Stock market information in marathi

आठवड्याचे समालोचन – मार्केटमधील पौर्णिमा अमावास्या म्हणजेच तेजी किंवा मंदी – ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मार्केटमधील पौर्णिमा अमावास्या म्हणजेच तेजी किंवा मंदी – ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०१७

हा आठवडा निराशेचा गेला. ओखी वादळाचा प्रलय. रुद्रप्रयाग येथे झालेला भूकंप, USA मधील करविषयक धोरणात झालेला बदल आणी त्यासाठी मंजूर झालेले विधेयक, RBI ची पॉलिसी, ख्रिसमस जवळ आल्यामुळे FII ची सुरु असलेली विक्री, गुजरातच्या निवडणुकांच्या निकालाविषयी व्यक्त होणारे उलटसुलट अंदाज या सगळ्या गोंधळातच संपला. ९७०० हे निफ्टीचे २०० दिवसांचे MOVING AVERAGE आहे. जर गुरुवार तारीख ७ डिसेंबर रोजी आलेली तेजी ही टिकाऊ नसेल तर हि RALLY ‘PULLBACK RALLY’ किंवा ‘रिलीफ RALLY’ समजावी. ह्याच्या नंतर जेव्हा मार्केट पडू लागेल तेव्हां त्याला ९७०० वर सपोर्ट मिळेल असं एकू येतंय

आंतरराष्ट्रीय घटना

 • चीनमध्ये प्रदुषणाच्या कारणासाठी रद्दीपासून पल्प बनवण्यावर बंदी घातली. त्यामुळे चीनच्या पेपर उद्योगावर विपरीत परिणाम होईल. याच कारणामुळे भारतातील पेपर उद्योगाला चांगली संधी उपलब्ध होईल – उदा स्टार पेपर, J K पेपर, वेस्ट कोस्ट पेपर
 • USA मध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी वचन दिल्याप्रमाणे कर सुधारणा विधेयक USA च्या सिनेट मध्ये पास झाले. तसेच ट्रम्प यांना विशिष्ट देशाच्या नागरिकांना USA मध्ये प्रवेश करण्यास बंदी घालणारा कायदा करण्यास USA च्या सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली
 • USA मधील JOBLESS CLAIM कमी कमी होत असल्यामुळे या गोष्टीचा परिणाम फेडच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या मीटिंग मधील निर्णयावर होईल. फेड या मीटिंगमध्ये दर वाढविण्याचा निर्णय घेईल.

