड्युटी १०% वरून हळूहळू ८% आणी ६% केली जाईल. मजुरांच्या बाबतीत कायदे बदलले जातील त्यांना संघटीत केले जाईल.
 • सरकारने ITDC मधील रांची येथील अशोल विहार या हॉटेलमधील स्टेक विकण्यासाठी बँकांची नियुक्ती केली आहे. हॉटेल पोन्डिचेरी अशोक लीजवर देण्यासाठी टेंडर मागवले आह.
 • NCR, राजस्थान, उत्तर प्रदेश, आणी हरयाणा या राज्यसरकारांनी पेटकोकच्या वापरावर बंदी घातली आहे. नैसर्गिक GASसाठी मागणी वाढल्यामुळे याचा परिणाम पेट्रोनेट LNG, IGL गेल यांच्या शेअरवर होईल.
 • सरकारने ‘क्वाड्रीसायकल’ साठी तत्वतः मंजुरी दिली. बजाज ऑटोच्या ‘QUTE’ ला मंजुरी मिळू शकते. याचा परिणाम बजाज ऑटोवर होईल.
 • सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांसाठी रीकॅपिटलायझेशन योजनेचा आराखडा पूर्ण करत आणला आहे. सरकार रीकॅपिटलायझेशन बॉंडसाठी संसदेची मंजुरी घेतल्यावर थेट सरकारी बंकाना हे बॉंड इशू करेल. तसेच सरकारने असे जाहीर केले की २०१८ या वित्तीय वर्षात कोणत्याही बँकांचे मर्जर होणार नाही.
 • दिल्ली राज्य सरकार १०,००० ऑटोसाठी लायसन्सेस इशू करणार आहे.
 • मद्रास फर्तीलायझर या कंपनीत सरकार सुधारणा करणार आहे. सरकार आपल्या स्टेकचे डायव्हेस्टमेंट करणार आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI आपली वित्तीय पोलिसी ६ डिसेंबर रोजी जाहीर करेल.
 • NCLT मध्ये चायना डेव्हलपमेंट बँकेने RCOMला दिलेले Rs ९००० कोटींचे कर्ज परत न केल्याबद्दल BANKRUPTCY साठी केस दाखल केली. RCOM आपला DTH बिझिनेस ‘BIG टीव्ही’ पेन्टेक आणी विकन मिडीया या कंपन्यांना विकणार आहे.
 • शाहजाहापूर कोर्टाने नेस्लेला फेल झालेल्या MAGI SAMPLEसाठी Rs ६२ लाख दंड ठोठावला.
 • IRDA P. E. गुंतवणूकदारांना SPV (स्पेशल पर्पज व्हेहिकल) द्वारा इन्शुरन्स कंपन्यात गुंतवणूक करायला सांगू शकते. या गुंतवणूकदारांसाठी १०% मर्यादा आणी ५ वर्षांचा लॉक-इन पिरीयड असू शकतो.
 • रहेजा ग्रूपवर आयकरखात्याने छापे टाकले. या ग्रूपची शॉपर स्टॉप ही कंपनी लिस्टेड आहे

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • इंडियाबुल्स रिअल इस्टेट F & O मधून २९ नोव्हेंबरला बाहेर पडेल. नार्वेच्या बँकेने डेन नेटवर्क्समध्ये मोठी गुंतवणूक केली. याचा परिणाम मुक्ता आर्ट्स, टीव्ही टुडे, टीव्ही 18, हाथवे केबल या कंपन्यांवर होईल.
 • क्रिसिलने इंडिया बुल्स हौसिंग चे लॉंग टर्म रेटिंग ‘AAA’ केले.
 • ऑक्टोबर महिन्यासाठी फिस्कल डेफीसिटचे आकडे आले. सरकार आपल्यासाठी प्रत्येक क्षेत्रात एक लक्ष्य निर्धारित करत असते.उदा :- सरकारचे करांपासून उत्पन्न, सरकारचे करांशिवाय इतर स्त्रोतांपासून उत्पन्न, फिस्कल डेफिसीट, सरकार करणार असलेला भांडवली खर्च आणी रेव्हेन्यू खर्च
 • जून २०१७ ते सप्टेंबर २०१७ या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या प्रगतीचा दर ६.३% राहिला (मार्च २०१७ ते जून २०१हा दर ५.७% होता. त्यामुळे आता असे वाटते आहे की GST आणी डीमॉनेटायझेशण यामुळे GDP च्या वाढीला बसलेली खीळ दूर झाली असून आता अर्थव्यवस्था नॉर्मल वेगाने प्रगती करेल.
 • अर्थव्यवस्थेच्या कोअर क्षेत्रातील वाढ ४.७% झाली. स्टील उत्पादन रिफायनरी प्रोडक्ट्सच्या उत्पादनात चांगली वाढ झाली.
 • यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या काळात फिस्कल डेफिसीट Rs ५.२५ लाख कोटी एवढी आली आहे. ही वित्तीय वर्ष २०१८च्या फिस्कल डेफिसीटच्या टार्गेटच्या ९६% आहे. भीती अशी वर्तवली जात आहे की वर्षअखेर फिस्कल डेफिसीट सरकारने ठरवलेल्या टार्गेटपेक्षा खूपच जास्त असेल.