सरकारी अन्नौंसमेंट

 • वित्तीय वर्ष २०१८ साठी वार्षिक अंदाजपत्रक १ फेब्रुवारी २०१८ रोजी सादर केले जाईल.
 • ३१ डिसेंबरनंतर साखरेवरील स्टॉक लिमिट उठवले जाणार आहे तसेच साखरेवर इम्पोर्ट ड्युटी बसवणार आहे.
 • सरकारने निर्यातदारांसाठी Rs ८४५० कोटींचे PACKAGE जाहीर केले. यात मुख्यतः LABOUR INTENSIVE उद्योगांचा समावेश आहे. यात शेती, चर्म उद्योग, मच्छी आणी इतर समुद्री पदार्थ, टेलिकॉम आणी इलेक्ट्रॉनिक उत्पादने,वैद्यकीय आणी सर्जिकल साधने, गारमेंट्स आणी मेडप्स आणी विविध सेवांचा समावेश आहे. सरकारने MEIS (MERCHANT EXPORTER INCENTIVE SCHEME) या योजनेखाली चर्म उद्योग, अग्रो प्रोडक्टस्, टेक्स्टाईल, आणी कार्पेट उद्योगांसाठी दिली जाणारी इंसेनटिव्ह २% वरून ४% केली.. याचा परिणाम हाटसन अग्रो, अपेक्स फ्रोझन फूड्स, अवंती फूड्स
 • खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना DBT योजने खाली उरलेली रक्कम (सुमारे Rs २३००० कोटी) सबसिडीच्या स्वरूपात दिली जाणार आहे.
 • सरकारने ताग आणी तागापासून उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी Rs ९२५ कोटी राखून ठेवले आहेत. याचा परिणाम CHEVIOT, GLOSTER, LUDLOW या ताग उद्योगात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांवर होईल.
 • सरकारचे २०२० सालापर्यंत निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. याचा परिणाम वेळोवेळी निर्यात क्षेत्रात कार्यरत असणार्या कंपन्यांना होईल. उदा गुजरात अंबुजा export, गोकुळदास export
 • DGFT ने फॉरीन ट्रेड पोलीसीचा आढावा घेताना इम्पोर्ट आणी एकसपोर्ट कोड मिळण्यासाठी असलेले नियम शिथिल केले.
 • GST कौन्सिलची पुढील मीटिंग जानेवारी २०१८ मध्ये होईल. सरकार सोन्यावरील GST ३% वरून ९% करणार आहे आणी इम्पोर्ट ड्युटी कमी करणार आहे.
 • केरळ राज्य सरकार मद्यार्क सेवनासाठी मर्यादा २१ वर्षावरून २३ वर्ष करण्याचा विचार करत आहे.
 • सरकार नागरिकाला २४ तास अविरत विजेचा पुरवठा होणे हा एक मुलभूत हक्क करण्याच्या विचारात आहे. सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यातील नागरिकांना असा अविरत २४ तास वीज पुरवठा मार्च २०१९ पासुन करावा असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.
 • सरकार ‘युनिटेक’ या रिअल्टी क्षेत्रातील अडचणीत असलेल्या कंपनीला जनहितार्थ ताब्यात घेण्याचा विचार करत आहे. सरकारने या आशयाचा विनंती अर्ज NCLT मध्ये दाखल केला आहे. जर सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली तर तो FLAT बुक केलेल्या ग्राहकांना, डीपॉझीट होल्डर्स तसेच भाग धारकांना दिलासा ठरेल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

RBI ने आपले द्विमासिक वित्तीय धोरण ६ डिसेंबर रोजी जाहीर केले.RBI ने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, MSF या महत्वाच्या रेटमध्ये कोणताही बदल केला नाही RBI ने महागाई वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत वाढेल अशी भीती व्यक्त केली. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना इशारा दिला की त्यांनी आपल्यात विविध प्रकारचे रीफॉर्म्स केले पाहिजेत. त्यांच्या कारभारातील आणी कर्ज देण्याच्या पद्धतीतील सुधारणा बघूनच त्यांना देण्यात येणारी रीकॅपिटलायझेशनची मर्यादा ठरवली जाईल.

RBI ने डिजिटल व्यवहाराला उत्तेजन देण्यासाठी MDR (‘मर्चंट डीसकौंट रेट’) ची कमाल मर्यादा ठरवली. यासाठी RBI ने  Rs २० लाखांपेक्षा कमी टर्नओव्हर म्हणजे स्माल मर्चंट आणी Rs २० लाखांपेक्षा जास्त टर्न ओव्हर असलेले लार्जर मर्चंट अशी विभागणी केली. तसेच फिझीकल POS वापरणारे आणी QR कोड वापरणारे अशी विभागणी केली.

स्माल मर्चंट जे फिझीकल POS वापरतात त्यासाठी MDR @ ०.४०%असा रेट ठरवला आणी Rs २०० ही कमाल मर्यादा ठरवली. QR कोड बेस्ड व्यवहारासाठी MDR @ ०.३०% आणी कमाल अर्यादा Rs २०० ठेवली. लार्जर मर्चंट्ससाठी फिझीकल POS व्यवहारासाठी MDR @ ०.९०% तर कमाल मर्यादा Rs १००० ठेवली. QR कोड बेस्ड व्यवहारासाठी MDR @ ०.३०% तर कमाल मर्यादा Rs १००० ठरवली. MDR म्हणजे डिजिटल व्यवहारासाठी मर्चंट ग्राहकांना जे चार्जेस लावतात ते चार्ज.

RBI ने परदेशातील भारतीय बँकांच्या युनिट्सला AAA रेटेड सार्वजनिक आणी खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या ‘ EXTERNAL COMMERCIAL BORROWING’ चे रीफायनांस करण्याची परवानगी दिली.

ISMA ने असा अंदाज व्यक्त केला आहे की OMCना ओईल मध्ये ब्लेन्डीग करण्यासाठी केल्या जाणाऱ्या इथनॉल च्या पुरवठ्यात वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये ७१% वाढ होईल. त्यामुळे साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नात Rs ४५०० कोटींची वाढ होईल. त्यांनी यासाठी वाढलेली इथनॉलची किमत आणी उसाची वाढती लागवड ही कारणे दिली आहेत.

सेबी ने प्रकाश इंडस्ट्रीज,  जे कुमार इन्फ्रा आणी SQS इंडिया या कंपन्यांना शेल कंपन्यांच्या बाबतीत क्लीन चीट दिली. ARSS इन्फ्रा या कंपनीचे फोरेन्सिक ऑडीट करायला सांगितले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • बायोकॉन मायलॉन यांच्या ‘ओगीवरी’ या पोटाच्या आणी ब्रेस्ट कॅन्सरवरील औषधासाठी USFDAची मंजुरी मिळाली.
 • इन्फोसिसचा CEO साठी चालू असलेला शोध पूर्ण झाला. आता ‘कॅपजेमिनी’ या कंपनीतून आलेले श्री सलील पारेख हे १ जानेवारी २०१८ पासून CEO म्हणून इन्फोसिसमध्ये सूत्रे हातात घेतील.
 • ABBOT LAB या कंपनीला एका औषधाची किंमत एका वर्षांच्याआत ३०% ते ३५% वाढवण्याच्या बाबतीत NPPA नोटीस देणार आहे. एका वर्षात फक्त १०% पर्यंत किमत वाढवता येते.
 • पेटकोक आणी SANDवरील बंदीमुळे सिमेंट कंपन्यांच्या मार्जीनवर परिणाम होईल.
 • मद्रास फरटीलायझर या कंपनीवर असलेल्या कर्जाचे रुपांतर इक्विटीमध्ये केले जाणार आहे.
 • DR रेडी’जच्या हेंदराबाद येथील मियापूर प्लांटसाठी USFDA कडून EIR मिळाला.
 • टाटा प्रोजेक्ट JV ला मुंबईमध्ये ट्रान्सहार्बर प्रोजेक्टसाठी Rs ५६०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • ज्युबिलीयंट फूड्स या कंपनीला गुजराथमध्ये Rs २५० कोटींचा कीटकनाशक औषधे बनवणाऱ्या प्लांटसाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली
 • FIEM इंडस्ट्रीजने एशियन इंडस्ट्रीज आणी टोयोटा T SUSHO या कंपन्यांबरोबर JVसाठी करार केला.
 • भारती एअरटेलने जगरनॉट बुक्स मध्ये स्टेक खरेदी केला.
 • विप्रो विरुद्ध ‘NATIONAL GRID’ ने USA मधील कोर्टात US $ १४ कोटींचा दावा दाखल केला.
 • गोदरेजने आपला फर्निचरचा नवा BRAND ‘स्क्रिप्ट’ मार्केट मध्ये आणला. ही कंपनी ३ शहरात ३ नवीन स्टोअर्स उघडेल.
 • बालाजी अमाईन्स या कंपनीला महाराष्ट्र सरकारने मेगा प्रोजेक्ट योजनेखाली ६५ एकर जमीन दिली. या जमिनीचा उपयोग कंपनी आपल्या विस्तार प्रकल्पासाठी करेल.
 • HPCL BPCL यांनी ५ वर्षासाठी चार्टर्ड शिपसाठी टेंडर मागवले.
 • USA मध्ये सतत ५व्या महिन्यात क्लास 8 ट्रकची विक्री वाढली. भारत फोर्ज या कंपनीचे ४०% उत्पन्न यावर अवलंबून आहे.
 • स्टील कॉपर, निकेल या धातूंच्या किंमती कमी होत आहेत. याचा परिणाम वेदान्ता, टाटा स्टील, हिंदाल्को यांच्यावर होईल. पाईप बनवणाऱ्या कंपन्यांच्या रॉ मटेरीअलची किंमत कमी झाल्यामुळे त्यांना फायदा होईल.
 • रबराच्या किंमती कमी झाल्या आहेत याचा फायदा टायर कंपन्यांना होईल. अपोलो टायर्स, सीएट, MRF याना होईल.
 • लेडच्या किंमती कमी होत आहेत. याचा फायदा कारसाठी BATTERY बनवणार्या कंपन्यांना होईल – अमर राजा, एक्झाईड
 • शिल्पा मेडिकेअरच्या तेलंगणातील युनिटच्या तपासणीत USFDA ने १० त्रुटी दाखवल्या.
 • गुजरात अल्कली या कंपनीला ANTITRUST बॉडीने Rs १.८८ कोटी दंड ठोठावला होता APELLATE औथोरीटीने या साठी स्टे दिला.