 

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • अशोक LEYLANDने हीनो मोटर्स या जपानी कंपनीबरोबरचा युरो VI इंजिनच्या संबंधात केलेला करार रिन्यू केला. तसेच अशोक LEYLAND ने आपल्या UK मधील सबसिडीअरीतील स्टेक वाढवला.
 • ग्लेनमार्क फार्माच्या बद्दी युनिटच्या ६ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१७ या काळात केलेया तपासणीत ७ त्रुटी दाखवल्या.
 • सन फार्माने आपले ‘RIOMET’ हे औषध देशभरातून परत मागवले.
 • जिंदाल ड्रीलिंगला ONGC कडून ३ वर्षासाठी ऑफशोअर ड्रिलिंगसाठी ऑर्डर मिळाली.
 • इन्फोसिस ऱ्होड आयलंड मध्ये इनोव्हेटिव हब उभारणार आहे.
 • L&T ला Rs ३५७० कोटींची ऑर्डर मिळाली. L&T ला बांगलादेशमध्ये US $२५ कोटींची EPC ऑर्डर मिळाली.
 • भेलने मिझोराममध्ये ३० MW हायड्रो पॉवर युनिट लावले.
 • पार्श्वनाथ डेव्हलपर्स या कंपनीला Rs १०३० कोटींचे आर्बिट्रेशन अवार्ड मिळाले.
 • पेट्रोनेट LNG राजस्थानमध्ये GAS लीक्विफिकेशन युनिट लावणार आहे.
 • ओडिशामध्ये आयर्न ओअरच्या किंमती वाढवल्या. याचा परिणाम NMDC आणी JSPL यांच्यावर होईल.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया ने बल्क डीपॉझीटवरचे दर ५.२५% ते ५.७५% केले. या SBI च्या दर वाढवण्यामुळे मार्केटमध्ये लिक्वीडीटी कमी झाली कां! असे वाटल्यामुळे रुपयाचा विनिमय दर १ US $ = Rs ६४. वरून १US$=R६४.५४ इतका कमी झाला. यावर SBIने असे स्पष्टीकरण दिले आम्ही रेट १.९०% डीमॉनेटायझेशननंतर आलेल्या भरपूर कॅशमुळे रेट १.९०% कमी केला होता.
 • थंडीच्या दिवसात दुधाचा पुरवठा जास्त होतो. त्यामुळे डेअरी कंपन्यांचे मार्जिन वाढते. याचा परिणाम प्रभात डेअरी, क्वालिटी डेअरी यांच्यावर होईल.
 • ऑटोविक्रीचे आकडे आले. त्यामध्ये अशोक LEYLAND, मारुती, बजाज ऑटो यांची विक्री चांगली झाली. एस्कॉर्टस या कंपनीचे विक्रीचे आकडे चांगले आले नाहीत
 • ककातिया सिमेंटचा निकाल चांगला तर TBZ चे निकाल असमाधानकारक आले. मुक्ता आर्ट्स टर्न अराउंड झाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • IDBI च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने NSE मधील १.५ % स्टेक म्हणजे ७४ लाख शेअर्स विकायला परवानगी दिली.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • स्वराज इंजिन ह्या कंपनीला Rs २४०० प्रती शेअर या भावाने ३००००० शेअर्स ‘BUY BACK’ करण्यास बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मंजुरी दिली.
 • M&M फायनांस ही कंपनी महिंद्र एंड महिंद्र या कंपनीला प्रती शेअर Rs ४२२ या भावाने २.५ कोटी शेअर्स इशू करणार आहे.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • फ्युचर सप्लाय चेनचा Rs ६००० कोटींचा IPO ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०१७ या काळात चालू राहील या IPOचा प्राईस BAND Rs ६६० ते Rs ६६४ असेल. त्यामुळे फ्युचर ग्रूपच्या शेअर्सकडे मार्केटचे लक्ष असेल.
 • PNB हौसिंग फायनान्स ही कंपनी OFSच्या माध्यमातून १ कोटी शेअर्स विकणार आहे. या OFS ची फ्लोअर प्रेस Rs १३२५ आहे.
 • भारत इटीफ 22 हा एक्स्चेंज ट्रेडेड फंड Rs ३७.३३ प्रती युनिट लिस्टिंग झाला. याची NFOमध्ये प्रेस Rs ३५.८७ होती.
 • IDBI NSDLमधील २३.८३ % स्टेक विकणार आहे

 

मार्केटने काय शिकवले

F & O मध्ये एखाद्या शेअरमध्ये वाढणारी ओपन इंटरेस्ट पोझिशन, रोलओव्हर बघून १ महिन्यासाठी खरेदी करता येते.

एकूण VOLUME पैकी डेट्रेडचा VOLUME आणी डिलिव्हरीतील VOLUME यांच्याकडे लक्ष ठेवावे. जर डिलिव्हरीबेस्ड खरेदी जास्त असेल तर नजीकच्या भविष्यकाळात शेअरची किंमत वाढण्याची शक्यता असते. ट्रेडेड VOLUME जास्त असतील तर तो एखाद्या घटनेला, सरकारच्या धोरणाला मिळालेला तीव्र प्रतिसाद समजावा. पण हा अत्यंत अल्प कालीन असतो.

थंडीमध्ये हॉटेल क्षेत्र, विमानवाहतूक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, आदी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा फायदा होतो.

ADVANCE TAX कलेक्शन, RBI ची वित्तीय पॉलिसी, गुजराथमधील निवडणुकांचे तसेच युपी मधील निवडणुकांचे निकाल, म्युच्युअल फंडांची बोनस देण्यासाठी केलेली शेअर्सची विक्री, आणी अंदाजपत्रकाविषयी मार्केट तज्ञांचे अंदाज याकडे डिसेंबरमध्ये लक्ष ठेवावे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२८३३ वर, NSE निर्देशांक निफ्टी १०१२३ वर आणी बँक निफ्टी २५१९२ वर क्लोज झाले.

 

Advertisements

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – अती परिचयात अवज्ञा – २७ नोव्हेंबर २०१७ ते १ डिसेंबर २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – मार्केटमधील पौर्णिमा अमावास्या म्हणजेच तेजी किंवा मंदी – ४ डिसेंबर ते ८

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s