 • गोदरेज एअरोस्पेस या कंपनीला ब्राह्मोस मिसाईल्सच्या ११० एअरफ्रेम बनवण्याचे काम मिळाले.
 • IDBI NSDL मधील ७% स्टेक विकणार आहे.
 • IRB इन्फ्रा या कंपनीवर CBI ने चार्जशीट दाखल केली
 • ‘प्रदूषण’ या थीम वर बरेच संशोधन होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिसिटी किंवा GAS वर चालणारी वाहने उपयोगात आणणे हा एक प्रदूषण टाळण्याचा उपाय म्हणून पुढे येऊ शकतो. याचा परिणाम ‘EKC’ ‘IGL’ ‘MGL’ , पेट्रोनेट LNG आणी गेल या कंपन्यांवर होईल
 • L&T हायड्रोकार्बन या कंपनीला Rs १६०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • बँक खाते तसेच मोबाईल बरोबर आधार लिंक करण्यासाठी आता सरकारने ३१ मार्च २०१८ ही तारीख निश्चित केली.
 • इन्फोसिसच्या पूर्व CFO च्या सेव्हरंस PACKAGEचा विवाद सोडवणार आहे. त्यांनी तसे सेबीला कळवले आहे. ते चूक मान्यही करत नाहीत किंवा नकारही देत नाहीत. पण गाठ सुटावी अशी इच्छा व्यक्त करीत आहेत. नवीन CEOना जुनी गाठोडी खांदयावर वाहायची नाहीत असे दिसते.
 • श्रीराम EPC या कंपनीचा निकाल चांगला आला. तर जेट एअरवेजचा निकाल असमाधानकारक आला.
 • पडबिद्री येथील प्लांटमध्ये समझौता झाल्यामुळे आता सुझलॉन तेथे पुन्हा काम सुरु करेल.
 • युनियन बंकेने Rs १६२.७९ प्रती शेअर तर बँक ऑफ महाराष्ट्रने Rs २२.५५ प्रती शेअर आर NCLने Rs २४९.६३ या दराने QIP इशू आणले.
 • SAIL या सार्वजनीक क्षेत्रातील सरकारी कंपनीने आर्सेलर मित्तल या कम्पनीबरोबर ऑटोमोटिव्ह स्टील उत्पादन करण्यासाठी US $ १ बिलियन JV करण्यावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची तातडीने बैठक बोलावली आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • PNB ने PNB हौसिंग फायनांस कंपनीचे ९८००० शेअर्स Rs १३२० कोटींना विकले.
 • इन्फोसिस आणी विप्रो या IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा BUYBACK अनुक्रमे १४ डिसेंबर २०१७ आणी १३ डिसेंबरपर्यंत चालू राहील. आपल्याकडे या कंपन्यांचे शेअर्स असतील तर कंपनी आपल्याकडील किती शेअर्स कंपनी जाहीर केलेल्या रेटला BUYBACK करील हे टेंडर फॉर्म पाठवून आपल्याला कळवेल. आपल्याला हा फॉर्म मिळाला नाहीतर आपण कंपनीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता. आपल्याजवळील सर्व शेअर्स सुद्धा आपण BUYBACK साठी कंपनीला ऑफर करू शकता. आपल्याला आपला जिथे DEMAT अकौंट असेल तेथे DIS भरून हे शेअर्स क्लीअरिंग कॉर्पोरेशनने दिलेल्या अकौंटमध्ये आणी SETTLEMENT नंबरमध्ये ट्रान्स्फर करावे लागतील. हे दोन्ही नंबर आपला ब्रोकर आपल्याला देऊ शकेल. हे शेअर्स ट्रान्स्फर झाल्यावर आपला ब्रोकर ते कंपनीला BUYBACK साठी ऑफर करू शकेल. आपले शेअर्स वर दिलेल्या तारखेच्या आत कंपनीला BUYBACK साठी ऑफर व्हायला पाहिजेत. BUYBACK ची रक्कम आपल्या बचत खात्यात थेट जमा केली जाईल.
 • हाटसन अग्रोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने Rs ९०० कोटींच्या राईट्स इशुला मंजुरी दिली.
 • क्लारीस लाईफसायन्सेसचा शेअर डीलिस्ट होणार आहे. यासाठी IDFCची नेमणूक केली आहे. कंपनीजवळ Rs ३८१ प्रती शेअर कॅश आहे. ‘रिव्हर्स बुक बिल्डींग’ पद्धतीने डीलिस्टिंग केले जाईल. म्हणजेच शेअरहोल्डर किती रुपयाला शेअर्स द्यायला तयार आहेत ते त्यांनी कळवायचे असते. जी किंमत ठरेल त्या किमतीला डीलिस्टिंग होते (डीलिस्टिंगच्या प्रक्रीयेविषयी माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात खुलासेवार माहिती दिली आहे.)

या आठवड्यात आलेले IPO

SHALBY हॉस्पिटल्सचा IPO ५ डिसेंबरला ओपन होऊन ७ डिसेंबरला बंद झाला. प्राईस BAND Rs २४५ ते २४८ असून मिनिमम लॉट ६० शेअर्सचा आहे. या कंपनीची ११ हॉस्पिटल्स आहेत. आणी नजीकच्या भविष्यात इंदोर जयपूर आणी मुंबई येथे हॉस्पिटल्स चालू करण्याचा इरादा आहे. इशू साईझ Rs ५०४ कोटींची असून यापैकी Rs ४८० कोटींचे नवीन शेअर्स इशू केले जातीलया IPOचा पैसा कंपनीकडे येणार असला तरी कंपनीकडे ग्रोथ प्लान नाही. कंपनी IPOचे प्रोसीड्स कर्ज फेडण्यासाठी वापरेल. तसेच हे स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, मल्टी स्पेशालिटी नव्हे. हल्ली सरकारचे लक्ष हॉस्पिटल क्षेत्रातील प्रॉफीट मार्जिनकडे वेधल्यामुळे सरकार विविध शस्त्रक्रियांचे कमाल दर ठरवण्याची शक्यता आहे. हा इशू २.८२ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.

‘फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्स’ या कंपनीचा IPO डिसेंबर ६ ला ओपन होऊन ८ डिसेंबरला बंद झाला. ही कंपनी. प्राईस BAND Rs ६६० ते Rs ६६४ चा होता. मिनिमम लोट २२ शेअर्सचा आहे. इशू साईझ Rs ६४६ ते Rs ६५० कोटींची होती. ही कंपनी लोजिस्टिकच्या तीन सेगमेंटमध्ये काम करते. CONTRACT, एक्स्प्रेस, TEMPERATURE CONTROLLED लॉजिस्टिक्स. या कंपनीचे शेअर्स काहीसे महाग ऑफर केले आहेत. या सेक्टरला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा दिल्यामुळे GST चा फायदा मिळेल.

मार्केटने काय शिकवले

एल आय सी हा शेअर मार्केटमधील काही मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. बँकेत ठेवलेल्या मुदतीच्या जमा ठेवींवरील तसेच इतर गुंतवणुकीवरील व्याजाचा दर कमी झाल्यामुळे आता LIC ला आपल्या शेअरमार्केटमधील गुंतवणुकीला लगाम घालावा लागेल. एवढेच नाहीतर वेळोवेळी शेअर्स विकून प्रॉफीट बुकिंग करावे लागेल. शेअरमार्केट मधून योग्यवेळी एन्ट्री करून योग्य वेळेला एक्झिट करू पण मार्केटमध्ये गुंतवणूक करत राहू असे LIC ने सांगितले. नाहीतर शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम त्यांच्या पॉलिसीधारकांना द्यायच्या बोनसवर होईल अशी त्यांना भीती वाटते. यावरून आपण शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्याजवळील पैसा आणी आपण त्यातील आपल्या इतर खर्चांवर परिणाम न होता किती पैसा शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो याचे भान असणे  अत्यावश्यक आहे. तसेच आपल्या गुंतवणुक सुरक्षित आहे की नाही हे बघणेही आवश्यक आहे. जर आपल्याला सतत तोटा होत असेल तर त्याची कारणे शोधून ती दूर केली पाहिजेत. रिस्क रिवार्ड रेशियो लक्षात घेवूनच शेअर्समध्ये व्यवहार करावेत.

मार्केटमध्ये पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. असे म्हणतात “BOOKING THE PROFIT IS MORE IMPORTANT THAN PROFIT IN BOOKS”

(१)आपल्या गुंतवणुकीचे रक्षण करणे.

(२)शक्यतो तोटा होऊ न देणे

(३)वेळेवर प्रॉफीट बुक करणे

(४)वेळेवर आणी कमीतकमी नुकसान आणी जास्तीतजास्त फायदा होईल असा निर्णय घेण्याची क्षमता आपल्या अंगी बाणवणे

लोक मार्केट पडू लागले की एकच निर्णय घेतात पुन्हा मार्केटमध्ये घुसायचे नाही. आपल्याला जमणार नाही. त्याऐवजी प्रॉफीट बुक करणे, स्वस्तात काही चांगल्या शेअर्सची खरेदी करणे आपल्या पोर्टफोलिओचे सिंहावलोकन करून त्यातील तोट्यात चालणारे शेअर्स विक्रीसाठी निश्चित करणे तसेच आपल्याला फायदेशीर वाटणार्या कंपन्यांचे शेअर्स खरेदीसाठी निश्चित करणे. आणी सर्व धैर्य गोळा करून मार्केट सुधारण्याची ‘अशुभस्य काल हरणं’ म्हणत वाट पहाणे. जगबुडी झाल्याप्रमाणे हातपाय गाळून बसू नये किंवा घाईघाईने सर्व शेअर्स येईल त्या भावाला विकून टाकू नयेत अशावेळी सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून कृती केल्यास वरील चार गोष्टी आपण अमलात आणू शकतो.

मार्केट पडत असेल तेव्हा कॅश सेगमेंट आणी वायदे बाजारात दोन्हीकडे VOLUME आणी ओपन इंटरेस्ट वाढत असेल तर मंदी येणार हे निश्चित होते.

गुजरात निवडणुकांचा एक्झिट पोल १४ डिसेंबरला येईल. तसेच ADVANCE आयकर भरण्यासाठी सुरु असलेली विक्री थांबेल, येते ४ ते ५ दिवस सावध पवित्रा घेतल्यास उरलेला डिसेंबर महिना चांगला जाण्यास हरकत नाही.

BSE निर्देशांक सेसेक्स ३३२५० NSE निर्देशांक निफ्टी १०२६५ बँक निफ्टी २५३२१ वर बंद झाले.

 

One thought on “आठवड्याचे समालोचन – मार्केटमधील पौर्णिमा अमावास्या म्हणजेच तेजी किंवा मंदी – ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०१७

 1. पिंगबॅक अनामित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s